लेखकआशु जोगयांनी गुरुवार, 15/09/2011 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळीवर वावरताना
आपल्या लक्षात येइल. मिसळीची एक स्वतःची भाषा आहे.
काही स्वतःचे शब्द आहेत. आपण त्याची यादी करुया
उदा...
मोठे व्हा
जिलब्यापाडू लिखाण
हलवाई
भंपक
आपल्याला आठवणार्या शब्दांची आपण भर घालावी
---
लेखकसुधीर काळेयांनी शनिवार, 03/09/2011 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांच्या आंदोलनात सरकारची फजीती!
परिस्थिती अंगाशी आल्यावर माणूस काय नाहीं करत? पण ती तशी अंगावर येईपर्यंत कांहींच न करणारा माणसाला काय म्हणावे? कदाचित् अशा व्यक्तींसाठीच "दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसून कापूस वाटी![१]" ही म्हण रूढ झाली असावी! एप्रिलच्या मध्यापासून ऑगस्टच्या मध्यापर्यंत केंद्र सरकारने ’रेटारेटी’त घालविलेले दिवस आणि १६ ऑगस्ट ते २७ ऑगस्टच्या दरम्यान चांदण्यात बसून (घाईघाईने) वळलेल्या वाती हे या म्हणीचे सार्थ उदाहरण आहे!
लेखकमुक्तसुनीतयांनी शुक्रवार, 02/09/2011 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
एक बेहद्द नाममात्र घोडा
पाठीवरती जीन मखमली
पायी रुपेरी तोडा
म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ?
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
भव्य हिमालय तुमचा अमुचा
ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट ,
गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट.
बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट
कर्मठ जो प्राणी तो पोंचट.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा जो नुसतिच काडी
नाही खर्चिली कवडी दमडी
नाहि वेचिला दाम
श्रीराम जयराम जयजय राम.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
षंढ सारी लेकरे
लेकरे उदंड जाली
अरुण उगवला पहाट झाली
झाले मोकळे आकाश
आकाश झाले थेन्गने अन
चानदन्या झ
लेखकरोमनायांनी शुक्रवार, 26/08/2011 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
एक महाभयंकर जात
खरे पाहता, "जात" हा शब्द दर्शवितॊ ते वर्गीकरण. जसे की सजीवांमध्ये - प्राणी, पक्षी, माणूस, वनस्पती वगैरे. यामध्येही अनेक पोट जाती असू शकतात जसे की, शिकार करणारे प्राणी, शाकाहारी वगैरे. माणसाने हि आपापल्या जाती बनविल्या. माणसाच्या जाती मुख्यत: त्याचे स्थळ, तो करतॊ ते काम, त्यानुसार रहाणीमान दर्शविण्यासाठीच होता. पण या जातीचा चुकिचा अर्थ ज्यांनी पसरविला, वाढवला व पॊसला ती एक महाभयंकर जात आहे.
लेखकमुक्तसुनीतयांनी गुरुवार, 18/08/2011 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला
वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला
यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे
चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले
ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!!
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा
"भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा
"जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"
लेखकडॉ.श्रीराम दिवटेयांनी गुरुवार, 11/08/2011 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
साडू म्हणे कामच तोडू...
पूर्वाश्रमीचे घनिष्ठ मित्र असलेले व आता एकमेकांचे साडू बनलेले दोघेजण नेमक्या फ्रेंडशिप डे च्या दिवशी एकत्र येतात. त्यांच्यात पुढीलप्रमाणे संवाद घडतो...
“काय साडू, लग्नाचे लाडू फुटल्यापासून तू चांगलाच सुटलाय की रे.”
“आणि हे माझ्या प्रिय साडू तुझंही पोट फारच वाढू लागलंय त्याचं काय?”
“अरे आज फ्रेंडशिप डे. विसरलास की काय?”
“छे छे कसा विसरेन?”
“मग बँड नाही आणलास? मागच्यावर्षी तर चांगले कोपरापर्यंत बँड बांधून फिरत होतास ना?”
“अरे साडू, मागच्या आठवणी नकोस काढू..
लेखकप्यारे१यांनी शुक्रवार, 05/08/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे कन्फ्युजन. काय करावं बरं असा प्रश्न घेऊन मी तुमच्यासमोर आलोय.
नक्की काय झालंय हे नमनाला घडाभर तेल न घालता सांगतो.
आटपाट नगर होतं. गावामध्ये बारा बलुतेदार, अठरा पगड जातीजमातींचे, विविध व्यवसाय असलेले, विविध कौशल्ये असलेले लोक एकत्र येत जात होते.... तुम्ही म्हणाल 'राहत होते' असे हवे ना? नाही येत जात होते असेच बरोबर आहे.
त्या गावाचं वैशिष्ट्यच असं होतं की नगरामध्ये लोक राहत नव्हते. तरी प्रत्येकाचं एकेक घर, एकेक निवारा या नगरामध्ये होता. थोडं सेकंड होम्स टाऊन शिप सारखं म्हणा ना! बर्याच्शा लोकांची स्वतःची वेगळी घरं त्यांच्या त्यांच्या गावी होती. या सेकंड होम टाऊनशिप मध्ये..
लेखकभडकमकर मास्तरयांनी मंगळवार, 26/07/2011 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्यार का पंचनामा.
दोन महिन्यांपूर्वी "प्यार का पंचनामा" नावाचा सिनेमा येऊन गेला.. आला कधी गेला कधी कळलाही नाही या टाईपातला हा सिनेमा. तूनळीवरती याच्या संवादांच्या काही क्लिप्स पाहिल्या होत्या. हे प्रोमोज आवडलेही होते. पण बर्याचदा प्रोमोज बरे असतात आणि सिनेमा कंटाळवाणा असतो त्यामुळे सिनेमाकडून फ़ार अपेक्षा नव्हती...तरीही पाहिला आणि हा सिनेमा चक्क आवडला. मजा आली.
तूनळीवरची झलक
http://www.youtube.com/watch?v=pwSmmJV1XvY
गोष्ट सोपी आहे. रजत, निशांत आणि चौधरी या नावाचे तीन बॅचलर आय्टी इन्जिनियर्स फ़्लॅटमेट्स आहेत.