अनिकेत, २७ वर्षाचा इंजिनिअर...तीन वर्षापूर्वी एका चांगल्या कंपनीत नोकरीवर रुजू झाला होता. छोटस स्वतःच घर घेतलं, लग्नही झाल. पण अचानक आर्थिक मंदीमुळे नोकरीवर कुऱ्हाड कोसळली. अनिकेतला हा धक्का सहन झाला नाही व तो व्यसनाच्या आहारी गेला. कुटुंबीयांनी खूप समजावले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी पालक वैतागून गावाकडे निघून आले नि बायकोही माहेरी निघून गेली.
निखील, वय वर्ष २०.एक हुशार व अभ्यासू विद्यार्थी. बारावीत चांगले गुण मिळवून एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. पहिल्यांदाच शिक्षणासाठी घरापासून दूर राहिला होता. चुकीच्या संगतीमुळे व्यसनाच्या आहारी गेला. त्यातच तो पहिल्या वर्षी नापास झाला.