निवेदन...
लेखनप्रकार
राम राम मंडळी,
आजपर्यंत पंचायतसमितीच्या कामामध्ये तसेच येथील लेखन संपादित करण्यामध्ये मी कधीही हस्तक्षेप केलेला नाही/करत नाही हे सर्वप्रथम नमूद करतो. आणि तसं मी अनेकदा जाहीरपणे सांगितलंही आहे! आपल्याला विश्वास ठेवायचा असेल तर अवश्य ठेवा किंवा ठेवू नका, ही आपली मर्जी!
आपण जर येथील काही लेखन पुन्हा एकदा चाळलेत तर माझी थट्टामस्करी, माझ्यावर जाहीर आरोप, असले अनेक प्रकार इथे केलेले आपल्याला पाहायला मिळतील. हे सर्व लेखन आजही येथे शाबूत आहे! त्याचप्रमाणे सुरवातीला पोष्टमन यांचा 'संत तात्याबांची अमृतवचने' किंवा गेले काही दिवस किमयागार नावाच्या इसमाचे सतत मला टार्गेट करण्याकडे असलेले लेखन अश्याही गोष्टी माझ्याच बाबतीत लिहिल्या गेलेल्या आहेत, ज्या आजही येथे शाबूत आहेत!
असे असताना,
'कुणा एका बाळासाहेबांचा एखादा विनोद (ज्यात तात्याला टार्गेटही केलं गेलं नाहीये!) तात्याला मुद्दाम आपले मालकी हक्क वापरून येथून उडवून लावण्याची काय बरं गरज असावी?' असा साधा आणि सोपा विचारही येथे कालपासून मिसळपाववर आणि माझ्यावर मुक्त वाभाडे (हे देखील लोकशाहीचेच एक लक्षण, इतर संस्थळांवर कदाचित हे संभव नसावे/नाही!) काढणार्या, मिसळपाववर आणि तात्यावर वैयक्तिक प्रेम तसेच द्वेषही (!) असणार्या मंडळींनी करू नये, याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते!
आता प्रश्न असा उरतो की हे केलं कुणी? तर त्याबाबतीत मी कालपासून जवळजवळ ८-१० वेळेला नीलकांतशी बोललो आहे, त्याला तपास करायला सांगितला आहे. तांत्रिक गोष्टीतलं मला काहीच कळत नाही, नीलकांतच ते सर्व पाहतो. परंतु तो सध्या अभ्यासात व्यग्र असल्यामुळे त्याला वेळ नाही. त्यामुळे 'तुझ्या सवडीने निवांतपणे तू काय ते बघ!' अशी मुभा मी त्याला दिली आहे.
मिपाच्या सुरवातीला ज्यांच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवून ज्या मंडळींना येथील काळजीवाहू समिती सदस्य म्हणून नेमले होते आणि पुढे ती मंडळी बिनविरोध निवडून आली त्यापैकी एकानेही माझ्यावर जाहीर आरोप किंवा संशय घेण्यापूर्वी (तसा ते अवश्य घेऊ शकतात, त्याबद्दल ना नाही!) मला विश्वासात घेऊन किंवा एखादे पोष्टकार्ड पाठवून 'काय तात्या, काय भानगड झाली आहे? किंवा काय प्रॉब्लेम असावा?' असे विचारले नाही याचे मला राहून राहून वाईट वाटत आहे. मी मात्र जिथे जिथे पंचायत समितीचा उल्लेख आला किंवा मला करावा लागला तिथे तिथे वेळोवेळी पंचायतीबद्दल पूर्ण विश्वासच व्यक्त केला आहे हेही नमूद करावेसे वाटते!
कालपासून मी सर्व प्रतिसाद वाचत आहे, परंतु मुद्दाम इतका वेळ गप्प राहिलो त्याबद्दल क्षमस्व, परंतु या निमित्ताने मला हे बघायचे होते की कोण कसं आहे नी कोण कसं आहे, कुणाचे काय विचार आहेत आणि कुणाचे काय विचार आहेत! या निमित्ताने येथील बर्याचश्या मंडळींचे अंतरंग मला बघायला मिळाले! मालक या नात्याने मिसळपावचे खरे हितचिंतक कोण, मिपाची खरी काळजी/कड कुणाला आहे, कोण फक्त चोची मारायच्या संधी शोधतो आहे हेही समजले! तरीही मालक या नात्याने खुलासा करायला इतका वेळ लावल्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व सभासदांची क्षमा मागतो!
आता येथील लेखन उडण्याबाबत -
तर केवळ बाळासाहेबांचा विनोदच नव्हे, तर यापूर्वीही अगदी साधेसुधे असणारे प्रतिसादही (उदा माझे स्वत:चेच एक दोन प्रतिसाद, माझ्या आठवणी प्रमाणे प्रमोदकाकांचाही एखाददुसरा प्रतिसाद) येथून काही वेळेला उडाल्याच्या घटना घडल्या आहेत त्याबबतीतही मी वेळोवेळी नीलकांतला तपास करायला सांगितले आहे, परंतु त्याच्या कार्यबाहुल्यामुळे त्याला गेले अनेक दिवस हे कुठलेही काम करायला जमलेले नाही.
असो! खुलाश्याअंतर्गत माझ्यापाशी जे काही सांगण्यासारखं होतं ते मी सर्व इथे सांगितलं आहे! यापेक्षा अधिक कोणताही खुलासा माझ्यापाशी नाही तसेच यापुढे यापेक्षा अधिक कोणताही खुलासा मी करू शकेन असं मला वाटत नाही!
एक गोष्ट मात्र खरी, आता यापुढे कुणाच्या गळ्यात गळे घालायचे, कुणाला दिलखुलासपणे आपलं म्हणायचं, कोण जवळचा/कोण परका या सर्व गोष्टी मला समजल्या हे मात्र बरे झाले! अर्थात, हे माझे वैयक्तिक निवेदन. मिसळपावचा मालक म्हणून नव्हे!
कळावे,
लोभ आहेच, तो जमल्यास वाढावा, न वाढल्यासही उत्तमच! :)
आपला,
तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.
वाचने
31603
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
किंबहुना,
लेखन नष्ट
धन्यवाद / सूचना
- तुम्ही नीलकांताला सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाचा छडा लागला, की त्या तपासाचे निष्कर्ष त्वरीत येथे सर्व सभासदांसमोर जाहीर व्हावेत.
- पंचायत समितीचेच एक सभासद असलेल्या विकासरावांचा परवलीचा शब्द चोरण्याचा जो प्रयत्न झाला, त्या प्रकरणाचा आणि प्रतिसाद उडवण्याच्या प्रकरणाचा परस्परसंबंध लक्षात घेऊन त्या दृष्टीने एकूण प्रकरणाचा छडा लावावा
- तुम्हाला मागे मी लिहिलेला व्य नि मिसळपावाच्या हितासंबंधी आहे, असे सांगून जगजाहीर केल्यानंतर माझ्यासह येथील बर्याच सदस्यांची त्याबाबत स्पष्ट नाराजी सगळ्यांनाच दिसली आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी (अगदी पंचायत समितीचे सदस्यही) व्य नि वगैरे लिहून विश्वासात बिश्वासात घेऊन संवाद साधण्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरते. त्यामुळे कुणाकडून तशी अपेक्षा न ठेवाल तरच बरे! निदान मी तरी पुन्हा अशा व्य नि च्या फंदात स्वतःहून पडण्यास तयार नाही. ज्यांनी त्या प्रकरणानंरही व्य नि तून संपर्क साधला असेल, त्या सदस्यांच्या सहनशीलतेचे मला कौतुकच वाटते.
- नियुक्त पंचायत समितीने 'ना काम' आंदोलन थांबवले की मिसळपावावरील मार्गदर्शक लेखनाबाबत काही बाबी सुस्पष्ट कराव्यात. जसे प्रतिसाद उडवले जाण्यासाठीचे निकष; अश्लील,ओंगळवाणे,हिडीस काय आहे, काय नाही; इत्यादी. त्याबाबत संकेतस्थळाचे मालक म्हणून तुमचा हस्तक्षेप नसला, तरी योग्य पाठपुरावा असावा. त्याबाबत सदस्यांना माहिती दिली जावी.
- तुमचे किंवा प्रमोदकाकांचे उडालेले साधेसुधे प्रतिसाद उडणे आणि येथील बाळासाहेबांचा आणि त्यावरील काही प्रतिसाद उडणे, यातील अपघात काय आणि खोडी काय हे न कळण्याइतके मिसळपावचे सभासद मूढमती नसावेत, असे वाटते. त्यामुळे तुमच्या किंवा प्रमोदकाकांच्या प्रतिसादांच्या उडण्याची आणि बाळासाहेबांचे व संबंधित इतर प्रतिसाद उडण्याची तुलना करूच नकात.
- सध्याच्या वस्तुनिष्ठ समस्येला निवेदनातून वैयक्तिक हितसंबंधांची, वैयक्तिक भावनांची झालर लावू नकात (कोण कसे आहे, कोणाला कोणाची किती पडली आहे, कुणाला आपले नि परके समजायचे वगैरे) त्यामुळे एक तर विषय भरकटू शकतो आणि दुसरे, असे करून सदस्यांची संकेतस्थळाबद्दलची, येथील कामकाजाबद्दलची अपेक्षा, तक्रार जे काही असेल ते - सहानुभूतीत बदलू शकेल, जे कोणासाठीच हितावह नसेल; मिसळपावसाठी तर नाहीच नाही
असो. तुमचे निवेदन वाचून जे मनात आले ते प्रामाणिकपणे मांडले. मिसळपावच्या यापुढील वाटचालीसाठी मालक म्हणून तुम्हाला, पंचायत समितीला आणि सर्व सदस्यांना अनेकोत्तम शुभेच्छा. (प्रामाणिक शुभेच्छुक)बेसनलाडूहा खुलासा पटण्यासारखा आहे.
In reply to हा खुलासा पटण्यासारखा आहे. by प्रमोद देव
पट्तय पण.
In reply to पट्तय पण. by सहज
असहमत..
माफ करा/ खुलासा
In reply to माफ करा/ खुलासा by प्रियाली
प्रमोद
बरं झालं तात्या
In reply to बरं झालं तात्या by गारंबीचा बापू
महाशय
In reply to महाशय by आजानुकर्ण
आजानुकर्ण
In reply to आजानुकर्ण by गारंबीचा बापू
बापूसाहेब
In reply to बापूसाहेब by आजानुकर्ण
तुमची व्याख्या
In reply to बरं झालं तात्या by गारंबीचा बापू
इच्छा नाही,
In reply to इच्छा नाही, by विसोबा खेचर
आपलीच
दुर्दैवी
सहनत!
निवेदन
In reply to निवेदन by चित्रा
धन्यवाद,
In reply to धन्यवाद, by विसोबा खेचर
पटत नाही
खरं सांगायचं तर
In reply to खरं सांगायचं तर by ऋषिकेश
धन्यवाद,
आमचेही दोन शब्द !!!
In reply to आमचेही दोन शब्द !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद,
तात्या,
मिपा...
शुभेच्छा!!!
शुभेच्छा आणि विश्वास...
छान !
In reply to छान ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
नवल आहे!
In reply to नवल आहे! by विसोबा खेचर
म्हणजे
In reply to नवल आहे! by विसोबा खेचर
अपेक्षीत
In reply to अपेक्षीत by कोलबेर
असेच
In reply to नवल आहे! by विसोबा खेचर
सहमत
In reply to नवल आहे! by विसोबा खेचर
अगदी बरोबर
ते तर आहेच
तात्या
In reply to तात्या by उत्तर शोधत आहे (verified= न पडताळणी केलेला)
जर तुम्ही
In reply to जर तुम्ही by राजे (verified= न पडताळणी केलेला)
काही तरी
अरे आता पुरे
सहमत आहे
बास ना आता...
In reply to बास ना आता... by प्राजु
असहमत
सहमत
अगदी बरोब्बर...
++.....१
लिहीताना एका गोष्टीचे भान जरूर ठेवावे की "घरात" आमच्या सारख्या..