घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना
लेखनविषय:
काव्यरस
घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना
नाही जमेस काही आयुष्य मोजताना
भाळून चालते का लाटेवरी कुणाच्या
काळीज सागराचे घेऊन हिंडताना
ना घातली हवा तू राखेस एकदाही
सारी हयात गेली अंगार शोधताना
आहेत कान त्यांच्या भिंतीस जाणतो मी
आवाज होत नाही स्वप्नात बोलताना
होतो बर्याचदा मी माझाच हाडवैरी
बेभान अक्षरांचे आसूड ओढताना
- उपटसुंभ
वाचने
5138
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
अप्रतिम.
सुरेख! सुरेख!! उपटसुंभ!
काय एकेक शेर आहे देवा...शरच जणु. मोजुन दोन मिनिटात काळजात उलथापालथ झाली!
तसा मी काव्यप्रकारांच्या वार्यालाही न थांबणारा, पण खरं सांगतो, नुसत्या शिर्शकानं हलवून सोडलं मला अन आपसुकच धागा उघडला
साला, ओळीओळीतलं दर्द. उरात झिरपलं!
जियो! जियो!! .
In reply to आईग्ग्गं! by धमाल मुलगा
उपटसुंभ साहेब, बारामतीकरांचा प्रतिसाद लाभला या गझलला, सोन झालं गझलेच.
In reply to आईग्ग्गं! by धमाल मुलगा
नुसत्या शिर्शकानं हलवून सोडलं मला अन आपसुकच धागा उघडलारसिक आहेस :)
व्वा.
अतिशय सुरेख.
अपर्णातैची परवानगी न घेता त्यांची स्वाक्षरी वापरुन एवढेच म्हणेन
शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
गझल आवडली.
खूप छान लिहिलंय.
आवडली
आहेत कान त्यांच्या भिंतीस जाणतो मी आवाज होत नाही स्वप्नात बोलतानाकाय बोललात राव! तगडं लिखाण.
In reply to आहेत कान त्यांच्या भिंतीस by अग्निकोल्हा
स्वारी हं गिल्फुकाका .. पण मी खरच तंगडं लिखान वाचलं
आणि =))
मग तो टिंब अनुस्वार नीट जागेवर ठेवला ... आणि
मग एकदम तगडं लिखान :)
उपट्सुंभ्या खुपच छान रचना शब्दांची .
अतिशय सुंदर गझल
मस्त गझल.
आवडली रचना.
-दिलीप बिरुटे
दर्दभरी रचना.
सुंदर रचना. अजून येउ देत. :)
लगे रहो.
झक्कासच लिहिलय....। :-)
समांतर- अशीच एक रचना...अगदी वृत्त साधर्म्य/आणी रचना साधर्म्यही असलेली... :-)
http://www.misalpav.com/node/23352
फेटा उडवण्यात आलेला आहे..
होतो बर्याचदा मी माझाच हाडवैरी बेभान अक्षरांचे आसूड ओढतानाव्वा व्वा काय शेर लिहिलाय उत्त्म...
मला ते मिसरा, सानी-मिसरा, मक्ता असलं काही कळत नाही. इतकंच कळलं कि गझल खूपच आवडलेली आहे. मजा आया तो रिप्लाय देने मे कंजुसी नै करनेका :)
प्रत्येक शेर सव्वाशेर! अतिशय उत्तम गझल!
अप्रतीम गझल.
घायाळ पापण्यांनी मैफ़ील सोडताना नाही जमेस काही आयुष्य मोजतानाहा अनूभव घेतला आहे. :(
:)
छान लिहिले आहे..
खुप दिवसांनी काव्य विभागात आले अन त्याच सार्थक झाल :)
वाह!!
शिर्षकामूळे धागा आपोआप उघडला जातोय. खरं सांगू, हि रचना तूमच्या आयडीला बिलकूल साजेशी वाटत नाहीये.
In reply to वाह!! by किसन शिंदे
तूमच्या आयडीला बिलकूल साजेशी वाटत नाहीये.कसं काय? रचनेच्या सौंदर्याबद्दल दुमत नहिये पण इतर कोणत्याही धाग्यावर प्रतिसाद न देता बक्ककरून कविता टाकणारा आयडी उपटसुंभ का असू नये बरं? उपटसुंभचा दुसरा अर्थ आहे काय?
In reply to कस्काय? by दादा कोंडके
त्याचं काय आहे दादा, आम्ही वरचेवर हॉटेलात येत नाही. येतो ते असे मधेच आणि काहीबाही टाकून (इथे अर्थ पोस्ट करून, भलता अर्थ नको :)))निघून जातो. नियमीत येणं नसल्यामुळे फारशी ओळखही नाही इथे कुणाशी. त्यामुळे हे सगळं उपटसुंभपणाला साजेसं वर्तन आहे.
बाकी माहिती खात्यावर कळेलच..!
आता नियमीतपणे येण्याचा प्रयत्न करु.
अतिशय आवडली... प्रतिसादात आणखी लिहिण्यासाठी काळीज जागेवर नाही ...
सुंदर गझल ..
प्रत्येक शेर सव्वाशेर! अतिशय उत्तम गझल!+१
सुरेख!!
अप्रतिम रचना
अप्रतिम.