अ ब्यूटीफुल डे इन द नेबरहूड- मुलाखतकाराची मुलाखत

लेखनविषय:
लेखनप्रकार
Tom Hanks प्रसिद्ध अमेरिकी नियतकालिक ई-स्क्वायरच्या १९९८ सालच्या एका अंकात आलेल्या ‘Can You Say … Hero?’ या मुखपृष्ठकथेवर आधारलेला गेल्या वर्षी आलेला हा चित्रपट. सत्य घटनांवर आधारित. फ्रेड रॉजर्स या अमेरिकी टीव्ही सेलिब्रेटीभोवती केन्द्रित. फ्रेड रॉजर्स हे एक अनोखं व्यक्तिमत्त्व अमेरिकी मनोरंजन क्षेत्रात होऊन गेलं. त्याचा लहान मुलांसाठीचा “Mr. Roger’s Neighbourhood” नावाचा कार्यक्रम जवळपास चाळीस वर्षं तिकडच्या बालचित्रवाणीवर चालला. हा एक विक्रमच आहे.

कार्गो - एक फसलेला प्रयोग

लेखनविषय:
लेखनप्रकार
विज्ञान कथा हा प्रकार मला विशेष प्रिय आहे. कार्गो हा नेटफ्लिक्स चा चित्रपट पाहायची उत्सुकता होती. आमचे एक मित्र ह्या प्रकल्पावर काम करत असल्याने सुद्धा विशेष उत्सुकता होती. पण हा चित्रपट सपशेल फेल आहे. कथानक तुम्हाला सांगितले तरी काहीही फरक पडणार नाही कारण ह्यांत स्पॉईलर असे काहीच नाही. "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" ह्यांत जसे मथळ्यांतच कलाईमेक्स सांगून कारण जोहर मोकळा झाला होता त्याच प्रमाणे कार्गो म्हणजे सुद्धा एक अवजड ओझे आहे जे तुम्हाला सहन करावे लागते. राक्षस आणि मानवांचा एक तह झाला आहे. राक्षस लोक म्हणजे X-men प्रमाणे विशेष शक्ती असलेले खूप वर्षे जगणारे लोक आहेत.

अचूम् आणि समुद्र (भाग २)

अचुम् आणि समुद्र (भाग १) मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे. मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला: “अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे, शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे. ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे, तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.” मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात. यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता. असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:

ताजमहाल, कार्बन १४ कसोटी आणि प्रो. मार्विन मिल्स

लेखनविषय:
लेखनप्रकार

ताजमहाल, कार्बन १४ कसोटी आणि प्रो. मार्विन मिल्स

1 मार्विनमिल्स यांची ओळख ३७ मिनिटांच्या चित्रफितीतून अशी होते. Link for Lecture by Prof Marvin Mills

मित्र हो, ताजमहालाच्या संदर्भात लेखमाला सादर केली जात आहे. त्या संदर्भात विविध पैलूंवर प्रकाश टाकला जावा म्हणून लेखन केले आहे. यामधील एक महत्वपूर्ण दुवा ताजमहालाच्या बनावटीचा काल निर्णय करता येईल का? हा मानला जातो.

द पियानिस्ट

लेखनप्रकार
सप्टेंबर १९३९ वॉर्सा रेडिओ स्टेशन. स्पिलमन पियानो वादनात मग्न होता. लाईव्ह रेकॉर्डिंग सुरु असतानाच अचानक रेडिओ स्टेशन बॉंम्बस्फोटाच्या आवाजाने हादरून जाते. काही कळायच्या आत दुसऱ्या तिसऱ्या धमक्यात सर्व काही उध्वस्त. आरोळ्या आणि धावाधाव. स्पिलमनच्या डोक्याला छोटीशी जखम होते तशातच तो घरी जातो. घरची मंडळी घाशा गुंडाळण्याचा तयारीत होती. BBC वरून ब्रिटिश गव्हर्नमेंटने नुकतीच नाझी जर्मनी विरोधात युद्ध पुकारलयायाची घोषणा केली होती आणि लवकरच परिस्थिती अटोक्यात येईल असे वचनही दिले.

अभिनय जुगलबंदी - एक दृष्टिक्षेप

लेखनविषय:
लेखनप्रकार
अंदाज हा चित्रपट १९४९ मधे प्रदर्शित झाला. त्यात राजकपूर व दिलीपकुमार एकत्र होते. अभिनयाची जुगलबंदी चांगली रंगली. या चित्रपटाला सत्तर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त, दोन दिग्गज अभिनेत्यांची जुगलबंदी असलेल्या काही मोजक्या चित्रपटांवर एक दृष्टिक्षेप. हिंदी चित्रपटांना चांगल्या अभिनयाची परंपरा आहे. एकापेक्षा एक तगडे अभिनेते रुपेरीनगरीत होऊन गेले. काही चित्रपट असे आहेत की, त्यात दोन उत्तम अभिनेत्यांची समोरासमोर जुगलबंदी रंगलेली आहे. अंदाज मधे राजकपूर व दिलीपकुमार एकत्र होते. राजकपूरला शोमन म्हणून ओळखले जाते. महान अभिनेता असे त्याचे नाव घेतले जात नाही.

फॉरेस्ट गम्प- एका मुलाची कथा

काल पर्यंत मला हा चित्रपट काय आहे खरच माहित नव्हतं. अगदी सहजच मिळाला आणि वेळ घालवायला दुसरं काही नाही म्हणून पाहिला. आणि काही तरी वेगळं पाहिलंय याची जाणीव झाली. एका अनोळखी गावात बस स्टॉपवर बसलेला एक तरुण. शेजारीच ठेवलेली आटोपशीर बॅग. लोकं येतायत आणि जात आहेत. त्यालाही कुठे तरी जायचं आहे, पत्ता विचारावा तर कसा आणि कोणाला? शेजारीच बसची वाट पाहत बसलेल्या एका बाई बरोबर तो बोलायला सुरुवात करतो. तसं बघायला गेलं तर त्याला फक्त नऊ नंबर च्या बस शी देणं घेणं असतं, पण तो अगदी सुरूवातीपासूनची गोष्ट चालू करतो. आणि एक एक करत आपल्या समोर उलगडत जाते त्याच्या आयुष्याची कथा.

... And a forward shortleg

लेखनविषय:
आपण कॉमेंटरीमध्ये नेहेमी ऐकतो बघा - Kumble resumes from round the wicket with an aggressive field – 2 slips, a gully, silly point and a forward shortleg. येस! ... And a forward shortleg! एकदम "...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" स्टाईलमध्ये! कारण ती जागाच तशी आहे. फुटबॉल मधे स्वीपर किंवा लिबेरो, हॉकीमध्ये quarterback , बास्केटबॉल मधे point guard, कबड्डीमधला कोपरा रक्षक यांचा जो माज, जे ग्लॅमर तेच क्रिकेटमध्ये फॉरवर्ड शॉर्टलेगचं. इथे डायलॉगबाजी करून टाळ्या शिट्ट्या घेण्याची बात नाही - कडक रोलमध्ये पिक्चर खाण्याचा विषय आहे.

पुस्तक परिचय - The Great Game

लेखनविषय:
लेखनप्रकार
(पुस्तकाचा परियच करुन देताना प्रत्यक्षात ग्रेट गेम म्हणजे नक्की काय होते तेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा शंभराहून अधिक वर्षाचा इतिहास आहे म्हणूनच दोन भागात हा पुस्तक परिचय देत आहे.) पुस्तक : The Great Game लेखक : Peter Hopkirk ग्रेट गेम म्हणजे काय? ग्रेट गेम हा शब्द जरी रुडयार्ड किपलींग या इंग्रजी लेखकाच्या किम या पुस्तकामुळे लोकप्रिय झाला असला तरी त्याआधी सुद्धा हा शब्द वापरण्यात आला होता. एकोणवीसाव्या शतकात ग्रेट ब्रिटन आणि रशिया यांच्यात मध्य आशियावर वर्चस्व ठेवण्यासाठी जो संघर्ष झाला त्यालाच ग्रेट गेम असे नाव दिले गेले.
Subscribe to समीक्षा