तसा तो एकदम 'बेस्ट' पोरगा, निदान आमच्या गँगमधल्या सगळया जणी आणि हो, जणसुध्दा त्याला तसंच म्हणतात. काय नाही आहे त्याच्याकडे? पैसा, रूप, चारित्र्य आणि आनंदी स्वभाव, कष्ट करायला त्याला आवडते. आणि, त्या कष्टाचं चीज झाल्यावर चीज पिझझा खात तो एखाद्या मॉलमध्ये मजादेखील करतो. थोडक्यात '' ए सो कूल यंग मॅन!''
हा, पण आजकाल त्याच थोडं बिनसलय, मला एकटयाला त्याचे कारण माहित आहे. मलाच का माहित बरे? असो, त्याने मला नाही सांगितलेले पण त्याच्या वागण्यातुन सारं पाण्यासारखे स्वच्छ दिसतयं. मग हातच्या कंकणाला आरसा कशाला? खरं तर, हा मॉर्डर्न पोरगा!