Skip to main content

प्रतिभा

बंध माळेचे

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 22/08/2010 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
बंध माळेचे डायरीचे पान मिटवून भैय्याजींनी एक दीर्घ निश्वास सोडला. आजचा नामजप पूर्ण झाला होता. तस म्हटलं तर अजूनही जास्त करता आला असता. पण आज नको. आज रविवार असल्यामुळे सुशांत घरीच होता. एरवी तो कामावर गेला, आणि छोट्याला शाळेत पोहचवले की घरात फ़क्त भैय्याजी, बायको-प्रमिला आणि सून. कसा शांत आणि भरपूर वेळ मिळायचा. भैय्याजी नाम-सागरात, किंवा एखाद्या पुस्तकात स्वत:ला बुडवून घेत. सासु सुनेची स्वयंपाक घरातील आवरासावर संपली, की पूर्ण घर निस्तब्धतेच्या डोहात बुडून जायचे. अशा वेळी नामस्मरण करण्यात कशी वेगळीच अनुभुती यायची. रविवारी घरातील सगळे उगाचच प्रचंड उत्साहाने कोलाहल करीत असायचे.

बिच्चूची गोष्ट

लेखक नगरीनिरंजन यांनी बुधवार, 18/08/2010 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
(मनोगतावर पुर्वी प्रकाशित झालेली माझी ही कथा इथे पुनर्प्रकाशित करीत आहे.) बिच्चू सकाळी ठरलेल्या वेळी जागा झाला तेव्हा नेहमीप्रमाणेच त्याच्या आजूबाजूला आई बाबा नव्हते. त्याना नेहमीच मालक-मालकीणबाईंच्या आधी उठावं लागे. जाग आल्याबरोबर बिच्चू छोट्या मालकीणबाईंच्या खोली कडे चालू लागला. किचनमधून जाताना त्याने आईकडे पाहिले तेव्हा ती ब्रेकफास्टची तयारी करत होती. तिने एकदा बिच्चूकडे पाहिले आणि पुन्हा आपल्या कामात गढून गेली. छोटासा बिच्चू तुरुतुरू चालत छोट्या मालकीणबाईंच्या खोलीच्या दाराशी पोचला. त्यांना उठवायची वेळ जवळजवळ झालीच होती.

घनश्याम सुंदरा

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 16/08/2010 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट नेहमी कसा नवीन तजेला घेऊन येते! रात्रीचा अंधार कालच्या सगळ्या विवंचना, दु:खे घेऊन दूर पळून गेलेला असतो. त्या काळज्यांच्या सावल्या भले नंतर पुन्हा येवोत. पण उन्हाबरोबर परत येऊन त्यांनी मनाला अजून तरी झाकोळून टाकलेले नसते. तेव्हा हा वेळ चोवीस तासांमधला एकदम टवटवीत आणि बिनधास्त वेळ असतो. जो काही उद्योग आपण ह्या प्राईम टाईम मधे करू, त्यात प्रचंड सुख मिळते. कारण सुखाला अधूनमधून छेद देणाऱ्या कटकटींचे तात्पुरते का होईना, पहाटेच्या वेळेत विस्मरण झालेले असते.

केट कोलविट्झ - मनस्वी, प्रशांत चित्र-शिल्पकर्ती

लेखक चिंतातुर जंतू यांनी रविवार, 15/08/2010 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
कर्तबगार स्त्री कलाकारांची ओळख करून देण्याचा हा आणखी एक प्रयत्न. मागच्या लेखात लुईज़ बूर्ज्वा या खट्याळ, बंडखोर स्त्रीविषयी सांगितलं होतं.

शब्द

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 14/08/2010 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी सिगारेट का सोडली. श्री सुधीर काळे ह्यांचा लेख वाचून पुर्वी लिहून ठेवलेली ही स्वानुभवाची कथा आठवली. ....... ' शब्द. फ़ोनची घंटी वाजताच स्वातीने धावत जाऊन फ़ोन उचलला. मी अगदी मजेत आहे आई. तू काळजी करू नको. काळजी वाटणारच गं! लग्नानंतर इतक्या लांब गेलीस. तिथे तुम्ही दोघेच. सगळं घर लावायचं. कोणी मदतीला नाही..... विकास काय म्हणतात? त्याचं काम छान सुरू आहे. संध्याकाळी तसा लवकरच घरी येतो. दिवसभर मी एकटीच घरी. तू काळजी घे बाई. आई तू आली असतीस आमच्याबरोबर तर किती छान झाले असते! पण तुझी शाळा.

पुन्हा कधी येशील?

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 09/08/2010 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
लिफ़्टचा दरवाजा दहाव्या मजल्यावर उघडला, तेव्हा आधीच चार माणसे आत होती. तरीही मारीयाने सॉरी म्हणत म्हणत कशीबशी चाकांची खुर्ची आतमधे घुसवलीच. खुर्चीत बसलेल्या अंकल मॅथ्युने कोरडा आवंढा गिळून आपला ह्या कोंबाकोंबीत काहीच भाग नसल्याचे दर्शवले. त्याची बहुदा काही गरज नव्हती. लिफ़्टमधल्या माणसांनी विकलांग अंकल मॅथ्युकडे पाहिले देखील नसावे. त्यातले दोघे लिफ़्टच्या भिंतीला सावलीसारखे चिकटून जागा करून देण्याचा प्रयत्न करत होते. बाकी दोघांनी मारीयाच्या दोन्ही बाजुंना आपापली जागा मिळवली.

पॅलेस, कोर्टकेस, सुवर्णमोहोरा आणि मी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 07/08/2010 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
"आल्या का गं मॅडम?'' कोर्टरूमच्या आतून माझ्या मैत्रिणीने खुणेनेच विचारलं. माझी मुंडी तिसर्‍यांदा नकारार्थी हालताना बघून तिने चेहरा वाकडा केला आणि कोर्टरूमच्या पुढील बाजूची तिची खड्या पारशाची पोझ घेत पुन्हा एकदा आमच्या दाव्याचा क्रमांक साधारण कधी, किती वाजता येईल याची तेथील लिपिकास विचारणा करू लागली. वेळ दुपारची. दिवस पावसाळ्याचे. कोर्टाच्या ब्रिटिशकालीन दगडी इमारतीत असलेल्या कोर्टरूम्समध्ये ओलसर दमट हवेबरोबर पावसाळी आभाळामुळे आज जरा जास्तच अंधार दाटला होता. मधूनच सतावणार्‍या, गुणगुणणार्‍या माशांना संथ लयीत गरगरणारे पंखे अजिबात उडवून लावू न शकल्याने त्या मला आजही नेहमीसारख्याच छळत होत्या.

३० जुलै - वसंतराव देशपांडे यांचा स्मृतिदिन

लेखक भारी समर्थ यांनी मंगळवार, 03/08/2010 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नाही. दर्‍याखोर्‍यातून बेफाम दौडत जाणार्‍या घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर ऊन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी. ती फुले पहायला ऊन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी. - पु.ल. देशपांडे फार दिवसांपूर्वी ’नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात शंकर महादेवन यांनी ’बगळ्यांची माळ फुले’ गायले होते. त्यावेळी गाण्याचे मूळ गायक ’वसंतराव देशपांडे’, अशी प्रथमच माहिती मिळाली. पण, वसंतरावांची पहिली खरी ओळख झाली ती पुलंनी त्यांच्यावर लिहीलेल्या एका लेखातून.