मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोरण

बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे

शशिकांत ओक ·
मित्र हो, आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे. (संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य) आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री.

आता गरज पाचव्या स्तंभाची

गंगाधर मुटे ·
आता गरज पाचव्या स्तंभाची सन २००९ मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांसाठी सुमारे ७० हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली तेव्हा बुद्धिजीवी अर्थतज्ज्ञांनी एकच गलका केला होता. त्यांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर हा देश बुडणार होता. दोन वर्षापेक्षा जास्त काळ उलटला पण अजून देश काही बुडला नाही. समुद्राच्या पाण्याखाली दक्षिण भारताचा काही भाग बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ती त्सुनामीमुळे; कर्जमाफीमुळे नाही.

मो(गा) बाईल अर्थात प्रेमळ बायको

विनायक प्रभू ·
काहीही लिहीले तरी क्रिप्टीक म्हणायची स्टाइल आहे म्हणुन शिर्षकातच खुलासा. "हा मोबाइल चार्ज झालाच नाही" बटन दाबलेत का? बटन दाबल्याशिवाय तो चार्ज कसा होइल? कधी जाणार तुमचा धांदरट्पणा? मो(गा) बाइल "असु दे हां" आता बसा चरफडत.मो(गा)बाइल "बॅट्री जुनी आहे. चार्ज व्हायला कमीत कमी एक तास. ऑफिस मधे तसे विषेश काही नाही. पण एक तास काय करु?" सहा महीने सांगतेय. बॅट्री बदला म्हणुन. उगाच चार्जींग मधे वेळ का घालवायचा माणसाने? मो(गा)बाइल) "आजच बदलतो. पण आता वेळ कसा घालवु." मनाचे श्लोक म्हणा. आणि जरा महागाची खरेदी करा. वर्षभर तरी यायला पाहीजे.मो(गा)बाइल. "त्या पेक्षा असे करु या का? मी बेल बंद करतो.

तुमच्यात्-आमच्यात

विनायक प्रभू ·
"हजारो वर्षापुर्वी आपण झुंडीत राहात होतो. काही झुंडीत सशक्तांनी अशक्तांना आधार देणे काटेकोरपणे सांभाळले जायचे.

नवीन सदस्यांप्रति जून्या सदस्यांचे वर्तन.

नीलकांत ·
नमस्कार, आज मिसळपाववर येणार्‍या नवीन सदस्यांच्या अडचणी आणि त्याबाबत जूण्या सदस्यांचे वर्तन यावर चर्चा करावी म्हणून हा लेख आहे. असे साधारण निरीक्षण आहे की नवीन लोक साधारण ६ महिने ते १ वर्ष केवळ वाचनमात्र अवस्थेत असतात. त्यानंतर कधीतरी ते सदस्यं होतात. ते झाल्यावर सुध्दा प्रतिक्रिया लिहीण्यापासून ते लेख लिहीण्यापर्यंतचा प्रवास नवीन सदस्यासाठी जरा अडचणीचाच असतो. त्यामुळे हा प्रवाह जरा हळू चालतो. असं सगळं करून एखादा नवीन सदस्यं जेव्हा एखादा लेख लिहीतो तेव्हा तो पहिलाच लेख खूपच चांगला व्हावा किंवा अतिशय मुद्देसुद वगैरे व्हावा अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं वाटतं.

डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट .

शशिकांत ओक ·
डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट ....
"सध्या सर तमिळभाषेला जागतिक पातळीवर अभिजात भाषेचा मान मिळवून देण्यासाठी संशोधन कार्य करतायत, त्यात अत्यंत व्यस्त आहेत. तुमची अपॉईंटमेंट आहे का? काहीही झाले तरी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ काही मिळणार नाहीए." आम्हाला रिसेप्शनवरच कडकडत्या तमिळमिश्रीत इंग्रजी उच्चारांमधून समज दिली जाते.

नवाज शरीफ सही बोलले!

सुधीर काळे ·
नवाज शरीफ सही बोलले! (माझ्या नेहमीच्या लेखांतील विचारांपेक्षा एक वेगळाच विचार मांडणारा लेख) गेल्याच आठवड्यात नवाज शरीफ यांनी सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्काच दिला! कराचीत त्यांच्या "पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज" या पक्षाच्या वतीने बोलावलेल्या पत्रकारसंमेलनात त्यांनी "पाकिस्तानने आता भारताला त्याचा सर्वात मोठा शत्रू समजणे सोडून दिले पाहिजे" असे उद्गार काडले आणि "पाकिस्तानला जर प्रगतीच्या वाटेवर पाऊल टाकायचे असेल तर त्याने भारताबरोबरच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन (Re-appraisal) केले पहिजे" असेही ते पुढे म्हणाले.

शाळा

विनायक प्रभू ·
" चो, तुझ्या लक्षात आलय का?" नाही बॉ. "असा कसा रे तु"? अजाण मतिमंत मुढ बालक आहे असे समज. " अरे शाळा बंद झाल्या. जाहीराती पण बंद" आता मे महीन्यात शाळा बंदच असणार. आणि शाळांच्या जाहीराती पण. "अरे मी मर्दन शाळे बद्दल बोलतोय. मराठीत त्याला स्पा म्हणातात. हेल्थ स्पा." बर मग? "मग मर्दन कन्या काय करत असतील रे"? का बरे? तुझा मर्दन कन्या उद्धारक समिती काढायचा विचार आहे की काय? "नाही रे. सगळीच ठिकाणे तशी नसतात. पण बरीच असतात. मी एकदा गेलो होतो. आराम मिळाला. तु कधी भेट दिलीस का नाही"? नाय बॉ. मी घरगुती उपाय वापरतो. "पोटासाठी काय करतील रे ह्या सगळ्या"? मला नाही माहीत.

अभिष्टचिंतन.... आणि अर्थातच 'प्यार्टी' ची मागणी.

प्यारे१ ·
मिपावरील अत्यंत उत्साही, सळसळते, भटके आणि कट्टोत्सुक कार्यकर्ते, उदयोन्मुख होऊन बराच काळ लोटलेले आणि ज्येष्ठ होऊ घातलेले, मध्यम- निम्नउच्चवर्गीय जीवनाच्या वास्तवाची प्रखर जाणीव करुन देणारे लेखक, मिपावरील स्त्री सदस्यांची विशेषत्वाने काळजी करणारे आणि मोलाचे सल्ले देणारे भावोजी ५० फक्त अर्थातच हर्षद छत्रपति यांना 'ढ' दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!!! -शुभेच्छुक. प्यारे (सक्रिय सदस्य, खव उपामं) धमु ( उपाध्यक्ष, खव उपामं) ... ( खव उपामं अध्यक्षांची परवानगी नाही मिळाली अजून) वल्ली (संस्थापक, भटकंती ग्रुप) वपाडाव ( सदस्य, विवाहोत्सुक तरुण मंडळ) टारझन (हॅहॅहॅ) ;)