आता गरज पाचव्या स्तंभाची
मात्र ही अर्थव्यवस्था नको तिथे आणि चुकीच्या बिंदूवर अत्यंत बळकट आहे७० हजार कोटींची माफी देवूनही अर्थव्यवस्था कोसळली नाही ह्याचा अर्थ ती योग्य बिंदूवर बळकट आहे असा नाही का होणार?
In reply to बरेचसे by चिरोटा
७० हजार कोटींची माफी देवूनही अर्थव्यवस्था कोसळली नाही ह्याचा अर्थ ती योग्य बिंदूवर बळकट आहे असा नाही का होणार?अर्थव्यवस्था योग्य बिंदूवर बळकट आहे असा निष्कर्ष छातीठोकपणे काढ्णे कठीण आहे मात्र... यासंदर्भातला विचारवंतांचा कांगावा गैर होता एवढा निष्कर्ष हमखासपणे काढता येतो. :)
In reply to दुवा by यकु
In reply to लिंकबद्दल धन्यवाद. वाचली by गंगाधर मुटे
In reply to ''खरं तर एकदा काहीतरी by ५० फक्त
In reply to छान लेखन मात्र... by ऋषिकेश
पाचव्या स्तंभाची कल्पना समजली नाहीपाचव्या स्तंभाची निर्मिती सध्यातरी दृष्टीपथात नाही. पण येऊ घातलेल्या नव्या संगणकीय/इंटरनेट तंत्रज्ञानात पाचव्यास्तंभाची उणिव भरून काढण्याची थोडीशी धूसर शक्यता मला दिसत आहे. पण आजच तसे बेधडक भाकीत करणे शक्य नाही. मात्र आता पाचव्या स्तंभाची नितांत आवश्यकता आहे, याविषयी दुमत नाही.
In reply to पाचव्या स्तंभाची कल्पना by गंगाधर मुटे
In reply to मुटेसाहेब! by पिवळा डांबिस
In reply to +/- by नितिन थत्ते
In reply to मुटेसाहेब! by पिवळा डांबिस
In reply to तुमच्या प्रतिसादाशी सहमत by शिल्पा ब
In reply to मुटे साहेब लेखन जबरदस्त by गणेशा
स्वाभिमानाने जगले पाहिजे शेतकर्यांनी...शेतकरी स्वाभिमानीच असतो. पण त्याचे आर्थिकदारिद्र्य त्याला लाचार आणि लाजिरवाणे जीवन जगायला भाग पाडते.
आम्हाला काही फुकट नको.. आणि आमच्या उत्पादनाला फुकट वाया जावु दिले नाहि पाहिजे येव्हडी एकच मागणी सगळे बदलु शकते.हे महत्वाचे आहे. पण त्याच्या उत्पादनाचे भाव ठरविण्याचे अधिकार सरकारच्या हातात आहे. शेतकरी मागणी करतो पण सरकार ऐकेल तेव्हा ना. सरकारने शेतकर्याच्या रास्त मागणीची दखल घ्यावी म्हणून शेतकर्यांनी काय करावे, हे तुम्हीच सांगा.
In reply to शेती by पिवळा डांबिस
In reply to शेती by पिवळा डांबिस
किती गावांनी स्वयंस्फूर्तीने ते पाणी अडवून जिरवण्याच्या योजना अंमलात आणलेल्या आहेत?पाणी अडवायला, जिरवायला व वापरायला पैसा लागतो. शेतीमध्ये भांडवली बचत निर्माणच होऊ दिली जात नाही. ठीबक सिंचन संच फुकटात घरी येत नाही. एका ठीबकसंचाची जेवढी किंमत असते तेवढेही वार्षिक उत्पन्न अनेक शेतकर्यांचे नसते. एखाद्याचे हातपाय छाटून टाकायचे आणि मग त्याला लढायला सांगायचे, यात काही अर्थ आहे का?
जागतिकीकरणामुळे कुठलाही माल कुठेही विकता येऊ शकत असतांनाचुकीचे वाक्य आहे हे. भारतीय शेतकर्याला कुठेही माल विकता येत नाही. सरकार नावाचे हवाईचाचे जागोजागी आडवे येते.
छोटे शेतकरी नाहिसे झाले म्हणून काय अन्नाचा तुटवडा पडत नाही. मोठ्या कंपन्या ती गरज पुरवतात.चुकीचे वाक्य. मोठ्या कंपन्या अन्नधान्य पिकवत नाहीत. फक्त मार्केटींग करत्तात.
सुशिक्षित शेतकरी असलेल्या मुटेसाहेबांनाच यावर एक ऑब्जेक्टिव लेख लिहायचं आवाहन केलं आहेअशा तर्हेचे इतरांनी आजपर्यंत खूप लेखन केलेले आहे. त्यात माझी भर कशाला?
In reply to ऑब्जेक्टिव लेख by गंगाधर मुटे
In reply to शेती by पिवळा डांबिस
म्हणजे भारतातून कुठल्याच अन्नपदार्थाची, अन्नधान्याची निर्यात होत नाही का?निर्यात करायची की नाही हे सरकारच्या मर्जीवर असते, शेतकर्यांच्या नाही. ..... देशांतर्गत म्हणाल तर उसाला झोनबंदी, कापसाला प्रांतबंदी होतीच. ..... मी माझ्या लेखनाच्या विश्वासार्हततेचा वगैरे विचार करून लिहित नाही. वास्तव आहे तेच लिहायचा प्रयत्न करतो. वास्तविकताच तशी आहे तर मी काय करू?
In reply to वाक्य चुकीचे नाही by गंगाधर मुटे
In reply to आमच्या मांडवगणात लोकांनी असेच by शिल्पा ब
In reply to आमच्या मांडवगणात लोकांनी असेच by शिल्पा ब
राळेगणसिद्धीत अण्णा हजारेंनी असा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे याकडे तुम्ही दुर्लक्ष का करताय?राळेगणसिद्धीत अण्णा हजारेंनी असा प्रयोग श्रमदानाच्या बळावर जर यशस्वी करून दाखवला असेल तर... त्यांनी वारंवार शासनावर दबाव आणून, काही मंत्र्यांना घरी पाठवून शासनाकडून जो निधी उकळला तो कुठे गेला? :) ....................................................................
------------------------------------- मुटे साहेब : या निगेटिव्ह वाक्यामुळे वाइट वाटले. फक्त लिखानातील भरीने प्रत्यक्ष त्यावेळेस जरी काही होत नसले, तरी त्यातुन अनेक प्रश्नांची.. मार्गाची माहिती मिळु शकते, तुमच्या सारखेच शेतकरी जे शेतकर्यांबरोबर राहतात, तसेच समाजातील इतर गरचेजे ज्ञान ही भरपुर असलेले .. तर त्यांनीच पुढाकार घेवुन निदान त्यांच्या भागातुन त्यांच्या शेतकर्यांच्या उनिवा का आणि कश्या आहेत त्यातुन काय मार्ग निघु शकतात हे केलेच पाहिजे असे कळकळीने वाटते. समाज हा अनुकरणीय असतो असे तुम्हीच म्हणता, ह्या कार्याचे अनुकरण हळु हळु तुमच्या शेजारुन होउ शकेनच. मान्य योजनांना पैसा लागतो.. पण योग्य संघटन.. योग्य दिशा निवडायला तर पैसा लागत नाहि... दोष कोणात नसतो .. तो जसा सरकार मध्ये असतो .. जसा शहरात राहणार्या मांणसांत असतो.. कंपण्यात असतो .. तसाच तो गावात ही असतो ...शेतकर्यांत ही असतो ... परंतु योग्य दृष्टिकोन हाच सर्व क्रांतीचा, योग्य बदलाचा उगमदाता आहे असे वाटते. तुम्ही तसे लिखान करा वा करु नका पण निदान तुमच्या आजुबाजुच्या शेतकर्यांचा दृष्टिकोन स्वजागृतीतुन प्रगल्भतेकडे असायलाच हवा असे वाटते.. आणि या साठी योग्य लिखान.. योग्य मार्गदर्शन योग्य अनुभव असणार्या व्यक्तीकडुन का होउ नये. कोणी कीती लिखान केले कीती तज्ञांनी काय केले यापेक्षा शेतकर्यांत राहुन शेतकर्यांसाठी काही तरी करणे योग्य वाटते. शिल्पा जी म्हणतात तसे राळेगणसिद्धी चे मला माहित नाही जास्त, पण चांगल्यासाठी संघटन हा प्रगतीचा मार्ग असु शकतो असे वाटते. फक्त समाज.. सरकार यांचा दोष नसतो.. दोष असतो त्या त्या समाजातील काही लोकांच्या दृष्टिकोनाचा.. त्या सरकारवर नियंत्रण असणार्या व्यक्तींच्या अनुभवाचा.. थोडे जास्तच लिहिले गेले माझ्याकडुन वाटते.. भावना दुखावण्याचा हेतु नाहिये.. पण थोडक्यात सांगता आले नाही. आता माझ्यासारखे शहरात राहणारे आणि कंपणीत काम करणार्या मांणसांना कीती ही आपल्या शेतकर्यांबद्दल काही वाटले तरी तो त्याच्या रिलेटेड असणार्या त्याच्या सारख्या लोकांसाठीच काही तरी करु शकतो.. कारण त्याचाच त्याला अनुभव असतो .. त्यातच त्याला दूरदृष्टिने काही करता येवु शकते. शेतकर्यातील कोणी शेतकर्यांसाठी केले तर आमच्या सारखे लोक मदत करु शकतात(मदत म्हणजे फक्त पैसा असा अर्थ प्लिज घेवु नये) पण प्रत्यक्ष सुरुवात करुच शकत नाहि .. कारण जसे शेतकर्यांची दु:ख असतात.. तसी सामान्य माणसाची पण असतात. म्हणुन शेतकर्यांनी एकत्र येवुन जोपर्यंत त्यांच्यातुन काही करत नाहि तोपर्यंत समाज फक्त बघ्याचीच भुमिका घेइन.. मागे कोणी तरी (आपल्याच धाग्यात) एक गाव(शेतकरी) दत्तक घेइन किंवा प्रत्यक्षात शेतकर्यांना मदत करुया असे बोलेले होते.. अशी लोक आहेत.. खरेच आहेत.. पण त्यांचा दृष्टिकोन हा आहे की माझ्यापरिने मी मदत करुन कोणाचे तरी कल्यान करीन नक्की..आणि त्यांच्याकडुन दूर राहुन ते बरोबर आहे. पण खरा दृष्टिकोन असा हवा की आपन जे काही करु त्याने सर्व शेतकर्यांचे कल्यान झाले पाहिजे .. त्यांना योग्य मार्ग .. योग्य सुविधा.. योग्य दिशा कळली पाहिजे .. आनि हा दृष्टिकोन फक्त शेतकर्यांतुन पुढे येणार्यातच असु शकतो.. तेंव्हा घ्या लेखनी आणि उचला पाउल..सुशिक्षित शेतकरी असलेल्या मुटेसाहेबांनाच यावर एक ऑब्जेक्टिव लेख लिहायचं आवाहन केलं आहेअशा तर्हेचे इतरांनी आजपर्यंत खूप लेखन केलेले आहे. त्यात माझी भर कशाला?
या निगेटिव्ह वाक्यामुळे वाइट वाटले.सरकारचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन निगेटिव्ह आहे म्हणून शेतीचे चित्र निगेटिव्ह आहे. ते चित्र उगाच सकारात्मकतेचा आव न आणता जसे आहे तसे मी रेखाटण्याचा प्रयत्न करतो. मी नकारात्मक लिहितो की सकारात्मक यापेक्षा सरकारचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होणे गरजेचे आहे. .................. जोपर्यंत शेतीविषयी शासकीय धोरणे नकारात्मक आहेत तो पर्यंत तुम्ही म्हणता तसे "रचनात्मक कार्य" करणे म्हण्जे दगडावर मस्तक आपटून घेणे आहे. तुम्ही किंवा मी शेतीमध्ये काहीच बदल घडवू शकत नाही. ................. लिहिणे ही एक कला असते, हे मान्य पण मी लेखनात कलाकौशल्य वगैरे वापरण्याचा प्रयत्न करीत नाही. कारण कला ही कला असते आणि वास्तव हे वास्तव. रसिकांना रुचावे म्हणून "मसाला चित्रपट" बनवितात. त्यात मारधाडीपासून कपडे उतरविण्यापर्यंत सर्व काही असते. मग त्या चित्रपटाला भरमसाठ प्रेक्षकवर्ग लाभतो, कमाईही खूप होते आणि वाहवाही होते. त्या धर्तीवर (म्हणजे थोडेसे सकारात्मक, थोडेसे नकारात्मक, थोडेसे रंजक, थोडेसे विनोदी वगैरेवगैरे) शेतीविषयक लेखन करायचा सध्यातरी माझा विचार नाही. :) आपण दुसरे गिर्हाईक शोधावे :bigsmile:
आपण दुसरे गिर्हाईक शोधावेअतिशय चुकीचे शब्द. सध्या तरी रिप्लाय देणे थांबवतो आहे. मला वाटत होते तुमच्या लिखानाचे उगमस्थान हे शेती.. शेतकरी हे आहेत. पण कदाचीत मी चुक होतो. तुमच्या लेखनाचे उगमस्थान हे सरकार, बिगरशेतकरी, आणि त्यांचे वागणे हे आहे.
In reply to आपण दुसरे गिर्हाईक शोधावे by गणेशा
ज्या लाकडालाच वाळवी लागली आहे त्याचे पाच काय पन्नास स्तंभ उभारले तरी घर कोसळायचं राहणार आहे का?हेही खरेच आहे. जोपर्यंत वाळवी नष्ट होत नाही तोपर्यंत घर कोसळायचे थांबवणे कठीन आहे. आणि वाळवीचा जर नायनाट करता आला तर पाचव्या स्तंभाची गरजच भासणार नाही. हेच चार खांब पुरेसे ठरेल.
कोणताही शेतकरी केवळ आळसापोटी, "पार मरेस्तवर कर्जबाजारी झालो तरी मी स्वत:च्या जीवावर करता येण्यासारखेही उपाय करणार नाही" असे म्हणेल असे मला वाटत नाही.मला पन्नासपानी लेख लिहूनही जे निट व्यक्त करता आले नसते ते तुम्ही समर्पकपणे दोन ओळीत व्यक्त केले आहे.
>>>ही रक्कम पन्नास हजार