Skip to main content

धोरण

वेले

लेखक विकि यांनी शुक्रवार, 11/02/2011 22:50 या दिवशी प्रकाशित केले.

प्प्प्प

कट्टी अलमट्टीशी

लेखक शरदिनी यांनी शुक्रवार, 04/02/2011 15:09 या दिवशी प्रकाशित केले.

चारा वैरण नेसून पैरण
विकसित मार्गा ऊर्जा भक्षण
नकोनको ते एकलजीवन
बुद्धी नेव्हर वांछी

अट्टल चोरा कत्तल साची
डिंडिमवृद्धी फ़ुटाफ़ुटाची
कशास मागे धावून पाहे
उंची अलमट्टीची

तवंग कट्टर भालाबरची
प्रवेशचंचू मृगेन्द्रकैची
नोनचिचुंद्री कुरतडचीची
गोचीड पंखी लोभस गोची

सांगा सत्वर
....
कुठे वाढली
किती जाहली
................उंची अलमट्टीची ???

आर्द्रलाकडे बोलटभीरू
भल्या पहाटे उठला मोरू
दिव्या काव्या बेहतरनारू
कॉकसस्ट्रेप्टो कीड विखारू

कर्तव्य

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 03/02/2011 13:25 या दिवशी प्रकाशित केले.

" काल रात्री कुणीतरी मिल्टन नावाची बाई तुम्हाला फोन करत होती"
उठवायचस ना.
"रात्री एक वा़जता"?
काय म्हणत होती?
"नीटसे काय कळत नाही. पण अमेरिकन वाटत होती. कोण ही"?
माहीत नाही ब्वॉ?
"तुम्ही परत फोन लावा बघु माझ्या समोर. काय ते मला पण कळू दे"
वेडी की काय तु. अमेरिकेला फोन लावायची जहागिरदारी ? हॅट. असेल गरज तर परत फोन करेल.
-----------------------------------------------------------------------------------------
"उठा आता. बघा तीच बया परत फोनवर आहे. काय बोलते आहे ते कळले तर शप्पथ."
हॅलो.
"प्र्फुमॅस्टर, मी पॅरिस हिट्लन . जरा काम होते तुमच्या कडे."

लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 22/01/2011 15:31 या दिवशी प्रकाशित केले.

लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन

आजच्या सामनात पुन्हा एकदा आपले आघाडीचे सभासद प.रा उर्फ प्रसाद ताम्हणकर याचा एक लेख प्रसीध्द झाला आहे.

विषय आहे. "लग्न डॉट कॉम" लग्नाळुंना प.रा.ने मार्गदर्शन केले आहे.

प्रथमतः त्याचे पुन्हा एकदाअभीनंदन.

सामनात फुलोरावर क्लिक करा आणि इच्छुकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.

(इतरांनी काय करायचे हे मी सांगायला नको)

https://www.saamana.com/

मिपा - क्रिकेट विश्वचषक २०११ - आवाहन ...

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 19/01/2011 11:20 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मंडळी,

तयार आहात ना जल्लोशाला ?
तयार आहात ना ढोल-ताशे, टाळ्यांचा कडकडाट, आरोळ्या आणि जयजयकाराला ?
तयार आहात ना एखाद्या चुकलेल्या फटक्यावर, सुटलेल्या झेलावर आणि न दिलेल्या विकेटीवर खडाजंगी चर्चा करायला ?
तयार आहात ना विजयानंतर डोक्यावर घेऊन नाचायला आणि लाजिरवाण्या पराभवानंतर हक्काने संघाला ४ खडे सुनवायला ?

काय म्हणता ?
कशाची तयारी करायची ?

व्याख्याच व्याख्या

लेखक स्पा यांनी मंगळवार, 11/01/2011 09:48 या दिवशी प्रकाशित केले.

काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या.
बघा आवड्तायेत का?

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो

सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा

वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे

लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा

फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका

"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 05/01/2011 23:47 या दिवशी प्रकाशित केले.

आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली.

जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्‍मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्‍मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला. ते जम्मूत पत्रकारांशी बोलत होते.

कर्तव्यनिष्ठ दधीचीचा कर्मदरिद्री अस्थिभंग

लेखक शरदिनी यांनी बुधवार, 05/01/2011 09:43 या दिवशी प्रकाशित केले.

चौथीकडवा पंचमबर्मन
अकल्मखाजा धत्तड तत्तड
विचित्रपंथी सलज्जदूषण
धत्तड तत्तड धत्तड तत्तड

तोंडावरती उलटा पंज्जा
एटिएसचा स्वयंसेवक
इटलिपूरचा डिग्गी राजा
बोल बोलतो भलते रोचक

स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन
टेननंबरी शार्दुलविक्रिडित
जमालगोटी चेंडूफोडन
रिक्कि फिक्कि सगळे मोडीत

तळपत तडपत चित्रविचित्रा
त्रेधा तिरपिट पुजाबात्रा
याएसेलचा विचित्रसद्रा
धेनू भानू कर्मदरिद्रा

कर्तव्याच्या गंडस्थळावर
सिंगल मिंगल सिंगल मिंगल
एलोमा पाय्लोमा जिंगल जिंगल
दधीची ची हड्डी फ़्रॅक्चर

काव्यरस

आल्फा मेल

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 04/01/2011 16:47 या दिवशी प्रकाशित केले.

अँगल चे नॉमेन्केचर आल्फा,बिटा,थिटा हे मला माहीत आहे.
हे आल्फा मेल म्हणजे नेमके काय असते?
ह्याची व्याख्या काय?
ह्या मंडळीची नेमकी दिनचर्या काय असते?
ह्यांना हे नाव नेमके कशामुळे मिळते?
-----------------------------------------------------------------------------------------
रोज आपल्या बायको किंवा होणार्‍या बायकोकडुन जोडे खातो, खरे खुरे किंवा शाब्दिक.
आणि बिटा सारखा लाल लाल होतो तो बिटा मेल.
अगदी चांदीच्या ताटात वाढुन समोरुन वाढुन आले तरी त्याचा आस्वाद न घेउ शकणारा थिटा मेल.
पण हे आल्फाची व्याख्या काही माहीत नाही बॉ?

मतिमंद

लेखक तिमा यांनी गुरुवार, 30/12/2010 20:43 या दिवशी प्रकाशित केले.

पुतळे कापा, पुतळे हलवा
फुंकून फुंकून निखारे फुलवा
एस्ट्या पेटवा, ट्रक जाळा
सामांन्यांच्या तोंडात बोळा
भैया पळवा, भैया मरवा
खळ्ळ-खटॅकची हौस पुरवा
कागद नाचवा, नोटा दाखवा
आदर्शांचे इमले चढवा
कांदे लपवा, टोमॅटो पळवा
रोजरोज नवे खेळ लावा
बारा मतींची ताकद लावा
मतीमंदांची प्रजा वाढवा ||

काव्यरस