वीर सावरकर

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज स्वा.सावरकरांची पुण्यतिथी. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले. राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानी सुरु केली.पुढे त्याचे रुपांतर अभिनव भारत या संघटनेत झाले. सावरकर जातीभेद नष्ट करण्यासाठी सुद्धा खुप लढले. हिंदुत्व ही संज्ञा त्यांनीच तयार केली. हिंदुत्वाविषयीचे त्यांचे विचार आजही अत्यंत प्ररणादायी आहेत. सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शि़क्षा भोगली. तुरुंगात असताना त्यांनी अनेक महाकावव्ये लिहिली. १९२१ साली त्यांची तुरुंगातुन सुटका झाली. त्यानंतर ते हिंदु महासभेचे अध्य़क्ष अनेक वर्षे होते.

आयुर्वेद : परिभाषा-परिचय - शरीर -> १

पैसातैने लक्षात आणून दिलेलं आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का? हे श्री. ग्रेटथिन्कर यांचं काथ्याकूटातलं लिखाण आणि त्यावरचा मिपाकरांनी केलेला काथ्याकूट वाचून दिवाळी अंकात केलेलं आयुर्वेदावर लेखमाला लिहिण्याचं आश्वासन मनावर घ्यायचं ठरवलं आणि टंकायला बसलो, पण माझ्या मनातला लेखमालेचा त्यावेळचा प्रवाह उपरोल्लेखित काथ्याकूटामुळे काहीसा विस्कळीत होऊन बसल्याचं लगेचंच ध्यानात आलं. आता तो प्रवाह मार्गस्थ होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत आयुर्वेदाबद्दलच्या समज, गैरसमज आणि अपसमज यावर छोटीशी टिप्पणी करावी म्हणतो.

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके १३० वी पुण्यतिथी

लेखनविषय:
लेखनप्रकार
क्रांतीविरांचा मुकुटमणी असे आद्य क्रांतिकारक फडके कुलोत्पन्न वासुदेव बळवंत फडके यांची १३० वी पुण्यतिथी १७ फेब्रुवारी रोजी आहे. त्यांचे हृद्य स्मरण. १८५७ सालच्या अयशस्वी क्रांतीपर्वानंतर भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी स्वप्राणांच्या आहुत्या दिल्या, त्या थोर वीरांमध्ये वासुदेव बळ्वंत फडके यांचे नाव अग्रेसर आहे. या साठीच त्यांना “ आद्य क्रांतिवीर” असे संबोधले जाते. पनवेल जवळील “अभयारण्य “ म्हणून प्रसिध्द असलेले “कर्नाळा” या ऐतिहासिक किल्याच्या पायथ्याशी आहे. वासुदेव बळ्वंत फडके यांचे आजोबा श्री अनंतराव फडके हे या किल्याचे किल्लेदार होते.

आज नेताजी सुभाष जयंती

लेखनविषय:
लेखनप्रकार
akherJPG भारतीय स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या व परकिय सत्तेवर निर्णायक घाव घालण्यासाठी 'आजाद हिंद सेनेला' घेउन शत्रूवर निर्णायक हल्ला करायला निघालेल्या व दुर्दैवाने स्वप्न साकार होण्याआधीच अनंतात विलिन झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आज त्यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त सादर वंदन.

तीळ गुळ घ्या , गोड गोड बोला

लेखनविषय:
लेखनप्रकार
बरे बोलता सुख वाटते ! हे तो प्रत्यक्ष कळते ! आत्मवत् परावे ते ! मानित जावे ॥ कठिण शब्दे वाईट वाटते ! हे तो प्रत्ययास येते ! तरी मग वाईट बोलावे ते ! काय निमित्त्ये ॥ आपणास चिमोटा घेतला ! तेणे कासाविस झाला ! आपणावरुन दुसर्‍याला ! राखत जावे ॥ पेरिले ते उगवते !बोलण्यासारिखे उत्तर येते ! तरी मग कर्कश बोलावे ते ! काय निमित्त्ये ॥ श्री मद् दासबोध् दशक १२,समास 10 तीळ गुळ घ्या !

स्वप्नातल्या देशा

"सपने मे देखा एक सपना, वो जो है ना अमिताभ अपना..............." ऐकत होतो आणि खरोखरच अमिताभ आला. सुरुवातीच्या चहापाण्याच्या चार गप्पा झाल्यावर (म्हणजे फक्त गप्पाच झाल्या. पुणेकर आहे म्हटले मी. साले लोक न बोलावता घरी येणार वर यांच्यासाठी चहा करा हे कोणी सांगितले आहे?" ) अमिताभन्ने चाचरत मुद्द्याला हात घातला. पिक्चर काढतो आहे म्हणाला. मला हिरो होण्यासाठी गळ घालत होता. आधी ष्टोरी विचारायच्या बेतात होतो पण मग साशंक मनाने आधी उरलेली स्टारकास्टच विचारली. तर म्हणाला तुम्ही हिरो, अभिषेक साइड हिरो, ऐश्वर्या हिरोइन, जया तुमच्या आईचा रोल करेल आणी मी खलनायक. नाही म्हणले तरी मला ठसका लागला.

माझी चार अंग वस्रे

जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे - तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे - तीच्या फारसे जवळ जाउ नका.

नवरात्र उत्सव २०१२ (टेंभी नाका) ठाणे.

नमस्कार मिपाकर मंडळी. :) काल ठाण्याच्या टेंभी नाका स्थित देवीचे दर्शन घेउन आलो. :) या वेळी मदुराईच्या मिनाक्षी मंदीराची ७० फुट उंच प्रतिकॄती साकारण्यात आली आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीचा ओघ आणि बाहेर खरेदीचा भरलेला बाजार पहायला मिळाला.एव्हढ्या गर्दीत फोटो कसे काढायला मिळतील असा विचार मनात डोकावुन गेला,पण संधी मिळाली.
Subscribe to सद्भावना