मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'रमलप्रतिमा (भाग २) अर्थात नवीन काही AI चित्रे ( Prompt सह)

चित्रगुप्त ·

भागो 17/06/2024 - 23:46
बघितली. आता मला सांगा, सर, कित्येक वर्षे साधना करून शिकलेल्या चित्रकारांच्या नशिबात भविष्यात काय वाढून ठेवले आहे?

In reply to by भागो

चित्रगुप्त 18/06/2024 - 17:44
कित्येक वर्षे साधना करून शिकलेल्या चित्रकारांच्या नशिबात भविष्यात काय वाढून ठेवले आहे? -- हा प्रश्न कला-निर्मितीशी संबंधित असेल तर केलेली साधना कधीच वाया जात नाही. नवनवीन साधने आत्मसात करत नवनवीन प्रयोग करत रहाण्यातून सृजनशीलतेचे क्षितिज आणखी विस्तीर्ण होत असते. -- मात्र हा प्रश्न कलेतून पैसा मिळवण्यासंबंधित असेल, तर अमूक एका पद्धतीने काम करणारे कलावंत ती पद्धत कालबाह्य झाल्यावर अडचणीत येऊ शकतात. मला स्वतःला आता कलेतून पैसा मिळवायचा नसल्याने माझ्यासाठी नवीन असलेल्या गोष्टी शिकणे खूप आनंददायक आहे. उदाहरणार्थ एकीकडे कृत्रीम बुद्धिमत्तेने निर्माण होणारी कला, तर दर दुसरीकडे तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या युरोपियन चित्रकारांची पद्धत, या दोन्ही नवीन गोष्टी मी शिकतो आहे. गंमत म्हणजे या दोन्हीचे एकत्रिकरण करणेही शक्य, आणि खूप उपयोगीपण आहे.

कंजूस 18/06/2024 - 05:47
जमलं आहे. प्राथमिक प्रयोग एवढं देऊ शकतात आता तर आणखी पाच वर्षांत काय होईल.

पिक्चर मेकर,स्टोरी बोर्ड, स्टोरी बोर्ड प्लस, माया.... ते आज या टप्प्यावर पोहोचायला कित्येक दशके लागली. तसेही आता राजे राजवाडे,दिवाणखाने संपुष्टात आले आहेत. पारंपरिक चित्रकला परंपरेतून बाहेर पडू पहात आहे. तरी सुद्धा सध्यातरी पारंपरिक चित्रकलेला पर्याय नाही. भाषे बरोबर कल्पनेचा विलास मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. बघुया काय पुढे होते ते. दादासाहेब फाळक्यांनी सुरू केलेले छायाचित्रण आज कुठल्याकुठे पोहचले आहे याची कल्पना रामोजी चित्र सृष्टी बघितल्यावर स्पष्ट कल्पना आली व मानवाच्या सृजन आणी इच्छाशक्तीचे कौतुक वाटले. चित्रगुप्त यांच्यापासून पेर्णा घेवून मी सुद्धा चित्रकर बनण्याचा प्रयत्न करत आहे. आता १९६० सालच्या कन्यादान चित्रपटातील पी सावळाराम यांनी लिहीलेले गीत बदलायची वेळ आलेली दिसतेय. मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो भेट पहिली अपुली घडता निळी मोहीनी नयनी हसता उडे पापणी किंचित ढळता गोड कपोली रंग उषेचे भरतो ममस्पर्शाने तुझी मुग्धता होत बोलकी तुला न कळता माझ्याविण ही तुझी चारुता मावळतीचे सूर्यफूल ते करतो तुझ्या परी तव प्रीतीसरिता संगम देखून मागे फिरता हसरी संध्या रजनी होता नक्षत्रांचा निळा चांदवा झरतो

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 23/06/2024 - 23:38
तसेही आता राजे राजवाडे,दिवाणखाने संपुष्टात आले आहेत. पारंपरिक चित्रकला परंपरेतून बाहेर पडू पहात आहे.
तुम्ही वर म्हटले तसे घडून आता खूप वर्षे झाली. तथाकथित 'मॉडर्न आर्ट' चा उगम आणि वाटचाल यातून झाली, त्यालाही आता अनेक दशके उलटलीत. -- आता पुन्हा चक्र उलटे फिरून, आणि काही लोकांकडे अमाप पैसा आल्यापासून पुन्हा प्रासादतुल्य इमारती, हंड्या-झुंबरे, जुनी चित्रे-पुतळे, जुन्या शैलीच्या, उत्तम पॉलिश केलेल्या उंची लाकडाच्या फर्निचरने सजवलेले दिवाणखाने वगैरेची फॅशन येत आहे. इंदुरातील माझ्या परिचयातील दोन (सख्खे भाऊ असलेल्या) चित्रकारांना फ्रेंच प्रासादाबरहुकूम छतावर आणि भिंतींवर भव्य चित्रे, कुटुंबातील व्यक्तींची जुन्या पद्धतीची व्यक्तिचित्रे वगैरे रंगवण्याचे मोठे काम मिळालेले आहे. मी आणि माझ्या मुलाने जुन्या बाजारातून एक ८०-९० वर्षे जुना, मोहोगनी लाकडाचा तुटका सोफा आणून त्याला स्वतः दुरुस्त करून, पूर्वीची कापूस भरलेली गादी काढून टाकून हुबेहुब तशी दिसणारी फोमची गादी घरी बनवून त्यावर जुन्या डिझाईनचे कापड आणून व्यवस्थित बसवले आहे. हे सगळे करायला एक आठवडा लागला. आता लंबक पुन्हा उलट्या दिशेने जाऊ लागला आहे. माझ्यासारख्या 'जुने ते सोने' वाटणार्‍यांसाठी ही समाधानाची बाब आहे.

भागो 18/06/2024 - 09:45
चित्र क्र ६ मला "भरत" च्या चित्राची आठवण आली. ह्या वर्षीच्या मिपाच्या दिवाळी अंकातली चित्रे ही पण अशीच काढली असणार. 3d render, cinematicचा अर्थ फोड करून सांगणार का?

In reply to by भागो

चित्रगुप्त 18/06/2024 - 17:14
यांचे नेमके अर्थ मलाही ठाउक नव्हते. चित्र बनवताना खाली विविध पर्याय असतात, त्यापैकी वेगवेगळे निवडले तर वेगवेगळे प्रभाव निर्माण होतात. सध्या मी निशुल्क वापरत असल्याने रोजच्या वापरावर मर्यादा आहे, त्यामुळे भरपूर प्रयोग करून बघता येत नाहीयेत. मी अंदाजाने हे दोन पर्याय निवडले होते. बरे झाले तुम्ही अर्थ विचारलात, त्यामुळे मी गुगलून बघितले, ते असे: --- A 3D render is a computer-generated image (CGI) created from a 3D model using specialized software. The process of creating a 3D render is called 3D rendering, and it's the final step in the 3D visualization process. 3D rendering can be used to create photorealistic or artistic images of a variety of scenes and locations, including interiors and exteriors, landscapes, and structures. --- Cinematic AI images are images created using artificial intelligence (AI) to mimic the style of cinematic photography. Cinematic photography is a style that aims to create images with depth and emotion that resemble movie stills.

In reply to by चित्रगुप्त

भागो 18/06/2024 - 17:25
मी जेव्हा 3d शिकत होतो( Blender) ती इमेज आपल्याला तिन्ही अक्सिस मधून फिरवता येते. मला वाटले तस काही आहे कि काय. असेलही. नसेल तर पुढे मागे येईलही. इन जनरल मला राजा रविवर्माची स्टाईल वाटली.

सुरिया 18/06/2024 - 18:26
कितीही एआय आलं. रंगानं हात बरबाटवायचा थांबला, स्काय इज द लिमिट सोडा, ब्रेन इज द लिमिट कमी पडायलं तरी बुढऊ पेंटरबाबू आपला थांबलेला काळ अन फ्यांटस्या सोडायला तयार नाहीत असं दिसतंय. त्याच त्याच बाया अन तीच ब्यागरांडं तर आधी प्यारीसातल्या पेंटिंगात आणि गेलाबाजार चांदोबात बघितल्याच आहेत की. . आर्टिस्ट आहात, अनुभवी आहात अन एआय हाताशी हाय तर बनवा की एखादी कालातीत काहीतरी. उगी तेच तेच काय. एआय प्लस चित्रगुप्त हे कॉबोच कसे हिट्ट वाजले पाहिजे, बाकी स्क्रीप्टा बडवुन छान छान म्हणायला आम्ही हावोतच की.

In reply to by सुरिया

चित्रगुप्त 18/06/2024 - 20:01
@ सुरिया: धन्यवाद. 'बुढऊ पेंटरबाबू' आवडले. आत्ता आठ दहा दिवसांपूर्वी हे माध्यम हाती लागून सुरुवात झाली आहे. अनेक प्रयोग करायचे आहेत. बघूया पुढे काय काय होते. अर्थातच मूळचे तैलरंगात चित्रे रंगवणे थांबवायचे नाहीच. सत्तरीत आल्यावर बालपणीचा 'गुजरा हुवा जमाना' हवाहवासा, पुन्हा जगावासा वाटू लागतो. 'आता नही दुबारा' हे बुद्धीला कळत असले तरी काळाचे चक्र उलटे फिरून आता कालबाह्य/दुर्लभ झालेल्या गोष्टींमधे पुन्हा रमावेसे वाटू लागते, हे नैसर्गिकच असते, आणि ते त्या अवस्थेला पोचल्यावरच कळते. काही अद्वितीय, हटके, (मुद्दाम ओढून ताणून -) 'कालातीत' वगैरे करून दाखवायची, आपण ग्रेट वगैरे आहोत असे सिद्ध करण्याची खाज आणि मानसिक गरज/रुग्णता माझ्यात तरी अजिबात नाही. ज्यांना असेल त्यांनी तसे अवश्य करावे. -- बाकी नवनवीन क्षितिजांचा शोध घेत रहावा हे जरी खरे असले, तरी त्यात स्वतःची म्हणून असलेली आवड ही रहाणारच. त्यात गैर काही नाही. ज्यांना त्यात रस वाटेल त्यांनी बघावे, नसेल त्यांनी सोडून द्यावे. हा.का.ना.का.

चौकस२१२ 18/06/2024 - 19:00
सुरवातीला रोचक वाटले पण तोच तोच पण साहजिक लगेच जाणवतो त्यामुळे काही गोष्टीत वापरता येईल पण पुढे काय? आणि सगळेच हे वापरयाला लागले तर मग काय अर्थ मूळ चित्रकार आणि त्याची शैली आणि विचार हे मुळ

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 18/06/2024 - 21:50
मूळ चित्रकार आणि त्याची शैली आणि विचार हे मुळ
-- खरे आहे. परंतु रमलप्रतिमांमुळे अल्पावधीत नानविध शक्यतांचा शोध घेता येत असल्याने त्यांचा उपयोग करून घेत आपली कला परिपूर्ण करायला मदत मिळू शकते, माझा सध्या तोच प्रयत्न आहे.
सगळेच हे वापरयाला लागले तर मग काय अर्थ
सप्तसूर, सव्वीस वा अठ्ठेचाळीस मूळाक्षरे वगैरे सगळेच वापरत असले तरी प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे, प्रतिभेनुसार निर्मितीत फरक पडत जातो तसे यातही होईल.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 24/06/2024 - 14:49
नक्कीच प्रयोग करीत राहा ...पण एक चित्रांचा ग्राहक/ आवड असणारा ( मग ते स्थापत्य असो किंवा जाहिरात क्षेत्र असो ) म्हणून आलेली पहिली प्रतिक्रिया होती

शशिकांत ओक 18/06/2024 - 21:34
या सगळ्या प्रकारात प्रॉम्ट कसे लिहावे? याची माहिती मिळाली. व्यक्तीला सजवायला, जितके जास्त वर्णन लिहून ठेवले पाहिजे. बाकीचे तपशील साजेसे दिले की चित्र बनते हे समजले. मला यात विचारणा करावीशी वाटते की हे लेखी प्रॉम्ट लिहून देता देता आपण आधी तयार केलेल्या कलाकृतीला चढवून तिला जास्त नटवायला कुठल्या ॲपवर शक्य आहे का? कोणी असे प्रयोग केले असतील तर ते बघायला आवडेल.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/06/2024 - 21:40
आपण आधी तयार केलेल्या कलाकृतीला चढवून तिला जास्त नटवायला कुठल्या ॲपवर शक्य आहे का?
यासाठी बहुत काळापासून फोटोशॉप तर आहेच, बाकी आणखीही असतीलच.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/06/2024 - 21:57
प्रॉम्ट कसे लिहावे हाच यात कळीचा मुद्दा आहे. नेमके कोणते शब्द/वाक्य कोणत्या क्रमाने लिहायचे, कोणत्या तांत्रिक बाबी सांगायच्या वगैरेवर मार्गदर्शक लेख, व्हिडियो वगैरे आहेत, ते हळूहळू बघणार आहे. तुम्ही जर काही वाचले-बघितले तर ते इथे अवश्य लिहा. तुमच्या शिवकालीन युद्धतंत्र वगैरेवरील लेखनासाठी खूप उपयोग होऊ शकतो.

चौथा कोनाडा 19/06/2024 - 17:22
जबरदस्त चित्रं आहेत ! चिगु साहेबांच्या प्रयोगशीलतेला परिस सापडला आहे.. य लेखाच्या निमित्ताने प्रॉम्प्ट कसे लिहितात, त्यांचा क्रम, योग्य शब्द जुळवणी याची चुणु़क मिळाली ! ही नविन इंटरेस्टींग लेखमाला वाचानिय अ‍ॅज वेल बघणीय होणार यात शंका नाही ! आगे बढो चित्रगुप्त साहेब !

वकील साहेब 24/06/2024 - 12:01
आपण अपलोड केलेल्या एखाद्या फोटो वर आपल्या आदेशानुसार संस्कार करून नवीन इमेज ideogram बनवून देते का ? असेल तर ते कसे साध्य करावे ?

In reply to by चित्रगुप्त

गवि 24/06/2024 - 18:08
आधीच्या फोटोवर, विशेषतः व्यक्तीच्या फोटोवर बेमालूम संस्करण करून नवीन फोटो किंवा व्हिडिओ बनवून देणे यात बरेच कायदेशीर आणि नैतिक इश्युज आहेत. कोणतीही मुख्य प्रवाहातील लेजिट कंपनी असे फीचर (उपलब्ध असले तरी) वापरायला देणार नाहीत. इतक्यात तरी. पण या तंत्रात प्रवीण असलेले लोक स्वतः खटपट करून तसे बनवत असतातच. यात मुख्य समस्या डीप फेक टाईप व्हिडिओजची आहे. कोणाचे नग्न, बदनामीकारक चित्र किंवा त्याहून वाईट म्हणजे कोण्या समाजाच्या भावना दुखावणारे शब्द तोंडात घालून व्हिडिओ बेमालूम बनवले तर सध्या तरी बरेच मोठे नुकसान होऊ शकते. लोकांना अशा फेक गोष्टींची सवय व्हायला वेळ लागेल.

वकील साहेब 01/07/2024 - 03:37
Whatsapp अपडेट केलं तर whatsapp च नवीन फिचर असलेली जांभळी रिंग तुमच्या whatsapp च्या होम स्क्रीन वर दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर Meta AI नावाची नवीन चॅट बॉक्स ओपन होईल. इथे तुम्ही chat got ला विचारतात तसे अनेक प्रश्न विचारू शकतात. त्याची तात्काळ उत्तरे मिळतात. आणि त्याहून गंमत म्हणजे ideogram सारख्या प्रतिमाही बनवून मिळतात. त्याही अगदी त्वरित. त्यासाठी फक्त एक करायचं promt लिहितांना सुरवातीला फक्त imagine एवढा शब्द लिहायचा बस. Ideogram जसे 4 Result देते तसे meta ai फक्त एकच result देते. पण तोही छान असतो. मी गम्मत म्हणून चित्रगुप्त यांच्या promt कॉपी करून तिथे टाकून पहिल्या. हाती आलेल्या प्रतिमा खूपच छान होत्या. इथे डकवता येत नाहीये. पण तुम्ही स्वतः अजमावून पाहू शकता.

चित्रगुप्त 01/07/2024 - 07:44
Whatsapp चे Meta AI काही बाबतीत जास्त चांगले आहे असे दिसले. उदाहरणार्थ मानवाकृती ideogram पेक्षा जास्त चांगल्या येतात. दर दिवशी अमूक इतकी चित्रे असे काही बंधनही नाही, one more version असे लिहीले की पुन्हा आणखी एक नवीन चित्र मिळते. त्यात सुधारणांसाठी पण लिहून पाठवू शकतो, पण नेमक्या त्याच सुधारणा होतीलच असे नाही. काही वेडेवाकडे, चुकीचे पण होते. आधी /image असे लिहून मग इंग्रजीत prompt लिहायचा आणि मेसेज पाठवायचा.मिनीटभारात एक चित्र येते. मात्र ते चौरसाकारच असते. लांबट उभे वा आडवे मिळत नाही.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 01/07/2024 - 09:14
दोघांचे चेहरे एवढे सारखे कसे ? ( जरी भाऊ असले तरी ) तुम्ही इनपुट काय दिले होते ? एकाला ३ रा हात? आणि काही - प्रश्न या सर्व चित्रात सूर्य का असतो? -बहुतेक चित्रे "पौराणिक" किंवा तत्सम शैलीतील वाटतात ? इनपूट मुळे का काही वेगळे कारण ? समजा सिहासन चित्रपटा किंवा सामना चित्रपटाची कथा किंवा पिंजरा ची कथा कथा दिली तर?

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 01/07/2024 - 16:21
तुम्ही मांडलेले मुद्दे योग्य आहेत. १. चेहरे कसे येतील यावर आपले काहीही कंट्रोल नाही (मलातरी जमलेले नाही) हे जे गदायुद्धाचे चित्र इथे दिले, त्यासाठी अनेकदा प्रॉम्प्ट बदलून जी चित्रे येत गेली, त्या सर्वात काही ना काहीतरी चुका होत्याच, शेवटी त्यातल्या त्यात हे बरे वाटले. कशात दोघांना चारचार हात, चार गदा, कशात गदांना दोन्हीकडे गोलाकार डोकी (किंवा जे काही म्हणतात ते) गदा वाट्टेल तश्या धरलेल्या, शेवटी वैताग आला. बरेचदा पात्रांचे चेहरे चिनी-जपानी प्रकारचे, माना वाट्टेलतश्या वळलेल्या, हातांचे बोटे कमिजास्त किंवा चुकीची, असा सगळा घोळ असतो. मी फुकटवाले कॄबु वापरतो त्यामुळे असे होते का ते ठाऊक नाही. कदाचित टर्मिनेटर याविषयी सांगू शकतील.तीन हात वाले फक्त हेच होते, बाकीच्यात किमान चार-चार तरी होते. यातला मागच्या बाजूचा एक हात मी फोटोशॉपमधे मिटवला, पण ते चित्र इथे चढवता आले नाही. २. - प्रश्न या सर्व चित्रात सूर्य का असतो? उत्तरः ती माझी वैयक्तिक आवड आहे. मुळात मला संध्याकाळची वेळ, संध्याकाळची चित्रे लहानपणापासून आवडतात. आकाशातले रंग, ढग, मावळता सूर्य, हळू हळू गडद होणारा आसमंत, लांब सावल्या, इमारतींवर, झाडा-खडकांवर रेंगाळणारे सूर्याचे शेवटले सोनेरी किरण वगैरे अजूनही फार रम्य वाटतात. काहीतरी सरत आलेले, संपत आलेले असल्याची भावना हुरहुर निर्माण करते, ती आवडते. ३. बहुतेक चित्रे "पौराणिक" किंवा तत्सम शैलीतील वाटतात ? इनपूट मुळे का काही वेगळे कारण ? -- मुख्यतः वैय्यक्तिक आवडीमुळेच. ग्रीक-रोमन पुराणकथांवरील महान युरोपियन चित्रकारांची चित्रे हा माझ्या आवडीचा विषय. पॅरीस, रोम, फ्लॉरेन्स वगरेच्या संग्रहालयांमधे खजिनेच आहेत त्या चित्रांचे. कितीदाही बघितले तरी दर वेळी त्यात नवीन काहीतरी दिसते. भारतीय पुराणावरील कांगडा, गुलेर, बसौली, बूंदी, किशनगड वगैरे शैलीची चित्रेही अद्भुत वाटतात. लहानपणी बघितलेली 'चांदोबा' तील चित्रे तर फार सुंदर असायची. (त्यामानाने रविवर्मा सामान्य वाटतो) 'भीम-दुर्योधन गदायुद्ध' असा विषय घेऊनच रमलचित्र बनवायचे (१९६० च्या सुमाराचे चांदोबाच्या मलपृष्ठावरील ते चित्र अजून लक्षात आहे), असे ठरवून प्रयत्न केला, ते बरेच कठीण असल्याचे दिसून आले. मुळात 'गदा' ला इंग्रजीत काय म्हणतात तेच ठाऊक नव्हते, Mace हा शब्द सापडला. तो वापरला तर मोठ्ठा घण्/हतोडा येऊ लागला. मग त्यात 'mace with big spherical head' असे केल्यावर नुस्ता साधा दांडा आणि त्यावर गोल फुटबॉलएवढा गोळा. असे करता करता वैताग आला. त्या मानाने 'हेलन ऑफ ट्रॉय' वगैरे युरोपियन विषय घेतले तर फार सुंदर चित्रे बनतात असा अनुभव आला. - मुळात कृत्रीम बुद्धिमता अल्पावधीत ही चित्रे कशी बनवते, हे कुणी जाणकारांनी व्यवस्थित समजावून सांगितले तर कदाचित अशा सगळ्या प्रश्नांवर प्रकाश पडेल, आणि मार्ग सापडेल. तोपर्यंत जमेल तशी खटपट करायची. त्याचाही हळू हळू कंटाळा येईल बहुतेक. ४. समजा सिहासन चित्रपटा किंवा सामना चित्रपटाची कथा किंवा पिंजरा ची कथा कथा दिली तर? -- करून बघा. माझ्यात तेवढा उत्साह उरलेला नाही आता.

In reply to by चित्रगुप्त

गवि 01/07/2024 - 09:47
जेव्हा एखादे शहर कायमचे समुद्रात बुडते तेव्हा एखाद्या तुफानात प्रचंड मोठ्या लाटांनी बुडत नसून अनेक वर्षे हळुहळू पाण्याची पातळी वाढत वाढत ते कणाकणाने पाण्याच्या पातळीच्या खाली जात असावे. तुफानी लाटांनी पाणी शहरात भरले तरी ते ओसरून जाईल.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 02/07/2024 - 06:25
द्वारका समुद्रात बुडाली ह्याचे वर्णन केवळ दोन तीनच श्लोकांत महाभारतकारांनी केले आहे. तत्सागरसमप्रख्यं वृष्णिचक्रं महर्द्धिमत् | उवाह रथिनां श्रेष्ठः पार्थः परपुरञ्जयः || निर्याते तु जने तस्मिन्सागरो मकरालयः | द्वारकां रत्नसम्पूर्णां जलेनाप्लावयत्तदा || तदद्भुतमभिप्रेक्ष्य द्वारकावासिनो जनाः | तूर्णात्तूर्णतरं जग्मुरहो दैवमिति ब्रुवन् || , याप्रमाणें अर्जुनामागून द्वारकेंतील सर्व माणसें बाहेर पडून वाट चालू लागलीं असतां मागें समुद्रानें आपल्या पाण्यांत रत्नसंपन्न अशी सर्व द्वारका नगरी बुडवून टाकिली. अर्जुन जसा जसा त्या नगरीपासून पुढें पुढें जाई, तसा तसा तो तो नगरीचा भाग समुद्र बुडवून टाकी ! तो अद्भुत प्रकार पाहून द्वारकावासी मंडळी 'काय हो हैं दैव!' असें म्हणत अधिकाधिक वेगानें पुढें जाऊं लागली.

यापूर्वीच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१) दिलेल्या चित्रांनंतर गेल्या काही दिवसात आणखी बरेच प्रयोग केले, त्यापैकी काही चित्रे: चित्र १. . चित्र २. . A cinematic view of a picturesque landscape featuring an ancient castle in greek architectural style.

भल्याभल्यांसाठी आव्हान ठरणारं रोलँ गॅरोस

पराग१२२६३ ·

सौंदाळा 05/06/2024 - 13:05
लाल मातीचे कोर्ट. विम्बल्डन, कृत्रिम गवत गाजवणार्‍या कित्येक दिग्गजांना इकडे सूर गवसत नाही त्यामुळे फ्रेंच ओपन खासच. नादाल आणि फ्रेंच ओपन हे समीकरण घट्ट आहे. ऑलिंपिक मधे तेवढी मज्जा नाही. पुढील वर्षी राफा खेळेल का माहिती नाही. लेख आवडला.

पॅरीसमधील रोलँ गॅरोस टेनिस संकुलात (Roland Garros Tennis Complex) यंदाच्या टेनिस हंगामातील दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा सुरू झालेली आहे. क्ले कोर्टवर खेळवली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा. इथल्या लाल मातीची कोर्ट्स अग्रमानांकितापासून बिगरमानांकित खेळाडूंची कायमच शारीरिक, मानसिक कसोटी पाहत आलेली आहेत. त्यामुळे रोलँ गॅरोस संकुलातील मध्यवर्ती कोर्ट असलेल्या फिलीप चॅर्टिएर कोर्टावर (Philippe Chartier) आजवर अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळालेले आहेत.

न्यूत की द्यूत?

माहितगार ·

अहिरावण 09/05/2024 - 19:39
aa हल्ली गाय, शेण, गोमुत्र यांना तुच्छ मानण्याची वृत्ती बोकाळली आहे. ऋग्वेदात गायीचे अपार महत्व आहे. आपली संस्कृती गाय, गोमय, गोमुत्र यांना पवित्र मानते. आपले पुर्वज याच पावित्र्याला जपत आपली संस्कृती वर्धिष्णू ठेवत आणि वसा पुढे देत. आज अचानक त्यांना बाजुला सारुन आपण महान आहोत हा विचार मानणे म्हणजे आपले पुर्वज नाकारणे. असो. ज्याची त्याची जाण समज

In reply to by अमरेंद्र बाहुबली

असो. हा धागा राजकीय नाही. चुकून इथे प्रतिसाद दिला. इथे चर्चेची आवश्यकता नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 09/05/2024 - 20:36
>>>सावरकरांच्या गायी बद्दलच्या विचारांवर आपलं मत काय? तुमच्याशी कोणत्याही पद्धतीची चर्चा, वाद, संवाद, विचारांची देवाण घेवाण, ख्यालीखुशाली, विचारपुस, आपुलकीचे वा शत्रुत्वाचे संप्बंध ठेवण्याची माझी इच्छा नाही. यासंबंधी कोणताही बदल होईल असे मला वाटत नाही. तुम्ही माझ्यासाठी मित्र नाही, शत्रु नाही. परिचित नाही, अपरिचित नाही. केवळ एक परका. तुम्ही माझ्याबद्दल हवे ते बोलण्यास, लिहिण्यास, विचार करण्यास स्वतंत्र आहात. माझ्याबद्द्ल काहीही लिहिले अक्षरशः काहिही लिहिले तरी मी विचारणार नाही अथवा प्रतिवाद करणार नाही. हा जाहीर शेवटचा तुम्हाला दिलेला प्रतिसाद. विषय संपला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 10/05/2024 - 05:57
सावरकरांचे फक्त अर्धे विचार घेऊ नका सगळे घ्या हिंमत असेल तर आचरणात जरूर पडली तर गाय हि खावी ह्याच अर्थ जे हिंदू जे गायचं काय मास हि खात नाहीत याना डिवचण्याचा डाव म्हणून मुद्दामून बीफ पार्टी करावी याचे समर्थन सावरकरांनी केलं नाही ह्याला विंग्रजीत चेरी पिकिंग असे म्हणतात

In reply to by अहिरावण

चौकस२१२ 10/05/2024 - 06:03
भारताबाहेर पडल्यावर नेहमी हा प्रश्न विचारला जातो कि तुम्ही हिंदू गाय/ बैल का खात नाही , यावर " धर्मात निषिद्ध आहे म्हणून " असे अजिबात ना सांगता त्यामागची सामाजिक, शेती. अर्थ हे कारण आहे ( गाय जिवंत असून तिचा जास्त उपयोग आहे एकदा मारून नाही निदान तेवहा जेवहा भारतासारख्या देशात गायची पैदास करणे त्यानं जगवणे एवढे सोपे नवहते " आता हा तर्क प्रत्येकाला कुठे समजवत बसायचा असा विचा रकृं पूर्वी कोणतरी हुशार व्यक्तीने त्याला धार्मिक स्वरूप दिले असावे ( हा माझा तर्क ) असे सांगितल्यवा र्बहुतेक जण समजून घेतात स्पष्टीकरण मी गोमास खाल्ले आहे परंतु ना खाणाऱ्यांचा पूर्ण आदर

In reply to by चौकस२१२

माहितगार 10/05/2024 - 07:06
विवीध विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी याचा मी आग्रही असतो पण अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरानी अभ्यासपूर्ण चर्चेचा रसभंग होतो. ह्या धाग्यात नवा आणि वेगळा विषय आहे तो नेहवीच्या वाद विवादांनी हायजॅक होऊ देणे सयुक्तीक नाही यासाठी सदस्यांनी सहकार्य करावे आणि संपादकांनी अनुषंगिक नसलेले सर्व प्रतिसाद उडवावेत अशी नम्र विनंती

माहितगार 09/05/2024 - 22:57
@अहिरावण आपण वर झालेल्या अनुषंगिक नसलेल्या विषयांतराकडून धागा लेखाच्या मूळ विषयाकडे येऊ. तसे जुगारी जुगार (पैसा) खेळ किंवा खेळ नसलेल्या कोणत्याही भविष्यात काय होणार हे निस्चित न सांगता येणार्‍या कोणत्याही गोष्टीवर लावू शकतो. द्यूत शब्दामुळे जुगाराची आठवण होणे स्वाभाविक असले तरी आपण इथे न्यूत / द्युत यांचा मुख्यत्वे खेळ म्हणून विचार करतो आहोत. एनीवे आपण दिलेल्या ऋग्वेद ऋचांमध्ये नेमके कोणते शब्द संबंधीत खेळा बद्दल किंवा जुगारा बद्दल आहेत हे समजून घेण्यास आवडेल .

माहितगार 09/05/2024 - 23:39
या संस्कृत कोशात अक्ष शब्दाच्या अर्थात जुगार आणि चाक ह्या दोन्ही अर्थांचा समावेश दिसतो त्या शिवाय अक्षद्युत असा शब्दही दिसतो आणि न्यूत हा खेळही वर्तुळाकार असणे इथे लक्षात घेण्यासारखे असावे असे वाटते.

माहितगार 10/05/2024 - 07:46
जिज्ञासूंसाठी इंग्रजी विकिपीडियावर गॅम्ब्लेर्स लॅमेन्ट लेख दहावे मंडल लेख दुवे. एक वेगळा अनुषंगिक प्रश्न मनात आला की महाभारतातील धर्मराज युधिष्ठीराचा द्यूतातील सहभाग काल्पनिक नाही असे समजले तर धर्मराज युधीष्ठीराने ऋग्वेदातील अक्ष सुक्तास प्रमाण मानून द्य्ट्य खेळण्यास नकार द्यावयास हवा होता किंवा महा भारतातील प्रसंग आधी झाला / लिहिला यातुन ऋग्वेदातील ऋचेची प्रेरणा असेल तर महाभारत प्रसंगाचा उल्लेख ऋग्वेदातील सुक्तात आला असता. एक अशीही शक्यता असू शकते का की अक्ष सुक्त आणि महाभारतातील द्युत प्रसंग लिहिणार्‍या व्यक्ती एकच असतील किंवा समकालीन असतील? मला वाटते तीसर्‍या शक्यतेचा अभ्यास व्हावयास हवा कारण मी जर जुगार सट्ट्यावर टिका करणारा साहित्यिक असेन तर सुक्तही लिहीन आणि स्पष्ट करणारे कथानक लिहिन त्यामुळे एका लेखन प्रकारात दुसर्‍या लेखनाचा उल्लेख करणे गरजेचे किंवा सयुक्तिक वाटणार नाही.

In reply to by माहितगार

अहिरावण 10/05/2024 - 12:34
तुम्ही नक्की कोणते पेय घेता हो ? नाही म्हणजे इतके भन्नाट विचार कसे उत्पन्न होतात? :) परंपरा मोड परंपरेनुसार व्यासांनी महाभारत लिहिले आणि व्यासांनीच ऋग्वेद संहीता संपादीत केली असे मानले जाते. परंपरा मोड समाप्त महाभारत लेखन काल इसपु २ ते ४ शतक ऋग्वेद इसपु १००० ते १५०० कदाचित आज जसे अनेकांना वेद, पुराणातील नेमके माहित नसते तसेच दशग्रंथी पाठांतर करणा-यांव्यतिरीक्त फारसे कुणाला ऋग्वेद सुक्त, अर्थ माहीत नसावे. पाठांतर करणा-या सर्वांनाच ते माहित असतील असे नसावे. महाभारत ज्या लेखकाने/लेखकांनी लिहिले त्यांना हे सुक्त माहित होते वा नव्हते हे माहित नाही. माहित असेल तर सुक्ताचा उल्लेख न करता कथानकात खुबीने वापर केला. एवढं होऊनही अज्ञातवासात धर्म द्युत खेळत होताच.

In reply to by अहिरावण

माहितगार 10/05/2024 - 14:55
आज अक्षय तृतीये निमीत्ताने आंब्याचा रस घेतला. तसा मागच्या महिन्यापासून चालूच असल्यामुळे शरीरात वाढलेल्या साखरेचा प्रमाद असल्यास ठाऊक नाही.
एवढं होऊनही अज्ञातवासात धर्म द्युत खेळत होताच.
हे माहित नव्हते

In reply to by माहितगार

अहिरावण 10/05/2024 - 19:22
>>>हे माहित नव्हते हे धंदाड तत्ताड धंदाड तत्ताड धंदाड तत्ताड धंदाड तत्ताड माहितगारांना माहित नव्हते असे काही मिळाले हो... =))

आकाश गेडाम आणि मोहिनी गजाभिये या नागपूरस्थीत अभ्यासकांचा Study of Vanished South Asian Board Game 'Nyout गेल्या वर्षात प्रकाशित झालेल्या छोट्याशा शोध निबंधात त्यांना वाघोरी टेकड्यांच्या पायथ्याशी चंद्रपूर जिल्ह्यातील एरवा झरी गावाच्या परिसरात (N20’38’53, E79’35’23) एका प्राचीन खेळाच्या खूणा आढळल्याचा उल्लेख आहे.

हिमालयातून सुरू झालेली माझी गोष्ट. . .

मार्गी ·
माझा जन्म झाला हिमालयाच्या पर्वतीय परिसरामध्ये. उत्तराखंडच्या पिथौरागढ़ जिल्ह्यात सद्गड नावाच्या अतिशय सुंदर गावाजवळ. हिमालयाच्या पर्वत रांगांच्या मधोमध! सगळीकडे डोंगर, झाडं, पशु- पक्षी अशा वातावरणात मी जन्मलो. अतिशय थंड वातावरण होतं ते. मी आणि माझे भाऊ- बहीण डोंगरात खेळायचो. खूप सुंदर परिसर आणि हीss शांतता होती तिथे. सगळीकडे हिरवंगार वातावरण, माती, शेतं आणि भरपूर थंडी. शिवाय आम्ही जिथे राहायचो तिथे खूप बकर्‍या सोबत असायच्या. मी बकर्‍या आणि गायी- बैलांसोबत खेळायचो. माझे दिवस खूप मजेत जात होते. आजूबाजूला असलेले डोंगर- झाडं मला ओळखीचे वाटायला लागले होते.

दर्शननं केला प्रवास

पराग१२२६३ ·

निनाद 25/04/2024 - 17:52
तुमचे रेल्वे प्रेम आणि विषयातले सातत्य सर्व तपशिल साधत असलेली लिखाणाची ढब वाखाणण्याजोगी आहे.

चौकस२१२ 26/04/2024 - 11:29
तुमचा रेल्वे या विषयांवरील अभ्यास आणि छन्द कौतूकास्पद आहे पण हे नाही कळले कि "मिरज ते पुणे आणि ते सुद्धा पहाटे ४.५० निघून यात विशेष असे काय आहे ?

चौथा कोनाडा 26/04/2024 - 12:29
मस्त माहितीपुर्ण अनुभव ! रेल्वेचं जगच वेगळं .. त्यात तुम्ही मस्त फिरवून आणता ! ओघवतं लेखन... तुमच्या सवेच प्रवास करतो आहे असं वाटलं ! धन्यू !

मिरजेत दर्शन दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं.

माझ्या मिपावरील लेखांचं इंग्रजी पुस्तक We are the Quarry, Fate is the Hunter

स्वीट टॉकर ·

तुमचे अनुभवकथनपर लेखन कायमच आवडले आहे. ते लेखन आता इंग्रजीमधे पुस्तकाच्या स्वरुपात उपलब्ध आहे ही खूपच आनंदाची बाब आहे. यासाठी हार्दिक अभिनंदन. 'We are the Quarry, Fate is the Hunter' हे पुस्तक या प्रकारचे लेखन वाचायला आवडणार्‍या व्यक्तिंना आवर्जून सुचवीन.

माझे मिपावर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात. दुसरी गोष्ट म्हणजे माझे नव्वद टक्के विद्यार्थी अमराठी आहेत. त्यांना मी कॉलेजमध्ये जेव्हां यातल्या काही गोष्टी सांगितल्या तेव्हां त्यांनी आग्रह धरला की मी त्याचं इंग्रजीत पुस्तक करावं. मी सर्व अनुभव पुन्हा इंग्रजीत लिहिले आणि कालच त्याचं पुस्तक प्रकाशित केलं आहे.

गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची

पराग१२२६३ ·

चित्रगुप्त 07/04/2024 - 15:00
प्राचीन भारतीय तंत्रज्ञान / विद्येविषयी रोचक माहिती. आजवर दुर्लक्षित या विषयावर आता प्रत्यक्षात काही घडू लागले आहे, ही अतिशय मोलाची बाब आहे. याबद्दल पुढे काय काय घडते ते जाणून घ्यायला आवडेल. या धाग्यावर किंवा नवीन लेख अवश्य देत रहावेत ही विनंती. लेखाबद्दल अनेक आभार. . प्राचीन भारतीय जहाजाचे उठाव- शिल्प. . इ.स. पहिल्या शतकातील भारतीय समुद्र मार्ग. . सातवाहन नाणे. . . याविषयावरील विडियो आणि लेखः https://www.youtube.com/watch?v=M03ikNNDukQ&ab_channel=CACHEINDIA https://youtu.be/m1uBAZlmLu4?feature=shared https://brewminate.com/naval-warfare-in-ancient-india/ https://www.crystalinks.com/indiaships.html https://www.indiadivine.org/indias-ancient-great-maritime-history/

रामचंद्र 07/04/2024 - 16:04
ते नाव 'रॉयल्टी' नसून 'लॉयल्टी' होतं अशी माहिती मिळते. एकूणच सरकारचा हा एक चांगला उपक्रम वाटतो. पूर्वी टिम सेव्हरिन, थॉर हेयरडाह्ल यांसारख्यांनी अशाच मोहिमा केलेल्या होत्या. आपल्याकडे ओरिसात कटकला कार्तिक पौर्णिमेपासून आठवडाभर बाली यात्रा ही मोठी जत्रा असते. या मुहूर्तावर पूर्वी स्थानिक दर्यावर्दी आग्नेय आशियात व्यापारासाठी जायला निघत असत त्याची आठवण म्हणून ही जत्रा असते. मात्र अलिकडे अशी खरीखुरी सागरी मोहीम काढल्याचे माहीत नाही. अलिकडे तीसएक वर्षांपासून भारतीय नौदलातर्फे वेगवेगळ्या शांतताकालीन साहसी सागरी मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. त्यात लेखात उल्लेखलेल्या मोहिमेसारख्यांनी तर अजूनच चांगली भर पडेल.

रामचंद्र 07/04/2024 - 16:27
टिम सेव्हरिनच्या 'सोहार' या सिंदबादच्या सफरींवर आधारित मोहिमेवरचा व्यंकटेश माडगूळकरांचा लेख ललितच्या दिवाळी अंकात वाचल्याचं आठवतंय.

रामचंद्र 07/04/2024 - 22:43
इंग्रजांनी भारतीय सीमावर्ती तसेच एकूणच व्यापारी सागरी वाहतूक आपल्याच हातात ठेवली होती. या अधिकृत मक्तेदारीला आव्हान देणं हे एतद्देशीय व्यावसायिकांना अशक्यच होतं. मात्र त्यावरही मात करण्याचा एक प्रयत्न केरळात झाला. आपल्याकडे वालचंद हिराचंदांनी धाडस करून डावपेच लढवत गांधीजींच्या चळवळीला पाठिंबा देत लॉयल्टीचा म्हणजेच सिंदिया स्टीमशिप कंपनीचा प्रयोग संपूर्ण यशस्वी करून दाखवला. वालचंदांची दृष्टी आणि धमक याला तोड नाही.

लेखन माहितीपूर्ण आहे. बाय द वे, लेख वाचतांना चहा पिता पिता माझ्या मनात विचार आला. की, समुद्रपार करणे जिथे शास्त्रसंमत नव्हतं किंवा पाप मानल्या जात होतं त्या त्यापूर्वीचा काळ अतिशय प्रगतीचा होता असे म्हणावे लागेल. पाप मानल्या जायचं तो काळ अगदी अलिकडचे असावा असे वाटते. रामायण, महाभारत, काही धर्मग्रंथात समुद्र-प्रवास होत होता असे दिसते. अभ्यासु- जिज्ञासू भर घालतीलच. व्यापार- धन-लोभाच्या अपेक्षेने, सुंदर स्त्रीच्या अपेक्षेने आपले भारतीय लोक समुद्रात दुरवर फेरफटका मारुन समुद्र धोक्याची रिस्क घेत होते, असे दिसते. ( संदर्भ ) नवीन जहाज बांधणी आणि या निमित्ताने भारतीय सागरी व्यापार, भारतीय संस्कृती, सांस्कृतिक देवाण घेवाणात जहाजांची जी ऐतिहासिक-सांस्कृतिक भुमिका होती तीही समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे (अभ्यासू )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 08/04/2024 - 11:05
प्रतिसाद आवडला. पूर्वी ब्रिटिश बोट बांधणी तज्ञ इथे मराठा आरमाराचे काम बघायला (किंवा त्यांना चार गोष्टी शिकवायला) आले होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात बोट बांधणीविषयक माहिती आणि कागदपत्रे पाहून ते थक्क झाले आणि आम्ही तुम्हाला काय शिकवणार अशा आशयाचे बोलले.. असे कोणत्या तरी व्याख्यानात ऐकले होते किंवा कुठेतरी वाचले होते. पण नेमका संदर्भ मजजवळ नाही . शिलाई पद्धत हे नाव पूर्वी ऐकले नसले तरी फळ्या वाकवून आणि बऱ्यापैकी या तंत्राने कोंकणात लहान ते मध्यम मच्छीमार बोटी बांधताना बघितले आहे. फणसाचे लाकूड असे. आणि कसले तरी तेल. लेख रोचक.

लिओ 10/04/2024 - 13:43
या आधी भारतीय नौदलाने १९९७ च्या आसपास INS Tarangini नावाचॅ जहाज आपल्या ताफ्यात दाखल केले. हे जहाज जरी डिझेल इंजिन ने सज्ज असले तरी या जहाजावर शीडाची यंत्रणा आहे, डिझेल इंजिन आणि वारा या दोन्हीच्या सहाय्याने हे जहाज भ्रमंती करते.

चित्रगुप्त 10/04/2024 - 14:41
इस्लामी आणि ख्रिस्ती सत्तांचा हिंदु संस्कृतीवर झालेला परिणाम - या विषयावर कुणीतरी विस्तृत लेख लिहावा असे सुचवतो. अशी काही पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत का?

5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.

रेवदंड्याचं दर्शन

पराग१२२६३ ·

गोरगावलेकर 20/02/2024 - 14:48
कोरलाई किल्ला : आत पाहण्यासारखं फारसं काही नसलं तरी पुरातत्व खात्यातर्फे किल्ला खूप छान राखला आहे. किल्ल्यावरून सागराचे तसेच कुंडलिका खाडीचेही सुरेख दर्शन होते. दोन वर्षांपूर्वी येथे जाऊन आले आहे आणि त्याबद्दल मिपावर लेखही लिहिला होता.

Korlai कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.

'रोम' रंगी रंगले मन - 'तिवोली' आणि रोमचा 'किल्ला'

चित्रगुप्त ·

टर्मीनेटर 29/01/2024 - 16:45
मस्तच! माहिती आणि फोटोज छान 👍 (काय समस्या आहे माहित नाही पण काही फोटोज पुर्ण दिसत नाहियेत, ते नंतर पुन्हा बघतो.)
रोमन साम्राज्यातील वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम सारख्या भव्य इमारती, चिलखते, वस्त्रप्रावरणे वगैरेंबद्दल कमालीचे आकर्षण निर्माण झालेले होते.
+१००० मला पण ग्रीक/रोमन वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम, अँफी थिएटर, अ‍ॅक्वाडक्ट अशा गोष्टींचे प्रचंड आकर्षण आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:00
प्रतिसादांबद्दल अनेक आभार. फोटो आवडत आहेत हे वाचून चांगले वाटले. रोमन 'अ‍ॅक्वाडक्ट' हा अद्भुत प्रकार आहे. त्यासाठी मुद्दाम जऊन बघायला हवे. पुन्हा कधी गेलो तर नक्की बघेन. . .

Bhakti 29/01/2024 - 18:14
सर्वच फोटो, वर्णन, माहिती सुंदर आहे. धबधब्याच्या आणि बाजूला किल्ला तो फोटो जास्त आवडला.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:04
लेख आणि फोटो आवडत आहेत हे वाचून आणखी लिहिण्याचा उत्साह वाढतो आहे. @कंजूस, 'अगदी रस्त्यापासून आकाशापर्यंत आपण डोळ्यांनी बघतो तसं चित्र आहे' हे वाचून मी पुन्हा तो फोटो बघितला, आणि मलाही तसेच वाटले आणि हे कसेकाय घडले असावे, हा प्रश्न पडला आहे. .

In reply to by मनो

चित्रगुप्त 30/01/2024 - 20:02
एक सुचले ते असे, की कोणतेही दृश्य बघताना बहुतांशी आपण आपली नजर 'आडवी' फिरवत असतो. मोठा विस्तीर्ण देखावा बघताना तर विशेषच. त्या मानाने खालपासून वरपर्यंत दृष्टीक्षेप टाकण्याचे प्रसंग कमी असतात. या फोटोत 'आडवे' बघण्यासारखे काही नाही. बाजूच्या भिंतींमधील खिडक्या पण आपली नजत 'आत आत' नेत आहेत. त्या मानाने फोटोत 'उभे' घटक जास्त आहेत. 'आत' जाणारा रस्ता, पलिकडील इमारती आणि तीन ठिकाणी दिसत असलेले निळे आकाश. यामुळे असे वाटत असावे. (असे वाटते) Sir Ernst Hans Josef Gombrich यांच्या Art and illusion : a study in the psychology of pictorial representation या चित्रकलाविषयक पुस्तकात या विषयी विस्तृत उहापोह वाचल्याचे आठवते, पण नेमके काय ते विसरलो. या पुस्तकाची पीडीएफ उपलब्ध आहे: https://archive.org/details/artillusionstud00gomb

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 31/01/2024 - 10:07
Vertical shift किंवा perspective corrected पद्धतीचे wide angle lens चा एक प्रकार मिळतो. अतिशय महाग लेन्स असतं. (20/24mm prime with f/2) .तर ते वापरून फोटो घेतला असणार.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 31/01/2024 - 11:06
सगळे फोटो स्वस्तातल्या शामसंग (-खेले होरी) मोबल्यातून, तेही फक्त आटो मोडमधे काढलेत. फक्त क्रॉप केलेत हवे तसे. बाकी काय नाय. 'दृष्टी' हवी, ती निसर्गचित्रणातून मिळाली असावी, आणि थोर चित्रकारांची चित्रे बघण्यातून. बाकी फोटोग्राफीतले ओ की ठो कळत नाही.

हा लेख आणि फोटो तर आवडलेच पण त्यात दिलेल्या ईतर लिंकाही उघडुन वाचल्या. केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते. फक्त खिसा काय म्हणतो ते पहावे लागेल. :) आपण ईतकी डिटेल माहीती काढुन ठिकाणे बघताय हे विशेष. नाहीतर ईथेतिथे सगळे सारखेच, तेच राजवाडे,त्याच मुर्त्या आणि काय काय. फोटोही सुंदर आलेत. रच्याकने- फार वर्षांपुर्वी ऑफिसच्या कामानिमित्ताने ब्रसेल्स आणि अ‍ॅमस्टरडॅम बघणे झाले होते, पण मॅनिकेन पिस, तुसाँ म्युझियम, व्हॅन गॉग म्युझियम अशा २-४ गोष्टी सोडल्या तर फारशी नावेही आठवणार नाहीत. पुभाप्र

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:12
केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते.
-- अगदी खरे. माझ्या ओळखीतले जे कुणी तसे फिरुन आलेले आहेत, त्यांच्याकडून ऐकलेले माझ्या आवडीत कुठेच बसणार नाही. कुठेही जाण्यापूर्वी तिथला सांगोपांग अभ्यास करून जाणे बरे, अर्थात नेहमी ते जमत नाही आणि काही ना काही बघणे राहूनच जाते.

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 31/01/2024 - 13:24
सहमत. ग्रूपवाले वेळ फार घालवतात. नाश्ता, जेवण, शॉपिंग यातून वेळ उरल्यास लीडरने सांगितलेलं पाहाणं. आणि हो ग्रूप फोटो.

तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला! रोमची पहिली ओळख Dan Brown च्या एंजल्स अँड डेमन्स पुस्तकातून झाली. पुस्तक वाचता वाचता एकेका स्थळविषयी इंटरनेटवर जास्त माहिती वाचत होतो. त्यातून रोममधील वास्तुकला, शिल्पकला यांची ओळख झाली. St Peter's Basilica, Castle Sant' Angelo, Pantheon या प्राचीन वास्तू, Fontana dei Quattro Fiumi (Fountain of the Four Rivers) सारखी स्थापत्य कला, Bernini सारख्या कलाकाराच्या स्वर्गीय कलाकृती - Ecstasy of St Teresa. इतक्या सुरेख, भव्य, बारकावे दाखवणाऱ्या कलाकृती! अशीच पॅरिस, लुव्र, लिओनार्दो दा विंची यांची ओळख दा विंची कोड मधून झाली, तर फ्लॉरेन्सचं सौंदर्य इन्फर्नो मधून दिसलं! ओरिजिन या पुस्तकातून Casa Milà आणि Sagrada Família अशा अनोख्या वास्तू समजल्या...

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 30/01/2024 - 13:47
तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला!
या पुस्तकांपैकी फक्त 'दा विंची कोड' चे मराठी भाषांतर वाचले आहे. ते आवडले पण सिनेमा फारसा रुचला नाही. 'इन्फर्नो' वरील 'गुस्ताव्ह दोरे' (Gustave Dore) च्या चित्रांचे एक पुस्तक माझ्याकडे आहे. विलक्षण चित्रे असतात दोरेची. आत्ताच अ‍ॅमेझोनवर डॅन ब्राऊनची अन्य पुस्तके (मराठी) शोधून ठेवली आहेत. येत्या मार्चमधे दहा दिवस लंडनमधील संग्रहालये बघणार आहे. त्यासंबंधी काही विशेष पुस्तके, सिनेमे वगैरे असल्यास जरूर कळवावे. अनेक आभार.

सुंदर लेख ! दोन प्रश्न १. Tempio di Vesta मधील एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? असा उल्लेख कोठे आहे काय ? २. नदी / कालवे / समुद्राच्या अवतीभवती वसलेल्या शहरांत / गावांत त्या पाण्याचा काही विशीष्ट गंध वगैरे येतो काय ? अवांतर : बनेल काढून रोमन सम्राटाच्या आविर्भावात दिलेली पोज आवडली.

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 31/01/2024 - 11:18
एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? हा प्रश्न समजला नाही. 'जाणल्यामुळे' म्हणजे काय ? कौमार्यभंग वगैरे प्रकार रोमन साम्राज्याच्या दीर्घ इतिहासात घडलेही असतील, काही ठाऊक नाही. पाण्याला विशिष्ट गंध वगैरेही माहित नाही. त्या दिवशी कडक ऊन्ह असल्याने घामाघूम होत फिरावे लागले होते, म्हणून सदरा काढलेला होता. कुठे रोमन सम्राट आणि कुठे म्या पामर. या लेखात एवढी रुची घेत असल्याबद्दल अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

जुन्या मराठी ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांमधे जोसेफ ने मेरीला जाणल्यामुळे (संयोग झाल्यामुळे) येशूबाळाचा जन्म झाला अशा प्रकारचे उल्लेख असतात त्या अनुषंगाने हा शब्दप्रयोग केला.

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 02/02/2024 - 12:32
'जाणण्या' चा नवीनच अर्थ जाणकाराकडून जाणून घेतला. आता कळले लहान मुलांना 'अजाण' 'निष्पाप' वगैरे का म्हणतात. जुन्या ख्रिस्ती धार्मिक पुस्तकातले आणखीही असे शब्दप्रयोग 'जाणून' घ्यायला आवडेल. आपली 'जाणीव' वाढीला लागली पाहिजे राव. अनेक धन्यवाद.

चौथा कोनाडा 31/01/2024 - 14:51
क्या बात ... एक नंबर मस्त ! माहिती आणि प्रचि लै छान ! रोम ची सुंदर सफर घडवलीत चित्रगुप्त जी !
या सेविकांना वय वर्षे ६ ते ३६ या अवधीत अखंड कौमार्य राखणे आवश्यक असायचे.
बाबो .. किती आवगड असं ह्ये म्हनायचं ! व्हिला ‘आद्रिआना जबरदस्त दिसतोय ! कल्पना करून तयार केलेला व्हिला ‘आद्रिआना चा व्हिडीओ भारी आहे ! Villa d'Este किती रम्य आहे ! वाहते पाणी,धबधबे, शंभर कारंजे, तलाव सुंदर ! रोमचा राजवाडा, गल्ल्या वास्तू भयन्कर सुंदर आहेत !
- अस्मादिक.
ह्यो फोटो लै पेशल !
आपुली आपण काढी शेलफी, तो येक मूर्ख.
हा हा हा

खूप सुंदर भटकंती आणि अप्रतिम फोटो! सोबतीला इतिहास उलगडून सांगितलात ते फार आवडलं. येणारी अनेक वर्षे तुम्हाला अशी छान भटकंती करायला मिळो या शुभेच्छा :)

नंदन 03/02/2024 - 17:02
लेख आणि फोटो - दोन्ही खासच! (काही वर्षांपूर्वी ट्रेवी कारंज्यात एक बारकंसं नाणं टाकून पुनर्भेटीचा मनसुबा व्यक्त केला होता - तो योग केव्हा येतो ते पहायचं!)

परत एकदा वाचला धागा. काय सुंदर आहेत सगळे फोटो. मन खूष झालं. असेच लिहित रहा चित्रगुप्तकाका _/\_

श्वेता२४ 08/02/2024 - 12:53
अतिशय विस्तृत ओळख करून दिलीत. फोटो देखील अतिशय सुंदर. भविष्यात ही जागा बकेट लिस्ट मध्ये आहे. त्यामुळे तुमच्या या माहितीचा खूप उपयोग होईल. धन्यवाद!

चौथा कोनाडा 19/02/2024 - 22:07
श्री चित्रगुप्त यांच्या कलाकृतीचे उद्यापासुन एक आठवडा चित्रप्रदर्शन होत आहे: माहिती खालील ठिकाणी: सेव्हन_आर्टिस्ट_फ्रॉम_इंदोर चित्रगुप्तजी, हार्दिक अभिनंदन आणि प्रदर्शनासाठी समस्त मिपाकरांतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !

जुइ 27/02/2024 - 06:33
विहंगम आणि भव्य महाल! रोमचे असे सुंदर दर्शन तुमच्या मुळे झाले! फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले! रोम बद्द्ल अजून वाचायला आवडेल.

पुनर्जागरण काळातले थोर कलावंत- बर्निनी, मिशेलअँजेलो, राफाएल, लिओनार्दो, कारावाज्यो, आणि इतर अनेक चित्रकार, मूर्तिकार, स्थापत्यविद, लेखक, कवी, तत्वज्ञ, यांची प्रतिभा जिथे बहरली, ते चिरंतन शहर रोम.अशा या रोमच्या माझ्या अलिकडल्या भ्रमंतीत बघितलेल्या काही खास जागा आणि टिपलेले फोटो इथे देत आहे. . टायबर नदीवरील अनेक पुलांपकी एक. पलीकडे सेंट पीटर्स कॅथेड्रल दिसते आहे.

३० वर्षांपासून अखंडित....

पराग१२२६३ ·

नाॅर्थ ब्लॉकमधील असताना सलग पाच वर्ष परेड खुप जवळुन बघीतली. छान ,थोडक्यात आढावा इथे सादर केलात. संपूर्ण संकलनाचे एक काॅफी पुस्तक काढा. नक्कीच लोकांना आवडेल. धन्यवाद.

मी नेहरू प्लेस ला २-३ वर्षे नोकरी केली. २५ जानेवारी ला सक्तीचा हाफ डे मिळायचा सुरक्षा कारणास्तव . प्रत्यक्ष परेड दिल्लीत राहूनही पाहिली नाही . मुंबईस पळायचो सुट्टीसाठी. ऑफिसमधले सांगायचे कि नेहरू प्लेस हुन परेड जायची फार वर्षांपूर्वी

संग्रह सव्वीस जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाल्यावर भारत सार्वभौम, प्रजासत्ताक झाला. तेव्हापासूनच दरवर्षी 26 जानेवारीला देशभर प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं. त्या कार्यक्रमांपैकी सर्वात मुख्य कार्यक्रम असतो नवी दिल्लीत आयोजित होणारे संचलन आणि अन्य कार्यक्रम. हा सोहळा मी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दूरदर्शनवर पाहिला होता आणि तेव्हाच मला तो प्रचंड भावलाही.