कामणदुर्ग
ठाणे जिल्ह्यातील उंचीत माहुलीनंतर दुसर्या क्रमांकावर असलेला हा किल्ला (उंची साधारण २२०० फुट). तीन साडेतीन तासांचा खडा चढ, जंगल, कड्यात खोदलेल्या पायर्या, सोप्या श्रेणीचे कातळटप्पे या ट्रेकर्सना आकर्षीत करणार्या सर्व गोष्टी असुनही, केवळ माथ्यावर पाणी आणि निवारा नसल्यामुळे दुर्लक्षीत राहिला आहे. प्राचीनकाळी उल्हासनदीतुन चालणार्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच कल्याण-भिवंडी मार्गावर ताबा ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली असावी.
तर अश्या या दुर्लक्षीत किल्ल्याला भेट देण्यासाठी आम्ही चौघे जण या रविवारी (दि.२८ मार्च, २०१०) सकाळी ६.३० ला बाईकवरुन निघालो.