आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?

ग्रेटथिन्कर's picture
ग्रेटथिन्कर in काथ्याकूट
7 Feb 2013 - 9:31 pm
गाभा: 

आयुर्वेद हि भारतीयांनी जगाला दिलेली देणगी आहे असे म्हणतात. आयुर्वेदात अनेक औषधी काढे ,आसवं यांचा वापर केला जातो.
आयुर्वेदात वात, कफ, पित्त अश्या तीन प्रकृत्ती मानल्या गेल्या आहेत, त्याद्वारे निदान करण्याची पद्धत आहे.

प्रश्न असा आहे कि वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठरतात का? double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का? या औषधांची काढ्यांची आसवे वगैरेची bioavailability ,metabolism, pregnancy category ,side effects विषयी अभ्यास झाला आहे काय? असल्यास त्याची माहिती कुठे मिळेल.
एकुणात आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?

प्रतिक्रिया

काळा पहाड's picture

7 Feb 2013 - 9:40 pm | काळा पहाड

मला वैयक्तिक अनुभव आहे. अ‍ॅलर्जी साठी. अ‍ॅलोपॅथी च्या डॉक्टरांनीच सांगितले की alternative try करा. केला. अ‍ॅलर्जी गायब.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Feb 2013 - 9:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आयुर्वेद ही विज्ञानाची शाखा नक्कीचं आहे.

double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का? या औषधांची काढ्यांची आसवे वगैरेची bioavailability ,metabolism, pregnancy category ,side effects विषयी अभ्यास झाला आहे काय? असल्यास त्याची माहिती कुठे मिळेल.

वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठरतात का?

पद्धत वेगळी असु शकेल पण प्रक्रुतीचा विचार करुनचं सर्व पॅथींचे डॉक्टर औषध देतात हे खरं.
--
अतिशय शुद्ध स्वरुपातील आयुर्वेदीक रसायने कशी तयार करायची ह्याची माहीती तुम्हाला आयुर्वेद चरकसंहीता ह्या ग्रन्थात मिळेत.
सोप्या भाषेत ही माहीती वाचायची असल्यास डॉ. बालाजी तांबे ह्यांची पुस्तकं वाचा. (पुस्तकाची नावं समजली तर इथे पोस्ट करीनचं).

अनुराधा१९८०'s picture

8 Feb 2013 - 11:38 am | अनुराधा१९८०

पद्धत वेगळी असु शकेल पण प्रक्रुतीचा विचार करुनचं सर्व पॅथींचे डॉक्टर औषध देतात हे खरं

double blind clinical trials काय आहेत ते तुम्हाला माहिती नाहिये. आधी माहीति काढा मग लिहा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Feb 2013 - 5:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मला double blind clinical trials काय आहे हे अजिबातच माहीत नाही. गरीब बिच्चारा निरुपद्रवी ईंजीनिअर आहे हो मी...डागदर, वैद्द्य ह्यांच्याशी फारसा संबध नाही येत...पण ते प्रक्रुतिचा विचार करुन मगच औषध देतात हे मात्र खरं.
:)

विसुनाना's picture

9 Feb 2013 - 6:30 pm | विसुनाना

'Topics in the History of pharamacology' या पोपट एन. पाटील यांनी संपादित केलेल्या बी.एन शहा प्रकाशनाच्या पुस्तकात आयुर्वेदातील औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्सबाबत सविस्तर चर्चा आहे.

डॉ. पोपट एन. पाटील हे ओहयो स्टेट युनिव्हर्सिटीत फारमाकोलोजीचे 'प्रोफेसर' आहेत.

या पुस्तकातील 'हिस्टरी ऑफ फार्माकोलॉजी ऑफ मेडिसिनल प्लांट्स इन इंडिया' या जी.व्ही.सत्यवती यांनी लिहिलेल्या लेखात आयुर्वेदिक औषधी वनस्पतींवर आधारित औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स का यशस्वी झालेल्या नाहीत आणि त्या यशस्वी होण्यासठी काय केले पाहिजे याबबत सखोल चर्चा केलेली आहे.
त्यामुळे डबल-ब्लाईंड ट्रायल्स, प्लासिबो कंपॅरिझन, टॉक्सिकॉलॉजी या ट्रायल्स आयुर्वेदिक औषधांवर होतच नाहीत हा समज चुकीचा आहे. सत्यवती या आय.सी.एम. आर.च्या (Indian Council of Medical Research) माजी डायरेक्टर जनरल आहेत.
त्यांनी दिलेल्या लेखातील माहितीनुसार अशा ट्रायल्स भारतात अनेक ठिकाणी सुरू होत्या आणि आहेत.

ICMR

चित्राच्या खराब प्रतीबद्दल क्षमस्व!

या पुस्तकाच्या वाचनाने भारतीय उपचारपद्धतींबद्दल असलेले समज-गैरसमज तपासून पाहता येतील. तसेच या दुव्यावरही याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.

शुचि's picture

7 Feb 2013 - 9:49 pm | शुचि

बोलू की नको बोलू की नको :( जाऊ देत बोलतेच.
शतावरी - लॅक्टेशनकरता अफलातून म्हणजे अतिशय रामबाण उपाय आहे. स्वानुभव!

काळा पहाड's picture

7 Feb 2013 - 10:04 pm | काळा पहाड

मला वाटत होतं कि शतावरी बुद्धी चं औषध आहे.

२ प्रकारची शतावरी माहीत आहे. एक वृद्धापकाळी घेण्याची व दुसरी लॅक्टेशनकरता.

लॅक्टेशनवालं टॉनीक आहे, औषध नाही.

धन्या's picture

7 Feb 2013 - 10:07 pm | धन्या

लैंगिक शिक्षणाचे व्यावहारीक महत्त्व सारख्या विषयावर लोकांना लिहिते करणार्‍या व्यक्तीचीसुद्धा "बोलू की नको" अशी द्विधा अवस्था व्हावी आणि "लिहिलं एकदाचं" अशा भावनेने लिहिताना अवघडलेपण टाळण्यासाठी इंग्रजी शब्दाचा आधार घ्यावा ना...

लोका सांगे... ;)

अग्निकोल्हा's picture

7 Feb 2013 - 10:54 pm | अग्निकोल्हा

:) हा हा हा.

लोकांना लिहीते केले म्हणजे स्वतः लिहीते होता येते असे नाही :(
ऑकवर्ड वाटायचे ते वाटतेच.

धन्या's picture

7 Feb 2013 - 11:20 pm | धन्या

:)

दादा कोंडके's picture

7 Feb 2013 - 11:58 pm | दादा कोंडके

लैंगिक शिक्षणाचे व्यावहारीक महत्त्व सारख्या विषयावर लोकांना लिहिते करणार्‍या व्यक्तीचीसुद्धा

तुम्ही स्वतःला शिनिअर मेंबर म्हणवून घेता आणि..... असो. ;)

तुम्ही स्वतःला शिनिअर मेंबर म्हणवून घेता आणि

पण मी म्हणतो याला पुरावा काय?

दादा कोंडके's picture

8 Feb 2013 - 12:18 am | दादा कोंडके

पुरावा संपादकांनी नष्ट केलेला दिसतोय. :)

५० फक्त's picture

8 Feb 2013 - 11:18 pm | ५० फक्त

आता हे एक नविन अ‍ॅडवलय का संपादकांच्या केआरएत.?

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Feb 2013 - 10:05 pm | बिपिन कार्यकर्ते

एय्य पॉपकॉर्न!

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Feb 2013 - 10:07 pm | बिपिन कार्यकर्ते

बेसिकली प्रश्न एवढाच असावा, आयुर्वेदाने रोग बरे होतात का? ... बाकी सगळे त्यानंतर!

विकास's picture

7 Feb 2013 - 11:01 pm | विकास

गांधीवादी खरेच वाचा-कृती-विचार-आचारामध्ये अहींसा वापरतात का? ... मग गांधीजी बरोबर का ते ठरवू म्हणण्यासारखे झाले! ;)

अहो, भोंदू लोकं सगळीकडे असतात. त्यामुळे त्यांच्या फसवण्यावरून आयुर्वेद शास्त्र आहे का नाही हे ठरवणे योग्य ठरणार नाही असे वाटते. असो.

अग्निकोल्हा's picture

9 Feb 2013 - 12:34 am | अग्निकोल्हा

पण मग ज्योतिषही विज्ञान का मानु नये ?

नाना चेंगट's picture

7 Feb 2013 - 10:21 pm | नाना चेंगट

जाउ द्या हो !
ज्ञानशाखा असली काय अन नसली काय !
रोग बरा होतो ना? बास !
अ‍ॅलोपॅथी असो की आयुर्वेद की होमिओपॅथी की युनानी.. रोग्याला आराम मिळणे महत्वाचे... असो.

आयुर्वेद भारतीय पद्धती असल्याने अनेक जण निदान आंतरजालावर तिच्याकडे तुच्छतेने पहातात हे मात्र आढळले आहे...प्रत्यक्षात त्यातील काही औषधांचा वापर करतात की नाही ते माहित नाही. ;)

धन्या's picture

7 Feb 2013 - 10:33 pm | धन्या

लोक कुठे काय प्रश्न विचारतील याचा नेम नाही. :)

आता आयुर्वेद ही वैज्ञानिक ज्ञानशाखा आहे की नाही हे वेगवेगळ्या क्षेत्रातील नेटकर कसे काय सांगतील? काही जाणकार विज्ञान कशाला म्हणावे यावर प्रकाशझोत नक्की टाकतील. परंतू ते विज्ञानाचे निकष आयुर्वेदाला (शरीरविज्ञान विचारात घेऊन) लावताना कुठल्या बाबींचा विचार करावा लागेल हे सांगणं त्यांना शक्य असेलच असे नाही.

माझ्या माहितीनुसार प्रास ही एकच मिपाकर व्यक्ती या विषयावर अधिकारवाणीने बोलू शकते.

बिपिनदा म्हणतोय तसं, विषय "आयुर्वेदाने रोग बरे होतात का?" असा असायला हवा होता.

अविनाशकुलकर्णी's picture

7 Feb 2013 - 10:36 pm | अविनाशकुलकर्णी

पुण्यात ६५ च्या सालात लागवणकर व सरदेशमुख हे प्रख्यात व निष्णात वैद्य होते.
नाडी परीक्षा करून ते औषधे देत असत..
सरदेशमुख तर नुसती नाडी परीक्षा करून काय जेवलात ते सांगत असत.
कुठल्या वैद्न्यानिक कसोट्या लावता आपण ते समजले तर त्या वर लिहिता येईल.

धन्या's picture

7 Feb 2013 - 10:41 pm | धन्या

सरदेशमुख तर नुसती नाडी परीक्षा करून काय जेवलात ते सांगत असत.

जेवणाचं काय घेऊन बसला आहात, नाडी परीक्षा करुन अगदी भूत, भविष्य आणि वर्तमानही सांगता येतं.

आजानुकर्ण's picture

7 Feb 2013 - 11:07 pm | आजानुकर्ण

सरदेशमुख तर नुसती नाडी परीक्षा करून काय जेवलात ते सांगत असत.

काय सांगता? अगदी पोळी की चपाती हे देखील?

केदार-मिसळपाव's picture

8 Feb 2013 - 2:06 pm | केदार-मिसळपाव

अगदी पीठ कुठुन दळून आणलेत ते सुद्धा...

माझा तर आयुर्वेदावर विश्वास आहे बुवा! आता बीएएमएस अभ्यासक्रम केलेल्यांना डॉक्टर म्हणायचं की नाही या वादात मी पडणार नाही.

विकास's picture

7 Feb 2013 - 10:58 pm | विकास

आयुर्वेद हे अधुनिक विज्ञान नाही, पण ते वैज्ञानिक ज्ञानशाखा आहे. त्याच्यावर भारतातील सरकारी संस्थांपासून खाजगी संस्था तर संशोधन करत आहेतच पण तसेच जगात इतरत्र देखील अधुनिक विज्ञानासाठी प्रसिद्ध असलेली विद्यापिठे तसेच अमेरीकेतील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ पण काम करत आहेत.

डॉ. अशोक वैद्य, मला वाटते ते अमेरीकेतील येल विद्यापिठात डॉक्टर (अधुनिक विज्ञानानुसार) होते, नंतर आडनावाला साजेसे शिक्षण देखील केले आणि आयुर्वेदाच्या आधारे जे आयुर्वेदीक वैद्य अथवा आजीबाईच्या बटव्यातून उपचार केले जातात त्यावरून त्यांनी Reverse pharmacology चा प्रकार विकसीत केला आणि अधुनिक विज्ञानाशी ताळमेळ घालणारी औषधे तयार केली. विकीवर सापडलेल्या एका माहितीप्रमाणे:

It is asserted that Ayurveda knowledge allows drug researchers to start from time-tested and safe botanical material. The best example of bioprospecting using traditional knowledge is reserpine, the anti-hypertensive alkaloid from R. serpentina, which became available as a result of work carried out by CIBA in India in close collaboration with Ayurveda experts. The normal drug discovery course of ‘laboratory to clinics’ in this case actually becomes from ‘clinics to laboratories’.[8][12][13]

असे अजून बरेच काम चाललेले त्या क्षेत्रातील भारतीय आणि अमेरीकन तज्ञांकडून प्रत्यक्ष ऐकलेले आहे. त्यामुळे आयुर्वेद सायन्स नाही म्हणत दुर्लक्ष केल्यास मॅक्समुल्लरने वेदांसंदर्भात काय म्हणले हे शिकत आपल्या वेदांचा अर्थ लावण्यासारखे होईल... असो.

एकुणात आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?

नक्कीच... एकटी सर्जरी ही शाखा घेतली तर सुश्रुताने इसवीसना च्या ८०० वर्षापुर्वी न्युरो, रेटीना, हार्ट अशा आजही जटील समजल्या जाणार्या शस्त्रक्रिया नुसत्या यशस्वीपने पार पाडल्या नाहीत तर अतिशय शात्रोक्तरित्या त्याच्या संहिता ही लिहुन ठेवल्या आहेत.. कॉसमॅटीक आणि प्लॅस्टीक सर्जरीसारख्या करामती ही त्याने आधीच करुन ठेवल्यात.. अनेक अमेरिकन, युरोपिअन, अरेबिक फिजिसिअन्स या सगळ्या संहिता भारतात येऊन अभ्यासुन गेले आ णि स्वतःच्या भाषेत त्या अनुवादीत ही करुन घेउन गेले..
जगाने सुश्रुताला सर्जरीचा पितामह मानलंय..

आजानुकर्ण's picture

7 Feb 2013 - 11:21 pm | आजानुकर्ण

अरेच्चा. ही नवीच माहिती आहे. सुश्रुताने अतिशय शास्त्रोक्तरीत्या लिहूनही त्या शस्त्रक्रिया आजही जटील का समजल्या जातात?

धन्या's picture

7 Feb 2013 - 11:26 pm | धन्या

कॉसमॅटीक आणि प्लॅस्टीक सर्जरीसारख्या करामती ही त्याने आधीच करुन ठेवल्यात..

(त्या वेळच्या) प्लास्टीक सर्जरीचा आयुर्वेदाशी संबंध नसावा असे वाटते. सर्जरी आणि आयुर्वेद या दोन गोष्टींचा परस्परसंबंध नजरेसमोर आणणे जमत नाहीये. तुम्ही समजावून सांगता का?

आनन्दिता's picture

8 Feb 2013 - 3:31 am | आनन्दिता

सर्जरी आणि आयुर्वेद या दोन गोष्टींचा परस्परसंबंध नजरेसमोर आणणे जमत नाहीये

आयुर्वेद म्हणजे फक्त चिकित्सा आणि औषधोपचार इतकंच नाही.. आयुर्वेदाचं क्षेत्र खुप मोठं आहे.. या शास्त्राचे आठ भाग पडतात ज्याला 'अष्टांग'चिकित्सा संबोधलं जातं, शल्य चिकित्सा म्हणजेच शस्त्रक्रियेचं शास्त्र हे याच अष्टांगा पैकी एक आहे.
उरलेले प्रभाग खालील प्रमाणे..
१) काय चिकित्सा ( म्हणजे आजची dermatology)
२)कौमारभृत्य ( म्हणजे आजचं paediatrics)
३)भूत विद्या (treatment of mental diseases supposed to be produced by demoniacal influence) म्हणजे (demonology / exorcism/psychiatry)
४) शालाक्य :- यात डोळे आणि कान यांच्या रोगावरील उपचार येतात. म्हणजे (ophthalmology)
५)अगदतंत्र :- हे आहे विष शास्त्र.म्हणजे (toxicology)
६) रसायन :- म्हणजे (elixirs)
७) बाजीकरण :-म्हणजे (aphrodisiacs)

इतकंच नाही माझ्या वाचनात तर हे ही आलय..
The medical works of both Sushruta and Charaka were also translated into the Arabic language during the 8th century. The 9th-century Persian physician Rhazes was familiar with the text. The Arabic works derived from the Gupta era Indian texts eventually also reached a European audience by the end of the medieval period.[28] In Renaissance Italy, the Branca family of Sicily and Gaspare Tagliacozzi (Bologna) are known to have been influenced by the Arabic reception of the surgical techniques of Sushruta.

British physicians traveled to India to see rhinoplasty being performed by native methods.Reports on Indian rhinoplasty were published in the Gentleman's Magazine in 1794.Joseph Constantine Carpue spent 20 years in India studying local plastic surgery methods.Carpue was able to perform the first major surgery in the western world in 1815.Instruments described in the Sushruta Samhita were further modified in the Western World.Joseph Constantine Carpue based on this article was able to perform the "Indian" method of nose reconstruction and publish it in 1815.

यातली rhinoplasty म्हणजे एक प्रकारची प्लॅस्टिक सर्जरी आहे.

निनाद's picture

8 Feb 2013 - 8:27 am | निनाद

सुश्रुताने मोतीबिंदूच्या ऑपरेशनची पहिली नोंद मानवी इतिहास केली आहे. त्याने त्याची रीत आणि काळजी घेण्याची पद्धतीही नोंदवली आहे. त्यानेच प्लास्टीक सर्जरीचे वर्णन लिखित स्वरूपात ठेवले आहे.
हे पाहा -१. http://en.wikipedia.org/wiki/Plastic_surgery
२. http://en.wikipedia.org/wiki/Sushruta#Sushruta

केदार-मिसळपाव's picture

8 Feb 2013 - 2:10 pm | केदार-मिसळपाव

ससन्दर्भ...

आनंदी गोपाळ's picture

9 Feb 2013 - 2:21 pm | आनंदी गोपाळ

सुश्रुताने सांगितलेल्या पद्धतीस काऊचिंग असे म्हणतात. आजही भारतात काही ठिकाणी वैदू ही पद्धत वापरतात. या पासून आज केल्या जाणार्‍या फेको विथ टॉरिक मल्टीफोकल लेन्स सर्जरीज मधे मोहेंजोदारोची बैलगाडी अन कोलंबिया स्पेसक्राफ्ट इतका फरक आहे.

पण, मोतिबिंदू म्हणजे डोळ्यातील एक भाग (ते नेत्रभिंग आहे हा विचार नव्हता) अपारदर्शी होणे, व तो दूर केल्यास पुन्हा दिसू लागते, हा सैद्धांतिक विचार करून, तो अपारदर्शी भाग हटविण्यासाठी त्या काळात उपलब्ध असलेले विज्ञान वापरून यशस्वी सर्जिकल प्रोसिजर आखणे, तिच्यासाठी हत्यारे तयार करणे, व सर्जरी यशस्वी करणे, यासाठी सुश्रुत हा अत्यंत ग्रेट व आदरणीय ठरतो.

अन त्याच वेळी, Even though Sushruta discovered the reason of blindness in cataract, envisioined and implimented the surgery, it does NOT make 'Ayurveda' a 'live science' today. Not even science. त्या काळी वर्णन केलेली एकही सर्जिकल प्रोसिजर आज वापरीत नाहीत.

र्‍हायनोप्लास्टीचे ही तेच आहे. नाक कापण्याची शिक्षा झालेल्या लोकांना कपाळावरील चामडितून नाकासारखी नळी तयार करणे असे ते ऑपरेशन होते. पेडिकल ग्राफ्ट नामक प्लॅस्टिक सर्जरीच्या प्रिन्सिपलचा आद्य अवतार.

असो.

आनंदी गोपाळ's picture

9 Feb 2013 - 2:12 pm | आनंदी गोपाळ

गोची आहे :)

खुश्शाल भूतविद्या अ‍ॅड करीत आहात आयुर्वेदात!! बापरे!

शल्य-शालक्य. सुश्रुताचे कौतिक लिवताना शल्य विसरलात तुम्ही.

शल्य-शालक्य. सुश्रुताचे कौतिक लिवताना शल्य विसरलात तुम्ही.

शल्य हे कोणा व्यक्तीचे नाव आहे असा तुम्ही समज करुन घेतला आहात ही आमच्या अभ्यासाची गोची कशी काय बुवा.. सुश्रुताने शस्त्रक्रियेचे जे शास्त्र विकसित केले त्याला "शल्यचिकीत्सा" असं संबोधलं जातं.

खुश्शाल भूतविद्या अ‍ॅड करीत आहात आयुर्वेदात!! बापरे!

बापरे काय त्यात?. आहेच भूतविद्या आयुर्वेदाचा भाग.. पण ही ती भुतविद्या नाहीये जी तुम्ही समजताय( भुताखेतांची)...आयुर्वेदाच्या "अष्टांग चिकित्सा' मधल्या मानसशास्त्राशी संबंधीत शास्त्राला भुतविद्या म्हणतात.
http://www.lifepositive.com/body/ayurveda/ayurvedic-studies.asp
http://en.wikipedia.org/wiki/Ayurveda

आता मानसशास्त्राला आपल्या पुर्वजांनी भुतविद्या नाव का दिले हे तुम्ही त्यांना विचारा... :)
आनंदी गोपाळ नाव लावणारे तुम्ही आणि आम्हा पामरांच्या अभ्यासावर बोट... छट्ट बुवा!!!

आनंदी गोपाळ's picture

10 Feb 2013 - 9:31 am | आनंदी गोपाळ

शल्य कर्म = सर्जरी.
धन्यवाद!

आनंदी गोपाळ's picture

10 Feb 2013 - 9:58 am | आनंदी गोपाळ

३)भूत विद्या (treatment of mental diseases supposed to be produced by demoniacal influence) म्हणजे (demonology / exorcism/psychiatry)

येथे इंग्रजी डिक्शनरी पहावयास मिळेल : www.dictionary.com

आनन्दिता's picture

10 Feb 2013 - 8:40 pm | आनन्दिता

ठँकू... आमच्या विंग्रजी ची काळजी केल्याबद्दल....

पण वर दिलेली भुतविद्येची व्याख्या मी माझ्या घरात बसुन लिहिली नाहीये.. आयुर्वेदाच्या सर्व संदर्भग्रंथांमधे भुतविद्येची हिच व्याख्या आढळते.. त्यासाठी तुम्ही न वाचताच कै च्या कै प्रतिसाद देणार हे माहीत असुनही मी वर लिंका दिल्या होत्या. पण असो...

आनन्दिता's picture

10 Feb 2013 - 8:45 pm | आनन्दिता

शल्य कर्म = सर्जरी.धन्यवाद!

तुम्हाला या शल्याचा नक्की प्रोब्लेम काय आहे हे कळतच नाहीये. आय मीन तुम्हाला काय सांगायचय हे कळतच नाहीये.

तुमचे प्रतिसाद कळण्यासाठी एखादी डिक्शनरीची लिंक मिळु शकेल काय???. =))

आनंदी गोपाळ's picture

11 Feb 2013 - 11:19 pm | आनंदी गोपाळ

तुम्ही सेन्सिबल आहात असा चुकीचा गैरसमज झाला होता.
घरी बसून व्याख्या तयार करता येऊ शकतात अशी तुमची समजूत असेल तर तुम्हाला डिक्शनरी उपयोगी नाही. आमची शिकवणी लावून तर अजिब्बात उपयोग नाही. कुणी नर्सरी/प्लेग्रूप टीचर जवळपास असतील तर तिकडे चौकशी करून पहा.
यापेक्षा जास्त खडुसपणे लिहिता येते. पण त्यामुळे तुम्हाला मिरगी झाल्यास त्यावर आयुर्वेदात ट्रीटमेंट नाही, उगा ते भूतविद्या वै. करावे लागेल...

आनन्दिता's picture

12 Feb 2013 - 2:19 am | आनन्दिता

जे लोक तुम्हाला सेन्सिबल वाटतात त्यांना तुम्ही असेच प्रतिसाद देता काय...

कुठलीही व्याख्या घरी करता येत नाही याची पुरेपुर जाणिव मला आहे त्यामुळे मी वरती जे काही लिहिलंय त्याला योग्य ते पुरावे,लिंक्स च्या माध्यमातून दिले आहेत.
भूतविद्या हा आयुर्वेदातील अष्टांग चिकित्सांपैकी एक आहे, हे आत्तापर्यंत माझ्या वाचनात आलं असल्यामुळे मी ते माझ्या प्रतिसादात मांडलं आहे आणि त्यासाठी योग्य ते पुरावे पण दिले आहेत.

आता तुम्हाला हे भूतविद्या प्रकरण आयुर्वेदात आहे हे मान्य नसेल तर तुम्ही तुमची मतं इथे मांडायला हवी होतीत. मी वर सांगितलेली अष्टांगे तुम्हाला पटली नसतील तर ती नक्की कोणती आहेत हे तुम्ही लिहायला हवं होतंत. माझ्या समजण्यात जर काही दोष असते तर मे बी तुमचे मुद्दे वाचून मला काही नविन माहीती मिळाली असती. पण तुम्ही असं मुद्द्याचं काहीही न बोलता फक्त ,बापरे भूतविद्या अन आयुर्वेदात?.,केलंत..

तुम्हाला हवं तितकं खडुस तुम्ही लिहु शकता माझी त्याला ना नाहीये.. फक्त एकदा आयुर्वेदातल्या अष्टांगा बद्दल तुमचं पर्सेप्शन काय आहे हे एकदा मला कळू द्या.. जमलंच तर ही शल्य शालाक्य काय गोची आहे हे ही लिहा.. म्हणजे मला नक्की आपण भांडतोय कशासाठी आणि तुम्ही माझ्या अभ्यासाची मापं का काढताय हे मला कळेल.
माझे प्रश्न तुम्हाला कळ्ले असतील अशी आशा आहे. तरीही एकदा परत विचारते..
१) आयुर्वेदाच्या अष्टांग चिकित्सांचे आठ भाग तुमच्या मतानुसार कोणते?
२) शल्य शालाक्य हा घोळ मला खरंच समजला नाहीय. तुम्ही प्रत्येकवेळी दोन शब्दांतच उरकल्यामुळे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय हे समजलंच नाहीये.

तळटीपः नवीन काही शिकायला मिळणार असेल तर नर्सरी, प्लेग्रुप च,काय पण फुफाट्यात जायला ही आम्ही तयार आहोत.

नाही. कफ, वात, पित्त आदि विचार वैज्ञानिक कसोट्यांवर टिकणारे नाहीत. ज्यांना आयुर्वेदिक औषधे म्हणतो ती नैसर्गिक रसायनेच असतात (उदा. हळद, वगैरे). त्यांच्या वापराने रोग बरे होतात हे ऍलोपथिच्या औषधांनी रोग बरे होण्यासारखेच आहे. तेवढ्या कसोटीवर आयुर्वेद वैज्ञानिक आहे हे मानता येईल. पोटदुखी, प्राथमिक स्वरुपाचा सर्दी-खोकला इत्यादी गोष्टींवर उपचार करता यावेत. मात्र आयुर्वेदातील विज्ञान हे अतिशय प्राथमिक स्वरुपाचेच असावे असे वाटते. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, मानसोपचार, इंद्रियांचे पुनर्रोपण वगैरे गोष्टी आयुर्वेदात शक्य नसाव्यात.

विकास's picture

7 Feb 2013 - 11:34 pm | विकास

गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, मानसोपचार, इंद्रियांचे पुनर्रोपण वगैरे गोष्टी आयुर्वेदात शक्य नसाव्यात.
याचा अर्थ अधुनिक वैद्यकशास्त्रातील जनरल मेडीसिन (फॅमिली डॉक्टर) पध्दती पण वैज्ञानिक शाखा नाही असे म्हणावे लागेल.

आजानुकर्ण's picture

7 Feb 2013 - 11:43 pm | आजानुकर्ण

मात्र आयुर्वेदातील विज्ञान हे अतिशय प्राथमिक स्वरुपाचेच असावे असे वाटते. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, मानसोपचार, इंद्रियांचे पुनर्रोपण वगैरे गोष्टी आयुर्वेदात शक्य नसाव्यात.

आयुर्वेदातून उपचार करुन बरे होणारे रोग आणि जनरल मेडिसिनचा वापर करुन बरे होणारे रोग हे सारख्याच क्लिष्टतेचे असतील आणि उपायांची खात्रीही एकसारखी असेल तर माझ्या मते जनरल मेडिसिन व आयुर्वेद हे सारख्याच वैज्ञानिक पातळीवर आहेत. उदा. फ्लूसारख्या अत्यंत कॉमन आजारावर आयुर्वेदात काय उपचार आहे उदाहरण म्हणून घेता येईल. (स्वाईन फ्लूच्या काळात तांब्यांनी अनेक बाटल्या निलगिरीचे तेल विकल्याचे वाचले मात्र किती जणांना फायदा झाला हे कळले नाही.) दुर्दैवाने हळद, लवंग, ज्येष्ठमध, चंदन वगैरे अगदी प्राथमिक उपचार (फर्स्ट एड किंवा प्रथमोपचार स्वरुपाचे) वगळता आयुर्वेदाने काही विशेष उपचार होऊ शकतात असा मला अनुभव आलेला नाही. इतरांना असे अनुभव असतील तर वाचायला आवडेल.

विकास's picture

8 Feb 2013 - 1:30 am | विकास

(स्वाईन फ्लूच्या काळात तांब्यांनी अनेक बाटल्या निलगिरीचे तेल विकल्याचे वाचले मात्र किती जणांना फायदा झाला हे कळले नाही.)
ह्या संदर्भात माझा हा प्रतिसाद परत लिहीत बसत नाही. असे कुडमुडे अधुनिक विज्ञानात पारंगत झालेले डॉक्टर देखील असतात. मेडीकल मालप्रॅक्टीसचा विदा पाहीला तर सगळे वैद्यकीय सेवा ही विज्ञानाच्या ऐवजी अज्ञान ठरवावी लागेल. त्यामुळे तांब्यांनी स्वाईन फ्लू साठी काय दिले हे आयुर्वेद विज्ञान आहे का ठरवण्यासाठी योग्य नाही.

मात्र आयुर्वेदातील विज्ञान हे अतिशय प्राथमिक स्वरुपाचेच असावे असे वाटते. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, मानसोपचार, इंद्रियांचे पुनर्रोपण वगैरे गोष्टी आयुर्वेदात शक्य नसाव्यात.

अमेरीकन नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्याप्रमाणे: Ayurvedic medicine, as practiced in India, is one of the oldest systems of medicine in the world. Many Ayurvedic practices predate written records and were handed down by word of mouth. Two ancient books, written in Sanskrit more than 2,000 years ago, are considered the main texts on Ayurvedic medicine—Caraka Samhita and Sushruta Samhita. The texts describe eight branches of Ayurvedic medicine:

Internal medicine
Surgery
Treatment of head and neck disease
Gynecology, obstetrics, and pediatrics
Toxicology
Psychiatry
Care of the elderly and rejuvenation
Sexual vitality.

अमेरीकेत आयुर्वेदीक स्टँडर्ड नाही आहे, पण काही विद्यापिठे सर्‍टीफिकेट्स देतात. अनेक मान्यवर विद्यापिठात आल्टर्नेटीव्ह मेडीसिन म्हणून शिकवला जातो. एन आय एच, सीडीसी, एन एस एफ या संस्था देखील या संदर्भात संशोधन करत आहेत.

तुम्ही वरती जे फ्ल्यू संदर्भात एक उदाहरण दिले आहे, तशी अनेक असतात. पण आयुर्वेदासंदर्भात त्याला विज्ञान समजून अभ्यास करणार्‍यांचा एकच आक्षेप प्रामुख्याने पाहीला आहे, तो म्हणजे आत्ताच्या काळात त्यातील काही औषधात वापरले जाणारे heavy metals (basically pollutants) - जे पहील्यापासून आहे का कधी त्यात आले ते माहीत नाही. पण अमेरीकेत साधारणतः ७० आयुर्वेदीक औषधांचे जेंव्हा विश्लेषण केले गेले तेंव्हा त्यातील १४ औषधांमध्ये असे मिळाले, जे toxic धरले जाते. (यातील माहीतीप्रमाणे लेड होते, मी इतरत्र ऐकलेला प्रॉब्लेम हा पार्‍याचा देखील आहे).

आजानुकर्ण's picture

8 Feb 2013 - 2:47 am | आजानुकर्ण

मी माझ्या मूळ प्रतिसादात लिहिले होते की आयुर्वेदिक औषधे म्हणून ज्या गोष्टी दिल्या जातात ती नैसर्गिक रसायनेच असतात. ऍलोपथिक औषधांमध्ये असणाऱ्या गोष्टी आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये असणाऱ्या गोष्टी यामध्ये तत्त्वतः फरक नाही. त्यामुळे त्या निकषापुरता आयुर्वेदाला वैज्ञानिक मानायला हरकत नाही. थोडक्यात ज्याला आजीबाईचा बटवा असे म्हणतात तितपत आयुर्वेद मान्य आहेच. डाँक्टरकडे जाण्यापूर्वी अशा घरगुती उपायांनी आजार आटोक्यात येत असेल तर ते आर्थिकदृष्ट्याही फायद्याचेच आहे.

ज्यांना अल्टरनेटिव मेडिसिन म्हणतात त्यात ऍक्युप्रेशर, ऍक्युपंचर, होमियोपथी वगैरे प्रकारही येतात असे दिसते. त्यामुळे त्याला 'मेडिसिन' असा शब्द जोडल्याने ते वैज्ञानिक होतेच असे नाही.

http://en.wikipedia.org/wiki/Alternative_medicine

आयुर्वेदाचा पाया मानल्या जाणाऱ्या कफ-पित्त-वात वगैरे गोष्टींना शास्त्रीय आधार असल्याबाबत अमेरिकेत कुठे संशोधन झाले आहे काय?

मी फ्लूचे उदाहरण दिले कारण जनरल मेडिसिनमध्ये फ्लूवर उपचार आहेत. भारतासह जगातील सर्व भागात वारंवार आढळणारा हा रोग प्रतिजैविके किंवा लसींनी आटोक्यात येतो. एक उदाहरण म्हणून आयुर्वेदात यावर उपचार आहेत काय? भारतात बीएएमएस सारखी मेडिसिनची अधिकृत डिग्री मिळते तिथेही घटसर्प, धनुर्वात, कांजण्या, गोवर, डांग्या खोकला वगैरे रोगांवरही आयुर्वेदिक उपचार केले जात नाहीत.

बालाजी तांब्यांचे उदाहरण दिले कारण आजघडीला महाराष्ट्रातील कदाचित सर्वाधिक यशस्वी आयुर्वेदिक वैद्य ते असावेत. ते मालप्रॅक्टिस करत आहेत असा दावा मी केलेला नाही. आयुर्वेदिक उपचारांना प्रचंड मर्यादा आहेत. आपल्या पुराणांमध्ये त्याचा उल्लेख केला होता म्हणून आपला इगो सुखावतो याउप्पर क्लिष्ट आजारात या उपचारांचा फायदा नाही. आयुर्वेदाला वैज्ञानिक किंवा अवैज्ञानिक असे कोणतेही लेबल लावले तरी ती स्थिती बदलत नाही.

आनन्दिता's picture

8 Feb 2013 - 6:32 am | आनन्दिता

आयुर्वेदाचा पाया मानल्या जाणाऱ्या कफ-पित्त-वात वगैरे गोष्टींना शास्त्रीय आधार असल्याबाबत अमेरिकेत कुठे संशोधन झाले आहे काय?

मुळात आयुर्वेदाला अमेरिकेने सर्टिफिकेट द्यायची गरज च काय आहे.. आणि अमेरिकेने सर्टिफिकेट दिलं तरच आयुर्वेद विश्वासार्ह ठरतो काय? जगातलं हे सर्वात जुनं वैद्यकियशास्त्र असुन या उपचारपद्धती आपल्या कित्येक पिढ्यांनी शतकानुशतके वापरल्या आहेत.. अजुनही तेवढ्याच विश्वासाने वापरल्या जातील.. बस्स की मग!!

आजानुकर्ण's picture

8 Feb 2013 - 7:07 pm | आजानुकर्ण

आयुर्वेदाला कोणी सर्टिफिकेट दिले आहे याबाबतचा मूळ प्रतिसाद वाचा. त्याचा प्रतिवाद म्हणून अमेरिकेत याबाबतही आणखी संशोधन झाले आहे काय एवढेच मी विचारले. कदाचित अमेरिकेतील संशोधनावर मूळ प्रतिसाददात्याचा विश्वास असावा किंवा अमेरिकेव्यतिरिक्त असे संशोधन कुठे झाले नसावे. तुम्ही चुकीचे दार ठोठावले आहे. प्लीज कॅरी ऑन.

मुळात एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे "जुनी शास्त्रे" जसे आयुर्वेद ( वास्तुशास्त्र किवा अगदी चीनी फेंगशुई) , हि तेथील भौगोलिक परिस्थितींनुसार उदयास आलेली आहेत. त्यामुळेच आयुर्वेदातील औषधे/रसायने (ज्यांची आजीबाईचा बटवा म्हणून हेटाळणी चालू आहे) भौगोलिक परिस्थितीत मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आहेत .आणि म्हणूनच ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचेही ठरते.

विकास's picture

8 Feb 2013 - 11:45 am | विकास

तुम्ही विज्ञान नक्की कशाला म्हणाता? त्याची व्याख्या समजल्यास पुढे लिहीणे सोपे जाईल..

आजानुकर्ण's picture

8 Feb 2013 - 6:57 pm | आजानुकर्ण

दादा कोंडके यांनी जे मत दिले आहे अगदी तेच मत माझे आहे. येथे पाहा.

http://www.misalpav.com/comment/458659#comment-458659

माझ्या मते आयुर्वेद हे रोग, आजार मुळापासून बरे करण्यास मदत करते आणि ऍलोपथिच्या औषधांनी रोग फक्त दाबले जातात,म्हणजेच ते पुन्हा उचल खाऊ शकतात . संदर्भासहित स्पष्टीकरण हवे असल्यास माझ्या आई चेच उदाहरण घ्या.दम्याच्या विकाराने ती महिन्यातील १०-१५ दिवस अंथरुणास खिळून असायची , ऍलोपथिच्या औषधांनी थोडे दिवस बरे वाटायचे पण पुन्हा तेच.नंतर तिने आयुर्वेदाची मदत घेतली ज्यात औषधांसोबातच योगासनांचा सुद्धा समावेश होता आणि नंतर पुन्हा कधी दम्याने उचल खाल्ल्याचे बघितले नाही. बाकी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, मानसोपचार, इंद्रियांचे पुनर्रोपण इत्यादी गोष्टींवर आनंदिता ने प्रकाश टाकलेला आहेच.

पक्या's picture

8 Feb 2013 - 2:19 am | पक्या

साठीतले एक परिचित आहेत त्यांना कॅन्सर चे निदान झालेले आहे. पण त्यांची सर्जरी आणि किमो, रेडिओ थेरपीसारखे महागडे आणि भयंकर साईड इफेक्ट असलेले उपचार करून घेण्याची अजिबात ईच्च्छा नाही. सध्या ते एका निष्णात वैद्याचे उपचार घेत आहेत आणि सध्यातरी वैद्यांच्या औषधामुळे कॅन्सर नियंत्रणात आहे..म्हणजे आहे तसाच आहे अजून इतरत्र पसरलेला नाही किंवा वाढलेला नाही.आणि हे गेली २ वर्षे आम्ही पहात आहोत. पथ्य अगदी कडक आहे. आणि तेवढे ते नक्किच पाळतात. शिवाय वरचेवर प्रवास ही करतात. नैराश्येने ग्रासलेले, सतत झोपून असे ते गृहस्थ अजिबात नाहीयेत. खूप अ‍ॅक्टीव्ह आहेत. मला वाटते रोगाच्या सुरवातीच्या काळात आयुर्वेदिय उपचार सुरू केल्यास फायदा नक्कीच होत असवा ..शेवटच्या स्टेज ला पोहोचलेला रोग असेल तर आयुर्वेदिय उपचारांना मर्यादा असावी.

अविनाशकुलकर्णी's picture

7 Feb 2013 - 11:54 pm | अविनाशकुलकर्णी

.

http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-andhrapradesh/engine...

याला कुठला वैद्यान्यानिक आधार शोधणार

आजानुकर्ण's picture

7 Feb 2013 - 11:55 pm | आजानुकर्ण

हे आयुर्वेदिक आहे काय? नसल्यास चर्चेशी संबंध कळला नाही.

विकास's picture

8 Feb 2013 - 12:25 am | विकास

फोटोशॉप?

अभ्या..'s picture

8 Feb 2013 - 1:44 am | अभ्या..

नाही. हे फोटोशॉप एडीटींग नाही पण फोटो काढतानाच दुसरी काही ट्रीक केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Feb 2013 - 5:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गॅस ट्रबल असावा ;)

प्रसाद गोडबोले's picture

9 Feb 2013 - 2:00 am | प्रसाद गोडबोले

=))

विकास's picture

8 Feb 2013 - 2:13 am | विकास

थोडाफार याच संदर्भात माहितीकरता: पारंपारीक ज्ञानाचे जालीय ग्रंथालय हा लेख वाचू शकता.

पिवळा डांबिस's picture

8 Feb 2013 - 3:37 am | पिवळा डांबिस

वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठरतात का?

पाश्चात्य कसोट्यांवर ते सत्य ठरत नाहीत. पण या विचारांना पाश्चात्य कसोट्या लावणं हेदेखील चुकीचं आहे. भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्रात (आयुर्वेद, योग वगैरे) हे विचार सत्य समजले गेलेले आहेत.

double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का? या औषधांची काढ्यांची आसवे वगैरेची bioavailability ,metabolism, pregnancy category ,side effects विषयी अभ्यास झाला आहे काय?

नसावा. पण अजूनही कोणाला जर तशा ट्रायल्स करायच्या असतील तर ते अशक्य नाही. इथे एक महत्वाची गोष्ट दुर्लक्षिली गेलेली आहे आणि ती म्हणजे तुम्ही म्हणत असलेल्या चाचण्या ह्या नव्या रेणूंसाठी आवश्यक आहेत. असे रेणू जे कृत्रिम रासायनिक/ जैविक रीतीने बनवले गेलेले आहेत आणि मानवावर अजून वापरले गेलेले नाहीत. आयुर्वेदिक औषधे ही शतकानुशतकं वापरली गेलेली आहेत. त्यातली जी उपयुक्त होती ती टिकली आणि अनुपयुक्त/धोकादायक होती ती विस्मरणात गेली. तेंव्हा आयुर्वेदिक (किंवा युनानी) औषधांना वरील चाचण्या आवश्यक आहेत असं म्हणणं हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखं आहे.

एकुणात आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?

होय!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Feb 2013 - 8:55 am | बिपिन कार्यकर्ते

मला वाटतं, वरील प्रतिसाद कोणाकडून आला आहे हे बघता... चर्चा संपली तरी चालावी (म्हणजे या धाग्यावर), नाही का?

पिडांकाकांना तद्दन अज्ञानमूलक असा एक प्रश्न विचारतो. प्लीज़ बेअर विथ मी.

तेंव्हा आयुर्वेदिक (किंवा युनानी) औषधांना वरील चाचण्या आवश्यक आहेत असं म्हणणं हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखं आहे.

समजा आयुर्वेदिक औषधांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल्स घ्यायच्या आहेत. मग वडाची साल पिंपळाला लावणे का बरे ठरते हे? आयुर्वेदिक औषधे अनुभवसिद्ध आहेत म्हणून ट्रायल्स करू नयेत असे तर म्हणावयाचे नाही ना?

सध्याची डॉमिनंट "पॅथी" म्हंजे अ‍ॅलोपॅथी, तिच्या चष्म्यातून आयुर्वेदाचा निर्णय करणे हे सर्वथैव बरोबर नसले तरी काही निकष चूक म्हणता येणार नाहीत असे वाटते. आपले काय मत याबद्दल?

पिवळा डांबिस's picture

9 Feb 2013 - 2:24 am | पिवळा डांबिस

समजा आयुर्वेदिक औषधांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल्स घ्यायच्या आहेत. मग वडाची साल पिंपळाला लावणे का बरे ठरते हे?

क्लिनिकल ट्रायल्स या अनेक हेतूंनी केल्या जातात. एफिकसी (परिणामकारकता), डोस सिलेक्शन, सेफ्टी (सुरक्षितता), हेड-टू-हेड, ऑब्झर्व्हेशनल, पीआरओ वगैरे वगैरे.... तुम्हाला इथे परिणामकारकता (एफिकसी) संबंधी ट्रायल घ्यायची आहे. कोणताही रेणू हा अतिसूक्ष्म प्रमाणात (प्रत्येक रेणूसाठी हे प्रमाण वेगवेगळं असतं)दिला तर तो परिणामकारक ठरत नाही (नो इफेक्ट डोस)आणि अतिशय कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणात दिला तर तो घातक असू शकतो. म्हणूनच मी वर म्हटल्याप्रमाणे जर नवा रेणू टेस्ट करायचा असेल (मग पॅथी कुठलीहि असू द्या!)तर तो क्लिनिकली टेस्ट करणं योग्य ठरेल. पण जी आयुर्वेदिक औषधं गेली अनेक शतकं वापरात आहेत, ज्यांचे गुणधर्म आणि मात्रा (डोस) ज्ञात आहेत त्यांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल घेण्यामागचा हेतू कोणता?

आयुर्वेदिक औषधे अनुभवसिद्ध आहेत म्हणून ट्रायल्स करू नयेत असे तर म्हणावयाचे नाही ना?

मी कोणालाच कसल्या ट्रायल करू नका असं म्हणत नाहीये. ज्यांच्याकडे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ भरपूर असेल त्यांनी खुशाल हव्या त्या ट्रायल करत बसावं. त्यातून निष्पन्न काय होणार हा प्रश्न आहे. एखाद्या अगोदरच सार्वत्रिक वापरात असलेलं औषधाच्या (उदा. सुंठ, अडुळसा, ज्येष्ठमध इत्यादि)एफिकसी ट्रायल्स करून त्यातून काय शोधून काढणार? प्रत्येक ट्रायल हा एक प्रयोग असतो आणि प्रत्येक प्रयोगाला काहीतरी प्रयोजन असावं लागतं. नाहीतर तो केवळ रिसोर्सेसचा अपव्यय ठरतो...
माझा कुणीही कोणत्याही औषधाच्या कसल्याही ट्रायल करत बसायला मुळीच विरोध नाहिये. पण अलिकडे आयुर्वेदिक औषधांच्या ट्रायल्स झालेल्या नसल्याने ती औषधे विकण्याची बंदी करण्यात यावी अशी जी ओरड (व्हेस्टेड इंटरेस्ट्सकडून) होतेय त्याला आहे. ज्यांना आयुर्वेदिक औषधे वापरायची नसतील त्यांनी ती वापरू नयेत. पण पारंपारिक औषधांची उपयुक्तता त्यांच्या शतकानुशतकांच्या वापरातून सिद्ध झालेली आहे.

सध्याची डॉमिनंट "पॅथी" म्हंजे अ‍ॅलोपॅथी, तिच्या चष्म्यातून आयुर्वेदाचा निर्णय करणे हे सर्वथैव बरोबर नसले तरी काही निकष चूक म्हणता येणार नाहीत असे वाटते. आपले काय मत याबद्दल?

कोणते निकष ते सांगा, म्हणजे मग माझं त्या त्या निकषांबद्दलचं मत देईन...
:)

बॅटमॅन's picture

9 Feb 2013 - 2:32 am | बॅटमॅन

ओक्के.

मी कोणालाच कसल्या ट्रायल करू नका असं म्हणत नाहीये. ज्यांच्याकडे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ भरपूर असेल त्यांनी खुशाल हव्या त्या ट्रायल करत बसावं. त्यातून निष्पन्न काय होणार हा प्रश्न आहे. एखाद्या अगोदरच सार्वत्रिक वापरात असलेलं औषधाच्या (उदा. सुंठ, अडुळसा, ज्येष्ठमध इत्यादि)एफिकसी ट्रायल्स करून त्यातून काय शोधून काढणार? प्रत्येक ट्रायल हा एक प्रयोग असतो आणि प्रत्येक प्रयोगाला काहीतरी प्रयोजन असावं लागतं. नाहीतर तो केवळ रिसोर्सेसचा अपव्यय ठरतो...

हे वाचून बाकी समाधान झालं. धन्यवाद पीतचेष्टालुभवान :)

उत्तम माहितीपूर्ण प्रतिसाद. उत्तर मिळाले, फक्त एकच लाष्ट मुद्दा. निकष म्हंजे जे क्लेम्स आहेत ते घासूनपुसून लख्ख करणे, त्यांचा कीस पाडणे. तुम्ही म्हणता तशी चिकार औषधे आल्रेडी टेस्टेड आहेतच. पण जिथे अ‍ॅलोपॅथीला अजून काही गोष्टी जमत नाहीत किंवा नीट जमत नाहीत अशा ठिकाणी जर आयुर्वेदाचे काही क्लेम्स असतील तर ट्रायल्स केले तर फायदाच आहे असे मला वाटते. बाकी अपव्यय वगैरे सहमत आहे-थोडासा अनईझी यासाठी आहे की मी सैद्धांतिकपणे बोलतोय तर तुम्ही प्रॅक्टिकली बोलताय. साहजिकच आहे ते बाकी :) असो.

पिवळा डांबिस's picture

9 Feb 2013 - 2:59 am | पिवळा डांबिस

पण जिथे अ‍ॅलोपॅथीला अजून काही गोष्टी जमत नाहीत किंवा नीट जमत नाहीत अशा ठिकाणी जर आयुर्वेदाचे काही क्लेम्स असतील तर ट्रायल्स केले तर फायदाच आहे असे मला वाटते.

जरूर, पण अशा ट्रायल्स कोण करणार हा प्रश्न आहे. आयुर्वेदिक औषधविक्रेत्यांना याची काही गरज पडलेली नाही कारण ते सध्याही ते औषध विकताहेतच. भारतीय युनिव्हर्सिटीजकडे अशा ट्रायल्स करण्याइतका पैसा आहे असं मला वाटत नाही. सरकारी संस्था करू शकतात पण सरकारी कारभार बघता त्यांच्या निष्कर्षांना फारशी विश्वसनीयता नाही. हां, काही अ‍ॅलोपाथी औषध बनवणार्‍या कंपन्या करू शकतात पण त्यातून त्यांना लाभ काही नाही. लक्षात असू दे की एखादं औषध धोकादायक ठरलं म्हणून बाजारातून बॅन करता येतं पण ते पुरेसं इफेक्टिव्ह नाही म्हणून त्याचा वापर थांबवता येणं हे जवळजवळ अशक्य असतं...

मी सैद्धांतिकपणे बोलतोय तर तुम्ही प्रॅक्टिकली बोलताय.

कारण माझा तो पेशा आहे. एका फेज ३ क्लिनिकल ट्रायलला (रोगानुसार) जवळजवळ २० ते १५० लाख डॉलर्स खर्च येऊ शकतो. इतके हाय स्टेक्स असतांना प्रॅक्टिकल न राहून मी सांगतोय कुणाला?
:)

आनंदी गोपाळ's picture

9 Feb 2013 - 2:00 pm | आनंदी गोपाळ

पाश्चात्य कसोट्यांवर ते सत्य ठरत नाहीत. पण या विचारांना पाश्चात्य कसोट्या लावणं हेदेखील चुकीचं आहे. भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्रात (आयुर्वेद, योग वगैरे) हे विचार सत्य समजले गेलेले आहेत.

मा. पिवळा डँबीस,
माफ करा, मधे बोलतो आहे. पण रहावत नाही. आपण आधुनिक वैद्यकाचे शिक्षण घेतले आहेत असे गृहित धरून पुढे बोलतो.

१. आपण जे बोलत आहात त्याला आपल्या डॉक्टर असण्याचे ब्याकग्राऊंड आहे, हे लक्षात घेता, वरील वाक्य भोंगळपणाचे व चुकीचे आहे असे माझे स्पष्ट मत आहे. व या मतापाठी माझ्या आधुनिक वैद्यकातील २०+ वर्षांच्या यशस्वी प्र्याक्टिसचा आधारही आहे.

कसोट्या पाश्चात्य पौर्वात्य नसतात. त्या "शास्त्रीय" असतात हे आपण विसरता आहात काय?

(प्राचीनतेचाच हवाला द्यायचा तर उदा. भूतबाधा झाल्याने अमुक आजार होतो अशा प्रकारचे विचार पाश्चात्य देशांतही कोणे एके काळी 'सत्य समजले गेले' होते? त्यासाठी अनुभवसिद्ध उपचारपद्धतीही आहेत. सबसे तेज च्यानेलांवर त्याचे मार्केटिंगही असते. याला आपण वैज्ञानिक जाहीर करावे काय?)

२. हाय स्टेक्स आहेत म्हणून आयुर्वेदिक औषधाची क्लिनिकल ट्रायल घ्यायची गरज नाही, वा तसे करणे शक्य नाही, हे लॉजिक वापरताना तुम्ही तुमच्या वैद्यकीय ज्ञानाशी एकनिष्ठ आहात काय? याच लॉजिकने मॉडर्न मेडिसिनमधील औषधे वापरात आणावीत काय?

३. "आयुर्वेदिक" औषधे जेव्हा कधी काम करतात, तेव्हा ती नक्की कशी व का करतात? पेशंटच्या शरीरात गेलेल्या लक्षावधी प्लांट अल्कलॉईड्स व इतर 'नैसर्गिक' केमिकल्स पैकी नक्की काय काम करते, इ बाबींचे स्टँडर्डायझेशन व्हायला हवे असे आपण म्हणाल काय? या 'आयुर्वेदिक' औषधांना कोणतेही 'अन्टोवर्ड इफेक्ट्स' नसतात असे आपले मत आहे काय?

(अनुभवसिद्ध औषधांत उदा. विलो बार्क पासून अ‍ॅस्पिरिन हे बाळबोध असल्याने आपणास परिचित आहेच. अधिक विवेचन इथे करायलाच हवे काय?)

४. औषधांचे 'डोस' ठरविण्याच्या पद्धतीबद्दल आपले मत ऐकायला आवडेल. थेरप्युटिक डोस, टॉक्सिक डोस, लिथल डोस इ. कसे ठरवितात? या व असल्या अभ्यासासाठी 'व्हेस्टेड इंटरेस्ट' म्हणून फार्मॅकॉलॉनी नामक ज्ञानशाखा विकसित झाली आहे असे आपले म्हणणे आहे काय?

पण जी आयुर्वेदिक औषधं गेली अनेक शतकं वापरात आहेत, ज्यांचे गुणधर्म आणि मात्रा (डोस) ज्ञात आहेत त्यांच्या परिणामकारकतेबद्दल ट्रायल घेण्यामागचा हेतू कोणता?

म्हणजे नक्की काय? अमुक 'शीत' असते तमुक कफनाशक असते, हे 'गुणधर्म' आहेत, असे म्हणत आहात का आपण??
डोस म्हणजे नक्की कसा ठरतो? 'पाव चमचा सीतोपलादी चूर्ण सकाळ संध्याकाळ घ्या,' ह्याला डोस म्हणावे काय?

उत्तरे मिळण्याच्या अपेक्षेत,

आनंदी गोपाळ.

(टीप: आपण आधुनिक वैद्यकशास्त्राचे पदविधर नसलात तर वरील प्रतिसाद म्हणजे हवेत बोलणे आहे, असे समजून सोडून द्यावा, अन्यथा पुढे चर्चा करायला आवडेल)

पिवळा डांबिस's picture

10 Feb 2013 - 8:52 am | पिवळा डांबिस

वरील प्रतिसाद म्हणजे हवेत बोलणे आहे, असे समजून सोडून द्यावा,

हे वाचून सोडून द्यायचा अनावर मोह होत आहे!
पण मग लगेच उद्या बिका म्हणणार की, "एक डांबिस असतो, म्हणूनच तो आनंदी असतो!!!"
:)
अहो, मी इतर मिपाकरांप्रमाणेच माझं एक मत मांडलं हो! एक मिपाकर म्हणून मला तितकी तरी मुभा द्याल की नाही तुम्ही? त्यावर त्या ब्याटम्यानाने दोन फॉलो अप प्रश्न विचारले त्यांना माझ्या अल्पमतीप्राणे उत्तरं दिली मी! (ब्याटम्याना, हानू का आता येक! तुज्यामुळं आता डागतरसायबांना तरास व्हायाला लागलाय!!!)
डॉक्टरसाहेब, आम्ही भोंगळ आहोत हे पूर्णपणे मान्य! नायतर पिवळा डांबिसच्या ऐवजी काहीतरी 'धन्वंतरी' वगैरे नांव नसतं काय आमचं? ते सोडा, पण आम्ही चुकीचे कसे काय ते समजावून सांगाल काय?
कसोट्या शास्त्रीय असतात हे आम्हालाही कळतं, पण आज भारतीय अ‍ॅलोपाथी मेडिकल्/फार्मा जगत पाश्चात्य जगाने डेव्हलप केलेल्या कसोट्याच वापरत नाहीये काय? भारतीय अ‍ॅलोपाथी वैद्यकशास्त्राने आजवर जगन्मान्य अशा क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करण्याविषयीच्या वैद्यानिक कसोट्या शोधून काढल्या असतील तर त्याबद्दल माहिती द्या, वाचायला आवडेल...
दुसरं एक, मी कधीही आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स घेऊ नका असं म्हंटलेलं नाही, माझे रिप्लाय काळजीपूर्वक वाचा. उलट मी कुणालाही कुठल्याही आयुर्वेदिक औषधाच्या कसल्याही क्लिनिकल ट्रायल्स करायच्या असतील तर माझी काहीही हरकत नाही असंच म्हंटलेलं आहे. उगाच माझ्या तोंडी नसलेले शब्द गुंफायचा तुम्ही प्रयत्न करू नका! मी तसं म्हंटलेलं नाही त्यामुळे माझ्या ज्ञानाशी मी एकनिष्ठ असण्याचा/प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये.
तसंच मी कुठेही आयुर्वेदिक औषधांना अनटोवर्डस इफेक्ट नसतात असं म्हंटलेलं नाहीये. उलट मी असंच म्हंटलेलं आहे की कुठल्याही रेणूला अति अल्प प्रमाणात दिला गेलेला नो-इफेक्ट डोस असतो आणि अति कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणातला घातक डोस असतो. वाचा, वाचा हो!!!

डोस म्हणजे नक्की कसा ठरतो? 'पाव चमचा सीतोपलादी चूर्ण सकाळ संध्याकाळ घ्या,' ह्याला डोस म्हणावे काय?

दोन चमचे त्रिफळ्याचं चूर्ण गरम पाण्यातून घेतलं की बद्धकोष्ठ नाहीसं होऊन दुसर्‍या दिवशी साफ परसाकडे होते. चार चमचे घेतलं तर जास्त वेळं संडासात मुक्काम ठोकावा लागतो. याला डोस-विचार नाही म्हणायचं?

आपण आधुनिक वैद्यकशास्त्राचे पदविधर नसलात...

नाही, आम्ही आधुनिक वैद्यकशात्राचे पदवीधर (वी दीर्घ आहे पदवीधर या शब्दात!!) नाही. त्यामुळे हमारा सिर आपकी चप्पलके ऊपर!!!! पण गेली १५ वर्षे ड्रग डॅव्हलपमेंटमध्ये वाया घालवली आहेत. अगदी फार्माकॉलॉजी/ टॉक्सिकॉलॉजी अ‍ॅनिमल ट्रायल्सपासून ते फेज ३ क्लिनिकल ट्रायल्स करायचा अनुभव पाठीशी आहे. आजच्या घडीला दोन फेज ३ आणि १ फेज २ ट्रायल्स सुरू आहेत आमच्या निर्देशनाखाली जगातील २७ (अक्षरी सत्तावीस) देशांमध्ये! तेंव्हा क्लिनिकल ट्रायल्सची चर्चा चालू असतांना त्यात आपलं मत नोंदवावं असं उगीचच आम्हाला वाटलं. त्याबद्दल सॉरी!! त्याचं काय आहे की इंडियन एफडीए आमचा सल्ला विचारतं आणि दिलेला सल्ला मानतंही. पण ते वेडे असावेत.
बाय द वे, तुम्ही किती ग्लोबल क्लिनिकल ट्रायल्स केल्यात तुमच्या अधिपत्याखाली डॉक्टर? कळून घ्यायला आवडेल....

डॉक्टर, मला तुमच्याविषयी राग नाही. तुम्ही एक अ‍ॅलोपाथी प्रॅक्टिस करणारे फिजिशियन आहांत हे लक्षात घेता तुमचं मत तुम्ही व्यक्त केल्याप्रमाणेच असणार ह्याची मला जाणीव आहे. मी माझं ओरिजिनल मत हे तुमच्यासारख्या लोकांसाठी व्यक्त केलेलं नाहीच आहे. तुम्हाला कुठल्याही क्लिनिकल ट्रायल्स करायला मी कोण विरोध करणारा? उलट मी तर असंच म्हणेन की तुम्हीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही गेली वीस वर्षे यशस्वी अ‍ॅलोपाथी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहांत तर पुट युवर हार्ड अर्न्ड मनी व्हेअर युवर माऊथ इज आणि करा की आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स! एकदा एफडीए कडे ट्रायल रजिस्टर केलीत की इथे लिंक द्या, आम्हीही फॉलो अप करू तिची प्रोग्रेस आणि तिचे रिझल्टस!!! त्यात काय!!!
आम्ही आमचं मत अशा लोकांसाठी दिलं की ज्यांना सायन्सचं आणि आरोग्यविषयक ज्ञान नाही, त्यांचं ते दुर्दैवाने ते शिक्षण झालेलंच नाही. त्यांचा एकीकडे पारंपारिक आयुर्वेदिक औषधांवर विश्वास तर आहे पण ते वर्तमानपत्रातून वाचतात की आयुर्वेदिक औषधं अनुपयुक्त/ डेंजरस आहेत म्हणून! हा प्रचार कुठल्या हितसंबंधियांकडून चालतो हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, पण त्यामुळे ती लोकं कन्फ्यूज होतात. फक्त त्यांच्यासाठीच होता माझा प्रतिसाद.

मी तुमच्यासारखा मेडिकल प्रॅक्टिस करणारा फिजिशियन नाही पण माझं सगळं आयुष्य मी घातक रोगांपासून मानवजातीची माझ्या अल्प शक्तीनुसार सुटका करण्यासाठी घालवलेलं आहे. आजही कॅन्सर, लूपस आणि स्किझोफ्रेनियासारख्या असाध्य रोगांवरच्या ट्रायल्स यशस्वी करण्यासाठी झगडतोय मी!
डॉक्टर, आय हॅव, ऑनेस्ट टू गॉड, रियल लाईफ बॅटल्स अहेड ऑफ मी अ‍ॅन्ड द टाईम इज रनिंग आऊट! आय हॅव नायदर द टाईम नॉर द इन्क्लिनेशन फॉर कॉस्मॅटिक वन्स!!!!

आपला,
पिवळा डांबिस

आनंदी गोपाळ's picture

10 Feb 2013 - 9:33 am | आनंदी गोपाळ

:)

पिवळा डांबिस's picture

10 Feb 2013 - 9:51 am | पिवळा डांबिस

आम्ही आमचं काम चालूच ठेवतो आहोत, त्याला तुमच्या परवानगीची गरज कधीही नव्हती आणि नाही....
इन द मीनटाईम, तुम्ही केंव्हा आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स कधी सुरू करता ते सांगा....
अ‍ॅज आय सेड, पुट युवर मनी व्हेअर युवर माऊथ इज!!!!
:)

शास्त्रीय ज्ञानावर आधारीत देता आले तर बरे होईल

दुसरे,
मी मॉडर्न मेडिसिनवाला आहे. मला तुमचा आयुर्वेद सिद्ध करण्याशी घेणे देणे नाही. हौस असेल तर तुम्हीच प्रमाणित करा, मग आयुर्वेद शास्त्र आहे हे सांगा. कोणताही शास्त्रीय बेस नसताना केवळ तुम्ही म्हटलात 'आहे' म्हणून आयुर्वेद शास्त्र आहे, अशा बाबा वाक्यं आधारित पद्धतीचेच मला हसू येते. तेव्हा, माय मनी इज ऑलवेज ऑन मॉडर्न मेडिसिन.

आय होप युर 'फिलॉसॉफी' डझन्ट इन्फ्लुअन्स द क्लिनिकल ट्रायल्स कण्डक्टेड बाय युर कंपनी, (१२७ देशांत नं?) अ‍ॅण्ड ओन्ली सायन्स प्रिव्हेल्स...

आ.गो,कशाला डांबिसच्या नादाला लागताय, ते पोथीनिष्ठ आहेत. आमच्या पुर्वजांनी लिहले आहे ना मग त्येच योग्य आहे ,असा सूर आहे त्यांचा.
हे फेज३ ट्रायल घेतात हा अतिशयोक्ती अलंकार असावा काय हो?
नाय म्हण्टलं...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2013 - 9:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चर्चा वाचून मी आनंदी गोपाळ यांच्या बाजूने आहे, इतकेच सांगतो.
प्लीज भांडन चालू द्या. :)

डॉ.सातीला बोलवा हो चर्चेत.

-दिलीप बिरुटे
(आयुर्वेदिक की अ‍ॅलोपॅथी,कन्फ्युज)

आनंदी गोपाळ's picture

10 Feb 2013 - 9:47 am | आनंदी गोपाळ

आजच्या घडीला दोन फेज ३ आणि १ फेज २ ट्रायल्स सुरू आहेत आमच्या निर्देशनाखाली जगातील २७ (अक्षरी सत्तावीस) देशांमध्ये!

+

दोन चमचे त्रिफळ्याचं चूर्ण गरम पाण्यातून घेतलं की बद्धकोष्ठ नाहीसं होऊन दुसर्‍या दिवशी साफ परसाकडे होते. चार चमचे घेतलं तर जास्त वेळं संडासात मुक्काम ठोकावा लागतो. याला डोस-विचार नाही म्हणायचं?

-फार्म्याकॉलॉजीत इतके काम केल्यावर हेच म्हटलात तर नक्कीच वर म्हटलो तसे चालू द्या :)

(वी दीर्घ आहे पदवीधर या शब्दात!!)

ही मिसळपावची खासियत आहे. एकीकडे प्रमाण मराठी फाट्यावर मारतो म्हणायचं अन लग्गेच एकादा मिसटाईप पकडून दाखवायचा.

तुम्ही गेली वीस वर्षे यशस्वी अ‍ॅलोपाथी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहांत तर पुट युवर हार्ड अर्न्ड मनी व्हेअर युवर माऊथ इज आणि करा की आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स!

कॅन यू प्लीज रीड व्हॉट यू हॅव्ह टाईप्ड? आयुर्वेदिक औषध किंवा कोणतेही इतर, क्लिनिकल ट्रायल्स मधून जाऊन मॉडर्न मेडिसिन बनते. ते 'आयुर्वेदिक' रहात नाही, व मग आयुर्वेदाच्या नावाखाली मार्केटिंग करता येत नाही हे मी सांगायचे का तुम्हाला?

जगभरात फार्मा कंपन्या अन इन्शुरन्सवाल्यांनी मिळून काय चालवले आहे याची कल्पना तुम्हाला आहेच. असो. तुम्ही डॉक्टर आहात इतकेच ठाऊक होते म्हणून तो प्रतिसाद लिहिलेला होता.

बाकी चालू द्या.

पिवळा डांबिस's picture

10 Feb 2013 - 9:57 am | पिवळा डांबिस

आयुर्वेदिक औषध किंवा कोणतेही इतर, क्लिनिकल ट्रायल्स मधून जाऊन मॉडर्न मेडिसिन बनते. ते 'आयुर्वेदिक' रहात नाही

पण कोणतेही मेडिसिन, हे मॉडर्न मेडिसिनच का बनायला हवे? हा आग्रह का?
तुम्ही मॉडर्न मेडिसिनचे गुलाम आहांत आणि त्यापासून उपजीविका करतां आहांत म्हणून?
तसे असेल तर मीच म्हणतो की,'चालू द्या!'
:)

आनंदी गोपाळ's picture

10 Feb 2013 - 9:59 am | आनंदी गोपाळ

हे पाहून मज्जा आली

पिवळा डांबिस's picture

10 Feb 2013 - 10:12 am | पिवळा डांबिस

आमचे वरचे सर्व अभिप्राय वाचून कुणाही मिपाकराला सहज कळेल की आम्ही आयुर्वेदाचे मालक नसून चक्क अ‍ॅलोपाथी औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स घडवून आणणारे आहोत. पण तुमच्यासारख्या कावीळ झालेल्यांना सगळं पिवळंच दिसणार!!
बाय द वे: काविळीवर अ‍ॅलोपाथीमध्ये काय उपचार आहे हो?
:)
एनिवे, अ‍ॅज आय प्रिव्हियसली सेड. आय हॅव सिरियस बॅटल्स टू फाईट. इन अ व्हेरी लेस टाईम. सो हा माझा शेवटचा रिप्लाय!!! एन्जॉय!!!
:)

आनंदी गोपाळ's picture

10 Feb 2013 - 10:16 am | आनंदी गोपाळ

हिपॅटायटिस इ.
यांबद्दल आयुर्वेदात काय उपचार आहेत हो?

शैलेन्द्र's picture

10 Feb 2013 - 4:29 pm | शैलेन्द्र

काका..
प्रतिसाद आवडला..
याच धाग्यात पुढे जावुन काही सांगु इच्छीतो,
मुळात बरेच प्रतिसाद आयुर्वेद व वनौषधी(किंवा हर्बल मेडीसीन) यांत गल्लत करतायेत. आयुर्वेदाचे क्षीतिज केवळ रोगावरील औषध ठरवण्यापुरतेच मर्यादीत नाही. निरामय आरोग्य जगण्यासाठी कशी जीवनचर्या ठेवावी आणी तरिही रोग झालाच तर, पथ्य व औषधींच्या मदतीने तो कसा दुर करावा याच ज्ञान म्हणजे आयुर्वेद. त्यात वर्णन केलेल्या सगळ्याच गोष्टी खर्‍या (किंवा परिणामकारक) असतीलच असे नाही परंतु कित्येक उपचार अनुभवसीध्द आहेत.

आता क्लीनिकल ट्रायल विषयी.. मुळात क्लिनीकल ट्रायल कसल्या करणार? म्हणजे आयुर्वेदानुसार तुळस ही वेदनाशामक असेल तर तुम्ही क्लिनीकल ट्रायल कसली घेणार, तुळाशीची की उजेनॉलची? तुळाशीत सापडणारे β-elemene हे चांगले अन्टी कॅन्सर ड्रग असु शकते, पण उद्या तसे सिद्ध जरी झाले तरी मी त्याला आयुर्वेदीक औषध न मानता वनौषध समजेल. कदाचीत β-elemene फार्मसीमधेही तयार करता येत असेल.

आयुर्वेदाची शास्त्र म्हणुन जी चौकट आहे ती माझ्या माहीती प्रमाणे कफ/वात्/पित्त या त्रीदोषांवर आधारीत आहे. असे काही वर्गीकरण करता येते का, किंवा जणुकीय द्रुष्ट्या असे वेगळेपण आहे का, हा खरा प्रश्न आहे.
काही वर्षापुर्वी पुण्यातील रीजनल रीसर्च सेंटरने या तिनही प्रकारच्या लोकांचे मायक्रोअ‍ॅरे प्रोफाईल तयार केले होते. तसेच विशिष्ट परिस्थीतीला/औषधांना या लोकांतील एकाच सायकलच्या किंवा सिस्टीमच्या जीन सेटस कशा रिअ‍ॅक्ट करतात ते शोधायचा प्रयत्न केला होता. एखादे औषध/रसायन जर या तीन वेगवेगळ्या प्रकृतीच्या लोकांना समान परिस्थीतीत दिले तर त्यांच्या जनुकीय प्रोफाईलमधे कोणते बदल होतात, एखादी विवक्षीत जीन कितपत अप्रेग्युलेश्न किंवा डावुन रेग्युलेशन दाखवते हे रिअल टाईम पिसीआर वापरुन ठरवायचा प्रयत्न झाला होता. त्या अभ्यासाचे पुढे काय झाले ते मला माहित नाही.

आयुर्वेद शास्त्र आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी त्याच्या चौकटीची वैधता ठरवावी लागेल.. औषधांची परिणामकारकता सिध्द करणे म्हणजे फक्त त्यातील रसायनांची परिणामकारकता सिध्द करणे.

अनुप ढेरे's picture

11 Feb 2013 - 6:24 pm | अनुप ढेरे

अ‍ॅलोपॅथी मध्ये रुग्णाला औषध देण्याचे प्रमाण कसे ठरवतात हे जाणून घ्यायला आवडेल. उदा: एखाद्या सिरपच प्रमाण अ‍ॅलोपॅथीचा डाक्टर चमच्यांमध्येच सांगतो. आणि गोळयांचे प्रमाण (२५०मिलीग्राम/५०० मिलिग्राम यातल कुठलं?) हे तरी कसे ठरवतात.?

बॅटमॅन's picture

9 Feb 2013 - 2:14 pm | बॅटमॅन

हम्म हे बाकी खरं. आता पूर्णपणे सहमत :) धन्यवाद पिडांकाका.

विकास's picture

8 Feb 2013 - 11:44 am | विकास

तेंव्हा आयुर्वेदिक (किंवा युनानी) औषधांना वरील चाचण्या आवश्यक आहेत असं म्हणणं हे वडाची साल पिंपळाला लावण्यासारखं आहे.

सहमत आहे. तरी माझ्या आधीच्या प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे ड्रग डीसकव्हरी साठी आयुर्वेदातील ज्ञानाचा उपयोग करून संशोधन करणे चालू आहे - केवळ भारतातच नाही. त्यालाच reverse pharmacology म्हणतात. तसे केल्यास काही गैर वाटत नाही. जे असे संशोधन करतात ते बर्‍याचदा अ‍ॅलोपथीचे डॉक्टर - संशोधक असतात आणि ते आयुर्वेदास विज्ञान म्हणूनच बघतात.

अनुराधा१९८०'s picture

8 Feb 2013 - 1:57 pm | अनुराधा१९८०

इथे एक महत्वाची गोष्ट दुर्लक्षिली गेलेली आहे आणि ती म्हणजे तुम्ही म्हणत असलेल्या चाचण्या ह्या नव्या रेणूंसाठी आवश्यक आहेत.

हा अत्यंत चुकीचा समज आहे. कुठलेही रसायन ज्याला ऑषध म्हणुन मान्यता हवी असेल तर ह्या चाचण्या आवश्यक आहेत. एकदा विकी वर बघातरी double blind test म्हणजे काय ते.

नाना चेंगट's picture

8 Feb 2013 - 1:59 pm | नाना चेंगट

पिडाकाकांना समज देण्यात येत आहे की त्यांनी तत्काळ विकीपिडीयावर जाऊन सदर प्रक्रियेची व्यवस्थित माहिती घेउन आपले ज्ञान अद्ययावत माफ करा विकीयावत करावे.

हुकुमावरुन

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Feb 2013 - 2:01 pm | बिपिन कार्यकर्ते

नान्या... माझा प्रतिसाद चोरलास!

परिकथेतील राजकुमार's picture

8 Feb 2013 - 7:20 pm | परिकथेतील राजकुमार

पिडाकाकांना समज देण्यात येत आहे की त्यांनी तत्काळ विकीपिडीयावर जाऊन सदर प्रक्रियेची व्यवस्थित माहिती घेउन आपले ज्ञान अद्ययावत माफ करा विकीयावत करावे.

जे प्रतिसाद देण्याआधी विकीपिडीयावरती जात नाहीत त्यांच्याकडे ज्ञान असते का?

तस्मात, सध्याच्या आधुनीक काळात पिडांकाका हे ज्ञान दॄष्ट्या अत्यंत मागासलेले आहेत असे खेदाने नमूद करतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Feb 2013 - 2:00 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत आहे!

पिडां, एकदा बघा तरी विकिवर... आधी विषय नीट समजून घ्यावा माणसाने विकिपिडियामधून आणि मगच बोलावे! कधी कळायचं तुम्हाला?

पिवळा डांबिस's picture

9 Feb 2013 - 2:44 am | पिवळा डांबिस

@नाना, परा आणि बिका: वाईऽऽऽट्ट मेले!!!!
बिका, तुमची बायको गोडं वरण बनवतांना विकीपिडियावरची रेसेपी वाचून बनवते का हो?
:)

नाना चेंगट's picture

9 Feb 2013 - 1:23 pm | नाना चेंगट

बिका स्वतः गोड आंबट किंवा जे काही असेल ते वरण बनवतो त्यामुळे तुमचा मुद्दा बाद. ;)

आनंदी गोपाळ's picture

9 Feb 2013 - 2:08 pm | आनंदी गोपाळ

येथील जुन्या जाणत्या मेंब्रांना विकी शब्द दिसताच हिव भरते असे दिसते.

हवी तर फार्म्याकॉलॉजीच्या टेक्स्ट बुकांची यादी खरडवहीत देतो. अथवा अ‍ॅमेझॉनवर इथे पहा. डबल ब्लाईंड क्लिनिकल ट्रायल काय असते ते आपण सर्वांनी पहावे हे विनंती. विकी वर आहे म्हणजे चुकीचेच आहे असे नसते. सहज सोपा व सर्वांनाच उपलब्ध असलेला ढोबळ संदर्भ म्हणून विकी योग्यच आहे.

चौकटराजा's picture

8 Feb 2013 - 9:46 am | चौकटराजा

मी अलोपथिक, आयुर्वेदिक व होमिओ चा अनुभव घेतला आहे. तिन्ही ला आपापल्या मर्यादा आहेत. पण या आहेत औषध पद्धति ! त्या चिकित्सा पद्धति नव्हेत. चिकित्सा पद्धतीतील भागाचा विचार करायचा झाला तर आधुनिक वैद्यक ( अलोपथी नव्हे) हे सर्वश्रेष्ठ आहे. परिपूर्ण मात्र नाही.

ऋषिकेश's picture

8 Feb 2013 - 9:54 am | ऋषिकेश

आयुवेद ही एक अनुभवजन्य उपचारपद्धती आहे यावर सहमत.
मात्र सध्या 'आयुर्वेदिक' म्हणून जे जे खपते ते 'वैदीक' म्हणून काहिहि खपवावे असे आहे असे खात्रीशीररित्या म्हणू शकतो.

बाकी चालु दे!

आनन्दिता's picture

8 Feb 2013 - 10:14 am | आनन्दिता

एक आठवण शेयर करावीशी वाटली..
माझ्या ३ वर्षाच्या भाच्याला कधीतरी एकदा गोष्ट सांगत असताना ड्रॅगन चा संदर्भ आला तेव्हा त्याला ड्रॅगन म्हणजे ज्याच्या नाकातोंडातून आग आणि धुर येतो असा प्राणी असं सांगितलं मी होतं.. या सगळ्याला ४-५ महीने लोटून गेले होते.. एका संध्याकाळी त्याला घेऊन दुकानात गेले असताना त्याने बाहेर उभं राहुन सिगारेट ओढणार्या एका त्याने माणसाला पाहीलं आणि "मावशी हा बघ ड्रॅगन " अशी आरोळी ठोकली.. अन डोळ्यात अनंत आश्चर्याचे भाव घेऊन टाळ्या ही पिटल्या.. पण तो ' ड्रॅगन' मात्र माझ्याकडे खाऊ की गिळू असा पाहु लागला..

आनन्दिता's picture

8 Feb 2013 - 10:16 am | आनन्दिता

अय्यो चुकीच्या धाग्यावर प्रतिसाद दिला गेला... चुकुन चुक झाली... क्षमा असावी...

नक्शत्त्रा's picture

8 Feb 2013 - 10:36 am | नक्शत्त्रा

इट्स sicence .. आपण कुठली हि गोष्ट अ सभीत करून दाखवली कि ती तिच्या पाठीमागचे शास्त्र शोधतो. आणि पुरावा देवून तीच गोष्ट परत प्कारतो.

Science is both a body of knowledge and a process which is exciting, ongoing and useful.

Traditional medicine (a term used here to denote the indigenous health traditions of the world) and complementary and alternative medicine.

Most research has focused on clinical and experimental medicine (safety, efficacy, and mechanism of action) and regulatory issues, to the general neglect of public health dimensions. Public health research must consider social, cultural, political, and economic contexts to maximize the its contribution to health care systems globally.

नक्शत्त्रा's picture

8 Feb 2013 - 10:42 am | नक्शत्त्रा

each branch of science has theories and methodologies and its own limitations which lead to invent new theory.

प्रत्येक science मध्ये test successful होतात आणि fail हि.

तेच आयुर्वेद ला हि लागू आहे.

नक्शत्त्रा's picture

8 Feb 2013 - 10:44 am | नक्शत्त्रा

आनन्दिता -पण तुज भाचा किती खर बोलला .........हि नवीन पिढी जोपर्यंत असे विचार मनात बिम्बवणार नाही, तोपर्यंत कितेक ड्रॅगन बघायला मिळणार देव जाने.

jaypal's picture

8 Feb 2013 - 11:08 am | jaypal

प्रास कॉलिंग प्रास
प्रास कम ईन प्रास कम ईन

अनुराधा१९८०'s picture

8 Feb 2013 - 11:41 am | अनुराधा१९८०

double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का?

झालेली नाही कुठल्याही प्रकारची trial. double blind तर फारच लांब राहिली.

अश्या trials आधी कराव्यात आणि मग ऑषधे विकवीत.

जगात कुठलेच शास्त्र पारिपुर्ण नसते,प्रत्येक शास्त्राला त्याच्या काही मर्यादा निश्चितच असतात,उदा.आधुनिक शास्त्रामध्ये,संधीगत वात्,मुत्राश्मरी,सगळ्या आजारांचे मुळ असणार्‍या पचनाच्या तक्रारी,सिरोटीक लिव्हर्,असायटीस यासारख्या आजारांवर उपचार नाहीयेत्,तेथे आयुर्वेद अत्यंत उत्कृष्ठ काम करतो,सोरियॅसिस सारखा आजार अ‍ॅलोपॅथी बरीच करु शकत नाही,तेथे आयुर्वेदीय औषधपद्धती ४ ते ६ महिन्यात हा आजार पुर्ण बरा करते,पण तुम्ही सर्जिकल प्रोसिजर मध्ये आयुर्वेदाचा आग्रह नाही धरु शकत.ही त्याची निश्चित मर्यादा आहे. त्यामुळे आयुर्वेद हे शास्त्रच नाही हा दावा खरच चुकीचा आहे.

पिंपातला उंदीर's picture

8 Feb 2013 - 1:20 pm | पिंपातला उंदीर

अहो काही लोकांच्या मते रामायण-महाभारतमध्ये विमान आणि अणुबॉम्ब यांचा पण उल्लेख आहे. वेदम वाक्यं प्रमाणं हे माहीत नाही का? यातून उज्वल हिंदू संस्कृतीचा इतिहास कळतो.

विकास's picture

8 Feb 2013 - 6:43 pm | विकास

विषय काय चाललाय, तुम्ही काय लिहीताय? ज्यांचे म्हणणे आयुर्वेद हे सायन्स आहे असे आहे, त्यातील कोणीही असले काही बरळले नाही. पण विषय नसताना जात आणि धर्म काढला नाही तर स्वतःचा निधर्मीपणा दिसत नाही असे कुठेतरी वाटत असावे आणि त्याव्यतिरीक्त चर्चेत लिहीण्यासारल्जे माहितीपूर्ण काही माहीत नसावे असेच असले प्रतिसाद वाचले की वाटते. असो,

पिंपातला उंदीर's picture

8 Feb 2013 - 8:58 pm | पिंपातला उंदीर

सर्वप्रथम मी कुठल्याही जाती-धर्मावर टीका केलेली नाही. नंबर २ मागच्या काही धाग्यांवर मी मांडलेली मत पटत नाहीत म्हणून इथे गुस्सा होऊ नका. नंबर ३ हे नेटवरच virtual life एवढ सीरीयस घेऊ नका हो. लोभ असावा.

पिंपातला उंदीर's picture

8 Feb 2013 - 8:59 pm | पिंपातला उंदीर

लोभ असावा च्या जागी लोभ नसावा असे वाचले तरी चालेल

विकास's picture

8 Feb 2013 - 9:39 pm | विकास

#१ & २: मी टिका केली असे कुठे म्हणले? नको तेथे जाती-धर्म काढता, हे दाखवून दिले, इतकेच. आणि ते विधान हे वास्तव आहे.

#३: virtual life सिरीयसली घेयचे का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही मात्र जातीय आणि धार्मिक आणि ते देखील काही माहीती नसताना लिहू नका असे मी नक्की विनंती म्हणून म्हणेन.

पिंपातला उंदीर's picture

8 Feb 2013 - 9:46 pm | पिंपातला उंदीर

विनंती मान्य केली जाणार नाही. क्षमस्व.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Feb 2013 - 12:00 am | विश्वनाथ मेहेंदळे

विकासराव, काही कुत्री ट्रेनिंग दिलेली असतात. त्यांना आपण बस म्हणायला सांगितले की बसतात, बऱ्याच ट्रिक करून दाखवतात. त्यांच्याकडे प्रेमाने बोलून फायदा असतो. कधीमधी खाऊ दिला तर खुशही होतात. पण हेच पिसाळलेल्या कुत्र्यांकडे करून चालत नाही. ती चावायला अंगावर येतात. त्यांना एकतर स्वतः ठोकून काढावे किंवा म्युनिसिपालिटीला फोन करावा. काय म्हणता ;-)

टीप :- हे नेटवरच virtual life आहे. एवढ सीरीयस घ्यायचे नसते. त्यामुळे मी काहीही उपमा देऊ शकतो.

पिंपातला उंदीर's picture

9 Feb 2013 - 9:15 am | पिंपातला उंदीर

उतार वय, आयुष्यात काही भरीव न केल्यामुळे आलेले frustration , आयुष्यात नैराश्य असणे अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात आहेत. त्यामुळे याचा अर्थ हा नाही के ते फ्रस्ट्रेशन इथे काढावे. तुमच्यासारख्या सीनियर सिटिज़न ला असली भाषा वापरणे शोभत नाही. हा माझा शेवटचा प्रतिसाद. आणि शेवटच my sympathies.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Feb 2013 - 3:32 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तुमच्यासारख्या सीनियर सिटिज़न ला असली भाषा वापरणे शोभत नाही.

आणि विकास यांच्याशी तुम्ही उद्धटपणे वागलात ते शोभले वाटते तुम्हाला. वरून एक वाक्य आधी माझ्यासारख्या सीनियर सिटिज़नचा पाणउतारा करणे पण शोभले वाटते. आता असेल आमचे उतार वय, नसेल काही भरीव केले आम्ही, असू आयुष्यात निराश आम्ही, पण हे असे चारचौघात बोलणे शोभले काय ?? वडीलधाऱ्या माणसांशी असे बोलतात होय ???

पैसा's picture

10 Feb 2013 - 9:43 am | पैसा

विमे काका होते ते आजोबा कधी झाले? मला वाटलं होतं हा धागा शिरेस आहे म्हणून! इथे भलताच विनोदी प्रकार चालू आहे! =))

कवितानागेश's picture

10 Feb 2013 - 9:54 am | कवितानागेश

अमोल उद्गीरकर काकांनी लहानपणी आजोबा-आजींचा हातचा मार खाल्लीला दिसतोय. आजोबा लोकांवर इतके कावलेले दिसतायत ते! ;)
अजून एक अवांतर प्रश्नः आयुष्यात भरीव काही केलेल्यांनी काहीही बोललेले चालते का?
- विमेआजोबांच्या नातीची वर्गमैत्रिण

दादा कोंडके's picture

12 Feb 2013 - 2:35 am | दादा कोंडके

हसून हसून डोळ्यातून पाणी आलं हो! :))

परिकथेतील राजकुमार's picture

11 Feb 2013 - 3:26 pm | परिकथेतील राजकुमार

उतार वय, आयुष्यात काही भरीव न केल्यामुळे आलेले frustration , आयुष्यात नैराश्य असणे अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात आहेत.

=)) =))

अहो तो 'विश्वनाथ' लोकाच्या आयुष्यात नैराश्य आणेल. त्याला कसले येतेय नैराश्य.

हा माझा शेवटचा प्रतिसाद. आणि शेवटच my sympathies.

बघा, आले की नाही तुम्हाला नैराश्य. बाकी, तुम्ही अजून थोडी चर्चा करून ह्या धाग्यावर काही भरीव कामगिरी करावी असे वाटते.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Feb 2013 - 10:44 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अहो तो 'विश्वनाथ' लोकाच्या आयुष्यात नैराश्य आणेल. त्याला कसले येतेय नैराश्य.

हीहीही !!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Feb 2013 - 1:26 am | निनाद मुक्काम प...

परा ने हे बाकी मनापासून लिहिले आहे असे वाटते.
;)

मृत्युन्जय's picture

6 Apr 2013 - 1:05 pm | मृत्युन्जय

लोकांना कमालीचे नैराश्य आणुन वर असे निर्लज्जपणे हसायचे म्हणजे तर कळस झाला अक्षरशः. कुठे फेडाल ही पापे विमेकाका (की आजोबा? नक्की तुमचे ष्टेटास काय आहे आहे सध्या ते सांगा बरे). असो. मी याचा जाहीर णिषेध नोंदवतो. एक आंतरजालीय पेटिशन काढावी असाही विचार आहे. तुमच्या वेद पुराणांमुळे खुप माजले आहात तुम्ही. तुम्हाला कंपल्सरी अ‍ॅलोपॅथिक औषधे खायला घालीन म्हणतो. अजुन बरेच काही लिहायचे आहे. पण तुर्तास एवढेच. मनुवादी कुठचे.

मोदक's picture

13 Feb 2013 - 2:09 am | मोदक

जाऊ द्या हो अमोल शेठ..

मेहेंदळेकाकांची जालीय वाटचाल बघून त्यांचा समीक्षकी खाक्या लगेच लक्षात येतो. बद्धकोष्ठी प्रतिसाद देवून आपल्यासारख्यांना नाऊमेद करतात हे सगळे म्हातारे लोक.

माझा तुम्हाला पाठिंबा आहे.

(मात्र तो चुकून घेतलाच तुम्ही, तर नक्की काय कराल हाही एक प्रश्नच आहे.!)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Feb 2013 - 11:51 pm | विश्वनाथ मेहेंदळे

नंबर ३ हे नेटवरच virtual life एवढ सीरीयस घेऊ नका हो.

हे तुम्ही पण लक्षात ठेवा म्हणजे झाले. भविष्यात कधी गरज पडेल सांगता येत नाही.

दादा कोंडके's picture

8 Feb 2013 - 2:08 pm | दादा कोंडके

फक्त अनुभव आणि विश्वास यांच्या कसोटीवर उतरलेल्यांनी आयुर्वेदीक उपचार करावे उगाच त्याला शास्त्र वगैरेचा दर्जा कशासाठी द्यायचा?

सर्वजण प्रासची आठवण काढताहेत आणि मत मागताहेत. प्रासभाऊने लिहीलेला हा लेख ज्यांनी वाचला नसेल त्यांच्यासाठी:

http://www.misalpav.com/diwali2012/ayurved_way_of_life

jaypal's picture

8 Feb 2013 - 2:29 pm | jaypal

गवि. धागा वाचन खुण म्हणुन साठवला आहे

केदार-मिसळपाव's picture

8 Feb 2013 - 2:40 pm | केदार-मिसळपाव

मला आपल्या आयुर्वेदिक पद्धतीन्वर विश्वास आहे बुआ..
१० वषान्पुर्वी मला काविळ हा रोग झाला होता. म.ब.ब.स. वैद्यान्कडे जाउनही काही फरक पडत नव्हता. मग औरन्गाबाद च्या जवळ भेन्डाळा गावाजवळच्या एका वैद्यबुवान्बद्दल ऐकले. ते म्हणे नाकात काही औषधाचे थेम्ब टाकतात ज्याने काविळ बरा होतो. हा उपाय पण करावयाचे ठरवले. तिथे जाउन त्या वैद्यबुआन्कडुन औषध नाकात टाकुन घेतले. वैद्यबुआ म्हणाले कि म्हणाले कि इथुन पुढे ३-४ दिवस नाकाद्वारे सतत पिवळा स्त्राव (त्यान्च्या शब्दात काविळ) बाहेर येइल तो एका कोरड्या फडक्याने साफ करत जा. पुढे म्हणाले की आता काळजी सोडा आणी फक्त आठवडाभर आराम करा.(तिथे जमलेली लोक तर मजेत म्हणाली कि बाहेर टपरीवर भजी खाउन गेलात तरी चालेल. आम्ही मात्र इथे आमच्या म.ब.ब.स. वैद्याचा सल्हा ऐकला कि यक्रुताला तेल्-तुप सध्या पुर्णपणे बन्द). उपचाराचे शुल्क फक्त २० रुपये (१९९७ चि गोष्ट आहे ही). पुढील १० दिवसानन्तर मी पुर्ण बरा आणी कालीजात जायला लागलो.

अनुराधा१९८०'s picture

8 Feb 2013 - 9:07 pm | अनुराधा१९८०

काविळ ही स्वता शरीरच बरी करते. आपण फक्त पथ्य पाळुन बरे होण्याला मदत करायची असते.
काही केले नाही तरी काविळ बरी होते, त्यामुळे तुम्ही एकुन ७-१० दिवस घालवल्यानंतर ती बरी झाली, नाकात ऑषध घातल्यामुळे नाही

मानावी.
ज्या ज्या गोष्टीने माणसच्या उत्कर्षात भर पडते आणी ज्या गोष्टीची तार्किक पद्धतीने उकल करता येते त्याला वैज्ञानिक ज्ञान म्हणता येइल. असे बुआ मला फक्त वाटते. मी आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानतो.

ग्रेटथिन्कर's picture

8 Feb 2013 - 2:48 pm | ग्रेटथिन्कर

double blind trial विषयी विकीपेडीयावरची माहिती.सर्वात शेवटची ओळ वाचा.

A blind or blinded experiment is a scientific experiment where some of thepeople involved are prevented from knowing certain information that might lead to conscious or subconscious bias on their part, thus invalidating the results.
For example, when asking consumers to compare the tastes of different brands of aproduct, the identities of the product should be concealed –otherwise consumers will generally tend to prefer the brand they are familiar with. Similarly, when evaluating the effectiveness of a medical drug , both the patients and the doctors who administer the drug may be kept in the dark about the dosage being applied in each case – to forestall any chance of a placebo effect , observer bias ,or conscious deception.
Blinding can be imposed on researchers, technicians, subjects, funders, or any combination of them. The opposite of a blind trial is an open trial . Blind experiments are an important tool of the scientific method , in many fields of research— medicine , psychology and the social sciences , natural sciences such as physics and biology , applied sciences such as market research , and many others. In some disciplines, such as drug testing, blind experiments are considered essential
हा विकी दुवा. http://www.wikipedia.org/wiki/Blind_experiment

जगात कोणतीच थिअरी परिपूर्ण नाही. अ‍ॅलोपथी (याचा उल्लेख मॉडर्न मेडिसिन असा करावा हेच योग्य) त्यातल्यात्यात प्रमाणित, डॉक्युमेंटेड आणि शिस्तबद्ध आहे. (उदा. अमुक औषधातील अमुक द्रव्याने हा वाईट परिणाम होऊ शकतो, इव्हन काही जणांना टॉलरेट न झाल्यास मृत्यूही येऊ शकतो हे सोबतच्या पत्रकातही स्वच्छ आणि प्रामाणिकपणे लिहीलेलं असतं.) इथे लपवाछपवी नाही. अचाट दावे नाहीत. कोणत्याही रोगावर हमखास इलाजाची ग्यारंटी नाही. अमुक एका डॉक्टरांच्या "हाताला" जास्त "गुण" येतो अशातला प्रकार नाही. अमुक औषध, मग ते त्या क्वांटिटीत कोणीही दिलं तरी परिणाम सारखाच. मात्र मुळात योग्य डायग्नोसिस करण्यातलं ज्ञान मात्र अ‍ॅलोपथीतही डॉक्टरसापेक्ष राहणारच.

आयुर्वेदातलं प्रत्येक औषध अक्सीर नसेलही, पण काहीना काही द्रव्य शरीरात जातंय तोपर्यंत परिणामांची अपेक्षा आणि चर्चा करण्यासाठी वाव राहतोच. आयुर्वेद हे निश्चितच मॉडर्न सायन्स नव्हे, पण ती क्वॅकरीदेखील नव्हे. त्याला एक "पोटेन्शियल शास्त्र" म्हणून बघायलाच हवं. होमिओपथीमधे औषधाचा अंशच शरीरात जात नसल्याने चर्चाच खुंटते, आणि "अ‍ॅट बेस्ट प्लासेबो अँड अ‍ॅट वर्स्ट क्वॅकरी" असं होमिओपथीचं वर्णन करावं लागतं. होमिओपथीत नुसत्याच पर्सनल स्टोरीज असतात. दिलेल्या औषधात मुळात औषधाचा एक तरी रेणू डिटेक्ट करुन दाखवा म्हटलं की तिथेच अडतं सगळं.. परत टंकावे लागू नये म्हणून तपशील इथे पहा

आयुर्वेदाची थिअरी मुळातूनच वेगळी आहे. ती खरी मानली तर अन्य पथी चुकीच्या मानाव्या लागतील.. आयुर्वेदात काटेकोर परीक्षण आणि तत्सम कसोट्यांवर किती सिद्धता झाल्या आहेत हे माहीत नसलं तरी त्यामधे "औषधी द्रव्य थेट नैसर्गिक स्वरुपात/अर्काच्या रुपात रुग्णाच्या शरीरात जाणं" ही घटना घडते आहे. त्याचा परिणामही अनेक केसेसमधे दिसतो. त्यातल्या काही औषधींचं विश्लेषण करुन त्यातला मूळ घटक आणि त्याचा रोगावर होणारा परिणाम यातला कार्यकारणभाव सिद्ध झालेला आहे.

आयुर्वेद आणि अन्य सर्व बाजूला ठेवून केवळ एक थॉट एक्स्पिरिमेंट करता येईल:

समजा अश्मयुगीन काळात कोणाचा पाय मुरगळला, तर त्यावर गारपिटीत हाती लागलेला बर्फ टेकवला की तात्पुरती का होईना वेदनामुक्ती मिळते असा अनुभव घेऊन बर्फ हे वेदनेवर "औषध" म्हणून वापरलं गेलं असेल. याचं स्पष्टीकरण म्हणून बर्फाची प्रवृती शांत असते आणि वेदनेची प्रवृत्ती तीव्र असते, त्या एकमेकींना रोखतात असं काही लिहीलं गेलं असेल. (हे फक्त उदाहरण आहे)

नंतर प्रगती झाली तेव्हा त्या बर्फाने तापमान कमी होऊन त्या वेदनाग्रस्त भागातल्या रक्तपुरवठ्यावर किंवा अदरवाईज घटकांवर काय परिणाम होतो आणि त्यामुळे वेदनेची जाणीव कशी कमी होते याचा उलगडा झाला. त्याउपर जाऊन त्या पेशींवर तसाच परिणाम बर्फाशिवाय करता येईल असं रसायन शोधलं गेलं. प्रयोग करुन वजनानुसार नेमका डोस ठरवला गेला..

या सर्व पार्श्वभूमीवर, हजारो वर्षांनी आजही बर्फ लावला की वेदना कमी होतेच..त्यामुळे आजरोजी केवळ अश्मयुगीन "कारणमीमांसा" बाद करा, "तीव्र" "शांत" हे कसले शास्त्र असं म्हणून बर्फाचा उपयोग अतएव औषधत्वच बाद करा असं नव्हे..

जिथे त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात तिथे पुन्हा एकदा नव्या कसोटीवर चाचण्या हव्यात (उदा. संपूर्ण शरीर बर्फात बुडवणे अशी पोटेन्शियली प्राणघातक चिकित्सा असेल तर नवीन पद्धतीने चाचण्या घेऊन रिस्क बेनिफिट पाहिला पाहिजे)

ओव्याचा अर्क खाऊन पोटदुखी थांबते आणि दुष्परिणाम होत नाहीत हा अनुभव सामान्यजनांना अनेकदा येऊन गेलेला असताना त्याची चाचणी केली नाही तरी ठीक असं वाटू शकेल, पण अशा वेळी ओव्यापासून अधिक प्रमाणित औषध बनवायचं असेल किंवा मूळ रेणू शोधायचा असेल तर संशोधन करता येईल.. शिवाय आयुर्वेदाला चाचण्यांची भीती किंव वावडं आहे असाही भाग नाही. उत्तम संशोधन आणि काटेकोर चाचण्यांना तोंड द्यायला नवीन आयुर्वेद तज्ञ तयार आहेत आणि तसं संशोधन होतंही आहे. मूळ तत्वांमधली काही आता कालबाह्य किंवा चुकीची ठरली तर ते मान्य करुन स्वतःला मूळ आणि होलिस्टिक अशा वैद्यकीय प्रवाहासोबत ठेवण्याचा प्रांजळपणा आयुर्वेदिक तज्ञ दाखवतील अशी मनापासून अपेक्षा आणि इच्छा आहे.

दादा कोंडके's picture

8 Feb 2013 - 4:09 pm | दादा कोंडके

समजा अश्मयुगीन काळात कोणाचा पाय मुरगळला, तर त्यावर गारपिटीत हाती लागलेला बर्फ टेकवला की तात्पुरती का होईना वेदनामुक्ती मिळते असा अनुभव घेऊन बर्फ हे वेदनेवर "औषध" म्हणून वापरलं गेलं असेल. याचं स्पष्टीकरण म्हणून बर्फाची प्रवृती शांत असते आणि वेदनेची प्रवृत्ती तीव्र असते, त्या एकमेकींना रोखतात असं काही लिहीलं गेलं असेल. (हे फक्त उदाहरण आहे)

अगदी खरंय.

त्याला एक "पोटेन्शियल शास्त्र" म्हणून बघायलाच हवं.

हे पटलं नाही. आयुर्वेद बकवास आहे असं नाही पण ते शास्त्रसुद्धा नाही. जो पर्यंत मायक्रोलेवलला जाउन कारणमिमांसा होत नाही तोपर्यंत ते भरवश्याचं म्हणता येत नाही. हजार वर्षांआधी अनुभवावरून काही ठोकताळे काढले इतकच ते आता तेव्हडेच अ‍ॅप्लिकेबल होत असतीलच कशावरून?
शास्त्र कशाला म्हणावं याचं पुस्तकी उत्तर मला माहीत नाही. पण त्याच्या उपयुक्ततेसाठी त्यातल्या मूळ नियमांचं 'सिंथसीस' करता यायला पाहिजे. म्हणूनच तर इतर शास्त्र प्रगत होत आहेत. शतकानुशतके आयुर्वेद तिथेच आहे. कारण ते शास्त्र नाहिये. आयुर्वेदातल्या औषधांचा फायदा म्वाडर्न मेडीसीन मधूनही समजाउन घेता येतोच. त्याचा फक्त फायदा असा की त्यातल्या औषधासाठी लागणारी घटकं घरगुती आहेत.

"पोटेन्शियल शास्त्र" म्हणजे सध्या ऑलरेडी "शास्त्र"च असं नव्हे दादा.. पोटेन्शियल शास्त्र म्हणजे (पुढे कधीतरी) शास्त्र बनण्याची (कदाचित) क्षमता असलेली पद्धती...

व्यक्तिगत निरीक्षणावरुन तरी प्रांजळपणा /शिस्त / पुरोगामित्व कमी पडतं बहुधा अशा प्रगतीसाठी.

एक बीएएमएसच्या अभ्यासक्रमातलं पुस्तक मागे वाचण्यात आलं. बाकी तपशील आठवत नाही पण एका विभागात रुग्णाला रक्त देण्यासाठी रक्त प्यावे (पाजावे) असा उल्लेख आहे. शिवाय अमुक देताना पूर्वेकडे तोंड करावे (कारण पूर्वेकडे देव असतात असे अमुकने म्हटले आहे) -- कंसही पुस्तकातलाच..

त्यामधे पुढे जणू फूटनोट, किंवा जाताजाता टिपणी असावी तसा उल्लेख होता की "हल्ली सुईवाटेही रक्त देतात"..

हा प्रॉब्लेम आयुर्वेदाच्या प्रगतीत धोंडा होऊ शकतो.. अरे सुईनेच रक्त द्यायला पाहिजे हे निर्विवाद मान्य झालंय.. रक्त प्यायलात तर ते पचेल आणि अन्य काही घटक मिळतील पण रक्त देण्याचा तातडीचा उद्देश सफल व्हायचा तर सुईनेच दिलं पाहिजे.. "प्यावे" हे परंपरागत असलं तरी आता ते खोडा.. किंवा सुईने द्यावे हे वर मुख्य जागी लिहून पूर्वी पीत असत असं जाताजाता लिहा... पूर्वेकडे तोंड करुन अमुक औषध द्यावे हे काढून टाका जर त्यात दम नाही हे सिद्ध झालं तर..

पोथीनिष्ठता हा आयुर्वेदालाच नव्हे इतरही बर्‍याच गोष्टींना महाशाप आहे...तसे तर पृथ्वी सपाट आहे असं समजणाराही पंथ आजरोजी शिल्लक आहे, आणि ते पृथ्वीच्या टोकावरुन खाली न कोसळता जगू शकतातच... :)

अस्वस्थामा's picture

8 Feb 2013 - 8:42 pm | अस्वस्थामा

गवि.. तोडलंत.. !!
माझ्या मनातला प्रतिसाद इतक्या चांगल्या स्वरूपांत मांडलेला इथे वाचून आनंद झाला..
त्यामुळे अगदी शब्दा-शब्दाशी सहमत..

गेल्या दोन प्रतिसादांमध्ये थोडक्यात या प्रश्नाचं बरंचस उत्तर आहे असं म्हणता येईल.

"पोटेन्शियल शास्त्र म्हणजे (पुढे कधीतरी) शास्त्र बनण्याची (कदाचित) क्षमता असलेली पद्धती..."

हे अगदी अचूक!

दादा कोंडके's picture

9 Feb 2013 - 12:33 am | दादा कोंडके

"पोटेन्शियल शास्त्र" म्हणजे सध्या ऑलरेडी "शास्त्र"च असं नव्हे दादा.. पोटेन्शियल शास्त्र म्हणजे (पुढे कधीतरी) शास्त्र बनण्याची (कदाचित) क्षमता असलेली पद्धती...

हे कळलं हो, पण पोटेंशिअल तरी का? काही थंब रुल्स सांगितले आहेत बस्स. आणि म्वाडर्न सायन्स आणि आयुर्वेद काही समांतर वैदक शास्त्र नाहियेत. जी हमखास औषधं (हळद वगैरे) म्हणून आयुर्वेदात सांगितलेले आहेत ती (काही) म्वाडर्न सायन्सच्या कसोटीवर खरी उतरतातच. कारण त्यात अ‍ॅलोपॅथीच्या औढधांचे गुणधर्म सापडतात. पण आयुर्वेद त्याची कारण देत नाही. (आणि उद्या जाउन आणखी इतर औषध जरी खरी उतरली तरी त्याला शास्त्र का म्हणावं?) कारण ती फक्त "अ‍ॅड हॉक" पधतीचे उपचार सुचवतात. (त्यामुळे तुलना करायचीच असेल तर त्या काळात असणारे इतर मागास समाजातल्या वैद्यकलेशी करावी ज्यांनी असे वेगवेगळे प्रयोग करून बघितले नाहीत, आणि त्याची नोंद केली नाही.) त्याची ओढून ताणून अ‍ॅलोपॅथीची तुलना का करायची? आणि त्याकाळी ते पुढारलेलं शास्त्र होतं आणि कलौघात ते नष्ट झालं असं ही नव्हे. कारण अगदी काही शतकं आधी (आत्ता वाटणार्‍या) साध्या साध्या रोगांनी राजेलोक दगावल्याचा इतिहास आहे. आणि फक्त वैदक शास्त्रच पुढारलेलं असू शकत नाही त्यामगे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रसायनशास्त्रापासून इलेक्ट्रोनिक्सपर्यंत प्रगत हवं. असो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Feb 2013 - 1:33 am | निनाद मुक्काम प...

गवि ह्यांची एखादा विषय सुलभरीत्या कोणाच्याही गळी उतरविण्याची हातोटी मला भयंकर आवडते.
त्याच्या प्रतिसादावर शक्यतो प्रतिवाद झालेला पहिला मिळाला नाही आहे.
ह्यामुळे पॉपकॉर्न घेऊन बसलेल्याची निराशा होते.

एक बीएएमएसच्या अभ्यासक्रमातलं पुस्तक मागे वाचण्यात आलं. बाकी तपशील आठवत नाही पण एका विभागात रुग्णाला रक्त देण्यासाठी रक्त प्यावे (पाजावे) असा उल्लेख आहे. शिवाय अमुक देताना पूर्वेकडे तोंड करावे (कारण पूर्वेकडे देव असतात असे अमुकने म्हटले आहे) -- कंसही पुस्तकातलाच..

त्यामधे पुढे जणू फूटनोट, किंवा जाताजाता टिपणी असावी तसा उल्लेख होता की "हल्ली सुईवाटेही रक्त देतात"..

कोणतं हो पुस्तक ? काही नाव गाव?

तसे आमचे अनेक आयुर्वेदिक डागतर ओळखीचे आहेत.. नीट अभ्यास केला नसावा त्यांनी... सूईनेच रक्त देतात.

आयुर्वेद हे शास्त्रच असावे असे वाटते. पण त्याच्या काही मर्यादा आहेत.
आयुर्वेदिक औषधांचा गुण येण्यासाठी बराचा कालावधी जावा लागतो. तसेच त्याची पथ्ये आणि इतर नियमही व्यवस्थित सांभाळले तरच गुण येतो.
माझ्या माहितीतले एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. ते बर्‍याच वेळा त्यांच्या पेशंटस ना अ‍ॅलोपॅथिक औषधे घेण्यास सूचवतात. त्यामुळे असे वाटते कि आयुर्वेद हे शास्त्र असले तरी ते परिपूर्ण नाही.
तसेच आयुर्वेदिक औषधांचे गुणकारित्व आनुभवांवरून मान्य करण्यात आलेले असले तरी त्याच्या अधिकारिक चाचण्या घेतल्या जातात का ?

गवि's picture

8 Feb 2013 - 4:46 pm | गवि

माझ्या माहितीतले एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. ते बर्‍याच वेळा त्यांच्या पेशंटस ना अ‍ॅलोपॅथिक औषधे घेण्यास सूचवतात.

अहो... तुमचे डॉक्टर वेगळ्या उद्देशाने तसं करत असतील पण हे फार फार सामान्यपणे होत असतं.. एम्बीबीएसला अ‍ॅडमिशन मिळाली नाही म्हणून बीएएमएस हे इतकं कॉमन आहे की सांगता सोय नाही.

प्रासभाऊसारखे आवर्जून आयुर्वेदात प्रावीण्य मिळवून आयुर्वेदिक ट्रीटमेंटच देऊन त्यात संशोधनही करणारे आयुर्वेदनिष्ठ वैद्य खूप कमी आहेत. हेच तर वाईट आहे..

धन्या's picture

9 Feb 2013 - 12:05 am | धन्या

प्रासभाऊसारखे आवर्जून आयुर्वेदात प्रावीण्य मिळवून आयुर्वेदिक ट्रीटमेंटच देऊन त्यात संशोधनही करणारे आयुर्वेदनिष्ठ वैद्य खूप कमी आहेत. हेच तर वाईट आहे..

आमचा एक वायझेड मित्र तर फक्त "प्युअर होमिओपथी" चा बोर्ड लावून बसला आहे. त्याच्या सुदैवाने सध्या होमिओपथीला चांगले दिवस आल्याने त्याचं बरं चाललंय. :)

आजानुकर्ण's picture

8 Feb 2013 - 7:04 pm | आजानुकर्ण

बटाटेवडे तळताना मायलार्ड रिऍक्शन होऊन वड्यांचा रंग सोनेरी होतो. यामध्ये विज्ञान आहे. तितपत विज्ञान आयुर्वेदातही आहे. आयुर्वेदातील तत्त्वे आणि औषधे यांच्या मर्यादित वातावरणात झालेल्या चाचण्या पुरेशा समाधानकारक नाहीत. आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट्स नाहीत, किंवा आयुर्वेदिक उपचार 'उलटत' नाहीत हे खोटे आहे. आयुर्वेदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. आपल्या पारंपरिक ज्ञानाचा तो ठेवा आहे. प्राथमिक उपचारापुरते त्याचे स्थान निर्विवाद आहे. मला सर्दी खोकला वगैरे झाला तर मी डॉक्टरकडे जाण्यापूर्वी गवती चहा किंवा सुंठ वगैरे वापरण्याला प्राधान्य देतो. कारण मला ते सोयीचे वाटते. मात्र आधुनिक वैद्यकशास्त्राशी त्याची तुलना आणि बरोबरी करणे चुकीचे आहे. ज्याला कोणाला आयुर्वेदावर संशोधन करायचे असेल त्याने करुन ते अगदी रॉकेट सायन्स आहे असे सिद्थ केले तरी जोपर्यंत ते आधुनिक विज्ञान असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत आयुर्वेदाची स्थिती ही पारंपरिक ज्ञान इतकीच राहते.

विकास's picture

8 Feb 2013 - 9:34 pm | विकास

... जोपर्यंत ते आधुनिक विज्ञान असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत आयुर्वेदाची स्थिती ही पारंपरिक ज्ञान इतकीच राहते. ...

मूळ चर्चाप्रस्तावात अथवा ज्यांनी आयुर्वेदाच्या बाजूने (येथे) लिहीले आहे त्यातील कोणी "आधुनिक" हा शब्द वापरलेला आहे? विशेष करून ते "आधुनिक विज्ञान" आहे असे म्हणत?

म्हणूनच तुम्हाला विचारले की विज्ञानाची व्याख्या काय? तर त्याचे उत्तर तुम्ही (दादा कोडके आयडीने म्हणल्याप्रमाणेच) म्हणणार की माहीत नाही. मग जीथे बेसीसच ठरले नाही तेथे तुमच्या मुद्याला काय अर्थ राहीला. ते अवैज्ञानिक झाले. :-)

बाकी तुमची आयुर्वेद म्हणून जी काही माहिती आहे ती गवती चहा - सुंठ इतकीच मर्यादीत वाटली. म्हणूनच एन आय एच चा संदर्भ दिला. चरक आणि शुशृत संहीतेत गवती चहा प्या म्हणून सांगत होती असे म्हणायचे असेल तर ते हास्यास्पद आहे. त्या दोन्ही संहीतांचा आजही संदर्भ ग्रंथ म्हणून वापर करत पुढचे संशोधन चालू आहे.

बाकी आयुर्वेदाबद्दल आदर आहे का नाही हा येथे प्रश्न नाही. मला अणूबाँबबद्दल, बायोलॉजिकल वेपन्स बद्दल तिरस्कार आहे, पण म्हणून ते विज्ञान नाही असे म्हणणे योग्य ठरणार नाही. असो.

आजानुकर्ण's picture

8 Feb 2013 - 10:03 pm | आजानुकर्ण

मूळ चर्चाप्रस्तावात अथवा ज्यांनी आयुर्वेदाच्या बाजूने (येथे) लिहीले आहे त्यातील कोणी "आधुनिक" हा शब्द वापरलेला आहे? विशेष करून ते "आधुनिक विज्ञान" आहे असे म्हणत?

नाही. त्यांनीही विज्ञानाची व्याख्या दिलेली नाही. तुम्ही त्याला विज्ञान मानता तुम्हीही विज्ञानाची व्याख्या दिलेली नाही. त्यामुळे माझा समज आधुनिक विज्ञान जिथे प्रयोगशाळेत मर्यादित संचात प्रयोग करुन निरीक्षणे नोंदवली जातात व त्यांची एकवाक्यता तपासली जाते असा झाला. तुमची विज्ञानाची व्याख्या वेगळी असल्यास आयुर्वेदाला विज्ञान म्हणता येईलच. त्यामुळे मी बटाटवड्याचे उदाहरण दिले. बटाटवड्याचे आवरण सोनेरी होण्यासाठी मायलार्ड रिऍक्शन होणे आवश्यक असते. ती रासायनिक आणि विज्ञानाने तपासलेली प्रक्रिया आहे. तितपत विज्ञान आयुर्वेदात आहे. आयुर्वेद पूर्णपणे अवैज्ञानानिक आहे असे मी कुठेही म्हटले नाही.

कुणीही आधुनिक विज्ञान म्हटले नाही तसेच मीही त्याला पारंपरिक ज्ञान म्हटले आहे. फारतर पारंपरिक विज्ञान म्हणूया. चालेल का? त्याने आयुर्वेदाच्या सद्यस्थितीत काही फरक पडत नाही.

म्हणूनच तुम्हाला विचारले की विज्ञानाची व्याख्या काय? तर त्याचे उत्तर तुम्ही (दादा कोडके आयडीने म्हणल्याप्रमाणेच) म्हणणार की माहीत नाही. मग जीथे बेसीसच ठरले नाही तेथे तुमच्या मुद्याला काय अर्थ राहीला. ते अवैज्ञानिक झाले. smiley

मर्यादित संचात प्रयोग करुन निरीक्षणे नोंदवली जातात व त्यांची एकवाक्यता तपासली जाते. त्यांचे साईड इफेक्ट्स वगैरे तपासले जातात वगैरे. दादा कोंडके यांनी पुरेसा प्रतिसाद दिलाच आहे.

बाकी तुमची आयुर्वेद म्हणून जी काही माहिती आहे ती गवती चहा - सुंठ इतकीच मर्यादीत वाटली. म्हणूनच एन आय एच चा संदर्भ दिला. चरक आणि शुशृत संहीतेत गवती चहा प्या म्हणून सांगत होती असे म्हणायचे असेल तर ते हास्यास्पद आहे. त्या दोन्ही संहीतांचा आजही संदर्भ ग्रंथ म्हणून वापर करत पुढचे संशोधन चालू आहे.

याव्यतिरिक्त मला आयुर्वेदाची फारशी माहिती नाही. संशोधन चालू आहे ही आनंदाची गोष्ट आहे. जर संशोधनातून आयुर्वेद हे आधुनिक वैद्यकशास्त्राशी स्पर्धा करु करण्याइतके किंवा त्यास पूरक इतके उपयुक्त ठरले तर चांगलेच आहे.

बाकी आयुर्वेदाबद्दल आदर आहे का नाही हा येथे प्रश्न नाही. मला अणूबाँबबद्दल, बायोलॉजिकल वेपन्स बद्दल तिरस्कार आहे, पण म्हणून ते विज्ञान नाही असे म्हणणे योग्य ठरणार नाही. असो.

धन्यवाद. आयुर्वेद, अणुबाँब आणि बायोलॉजिकल वेपन्स हे एकाच ओळीत मांडण्याचे प्रयोजन कळले नाही.

विकास's picture

9 Feb 2013 - 1:34 am | विकास

त्यामुळे माझा समज आधुनिक विज्ञान जिथे प्रयोगशाळेत मर्यादित संचात प्रयोग करुन निरीक्षणे नोंदवली जातात व त्यांची एकवाक्यता तपासली जाते असा झाला.

या वाक्यात तुम्ही ज्या कृती लिहील्या आहेत त्याला विज्ञान म्हणत नाही तर विज्ञानाचा अभ्यास करायची एक आधुनिक पद्धती (system) म्हणतात. ती आत्ता जशी वापरली तशी जर वापरली नसली तर ते विज्ञान नाही अशा म्हणण्यास काही अर्थ नाही. उद्या कोणी म्हणेल की, पूर्वीच्या काळात इंजिनियरींग डीझाईन नव्हते याचा अर्थ आपल्याला (आणि जगात इतरत्र अनेक ठिकाणी) बिल्डींग टेक्नॉलॉजी आणि त्याच्या मागचे विज्ञान माहीतच नव्हते... जे काही राजवाडे बांधले गेले, शिवाजी आणि इतरांचे किल्ले, अनेक देवळे, अंजंठामधे आणि इतर अनेक ठिकाणी वापरले गेलेले रंग हे काही विज्ञान नव्हते, नुसतेच माधुरी - अनिलकपूरच्या गाण्यातले बटाटा वडा प्रमाणे इमॅजिन केलेले होते तर ...

विज्ञानाचा एकंदरीत अर्थ ढोबळमानाने, भौतिक जगताशी ज्याचा अभ्यास करून, समान कारणांसाठी सातत्याने समान अनुभव येऊन, त्यावर काढलेल्या निरीक्षण असा म्हणता येईल. भारतीय पद्धतीत ओरल हिस्ट्रीला / मौखिक इतिहासाला महत्व होते. त्या व्यतिरीक्त त्याची शास्त्रीय पद्धतीने माहिती देखील लिहून ठेवलेली आहे. भेलसंहीता, चरक संहीता आणि शुशॄत संहीता या त्यातील ज्ञात आहेत. इतर अनेक अज्ञात असू शकतात. बरं या संहीतांमधे त्यांनी असे म्हणलेले नाही की आम्ही यातील सर्व शोधलेले आहे. तर त्यांचे म्हणणे असे होते की यातील बहुतांशी हे शतकोत्तर (मौखिक) इतिहासानुसार अनुभवसिद्ध ज्ञान आहे. जे ते संकलीत करत होते. शुशृताने त्यात स्वत:ची महत्वाची जी भर घातलेली आहे ती सर्जरी आणि प्लॅस्टीक सर्जरीची. त्याने शवविच्छेदन पण (अभ्यासासाठी) वापरात आणले.

याव्यतिरिक्त मला आयुर्वेदाची फारशी माहिती नाही.

ही आयुर्वेदाची मर्यादा नाही.

जर संशोधनातून आयुर्वेद हे आधुनिक वैद्यकशास्त्राशी स्पर्धा करु करण्याइतके किंवा त्यास पूरक इतके उपयुक्त ठरले तर चांगलेच आहे.

ते चांगले आजही घडत आहे. अगदी तुमच्या हळद, सुंठ वगैरेचा पण उपयोग करून... पण आपल्याला माहीत नाही म्हणजे ते नाहीच असे नसते, किमान तसे वाटल्यास खात्री करावी. नाहीतर त्याला अंधबुद्धीप्रामाण्यवाद असे काहीतरी नाव ठेवावे लागेल...

आयुर्वेद, अणुबाँब आणि बायोलॉजिकल वेपन्स हे एकाच ओळीत मांडण्याचे प्रयोजन कळले नाही.

बर्‍याचदा अशा विषयात मांडले जाणारे विचार (मते) मर्यादीत अनुभव, आत्यंतीक अभिमान अथवा आत्यंतिक अभिमान्यांबद्दल आत्यंतिक घृणा दाखवत मांडलेली दिसतात. माझ्या दृष्टीने प्रश्न सिंपल होता, "आयुर्वेद वैज्ञानिक ज्ञानशाखा आहे का?" त्याला अशा कुठल्याही प्रकारात न अडकता, डिसपॅशनेटली उत्तर देणे हे महत्वाचे असते. माझ्या लेखी ते मी दिले, ते मला आयुर्वेदाबद्दल आदर होता म्हणून नाही तर जे वास्तव आहे आणि जे सिद्ध करता येऊ शकते त्याच्या आधारे... जर उलट असते तर तसे देखील म्हणले असते... इतकेच म्हणायचे होते.

आजानुकर्ण's picture

9 Feb 2013 - 2:38 am | आजानुकर्ण

प्रश्न आयुर्वेद हा वैज्ञानिक ज्ञानशाखा आहे का असा नाही. तुमच्या माहितीसाठी प्रश्नकर्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा सांगतो

प्रश्न असा आहे कि वैज्ञानिक कसोट्यांवर आयुर्वेदाचे वात कफ पित्त आदी विचार सत्य ठरतात का? double blind trial पद्धतिने आयुर्वेदीक औषधांचे परिक्षण झाले आहे का? या औषधांची काढ्यांची आसवे वगैरेची bioavailability ,metabolism, pregnancy category ,side effects विषयी अभ्यास झाला आहे काय? असल्यास त्याची माहिती कुठे मिळेल.
एकुणात आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?

तुम्हाला याची उत्तरे माहीत असल्यास सांगावी. औषधी काढ्यांची आसवे, आयुर्वेदाची पायाभूत तत्त्वे असणारे कफ-वात-पित्त हे गुणधर्म, आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट्स हे कुठे शास्त्रीय प्रयोग करुन नोंद केले आहे का? आधुनिक वैद्यकामार्फत आज माझ्या शरीरातील रक्त, हाडे वगैरेंची तपासणी करुन लालपेशी किंवा बोन मॅरो वगैरेचे विश्लेषण करता येते. आयुर्वेदाने एखाद्या व्यक्तीच्या शरीरात किती टक्के कफ-वात-पित्त असते हे सांगता येते का? कफ, वात, पित्त मोजण्याचे एकक काय आहे? तो कसा मोजतात? कफ वात वगैरे गोष्टींमागचा कार्यकारणभाव शोधला आहे का? ज्येष्ठमध चघळल्याने घशाला आराम पडतो हे ऑब्जर्वेशन आयुर्वेदात असेल तर त्यामागचे शास्त्रीय कारण आयुर्वेदाने सांगितले आहे का? सांडू, डाबर वगैरे कंपन्या जी औषधे तयार करतात व बाजारात विकतात. उदा. वासावलेह. (है औषध मी कधी कधी घेतो) यात औषधातील प्रत्येक घटकाचे प्रमाण सर्व कंपन्या छापत नाहीत. त्यामुळे औषध नियमन करणाऱ्या संघटनांनी ही औषधे अप्रूव केली आहेत का. नसल्यास का नाही? मी बटाटवड्याचे उदाहरण यासाठी दिले की ज्ञान ही अत्यंत ढोबळ संकल्पना आहे. त्यामुळे त्या निकषावर आयुर्वेद ज्ञान आहेच. आयुर्वेद हे अज्ञान आहे असा मी दावा केलेला नाही. पुन्हा एकदा re-iterate करतो की आयुर्वेदाची उपयुक्तता ही वेगळी गोष्ट आहे. आधुनिक वैद्यकाशी त्याची तुलना करण्याचे प्रयत्न फोल आहेत.

उद्या कोणी म्हणेल की, पूर्वीच्या काळात इंजिनियरींग डीझाईन नव्हते याचा अर्थ आपल्याला (आणि जगात इतरत्र अनेक ठिकाणी) बिल्डींग टेक्नॉलॉजी आणि त्याच्या मागचे विज्ञान माहीतच नव्हते... जे काही राजवाडे बांधले गेले, शिवाजी आणि इतरांचे किल्ले, अनेक देवळे, अंजंठामधे आणि इतर अनेक ठिकाणी वापरले गेलेले रंग हे काही विज्ञान नव्हते, नुसतेच माधुरी - अनिलकपूरच्या गाण्यातले बटाटा वडा प्रमाणे इमॅजिन केलेले होते तर ...

हे अत्यंत हास्यास्पद उदाहरण आहे. पूर्वी विरुद्ध आता अशी चर्चा चाललेली नाही. आयुर्वेद आणि वैद्यक किंवा विज्ञान इतपत चर्चा विषय आहे.

तसेही पाहता गेले तर पूर्वीच्या काळी बांधण्यात येणाऱ्या घरांच्या तुलनेत आजकालच्या बांधणीमध्ये बरीच प्रगती झाली आहे. बांधकामासाठी वापरात येणाऱ्या वस्तू, आरसीसी किंवा अधिक आधुनिक स्ट्रक्चरल डिझाईन्स repeatable पद्धतीने पद्धतशीर शिक्षण देऊन आजकाल शिकवता येते. भूकंप किंवा पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्यासाठी पुरेशी काळजी घेण्यासाठी प्रयत्न केले जातात. पूर्वी एकावर एक दगड रचून घरे बांधली जात म्हणून आज कोणी तसेच करु शकत नाही. पूर्वीच्या काळी कशी घरे बांधायचे याची शास्त्रीय माहिती देणारी नोंदही कुठे असेल असे वाटत नाही. फारतर घरे बांधल्यानंतर इतिहासकार किंवा पुरातत्त्वतज्ज्ञानी केलेली निरीक्षणे वाचायला मिळतील.

माधुरी दीक्षित आणि बटाटवड्याचा संदर्भ कळला नाही. माझा बटाटवड्याचा संदर्भ हा 'स्वयंपाकघरातील विज्ञान' या वर्षा जोशी यांच्या पुस्तकाचा होता. असो.

चेतन's picture

10 Feb 2013 - 5:14 pm | चेतन

थोडेसे शोधल्यावर ह्या लिंक सापडल्या.

http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/21617554
http://clinicaltrials.gov/ct2/show/NCT01488123

श्रावण मोडक's picture

8 Feb 2013 - 8:03 pm | श्रावण मोडक

कटकट!

नाना चेंगट's picture

9 Feb 2013 - 1:29 pm | नाना चेंगट

अर तिच्या.. परत त्रास सुरु झाला का तुम्हाला... सांगत होतो पाटणकर काढा सकाळ संध्याकाळ घेत चला.. ऐकत नाही तुम्ही.. तुमचा विश्वास नाही ना आयुर्वेदावर म्हणून.. एकदा ट्राय करा ! खरंच बरं वाटेल.. :)

श्रावण मोडक's picture

10 Feb 2013 - 4:55 pm | श्रावण मोडक

हे असं आहे तुम्हा आयुर्वेदवाल्यांचं. नुसतं औषध आणि वळसे सांगितले. मात्रा कोण सांगणार? आणि म्हणे आयुर्वेद हे शास्त्र आहे! ;-)
बादवे, नाना, एक माहिती द्या हो - विज्ञान म्हणजे काय? एखादी गोष्ट वैज्ञानिक आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी काही व्याख्या असेलच. ती काय आहे? आणि ती व्याख्या कधी ठरली? (इथं मला त्याचे इसवी सन हवे आहे, थोडा इतिहास बरा आहे तुमचा असं कळलं पऱ्याकडून म्हणून विचारलं...) ;-)

मदनबाण's picture

8 Feb 2013 - 10:05 pm | मदनबाण

चालु द्या...

जाता जाता :---
अनेक वर्ष डाबरवाल्यांचा "च्यवनप्राश" खाल्ला आहे,म्हंटल हे डाबरवाले काय सांगतात बरं ? मग त्यांच्या संकेतस्थळावर एक चक्कर टाकुन आलो. (डाबरचा आधीचा लोगो वटवॄक्ष होता,आता पान असलेले झाड हा त्यांचा नवा लोगो आहे हे तुम्हाला ठावुक असेलच.)
What is Ayurveda?
The Genesis
MYTHOLOGICAL PERSPECTIVE
HISTORICAL PERSPECTIVE
आणि एक जरासा वेगळा दुवा देखील देवुन जातो... ज्यांना तो वाचण्यात रस असेल त्यांनीच तो उघडावा.
Sushruta: The first Plastic Surgeon in 600 B.C.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Feb 2013 - 10:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय.

-दिलीप बिरुटे