मराठी दिन २०१८: समाचार-पत्रांत जॉर्ज भिकारीचं कहाणी ! (दक्षिणी मराठी)
- Read more about मराठी दिन २०१८: समाचार-पत्रांत जॉर्ज भिकारीचं कहाणी ! (दक्षिणी मराठी)
- 19 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
समाचार-पत्रांत जॉर्ज भिकारीचं कहाणी !
आमचं ल्योंक आणि सूनाचं बरोर थोडं महिने राह्याकरतां आम्ही अमेरिकाला गेलोतों. तिकडं अधिकपक्षं दनांसीं न्यूस्-पेप्पर् घ्याचं दंडक नाहीं. समाचार अग्गीनं मोबैल-फोनांतं वाचूनचं कळींगतीलं. माझं ल्योंक पणीं तसंचं. पण, स्मार्ट-फोन् मण्जे मला होईना! पाष्टे फिल्टर्-काफी पिताना न्यूस्-पेप्पर् हातांत असामं असं दंडक होऊँगलं. पह्यिलं थोडकं दिवस तर्पडूँगलों आणि सोसाला होईनास्कं ल्योंकाकडं सांगिट्लों. "कां बाप्पा, कां मला तंम्हाच सांगट्ला नाहींतं? हे काय एवढं थोर विषय कां?