मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

बालचित्रवाणी, संस्कार, गोट्या आणि असेच काही

ॐकार ·
मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी तात्यांचा लेख वाचून मी ही जुन्या काळात रमलो आणि आठवण आली ती बालचित्रवाणीची. त्यातल्या गाण्यांची, छोट्या छोट्या कार्यक्रमांची. अगदी पाण्याचे उपयोग, फळे-भाज्या यांतील जीवनस्त्त्वे यांची उजळणी करणारे छोटे छोटे प्रसंग ते दात स्वच्छ ठेवण्याबाबत दाखवली जाणारी "शीऽऽऽ, दात किती किडलेत हिचे' ही ओळ आठवून देणारी छोट्या मुलीची आणि सोबत तिच्या बाहुलीची प्रतिमा; अशी असंख्य क्षणचित्रं डोळ्यासमोर तरळली. त्याचसोबत 'किलबिल किलबिल पक्षी बोलती....

नेमेची येतो मग संकल्प

देवदत्त ·
नेमेची येतो मग पावसाळा प्रमाणे, नेमेची येते नवीन वर्ष आणि नेमेची येतो नवीन वर्षाचा संकल्प. १५ दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासोबतच बहुतेक जण प्रश्न विचारणार," मग नवीन वर्षाचा काय संकल्प केलास?" आता काय म्हणावे. दरवर्षीच सुरूवातीला ठरवतो की हे करणार, ते करणार. पण ते अमलात आणणे नीटसे जमत नाही. आहे, त्यात आळस हा भाग आहेच. परंतु काही वेळा वाटते, एवढे काय आपल्याला करायचे असते की जे इतके वर्ष आपण करावयाचे ठरवतो आणि मग करत नाही. सगळे नेहमीचेच. हो, जर मी ठरविले की दररोज सकाळी लवकर उठायची सवय लावीन, तर प्रयत्न करू शकतो.

मिसळपाववर आणिबाणी...

सरपंच ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मंडळी, या पत्राद्वारे मिसळपाववर आम्ही आणिबाणी जाहीर करत आहोत याची सर्वप्रथम सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. मराठी भाषेमधून 'जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते' या न्यायाने इथे उत्तम ललित, तसेच वैचारिक लेखन लोकांना करता यावे, इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेता यावा म्हणून हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. सुरवातीला काळजीवाहू पंचायत समिती, त्यानंतर निवडणुका व निवडून आलेली पंचायत समिती या घटनांमधून मिसळपाववर लोकशाही तत्वे आणण्याचा प्राथमिक प्रयत्न झाला. परंतु लोकशाही ही संकल्पना देखील अनेक कंगोरे, अनेक छटा असणारी संकल्पना आहे आणि तिलाही बर्‍याच फेजेसमधून जावे लागते.

निवेदन...

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मंडळी, आजपर्यंत पंचायतसमितीच्या कामामध्ये तसेच येथील लेखन संपादित करण्यामध्ये मी कधीही हस्तक्षेप केलेला नाही/करत नाही हे सर्वप्रथम नमूद करतो. आणि तसं मी अनेकदा जाहीरपणे सांगितलंही आहे! आपल्याला विश्वास ठेवायचा असेल तर अवश्य ठेवा किंवा ठेवू नका, ही आपली मर्जी! आपण जर येथील काही लेखन पुन्हा एकदा चाळलेत तर माझी थट्टामस्करी, माझ्यावर जाहीर आरोप, असले अनेक प्रकार इथे केलेले आपल्याला पाहायला मिळतील. हे सर्व लेखन आजही येथे शाबूत आहे!

यातना

सहज ·
Taxonomy upgrade extras
कळतील कुणा यातना होतात आमच्या मना मुक्त स्वांतत्र्याचा बहाणा का तर मिळावा रोज घालाया धिंगाणा साहीत्य निर्मीतीस कोण पुसेना पण नवसदस्य नावाच्या हुशार कल्पना पंचायत-मालक कोण कूठे समजेना कोणाच्या खांद्यावरून कोण साधे निशाणा शत्रुस अनासाये मिळे कराया ठणाणा लेखन-वाचनाचा आनंद मिळेना साहित्यप्रेमाच्या मोठ्या वल्गना माय मराठी काय म्हणेल कोणास नाही याची तमा

घरटे..

प्राजु ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
घर ते माझे बालपणीचे रंगबिरंगी आठवणीचे.. आईबाबांच्या पंखाखाली मांडलेल्या भातुकलीचे.. प्राजक्त, तुळस, कदंब अंगणी वेल जुईची बहरली होती.. सैरवैर त्या अंगणी माझी इवली पाऊले नाचली होती.. झोपाळ्याची जुनीच करकर सवे चिऊकाऊच्या गोष्टी.. त्यामागूनी सूरांत होतसे तिन्हीसांजेची शुभंकरोती.. एकेक पायरी यशाची ती चढले ज्याच्या बळावरी.. घर ते माझे उभे पाठीशी उनपाऊस घेत शिरी.. कधी न वाटे मला एकटे घर ते माझे सखा सोबती.. कितिक गुपिते दोघांमधली जपून त्याने ठेवली होती... जग ते होते छोटेसे पण आनंदाचे जीणे होते.. प्रत्येकाचा सूर वेगळा पण घर ते आमचे गाणे होते.. त्या मायेच्या आठवणीने उर दाटून येई कोण.. घरट्यावरूनी

आशा

गुंडोपंत ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
काही सुचत नाही काही टोचत नाही रस्त्यावरच्या छोट्या मुलीने विकलेली फुलं बोचायची मनाला सवय तरी होती दुसर्‍याचा विचार करायची पण हल्ली मी असले विचारही वेचत नाही हल्ली मनाला फार काही टोचतही नाही जरडच झालोय मी, तुटल्यासारखा, जख्ख म्हातार्‍या वाळल्या खोडासारखा तरी आशा आहेच, कधी तरी खोडाला पान येईल जरड झालेल्या मला, एक विचार करणारं मन येईल. मग मलाही कणव येईल त्या रस्त्यावरच्या छोट्या मुलीची मी ही काही तरी करणे लागतो रे, ही उभारी येईल मनाची. मला काही टोचत नाही, ही निर्लज्ज भावनाही संपुन जाईल एक दिवस कुणासाठी काही करण्याचे सुख घेवून येईल पण तोवर सत्य हेच... मी एक जरड जख्ख...