Skip to main content

भूगोल

छायाचित्र टीका

लेखक गणा मास्तर यांनी शनिवार, 20/12/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
nikko निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळ चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगले आले. अवांतर : सदर छायाचित्र मीच काढले आहे आणि उपक्रमवरही डकविलेले आहे.

कोकणवारी

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 17/12/2008 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
दोन वर्षांखाली कोकणात गेलो होतो. तेव्हा काढलेले काही फोटो इथे डकवत आहे. तेव्हा काही फोटोग्राफीमधली फार अक्कल नव्हती (आताही आहे अशातला भाग नाही), पण आता तांत्रिक बाबी जरा अधिक समजतात (त्यामुळे मी अजून वाईट फोटो काढतो ;)).

जिवंत निसर्ग

लेखक मीनल यांनी मंगळवार, 18/11/2008 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
भरधाव रस्त्याच्या कडेला एक सर्विस व्हॅन सावकाश येऊन थांबली.एक गोरा अमेरिकन माणूस खाली उतरला. अंगात खाकी युनिफॉर्म,शर्ट,पँटच्या खिशातून डोकावणारे काही घडी केलेले कागद आणि जाडसर पेन,आणि एलेक्ट्रिक केबल, हातात वॉकी टॉकी .कुठेतरी काम करणारा सरकारी कामगार असावा. मला म्हणाला,`` हॅलो मॅम, आर यु ऑल राईट?`` मी उत्तर दिले,`` येस.आय एम फाईन`` पुढे विचारले,`` आर यु शुअर ?ऑल ईज ओके विथ यु? मे आय नो व्हेअर डु यु लिव्ह``? मी डोक्याला आठ्या पाडून चमकून म्हटले,`` येस्.ऍब्सोल्युटली ओके. आय लिव्ह इन द सबडिव्हिजन ऍट द एंड ऑफ द रोड. तो हात उंचावत निघाला. निघताना म्हणाला ,`` दॅट्स ग्रेट.

बिग सर....

लेखक बबलु यांनी रविवार, 26/10/2008 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
या ऊन्हाळ्याच्या शेवटाला आमच्या घरापासून जवळच असलेल्या "बिग सर" पॅसिफिक सामुद्रिक Scenic Highway ला गेलो होतो. मस्त प्रकरण आहे हे ! अतिविशाल पॅसिफिक समुद्र, क्यालिफोर्नियाची नयनरम्य coastline आणि उत्कृष्ट हवामान. त्यातलेच काही फोटू....

आपल कोल्हापुर

लेखक झकासराव यांनी बुधवार, 15/10/2008 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची लिमिटेड लिस्ट माहिती असते. ह्यातच जर अजुन काहि भटकंती करणार्‍या लोकाना फार प्रसिद्ध नसलेल्या जागांविषयी माहिती कशी द्यावी?? किंवा मला तरी सगळ्या कोल्हापुरतील जागा माहित आहेत का?? मी प्राथमिक शाळेत असताना आमची एका दिवसाची सहल जात असे. अशा सहलीत मी कात्यायनी, खिद्रापुर अशा फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी देखील जावुन आलो आहे. ही ठिकाण बाहेरच्या (कोल्हापुरच्या बाहेरच्या लोकाना जे तिकडे पर्यटनाला येतात) कोणालाच विशेष माहिती नसतात. मग त्याची माहिती कशी मिळेल. आपल्याकडच्या पर्यटन खात्याबद्दल काहि न बोललेलच बर.

सोलापुर- छायाचित्रे

लेखक झकासराव यांनी गुरुवार, 25/09/2008 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी मध्यंतरी सोलापुरला जाउन आलो. तिथे फिरायला जाण्यासारख एकच ठिकाण आहे. ते म्हणजे सिद्धेश्वर मंदीर. ह्या मंदीराची खासियत म्हणजे हे एका तलावाच्या मध्येच आहे. :) चारी बाजुनी पाणी आणि मध्येच मंदीर. एकदम मस्त वाटत. ही मी काढलेली तिथली काही प्रकाशचित्रे. हा त्या तलावाचा एक व्ह्यु. ह्या तलावात आधी मासे देखील दिसायचे बरेच. आता दिसत नाहीत. बहुद्धा जाळ टाकुन पकडतात. :( हा त्या मंदीरात जायचा रस्ता.

सुगरण ??

लेखक झकासराव यांनी सोमवार, 22/09/2008 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यतंरी कोल्हापुरला गेलो होतो. त्यावेळी चिमण्यांचा आकाराचे काहि पोटावर पिवळसर झाक असलेल पक्षी अचानकच दिसले. सहजच म्हणून घराच्या मागच्या बाजुला गेलो आणि बघतोय तर काय मला दिसली ही एक सुखी समृद्ध कॉलनी. तिच नाव बहुद्धा "आदर्श कॉलनी"च असेल बॉ. :) बघा बघा तुम्हीदेखील बघा. मग जरा ह्या कॉलनीतील रहिवाशी कसे आहेत आणि काय करत आहेत हे बघुया म्हणल तर हे महाशय दिसले. बहुद्धा मनातच म्हणत असतील, "छे एक घर असताना देखील ह्या आमच्या बयेन दुसर घर बांधायला सांगितलय. तिला काय जातय नुसतच सांगायला.