Skip to main content

समीक्षा

पुस्तक परिचय भाग ३ - आग्र्याहून सुटका - जुन्या धाग्यातील काही न दिसणारे फोटो घालून नव्याने सादर

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 08/12/2020 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 3 आग्रऱ्याहून सुटका 1 लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन, पुणे. मो . क्र. ९९२२४३१६०९ शिवाजी महाराज कसे निसटले ? नव्या प्रमेयाप्रमाणे नजरकैदेतून सुटकेच्या दृष्टीने जून १६६६च्या अखेरीपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवून आणण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले होते. १. राजांनी स्वतःच्या माणसांना परत जाण्याची परवानगी देऊन दूर केले होते. परवान्याअभावी राजांची ही माणसे रामसिंहाच्या डेऱ्याजवळ राहात होती. २. रामसिंहाने दिलेला शिवाजी महाराजांबद्दलचा ‘जामीनकतबा’ औरंगजेबाने रद्द केला होता.

पुस्तक परिचय भाग 2 - आग्र्याहून सुटका - जुन्या धाग्यातील काही न दिसणारे फोटो घालून नव्याने सादर

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 08/12/2020 13:34 या दिवशी प्रकाशित केले.

पुस्तक परिचय भाग 2 - आग्र्याहून सुटका

1

पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्र

नव्या प्रमेयाप्रमाणे - १. शिवाजी महाराजांनी आग्र्याची नजरकैद हवेली २२ जुलैलाच सोडली! २. महाराज नंतर धौलपुर, ग्वालेर, नरवर, सिरोंज, शिवपुरी, कोलारस, बदरवास करून १५ दिवसाच्या प्रवासात २५० मैल अंतरावर शहादरा गावात सुखरूप पोहोचले. त्यानंतर त्यांनी कळवल्यावर संभाजीराजांना हवेली बाहेर सुरक्षित स्थळी म्हणजे मथुरेला पाठवण्याचे संदेश महाराजांनी दिले. हा गुप्त संदेश १५ ऑगस्टला आग्र्यात मिळाला व सर्व लगेच कामाला लागले.

पुस्तक परिचय भाग १ - आग्रऱ्याहून सुटका - जुन्या धाग्यात न दिसणारे काही फोटो , लेखक डॉ. अजित जोशींचा फोटो, मो. क्र, घालून पुनर्प्रकाशित करत आहे.

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 08/12/2020 13:28 या दिवशी प्रकाशित केले.

शिवरायांचा आठवावा प्रताप !

शिवाजी रायांच्या एका महत्वाच्या जीवनप्रसंगावर आधारित

आग्रऱ्याहून सुटका

- पुस्तकाचा परिचय करून देत आहे. जुन्या धाग्यात न दिसणारे काही फोटो , लेखक डॉ. अजित जोशींचा फोटो, मो. क्र, घालून पुनर्प्रकाशित करत आहे. 1 वरील चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरती सारख्या ठिसूळ व नरम मिठायांना ६० -७० किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल.

गोव्याचा इतिहास भाग -२ ( शिवोत्तर काल )

लेखक दुर्गविहारी यांनी बुधवार, 02/12/2020 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
संभाजी राजांचा उदय मराठी राज्याचा पाया घालणारा स्वातंत्र्यसुर्य ३ एप्रिल १६८० ला अस्तंगत झाला. पोर्तुगीजाना महाराजांची एवढी भीती होती की त्यानी महाराजांच्या ताब्यात असलेल्या मुलखावर कधीही सरळ हल्ला चढवला नाही. कोकण आणि गोव्यातल्या नद्या, जंगलं, दर्‍या, डोंगरांनी भरलेल्या दुर्गम प्रदेशात महाराजांचे गनिमी काव्याचे तंत्र अतिशय यशस्वी ठरले. त्याना थोडा अवधी मिळाला असता तर त्यांनी पोर्तुगीजांना गोव्यातून उखडून काढलं असतं हे निश्चित.

'सातपाटील कुलवृत्तांत': इतिहासासोबतच्या निरंतर वाटाघाटी

लेखक चलत मुसाफिर यांनी रविवार, 22/11/2020 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
(पूर्वप्रकाशन: शब्दालय 2020 दिवाळी अंक. मिपावर टाकताना काही मामुली फेरबदल केले आहेत) मी बहुतकरून महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असतो. मराठी साहित्य हा आवडीचा विषय असला तरी नवे लेखक, नवी पुस्तके याबद्दल अद्ययावत माहिती त्वरित मिळत नाही. आंतरजाल व समाजमाध्यमे यामुळे काही प्रमाणात ही समस्या सुलभ झाली आहे असे म्हटले तरी प्रादेशिक भाषांतील पुस्तके ठेवणाऱ्या वाचनालयांचा भारतात अभावच आहे. (सर्व मराठी पुस्तके स्वतः विकत घेऊन वाचणे शक्य नसते). अशा परिस्थितीतही ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांच्या 'सातपाटील कुलवृत्तांत' या महाकादंबरीचे नाव चांगलेच दुमदुमत असल्याची बातमी मजपर्यंत पोचली होती.

कोऱ्याकागदावरील भृगुसंहिता वाचन...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 04/11/2020 00:17 या दिवशी प्रकाशित केले.

भृगु संहिता वाचन...

काही कोरे ए4 साईझचे कागद हातात घेऊन वाचन केले जाते. त्याचे प्रात्यक्षिक. वाचनाचा भाग ३ सादर केला आहे. आधीच्या भागात माझ्या पूर्व जन्माचे कथन चालू होते. या भागात माझे, पत्नीचे, तिच्या वडिलांचे - केशव आणि माझ्या वडिलांचे - जनार्दन ही नावे आपसूकच आली आहेत. पंडितजींना मी पहिल्यांदा मोगा येथे भेटायला गेलो होतो. तिथे त्या दिवशी एक समारंभ आधीच आयोजित होता. नेहमी येणार्‍या ४०-५० भृगुऋषींच्या शिष्यमंडळींनी महर्षींच्या दरबार स्थानी अनेक मिठाई पाकिटे वगैरे आणली होती. मी हात हलवत गेलो होतो. म्हणून मला संकोचून जायला झाले.

परीक्षण : haunting at bly manor (नेटफ्लिक्स)

लेखक साहना यांनी मंगळवार, 13/10/2020 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
नेटफ्लिक्स च्या ह्या नवीन भयकथेला चांगले प्रतिसाद येत आहेत आणि मी संपूर्ण सिरीस काल पाहून संपवली. मी ह्या परीक्षणात विशेष असे स्पॉईलर्स दिलेले नाहीत. भयकथा हे थोडे addiction प्रमाणे आहे. किंवा कुणी तरी म्हटल्या प्रमाणे थोडे पॉर्न प्रमाणे आहे. पहिल्यांदा आम्ही जेंव्हा भयकथा पाहतो तेंव्हा अगदी प्यासा हैवान किंवा १०० डेज सुद्धा आमचा थरकाप उडवतो. पण हळू हळू कुठल्याही भयकथेचे भय वाटत नाही. मग काही तरी नवीन प्रकारची भयकथा पाहावीशी वाटते. त्यामुळे इतर कुठल्याही कथा प्रकारा पेक्षा "भयकथा" ह्यांत अनेक नानाविविध सब-जनर्स आहेत.

पद्मावत: खिलजी वि. उसूल

लेखक फारएन्ड यांनी मंगळवार, 13/10/2020 04:50 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहासातील राजे वा राण्या यांच्यावरचे सगळे चित्रपट एकत्र केले तर हे सिद्ध होते की पुढच्या २००-३०० वर्षांत भारतावर जी परकीय आक्रमणे झाली त्याबद्दल त्या त्या चरित्रनायकाला सगळी कल्पना होती. मुघलांची रणनीती, ब्रिटिशांचे कारस्थान, भारतातील सगळे राजे एक झाले तर वगैरे वगैरे. पण प्रत्येक वेळेस "इतर" राजांना ते समजले नाही. म्हणून देश पारतंत्र्यात गेला. या चित्रपटाने उसूलांची सर्व रेकॉर्ड्स मोडली आहेत. पूर्वी ७० च्या दशकात एका चित्रपटात फार फार तर २-३ उसूल असत. इथे उसूलांमधून इतर संवाद शोधावे लागतात. यातले बरेचसे उसूल दिग्दर्शकाने शाहिदच्या कॅरेक्टरला वेळोवेळी वापरायला दिले आहेत.

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २)

लेखक दुर्गविहारी यांनी बुधवार, 07/10/2020 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
अफझलखानः- अफझलखान हा मुळचा अब्दुल्लाखान.एका भटारीण बाईचा मुलगा.पण आपल्या अंगभुत गुणाने आणि पराक्रमाने तो मोठा झालेला होता. अफझलखान हि त्याला विजापुर दरबाराने दिलेली पदवी होती. स्वभावाने अत्यंत क्रुर असा हा ईसम.कपट आणि दगाबाजी हि त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्येच होती.

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 02/10/2020 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
अफझलखानाचा वध ! शिवचरित्रातील एक सोनेरी पान. ‘प्रतापगड रणसंग्राम’ म्हणजे महाराजांच्या युध्दशास्त्राला, रणधुरंधरांना दिलेलं एक अजोड देणं! शिवचरित्र हे कितीही वाचल-ऐकलं तरी त्याची गोडी कधी संपतच नाही.