अवतार
लेखनप्रकार
असाच एक वृद्धाश्रम.
वृद्धाश्रम पेक्षा ३स्टार हॉटेल अथवा सॅनिटोरीयम.
पैसा ठेवायला जागा नसलेल्या,अल्शेशियन,डालमेशन वगैरे साठी जागा असलेल्या,
मात्र वृद्ध पालकांसाठी जागा नसलेल्या शिरीमंतानी बांधलेले.
चकचकीत रिसेप्शन च्या मागे एक मोठा फोटो.
निरखुन बघत होतो मी.
एरवी अशा ठीकाणी मिळतात त्यापेक्षा वेगळा, मद्दड न दिसणारा मॅनेजर.
माझ्या निरखण्याला रोखुन बघणारा.
"काय, बघताहात हो साहेब त्या फोटोकडे, काय एवढे विषेश आहे त्यात?
तुम्हाला देणगीदाराच्या तोंडावर विष्णुअवतार दिसतोय का हो? अगदी मागच्या तेजोमय चक्रासकट.
मॅनेजर हसला.
"सगळेच नसतात हो तसे. काही अपवाद पण असतात की. आता बघा ना परवा एक गृहस्थ आले, एक लाख रुपये देउन गेले. कुठही नाव नको म्हणाले. अगदी व्हाईट इनकमचा ड्राफ्ट"
"तुम्ही काय करता "?
मी सांगितले.
" ह्या क्षेत्रात पण अवतार व्हायला खुप स्कोप असतो की. तुमचा होतो की नाही?"
खिशात फणी बाळगतो. कार्यक्रम झाला की लगेच केस विंचरतो. त्या निमित्ताने थोडेफार चक्र आले तर ते लगेच पुसुन टाकतो.
तो परत हसला.
" तुमचा ट्रिगर काय" समाजाचे देणे परत फेड्णे वगैरे."
छे. मला त्यात आनंद मिळतो. पैशापेक्षा मोठा. अगदी सेल्फिश मोटीव्ह. म्हणुन फावल्या वेळात करतो.
तुम्ही? मी विचारले.
"भरपुर कमावले. २० वर्षे अमेरिकेत होतो. मुलांसाठी भरपुर करुन ठेवले आहे. बायको गेल्यावर आत ह्या म्हातार्यांची सेवा करतो. माझ्या आई वडीलांसाठी काहीही करु शकलो नाही ह्या बोचणी वर उतारा. माझा ट्रिगर. अवताराचा प्रश्नच नाही"
मी विचार करु लागलो.
असे दोन पायाचे अवतार रोज भेटतात की.
सणाच्या आदल्या दिवशी टाकीचा नळ वाहतो. मुश्कीलीने प्लंबर मिळतो. नळ दुरुस्त होतो. बायकोने पैसे हातात देउन थँक यु म्हटल्यावर त्याच्या तोंडावर 'तारणहार' दिसतोच की.फोन केल्यावर लगेच येउन नेट दुरुस्त करणारा एम्.टी.एन्.एल वाल्यात पण हा दिसतो.
शेजारणी ला रात्री अचानक खुप पोटात दुखल्यावर एक प्रसिद्ध डॉक्टर येतात. बरोबर कार्डीओग्राम पण असतो. आता पोटातील दुखण्याला हे अस्त्र का, असा प्रश्न रात्री दोन वाजता कसा विचारायचा?
निदान होते. इंजेक्शन दिले जाते. अर्ध्या तासात दुखणे थांबते. १५०० रुपये फी घेउन डॉक्टर निघतात. नवरा अगदी सदगदीत. डॉ.कटर लगेच शाहु मोडक, अभि भट्टाचार्य, अरुण गोविल, नितिश मुद्रेत. फक्त बॅग्राउंड वर शंख ध्वनी नसतो.
__________________________________________
असाच एक कार्यक्रम संपवुन 'पोस्ट कुलींग प्रोसेस' ला मी लांब एकटाच बसलेलो.कधी नव्हे तो कार्यक्रमात एक छोटीशी चुक. त्याची व्यथा. प्युन ला न जुमानता एक गृहस्थ येतात.
"सर बहुत अच्छा काम कर रहे हो. लेने से देने मे आनंद रहता है, क्या कहते हो?"
मी गृहस्थाच्या चेहेर्याकडे बघतो. चेहेर्यावर 'वराह अवतार' दिसत होता.
मला पुढचे ' त्याने काही दिलेल्याचे' नेहमीचे संभाषण नको होते. पण उत्तर देणे भाग होते.
"बाबा रे, बहुतेक जण देव मानतात. पुजा करतात. सर्व आशा आकांक्षा त्या देवाभोवती फिरतात.
कुठेतरी त्या देवत्वाला पोचायची इच्छा बाळगतात. आणि काहीतरी देतात आणि देव बनतात"
"उसमे गलत क्या है"?
" ते मी कशाला ठरवु? मी माणुस आहे आणि मला अवतार व्हायचे नाही. तुम्हाला व्हायचे असेल तर त्याला माझी काहीही हरकत नाही"
हॉस्पिटल मधे असताना माझा एक सहकारी डॉक्टर मला म्हणायचा, "अरे ज्या कामाचे पैसे मी घेतो.
माझ्या सर्व गरजा भागवतो. म्हणुनच ' थँक यु डॉक्टर' प्रोसेस मधुन मला नको. मला खुप त्रास होतो. उद्या काही चुकले तर हेच लोक जोड्याने मारतात. जीव वाचवणे हे माझा व्यवसाय आहे."देव देव खेळ" हा नाही.
जाता जाता: लेखावरील प्रतिसादात तुम्हाला कुठले कुठले 'अवतार' दिसतात?
वाचने
2599
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
कोरा चांगदेवाचा
छान विवेचन!
नीट समजले नाही.
खरचं
जाणारच
देवाचे दशा वतार
In reply to देवाचे दशा वतार by अवलिया
मास्तरांपेक्षा भारी...
अवलियांचा विजय असो (हा कुठला \ कोणाचा अवतार)