भारताच्या क्रिकट पंढरीत जन्मलेलं ५ फूट ४ इंच उंचीचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व. मुंबईचं 'खडूस' क्रिकेट नसानसांत भिनलेला - गार्नर, होल्डिंग, रॉबर्ट्स, मार्शल, लिली सारख्या भयावह बोलर्सच्या नजरेला नजर भिडवून बचावाची अभेद्य तटबंदी उभी करणारा लढवय्या. १९७१ च्या स्वप्नवत सुरुवातीनंतर विल्यम हॅरिस ह्या त्रिनिदादियन गायकाला:
It was Gavaskar
We real master
Just like a wall
We couldn't out Gavaskar at all, not at all
You know the West Indies couldn't out Gavaskar at all
ह्या ओळी लिहिण्यास प्रवृत्त करणारा कलाकार. भारतीय क्रिकेटला जिंकायला शिकवणारा धुरंधर.