मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'एका खेळियाने' आता पुस्तक स्वरूपात!

जे.पी.मॉर्गन ·

फारएन्ड 14/08/2024 - 06:08
अभिनंदन! मिपावरचे बरेच वाचले आहेत त्यामुळे इतरही चांगले असतील यात काहीच शंका नाही. भारतात जाईन तेव्हा पुस्तक घेण्यात इंटरेस्ट आहेच.

मिपाकरांनी भरभरून प्रेम दिलेली लेखमाला 'एका खेळियाने' आता सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात उपलब्ध झाली आहे. त्याचं झालं असं की दोन एक वर्षांपूर्वी सकाळने एक स्पर्धा घेतली होती. त्यात 'एका खेळियाने'ला सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. त्याचेच फलित म्हणून सकाळ ने एका खेळियानेचे लेख पुस्तकरूपात प्रकाशित केले आहेत. मिपावर आधी प्रकाशित झालेले काही आणि काही नवीन अश्या तीसेक लेखांचा त्यात समावेश आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे पॅरिस ऑलिंपिक्स सुरु झाले त्याच दिवशी, २६ जुलै ला हे पुस्तक वेगवेगळ्या ई-दुकानांमध्ये उपलब्ध झाले. पुस्तकाचे ई-बुक देखील लवकरच उपलब्ध होईल.

आपण IDIOT झालो आहोत का?

kool.amol ·

तंत्रज्ञान विकसित होत असताना सुखसोई बरोबर इतरही ड्राबॅक्स आणत असते. माहितीचा पुर आला तर पुरात अनेकजण वाहून जाणारे असतात. नाईलाज आहे.

नुकताच डॉक्टर्स डे साजरा झाला. डॉक्टर लोकांविषयी आपल्याकडे सर्व प्रकारच्या भावना आणि मतं आहेत. मी स्वतः डॉक्टर नाही. डॉक्टर होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक गुणवत्ता मी सिद्ध करू शकलो नाही पण माझे मित्र, मैत्रिणी आणि काही नातेवाईक डॉक्टर आहेत. मी जिथे काम करतो त्या टिम मध्ये मी सोडून सगळे डॉक्टर आहेत त्यामुळे ह्या क्षेत्रातल्या बातम्या, चर्चा रोज कानावर पडत असतात. त्यामुळे माझ्याकडे ह्या क्षेत्रातील थोडी माहिती असते. काही दिवसांपूर्वी माझ्या एका सहकारी मैत्रिणीकडून कोणाचा तरी उल्लेख IDIOT syndrome चा बळी असा करण्यात आला.

सात-आठ महिन्यांपासून स्टॉक मार्केटमध्ये महिना ८० हजार कमावलेत

कांदा लिंबू ·

चौकस२१२ 02/07/2024 - 14:20
९ लाख भांडवलावर महिना ८० हजार म्हणजे वर्षाचे ९लाख साठ हजार म्हणजे 106% हुन अधिक वार्षिक परतावा.... या बद्दल अभिनंदन हे फार कठीण आहे, (हो अगदी ऑप्शन मधील लिव्हरेज धरले तरी ) हरकत नसेल तर काही प्रश्न - यात सातत्य किती आहे ( सरासरी ८० हजार असेल तरी मोठे खड्डे आणि उंचावतटे किती आहेत ? Draw down - या साठी आपण जोखीम किती पत्करता म्हणजे काय "विकता" १) नेकेड ऑप्शन विकणे २) कवर्ड ऑप्शन विकणे (बद्दल एक प्रसिद्ध म्हण आहे " जो माणूस कवर्ड ऑप्शन विकतो तो रोज/ दरमहा राजा सारखा खातो पण जेवहा हरू लागतो तेवहा एखाद्या सम्राटासारखा हागतो " ३) ऑप्शन स्प्रेड विकणे / विकत घेणे 4) नुसते ऑप्शन विकत घेणे Expiry शेवटच्या दिवशी भारतात इंडेक्स ऑप्शन हे कॅश सेटल्ड असतात कि प्रत्यक्ष इंडेक्स फ्युचर वर सेटल होतात? Expiry शेवटच्या दिवशी भारतात शेअर ऑप्शन हे कॅश सेटल्ड असतात कि प्रत्यक्ष शेअर डिलिव्हरी कि शेअर फुचर वर सेटल होतात ?

In reply to by चौकस२१२

कांदा लिंबू 03/07/2024 - 10:32
जुन महिन्यात झालेला - - तोटा - सव्वा लाख - नफा - एक लाख नव्वद हजार - शुल्कोत्तर निव्वळ नफा - ६५ हजार सात-आठ महिन्यांत - - एकाच दिवसात झालेला सर्वोच्च नफा - ४८००० - एकाच दिवसात झालेला सर्वोच्च तोटा - ६७००० मी नेकेड ऑप्शन्स् विकतो. पुट / कॉल दोन्ही विकतो. कवर्ड् / स्प्रेड् वगैरे करत नाही. यात प्रचंड जोखीम आहे, मर्यादित नफा आहे. नफ्याची वारंवारिता अधिक आहे. १० टक्के स्टॉपलॉस, २० टक्के नफा असे साधारण नियोजन करतो, वेळ पाहून त्यात थोडाफार बदल करतो. थोडेफार चार्ट्स्, विक्स् वगैरे बघतो, खूप जास्त तांत्रिक माहिती बाळगत नाही, माहिती प्रदूषण करून घेत नाही. "आधी झालेला तोटा आता भरून काढायचा आहे" अशी मानसिकता ठेवत नाही. अजून शिकाऊ उमेदवार आहे, "past performance is not an indicator of future returns" याची जाणीव आहे.

In reply to by कांदा लिंबू

चौकस२१२ 03/07/2024 - 18:24
मी नेकेड ऑप्शन्स् विकतो. कवर्ड् / स्प्रेड् वगैरे करत नाही. यात प्रचंड जोखीम आहे विरोधाभास जाणवला नेकेड ऑप्शन विकण्यात स्प्रेड विकण्यापेक्षा जास्त जोखीम असते / असू शकते विशेष म्हणजे नेकेड कॉल विकण्यात जास्त धोका हि आणि फाय द हि दोन्ही ची "शक्यता" प्रोबॅबिलिटी सारखी असेल म्हणजे असे कि समजा इंडेक्स १००० ला आहे आणि अ ) १००५ चा कॉल विकलात काय किंवा ब) १००५-१०१० चा कॉल स्प्रेड विकला काय इंडेक्स १००५ च्या वर गेली तर दोन्ही कडे तोटा होऊ शकतो , अ ) मध्ये अमर्यादित ब) मध्ये मर्यादित इंडेक्स १००५ च्या खाली राहिली तर अ ) मध्ये ब) पेक्षा जास्त फायदा होणार हे खरे

In reply to by चौकस२१२

कांदा लिंबू 03/07/2024 - 21:09
विरोधाभास जाणवला
मी नेकेड ऑप्शन्स् विकतो. कवर्ड् / स्प्रेड् वगैरे करत नाही. यात प्रचंड जोखीम आहे.‌
यातील "यात प्रचंड जोखीम आहे" हे व इतर, "मी नेकेड ऑप्शन्स् विकतो" यालाच लागू आहे.‌ माझा लेखनदोष!

अमर विश्वास 02/07/2024 - 14:49
अभिनंदन .. सध्या बाजारात बुल रन चालू आहे.. मार्केट सात्यत्याने वर जातंय .. त्याच्या जरूर फायदा ह्या .. काही महिन्यांनी मार्केट volatile होण्याची शक्यता आहे .. पण तोपर्यंत तुमचे ट्रेडिंग मॉडेल अजून मॅच्युअर झाले असेल happy trading

In reply to by अमर विश्वास

शाम भागवत 04/07/2024 - 03:55
सहमत आहे. बुल रन मध्ये चुका दुरूस्त करायला वाव मिळू शकतो. त्यामुळे नफ्याचे प्रमाण नुकसानीपेक्षा जास्त असू शकते. तसेच चुका दुरूस्त करायला फारसा कालावधी लागत नाही. मात्र साईडवेजमध्ये चुका दुरूस्त करायला वेळ लागतो. त्यामुळे पेशन्स असलेली माणसे नफा मिळवू शकतात. मंदीमधे झालेल्या चुका वर्षानुवर्षे दुरूस्त करता येत नाहीत. पेशन्स बरोबरच नविन भांडवलाची उपलब्धता असलेला नफा मिळवू शकतो. बाकीच्यांना वाट पाहाणे किंवा. नुकसान सोसून बाहेर पडणे हे दोन पर्याय शिल्लक राहतात.

कंजूस 02/07/2024 - 17:34
बरं चाललंय एकूण. यातून अजून टॅक्स जाईल ना. कुणाला लॉस झाल्यास काय वजावट मिळेल? कारण हा धंधा म्हणून धरत नाहीत असं समजून आहे.

गवि 03/07/2024 - 19:16
बरेचसे (सर्वच) जार्गन्स समजत नसल्याने एकूण शेअर बाजाराबद्दलचे सर्वच लेख डोक्यावरून जातात. अगदी तोंडओळख किंवा प्राथमिक माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेत असे वाटणारे लेख देखील सामान्य वाचकाला निम्म्याहून अधिक संकल्पना माहीत असतात असे गृहीत धरून धडाधड तांत्रिक शब्द टाकत जातात. म्हणजे एखाद्या वैद्यकीय विषयाची सामान्य लोकांना प्राथमिक माहिती देताना एखाद्या डॉक्टरने अँटेरियर, पोस्टेरियर, इन्फेरीयर आस्पेक्ट ऑफ सुप्राक्लॅव्हिक्युलर नोड्स, PTCA फॉर CAD वगैरे.. वगैरे.. शब्द लीलया फेकावे तसे.

In reply to by पॅट्रीक जेड

गवि 03/07/2024 - 20:13
आपल्याला ज्ञान मिळण्याऐवजी त्यांचे ज्ञान दिसते इतकेच. एकमेकांत हाय काँटेक्स्ट चर्चा चालू असली की बघणारी पब्लिक अचंबित होऊन "वॉव" याखेरीज काही म्हणू शकत नाही. खालील संज्ञा / शब्द हे अगदी सामान्य ज्ञान असेल तर मात्र माझे वरील प्रतिसाद रद्द समजावे. ... इंडेक्स ऑप्शन्स् विक्री पुट कॉल ऑप्शन स्प्रेड स्टॉप लॉस, नेकेड ऑप्शन शिवाय खालील वाक्यांनी अधिकच डगमग होते मनात:
ज्याचा त्याचा वकूब असतो. परमेश्वराची कृपाही असावी लागते.

In reply to by गवि

पॅट्रीक जेड 03/07/2024 - 20:55
आपल्याला ज्ञान मिळण्याऐवजी त्यांचे ज्ञान दिसते इतकेच. एकमेकांत हाय काँटेक्स्ट चर्चा चालू असली की बघणारी पब्लिक अचंबित होऊन "वॉव" याखेरीज काही म्हणू शकत नाही. १००० टक्के सहमत. काय चाललंय हे पाहून “वाव” लोक किती हुशार असतात नी आपण काय करतोय असा प्रश्न पडला. शेवटी शुभेच्छा लिहून कलटी मारली.

In reply to by पॅट्रीक जेड

चौकस२१२ 04/07/2024 - 08:44
यावर भरपूर माहिती उपलब्ध आहे , सोपी आणि किचकट होणारी दोन्ही https://www.optionseducation.org/optionsoverview/what-is-an-option धागाकर्ते आणि मला दोघांनाही यात रस आहे आणि थोडी माहिती आणि अनुभव म्हणून चर्चा केली ,,, त्यात हरकत घेण्यासारखे काय आहे कोण जाणे ? तुम्ही "वॉव"म्हणून नाही .. काय वाटेल ते काढताय !

In reply to by गवि

गवि सर, काही सर्वसाधारण लोकांना समजतील अशी उदाहरणे देऊ का ? कॉल ऑप्शन : समजा तुमच्याकडे शेती आहे, हे बख्खळ २०-२५ एकर . अन तुम्ही घेताय उस . आता हाय का, एवढा उस घेतला अन उसाचा दरच पडला तर काय करणार ? मग एक शेतकरी म्हणुन तुम्ही म्हणु शकता - २५०० रेट ने घेणार असेल तर मी उस विकायला तयार आहे . हा झाला कॉल ऑप्शन. इथे शेतकरी कॉल ऑप्शन सेलर आहे. आता समजा कोणी कारखान दाराने विकत घेतला तुमच्याकडुन हा कॉल ओप्शन तर तो बायर झाला . तो तुम्हाला कॉल ऑप्शन ची किंमत अ‍ॅडव्हान्स पेमेंट देईल. आता समजा उसाला २५०० च्या वर दर मिळाला तर ऑप्शन इन द मनी क्लोज झाला असे म्हणतात , आणि त्या परिस्थितीत शेतकर्‍याला झक मारत २५०० रुपायाने विकावे लागेल. पण समजा २५०० च्या खाली दर मिळाला, तर त्याला ऑट ऑफ द मनी म्हणातात, आणि तेव्हा कारखानदाराकडे ऑप्शन एक्सरसाईझ न करण्याचा पर्यात अर्थात ऑप्शन असेल. (२५००पेक्षा स्वस्त मार्केट मध्ये मिळत असल्यावर तो तुमच्याकडून कशाला महागातला उस विकत घेईल. ) पुट ऑप्शन : पण ह्यात रिस्क कारखानदारालादेखील आहेच ना. समजा उस दर २५०० च्या कैक पटीने वर गेला तर त्याचे सगळे प्रॉफिट मार्जिन गडबडाणार आहे . त्यामुळे कारखान्दार म्हणु शकतो - की कोणी २५०० ला उस विकायला तयार असेल तर मी व्हिकत घ्यायला तयार आहे, असे कॉन्त्रॅक्ट करुन द्यायला तयार आहे. हा झाला पुट ऑप्शन . आणि कारखान्दार झाला पुट ऑप्शनचा विक्रेता. आता शेतकरी हा ऑप्शन विकत घेऊ शकतो काही प्राईस पे करुन . आता समजा उसाला मार्केट २५०० पेक्षा कमी भाव मिळाला तरीही शेतकरी २५०० ह्या भावाने कारखानदाराला माल विकेल, अन कारखानदाराला झक मारत विकत घ्यावा लागेल. अन हेच २५०० पेक्षा जास्त भाव निघाला तर शेतकरी ऑप्शन एक्स्रसाईझ च करणार नाही, वाढीव भावाने मार्केट मध्ये विकेल !! आता विचार करा की एकदा ऑप्शन विकत घेतला की तो विकत घेणारा निश्चिंत आहे कारण त्याला फक्त नाममात्र ऑप्शन प्रिमियम भरुन आपली भविष्यातील खरेदी /विक्रीची किंमत ठरवलेली आहे . तसेच ऑप्शन विकणारा ही खुष आहे कारण त्याने व्यवस्थित विचार करुन असाच ऑप्शन विकला आहे की जो इन द मनी होणारच नाही! होण्याची प्रोबॅबिलिटी मोजुन मापुनच विकले आहे ते. अर्थात त्याला १ स्क्वेयर फुट जमीन न घेता, शेती न करता केवळ "सुनियोजित रिस्क घेऊन" शेतीतुन पैसे कमवता येणार आहेत !! बाकी जास्त लिहित नाही कारण ते उगाच जार्गन होईल. पण वरील एका कन्सेप्ट मुळे मार्केट किती प्रचंड इफिशियंट होईल ह्याचा विचार करा ! आता शेवटी प्रश्न राहतो की
ह्या ऑप्शनची , ह्या कॉन्ट्रॅक्टची किंमत कशी ठरवणार ?
तर हे आहे The Trillion Dollar Equation trillion https://www.youtube.com/watch?v=A5w-dEgIU1M&t=35s cp रिटायर झाल्यावर कधीतरी निवांतपणे ह्याविषयावर सविस्तर लिहावे असा विचार आहे . बघु कसा योग येतो ते. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

शाम भागवत 04/07/2024 - 03:43
अतिशय चांगल्या पध्दतीने समजावून सांगितले आहे. शेतकरी व कारखानदार दोघही आपली धंद्यातली जोखीम कशी कमी करतात ते लक्षात येते. धंद्यातली जोखीम कमी करणे ह्या हेतूनेच या प्रकारांचा जन्म झाला आहे. मात्र मी कारखानदारही नाही. शेतकरीही नाही. जमीन नाही व उसही नाही तेंव्हा त्याला सट्टा म्हणतात.

In reply to by शाम भागवत

चौकस२१२ 04/07/2024 - 08:53
ऑप्शन हे एक साधन आहे , सट्टा म्हणून हि वापरू शकता किंवा विमा म्हणून हि ( तरी सट्टा आणि ट्रेडिंग यात एक सूक्ष्म फरक आहे .. घोडयावर तो जिंकावा म्हणून पैसे लावने आणि बेटफेयर सारखया एक्सचेन्ज वर "ट्रेडिंग" करने यात जो फरक आहे तोच " तो एक वेगळा विषय आहे ) समजा तुमच्या कडे टाटा चे समभाग आहेत आणि ते दीर्घकाळ तुम्हाला ठेव्यायचे आहेत पण मध्येच ते खूप खाली जाण्याची शक्यता आहे तर तेव्हा तुम्ही पुट ऑप्शन विमा म्हणून विकत घेऊ शकता ... याला मॅरीड पुट असे म्हणतात ऑप्शन चा वपर इतकया विविध प्रकारे करता येतो कि लोक त्या विषयात डॉक्टरेट पण करू शकतील असो आयुष्य हेच सट्टा आहे ...

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 04/07/2024 - 05:48
प्रगो.. फार उत्तम समजावले. धन्यवाद. याला म्हणतात सर्वांसाठी ज्ञान. इथे एक शंका आली. केवळ सुनियोजित ऑप्शन विकून शेती नसताना कमाई कशी करणार. ऊस प्रत्यक्षात विकायची वेळ आली की तो द्यावा लागणार ना? अशी वेळ शंभर टक्के येणार नाही असे कसे गृहीत धरता येईल ? अशा वेळी केवळ हवेत ऑप्शन विकून प्रत्यक्षात ऊस अस्तित्वात नाहीच असे झाले तर शेतकऱ्याला काहीच liability नाही का? की हा प्रश्न अडाणीपणाचा आहे?

In reply to by गवि

हा प्रश्न अडाणीपणाचा आहे?
नाही नाही , मुळीच अडाणीपणाचा नाही हा प्रश्न. बहुतेक शिकागो स्टॉक एक्चेंजला असा प्रकार आधी घडला आहे फार पुर्वी १८६०-६५ मध्ये. कोणीतरी कॅटल ट्रेड अर्थात बीफ साठीचा फॉरवर्ड ट्रेड केलेला होता ( अर्थात भविष्यात मी अमुक अमुक इतक्या गायी विकत घेईन ) आणि शेवटच्या दिवशी त्याला एवढ्या सगळ्या गायी घेऊन घरी जावे लागले होते =)))) ह्याला फिजिकल सेटलमेंट म्हणातात, आता शक्यतो ते होतच नाही, आता कॅश सेटलमेंट होते अर्थात ऑप्शन इन द मनी असल्यास त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ठरवलेल्या आणि खर्‍या किमती मधील फरक एवढेच पैसे एक पार्टी दुसट्या पार्टीला ट्रान्स्फर करते बस्स. आणि ऑप्शन आऊट ऑफ द मनी असल्यास विषयच येत नाही. आता तुम्ही जी शक्यता वर्तवलीत ते होऊच शकते. मी जी उदाहरणे दिलेली आहेत त्या ऑशन ट्रेड ला नेकेड ऑप्शन म्हणतात , अर्थात त्यामध्ये तुम्ही म्हणता ती रिस्क राहतेच. म्हणुनच कव्हर्ड ऑप्शन ची कन्सेप्ट आहे. तुम्ही जो ऑप्शन विकता त्याचाच विरुध्द ऑप्शन अजुन जास्त डीप साईड ने विकत घेऊन ठेवता ! अर्थात तुम्ही २५०० रुपये ने १०० टन उस विकेन असा ऑप्शन विकला असेल आणी समजा उस २६०० -२७०० असा वर गेला तर तुमचे नुकसान होणार आहे म्हणुन आधीच २५५० रुपये रेट ने मी १०० टन उस विकत घेईन असा ऑप्शन विकत घेऊन ठेवायचा ! त्यामुळे नेहमीच मर्यादित नुकसान होईल. आणि तसेही आता अ‍ॅक्च्यल डीलीव्हरी द्यायची वेळ येतच नाही. कारण ते कोणालाच कंन्व्हिनियंट नसते . फिजिकल सेटलमेंट कदाचित फक्त काही अत्यल्प कमोडिटी ऑप्शन मध्ये तेही केवळ ऑव्हर द काऊंटर अर्थात आपले आपण केलेल्या ट्रेड मध्ये होत असावी असा माझा अंदाज आहे. शेयर मार्केट मध्ये कधीच होत नाही. अर्थात एवढा उस अस्तित्वात नाहीयेच ! हा केवळ सट्टा आहे. अहो उसाचे, कमोडीटीज चे किंवा शेयर्सचे , इंडेक्सचे सोडा , आता तर वेदर ऑप्शन अ‍ॅन्ड फ्युचर्स पण असतात , अर्थात पाऊस पडणार की नाही ह्यावर तुम्ही बेट घेऊ शकता !! माझा आवडाता बेट म्हणजे निर्मला मामी अन पॉवेल तात्या इंट्रेस्ट रेट कितीने वाढवणार की कमी करणार हा आहे ;) आणि महत्वाचे म्हणजे हे सर्वांसाठी ज्ञान नाही. हे म्हणजे सुंदर क्यूट फिश बाऊल मधील गोल्डफिश दाखवल्या सारखे आहे, बाकी फायनान्शियल मार्केट हे समुद्रासारखे आहे , त्यात शार्क आहे, ओर्का आहेत , सी वॉट्र क्रोकोडाईल आहेत , विषारी जेली फिश आहेत ... अजुन खुप खुप मजा आहे . =)))) आम्ही आधी ब्लु व्हेल मध्ये काम केले आहे , तुर्तास हम्पबॅक व्हेल साठी काम करत आहोत ;) इत्यलम.

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 04/07/2024 - 12:03
अत्यंत रोचक. म्हणजे सट्टा हे यातील अनेक व्यवहारांचे सत्य आहे. त्यामागे काही value creation नाही. केवळ अंदाजाचा खेळ आहे. माझी शंका खरी ठरली. कोणत्याही value creation involved नसलेल्या गोष्टीतून रोज किंवा सतत पोजिटीव्ह उत्पन्न किंवा इव्हन कधी तोटा पण बऱ्याचदा फायदा असे होऊन दीर्घकालीन नेट लाभ होणे अशक्य आहे हे बेसिक तत्व आहे. आपण रोज खेळतो याचा आनंद म्हणून ते ठीक आहे. ॲमवेशी तुलना करण्याचा मोह झाला. किंवा सध्याचे क्रिप्टो.

In reply to by गवि

गवि 04/07/2024 - 12:07
र च्या क ने. तुम्ही उत्तम रित्या शिकवू शकता असे दिसते. पुढे कधीतरी कॉर्पोरेट , लाईफस्टाईल, हॅपिनेस, अर्थशास्त्र, गणित, तत्वज्ञान (कोणताही क्लिष्ट पण सोपा केल्यास रोचक होणारा) विषय यांचा कोच होण्याचा विचार केला आहे का?

In reply to by गवि

Value addition म्हणजे दररोज वर खाली होणाऱ्या मार्केट मध्ये तुम्ही व्यवस्थित हेजिंग केले तर नुकसान मर्यादित ठेवता येते. पण सट्टा म्हणून खेळणाऱ्या लोकांबाबत तुम्ही म्हणालात ते एकदम १००% सत्य आहे. माझ्या माहितीनुसार सेबी ने ह्यावर रक रिपोर्ट पब्लिष केलेला आहे ज्यात असे म्हणाले आहे की ऑप्शन खेळणाऱ्या लोकातील ९०% लोक नुकसानीत आहेत, आणि जे फायदा कमावतात त्यांचा फायदा त्यांनी घेतलेल्या रिस्कक्या तुलनेत अत्यल्प आहे. बाकी कोच असे नाही पण मॉडर्न प्रवचनकार व्हायला नक्की आवडेल. फायनान्स , अध्यात्म, फिलॉसॉफी, इतिहास, संस्कृत वगैरे वगैरे सगळं एक करून एकदम परफेक्ट मिसळपाव :D आहे तो विचार मनात . बघू कधी योग येतो ते. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 04/07/2024 - 15:08
गणित आणि फिजिक्स घ्या त्यात. ते असलेच पाहिजे. सर्वांच्या मुळाशी तेच आहे. बाकी हायड्रोजन ॲटम्स व्हेन गिव्हन इनफ टाईम, टर्न इन टू ह्युमन्स.. ;-)

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 04/07/2024 - 15:26
Value addition म्हणजे दररोज वर खाली होणाऱ्या मार्केट मध्ये तुम्ही व्यवस्थित हेजिंग केले तर नुकसान मर्यादित ठेवता येते.
Value addition म्हणजे तुम्ही त्यातून पैसे लावून श्रीकृपेने काही बँक बॅलन्स वाढवला अशा अर्थाची वाढ नव्हे. Value creation अशी शब्दयोजना करताना उद्देश असा की यामध्ये या व्यवहारात ग्राउंड लेव्हलला कोणतीही प्रत्यक्ष भर पडत नाहीये. कोणीतरी तिसरा value क्रिएट करतोय किंवा करत नाहीये.. आणि इथे फक्त त्याचा अंदाज लावून एकमेकांत विशिष्ट संपत्तीचे फिरणे चालू आहे. कोणत्या जिलबीवर माशी बसेल, किंवा कोणता संघ जिंकेल, किंवा आज अंड्याचा भाव काय असेल या सर्व आपापत: घडणाऱ्या घटना वापरून एक शक्यता निर्माण होते त्यावर पैसे लावणे, यात फारसा गुणात्मक फरक जाणवला नाही. कोणत्या जिलबी वर माशी बसेल याबद्दल माझा अभ्यास आहे. अमुकदास हलवायाची जिलबी मी बरोब्बर ओळखतो आणि माशीला ती जास्त आवडते. वगैरे अभ्यास त्यामागे असू शकतो. बाकी ट्रेण्ड आणि त्यातून पुढील तासा तासाचे अंदाज कोणत्याही random गोष्टीतून देखील प्रोजेक्ट करता येतात. माझे आकलन चुकीचे देखील असू शकेल. दिसले ते असे भासले.

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 04/07/2024 - 17:55
ह्याला फिजिकल सेटलमेंट म्हणातात, आता शक्यतो ते होतच नाही, अनेक बाजारात होऊ शकते म् खनिज तेल , सिंगापोर एक्सचेंज नैसर्गिक रबर इत्यादी सगळेच कंत्रात कसा शेततलेड असतात्तच असे नाही All stock F&O contracts traded on Indian exchanges require compulsory delivery. If an individual holds an ITM stock option or a futures contract upon expiry, they must give or take delivery of the underlying stock². Conversely, OTM stock options are worthless upon expiry and do not impose any delivery obligation⁸. Index F&O contracts, on the other hand, are cash-settled.

In reply to by गवि

कांदा लिंबू 18/07/2024 - 10:57
प्रगो.. फार उत्तम समजावले. धन्यवाद. याला म्हणतात सर्वांसाठी ज्ञान.
१०८% सहमत! प्रगो, जोरदार धन्स्! --- अवांतर: एखादा विषय समजावून सांगण्याची हातोटी माझ्यात नाही आणि या धाग्याचा तो उद्देश्यही नाही. --- सवांतर: @प्रगो, "नवशिक्यांसाठी शेअर बाजार" अशी एखादी लेखमाला काढावी अशी विनंती.

In reply to by गवि

कांदा लिंबू 18/07/2024 - 10:34
बरेचसे (सर्वच) जार्गन्स समजत नसल्याने एकूण शेअर बाजाराबद्दलचे सर्वच लेख डोक्यावरून जातात. अगदी तोंडओळख किंवा प्राथमिक माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेत असे वाटणारे लेख देखील सामान्य वाचकाला निम्म्याहून अधिक संकल्पना माहीत असतात असे गृहीत धरून धडाधड तांत्रिक शब्द टाकत जातात.
सर्वसाधारणपणे सहमत. पण या धाग्याचा उद्देश्य "स्टॉक् मार्केट्ची ज्यांना कल्पना आहे त्यांच्याशी आपला अनुभव शेअर् करणे" असा होता. त्याअनुषंगाने झालेल्या चर्चेत काही जार्गन्स् इतरांना न समजणे हे स्वाभाविक आहे. --- प्रतिसादाला अंमळ उशीर झाल्याबद्धल खेद.

शाम भागवत 04/07/2024 - 04:02
अभिनंदन. मला फक्त रोखीत शेअरची खरेदी विक्री करणे जमते. हातात पैसे असतील तर सगळे पैसे देऊन खरेदी करायची आणि खात्यात शेअर्स असतील तरच विकायचे ह्या सोप्या नियमांवर अवलंबून रहायला आवडते. तुम्ही म्हटल्याप्रमाणे इश्वरकृपा लागतेच. किंबहुना तीच महत्वाची. _/\_

टर्मीनेटर 04/07/2024 - 13:24
"लाखात एखाद्याच्या नशिबात जुगारात दिर्घकाळ यशस्वी होण्याचा योग असतो"असे म्हणतात. लेख वाचल्यावर आपण (त्या) 'लाखातले एक' असल्याचे जाणवले. त्यासाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. आपल्यावर श्री तिरुपती बालाजीची कृपा अशीच कायम राहो! तसेच आपल्या ह्या यशाला/नशिबाला कोणाची दृष्ट लागायला नको म्हणून "आपल्या आयडीत असलेल्या 'लिंबाच्या' खाली एक लहानसा 'कोळसा' आणि वर सात हिरव्यागार 'मिरच्या' काळ्या दोऱ्यात किंवा तारेत ओवून कुठेतरी टांगावे" असा एक आगंतुक सल्ला 😀 ('आगंतुक सल्ला' ह. घ्या. हे. वे. सां. न.) @ 'शाम भागवत' आणि 'चौकस२१२'
"तेंव्हा त्याला सट्टा म्हणतात." --- "ऑप्शन हे एक साधन आहे , सट्टा म्हणून हि वापरू शकता किंवा 'विमा' म्हणून हि"
+१००० इक्विटी मधली गुंतवणूक आणि त्यावर आधारित खरेदी विक्रीतुन होणारा नफा-तोटा हा 'व्यापाराचा' भाग झाला, पण अशा प्रकारच्या वायदेबाजारातील 'बेटींग'लाच (गावरान-रांगड्या भाषेत मटका/जुगार, आणि मवाळ-सभ्य भाषेत) 'सट्टा' म्हणतात!
"जगात कुठल्याही गोष्टींपासून होणाऱ्या नफा-नुकसान किंवा आबादी-बरबादीला एक मर्यादा असते, परंतु 'वेश्यागमनाचा छंद/ सवय' आणि 'जुगाराचा नाद/व्यसन' ह्या दोन गोष्टी त्याला अपवाद आहेत. त्यातून होणाऱ्या आर्थिक नुकसान/बरबादीला कोणतीही मर्यादा नसल्याने आयुष्यातून उठवू शकण्याची क्षमता असलेल्या ह्या दोन गोष्टींच्या वाटेला चुकूनही जाऊ नकोस."
अशा आशयाचे संस्कार 'योग्य' संस्कारक्षम वयात आल्यापासून घरातून मिळाले आहेत. त्यापैकी पहिल्या गोष्टीचे आजतागायत कसोशीने पालन केले आहे पण दुसऱ्या, म्हणजे 'जुगार' ह्या गोष्टीकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याने पर्यटनानिमित्त भेटी दिलेल्या देशी-विदेशी कॅसिनोंमध्ये (अर्थात खास जुगार खेळण्यासाठी म्हणून अद्याप एक छदामही खिशातून खर्च केला नाही आणि कधी करणारही नाही, पण) प्रवेश शुल्कातच मिळणाऱ्या 'प्रोत्साहनपर' चिप्स वापरून जुगार खेळण्याचे जे दोन्ही हातांच्या बोटांवर मोजले तरी एक-दोन बोटे शिल्लक राहतील इतके मर्यादित प्रसंग आले त्यांचे 'बुक' बघितले तर त्यात फायदाच झालेला दिसतोय, पण शेअरबाजारात अपरिपक्वतेतुन केलेल्या बेफाम सट्टेबाजीतून खूप मोठे आर्थिक नुकसान सोसल्याच्या स्वानुभवावरून त्या वाटेला चुकूनही जाऊ नये असे माझे वैयक्तिक मत बनले आहे. मानवाला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे 'आर्थिक समस्या', 'मानसिक समस्या' आणि 'शारीरिक समस्या' हे वर्गीकरण आणि ह्या तिन्हींचा एकमेकांशी असलेला परस्परसंबंध विचारात घेता त्यांच्या गंभीरतेचे कमी-अधिक प्रमाणही व्यक्तिसापेक्ष असते ह्याविषयी दुमत नाही. सकारात्मक मानसिकता असल्यास अशा व्यवहारांतून झालेले आर्थिक नुकसान भविष्यात अन्य मार्गांनी भरूनही काढता येते, पण अशा नुकसानीची हाय खाऊन मनःस्थिती बिघडल्यास आर्थिक समस्येच्या सोबतीला मानसिक समस्याही हजेरी लावते आणि बिघडलेल्या मानसिकतेतून शारीरिक व्याधी/समस्याही उद्भवल्यास प्रकरण हाताबाहेर गेल्याने कित्येक व्यक्ती आयुष्यातून उठल्याची आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबांची परिस्थिती हालाखीची झाल्याची उदाहरणे समाजात कमी नाहीत. अर्थात असे लाखात एखाद्याचे असते तसे नशीब, ऋषी-मुनी-साधू-संत-तपस्वींच्या तोडीचा संयम/स्वनियंत्रण, नुकसान सहन करण्याची क्षमता आणि दैवाचे फासे उलटे पडण्यातून कठीण प्रसंग उद्भवल्यास त्यातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी लागणारी कणखर मानसिकता आणि कौटुंबिक पाठबळ ज्याच्या पाठीशी असेल त्याने 'कुठे थांबावे' ह्याचे तारतम्य राखून असे मार्ग चोखाळण्यास काही हरकत नाही. जाता जाता एक किस्सा: मागे मी एका सब-ब्रोकिंग फर्ममध्ये 'सायलेंट पार्टनर' होतो त्यावेळी रोज बोल्टवर जायला जमायचे नाही पण औद्योगिक वसाहतीतील ग्राहक कंपन्यांचा सुट्टीचा दिवस असलेल्या शुक्रवारी फावला वेळ मिळायचा तेव्हा उपस्थिती नोंदवायचो. त्यावेळी तिथे स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आणि सेवाकाळ पूर्ण करून निवृत्त झालेले अनेक 'काका' लोक असायचे. त्यातली फ्युचर ऑप्शन्स, कॉल, पुट आदी व्यवहार करणारी बहुतांश मंडळी कुठल्या कुठल्या वेबसाईट्स वरून प्रिंटआउट काढून आणलेले चार्ट्स, वैयक्तिक डायरीतील नोंदी, अर्थविषयक वृत्तपत्रे-मासिके, 'भाव कॉपी' वगैरे फडफडवत चर्चा करत बसायची. एक शांत पण मिश्किल स्वभावाचे 'काका' मात्र त्याला अपवाद होते. निवृत्त होईपर्यंत कित्येक वर्षे केवळ दीर्घ कालीन गुंतवणुकीच्या उद्देशाने शेअर्स खरेदी करण्यातून तयार झालेल्या त्यांच्या तगड्या 'पोर्टफोलिओ'च्या आधारावर इंट्राडे ट्रेडिंग करून ते रोज 'हँडसम' नफा मिळवत. त्यांच्यामते उपरोल्लिखित अभ्यासू 'चार्टीस्ट' मंडळी काय आणि 'मेन', 'जनता', 'कल्याण', 'वरळी' वगैरे मटक्याच्या बाजारांच्या चार्ट्सचा अभ्यास करून ओपन-क्लोजचे 'आकडे' आणि 'पाने' काढणारी मंडळी काय, आणि रेसकोर्सवर 'कोल्स'चा अभ्यास करून 'घोडे' ठरवणारी मंडळी काय, सगळे एकाच दर्जाचे 'सट्टेबाज' 😂 खरंतर त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते पण त्यावेळी 'सट्टेबाजीची' अशी काही हवा डोक्यात गेली होती कि त्यांच्यातला 'गुरु' ओळखेपर्यंत ह्या लेट लतीफ 'शिष्याचे' भरपूर नुकसान होणे हे विधिलिखित असावे! असो... "वक्त से पहले और किस्मत से ज्यादा किसी को नही मिलता" ह्या सत्यवाचनावर गाढ श्रद्धा असलेला... - (श्रद्धाळू) टर्मीनेटर

In reply to by टर्मीनेटर

चौकस२१२ 04/07/2024 - 17:31
दीर्घ कालीन गुंतवणुकीच्या उद्देशाने शेअर्स खरेदी करण्यातून तयार झालेल्या त्यांच्या तगड्या 'पोर्टफोलिओ'च्या आधारावर इंट्राडे ट्रेडिंग करून (श्रद्धाळू) टर्मीनेटर सहेब , हा विरोधाभास आहे ,,, कारण जर हे काका लांब पल्याचे गुंतवणूकदार होते तर ते इंट्राडे सारखा व्यापार का खेळतील? कदाचित तुम्हाला असे म्हणायचे असेल कि वर्षूनवर्षे गुंतवणूक केलेल्या फायदयांतून थोडे पैसे अश्या इंटर डे ट्रेडिंग मध्ये "खेळायला " वापरायाचे

चौकस२१२ 04/07/2024 - 17:26
बरेच जण येथे म्हणत आहेत कि शेअर बाजार / सौदा बाजार ( फ्युचर आणि ऑप्शन ) सट्टा आहे,, हे जरी १००% चुकीचे नसेल तरी १००% सत्य हि नाही , आणि "आपण नाही त्यातले" अशी ज्यांची समजूत असेल त्यांनी हा विचार कधी केलाय का कि तुमचे "पेन्शन फंड " किंवा विमा कंपन्या/ बँक तुमचच्या कडून घेतलेल्या पैशाचे काय करतात? ते बाजारात "गुंतवतात" आणि "खेळतात" पण .. हा हे खरे कि फ्युचर मध्ये तश्या अर्थाने Value addition होत नाही पण शेअर मध्ये होते, म्हणजे असे कि एखाद्या चांगळी कल्पना असणाऱ्या / समस्या सोडवणारा नवीन उद्योगात तुम्ही पैसे गुंतवता तेवहा समाजाला त्याचा काहीतरी फायदा ( आणि त्या मालकाला पण) होण्याची शक्यता असते आणि तुम्ही त्यात गुंतवत असता ... लांब पल्यासाठी हि आयुधे ( टूल ) आहेत , तुम्ही कसे वापरताय त्यावर ती उपयोगी किंवा जुगारीची आयुधे होऊ शकतात सरसकट सगळे जुगार हे म्हणणे एकांगी पणाचे होईल असो यात सगळ्यांनाच रस असाल पाहिलेज असे नाही पण ज्यानं आहे त्यांनी चर्चा केली तर हरकत नसावी कोणाची!

चौकस२१२ 04/07/2024 - 17:49
केवळ माहिती म्हणून इन्शुरन्स कंपनीय काय करतात ( किंवा लॉईड्स लंडन ची खाजगी सिंडिकेट ) ते जेवहा इन्शुरन्स विकतात तेव्हा हि जोखीम स्वीकरता आणि १०० जननाकडून प्रीमियम घेऊन २ जाणंच एखादा दावा करतील असा हिशोब असतो ( याचे पक्के गणित माहित नाही पण कल्पना अशी ) आता हीच कल्पना तुम्ही शेअर बाजारात शेअर + ऑप्शन मध्ये वापरून तुम्ही स्वतः इन्शुरन्स कंपनी बनू शकता कसे? पूट ऑप्शन ची व्याख्या अशी आहे कि " पूट ऑप्शन जो विकत घेतो त्याला अमुक अमुक शेअर अमुक अमुक किमतीला अमुक तारखेपर्यंत दुसर्याला विकण्याचा "हक्क" मिळतो" येथे हे समजून घ्या कि "हक्क" आहे जबाबदारी नाही ,,, या उलट जी व्यक्ती हा पुट विकतो त्याचं कडे हि "जबाबदारी " असते कि जर ऑप्शन "एक्सरसाईज " केला समोरच्याने तर तो त्याला ठरलेल्या किमतीला विकत घ्यावा लागतो समजा एक शेअर १०० रु ला आहे आणि तुम्हाला असे वाटते कि अमुक तारखेपर्यंत (१ आठवडा धरू ) हा शेअर ०० च्या खाली जाणार नाही तर तुमि १०० या " वायदे किमतीचा " पुट बाजारात विकू शकता आणि त्यासाठी तुम्हला २ रुप्ये मिळतील ते तुमचे झाले ( त्यास्तही १०० रु तुम्हाला ब्रोकर/ एक्सचेंज कडे ठेवावे लागतील ) जर शेअर १०० च्या वरती राहिला तर हा ऑप्शन "विरून" जाईल आणि तुम्हाला तुमचे १०० परत मिळतील + २ प्रिनियम मिळालेला आहेच १०० वर आठवड्याला २% फायदा , वार्षिक ५२ गुनिले २ = १०४% या उलट तर समजा शेअर ९० ला गेलला तर समोरचा तो पुट एक्सरसाईज करेल आणि तुम्हला १०० देऊन ते शेअर विकत घ्यावे लागतील एकूण हिशोब काय तर तुमचा शेअर ची बाजरी किंमत ९५ , तुम्ही दिले -१०० आणि २ प्रिनियम मिळालेला = दिले ९८ एकूण तोटा ३ रु असो

सुबोध खरे 05/07/2024 - 10:41
बाजारात १८ वर्षांपेक्षा जास्त राहून त्यातील तेजी आणि महामंदीची तीन आवर्तने( cycles) पाहून मी स्वतः या निष्कर्षाला आलो आहे कि फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये सातत्याने नफा मिळवणे हि गोष्ट ९९% लोकांना अशक्य आहे. जसे कॉलेजात असणारा एखादा फाटका मुलगा एखाद्या फाटकांद्यापोरीला पटवून जातो हे पाहून अनेक बऱ्या/ चान्गल्या मुलांचा जळफळाट होतो तशीच स्थिती चढत्या बाजारात नफा मिळवणाऱ्या एखाद्याकडे पाहून खिशात चार पैसे बाळगणाऱ्या माणसांची होते. यामुळे ते इर्षेने या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारात हात घालतात. सुरुवातीला त्यांना चांगला नफा होतो सुद्धा. पण त्यामुळे आपल्याला हा बाजार "समजला" आहे या गैरसमजात ते इर्षेने खेळु लागतात आणि भारी नुकसान घेऊन बाहेर पडतात. दर पाच वर्षांनी हाच प्रकार परत परत होताना मी पाहतो आहे. मला बादल सिनेमा माहीम ची एक आठवण येते. तेथे अतिशय मोक्याच्या ठिकाणी एक सीट रिकामी होती. त्यामुळे आपली सीट सोडून कुणी तेथे येऊन बसला आणि मागे रेलला कि सीट उलटी होत असे आणि तो माणूस मागे पडत असे. मग तो उठून गेला कि काही वेळाने परत दुसरा माणूस. सिनेमा ऐवजी हाच प्रकार पाहून आमचे हसून हसून पोट दुखू लागले होते. First law of thermodynamics सारखा First law of economics आहे तो म्हणजे money can neither be created nor destroyed, only it changes pockets.

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 05/07/2024 - 12:59
इर्षेने खेळु लागतात आणि भारी नुकसान घेऊन बाहेर पडतात. असे फसण्याचे अजून एक कारण म्हणजे , फुचर आणि ऑप्शन मध्ये अग्नगभूत "लिव्हरेज " असते ती दुधरी तलवार आहे ती नाही समजली तर एक दिवसात +१०० किंवा _१००% होऊ शकते ,,, ( यात फुचर मधेय साधारण १:५ लिव्हरेज मिळते , ऑप्शन मध्ये अजून एक घटक म्हणजे ( जो फुचर किंवा शेअर मध्ये नसतो तो म्हणजे जसा " वेळ" जातो ( टाइम व्हॅल्यू ) तशी म्हणजे तुम्ही एखाद्या शेअर किंवा इंडेक्स किंवा शेतीमालावर बेतलेला ऑप्शन ) विकत घेतलात आणि जर त्याची मुदत संपेपर्यंत ते अंडरलायिंग जिथे आहे तिथेच राहिले तर त्या पोषण ची किंमत शून्य होते ( घटनारा / गळात जाणारा वेळ - टाइम डिके ) असो परत म्हणतो हे एक उत्तम आयुध आहे , समजून वापर केला तर फायदा होऊ शकतो .... त्याचं वाटेला जाणे किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न जरी असला तरी या कालपेनल कोणी सरसकट धुडकावून देऊ नये हि विनंती ( तुमचे मुचुअल फंड हैच वपर करीत असतात तुम्हाला आवडो कि ना आवडो )

In reply to by चौकस२१२

आग्या१९९० 05/07/2024 - 14:00
ऑप्शन मध्ये अजून एक घटक म्हणजे ( जो फुचर किंवा शेअर मध्ये नसतो तो म्हणजे जसा " वेळ" जातो ( टाइम व्हॅल्यू ) तशी म्हणजे तुम्ही एखाद्या शेअर किंवा इंडेक्स किंवा शेतीमालावर बेतलेला ऑप्शन ) विकत घेतलात आणि जर त्याची मुदत संपेपर्यंत ते अंडरलायिंग जिथे आहे तिथेच राहिले तर त्या पोषण ची किंमत शून्य होते ( घटनारा / गळात जाणारा वेळ - टाइम डिके ) अंडरलाईनच्या स्पॉट प्राइसपेक्षा फ्युचर प्राइस प्रीमियम किंवा डिस्काउंट असल्यास एक्सपायरीच्या दिवशी बऱ्याचदा फ्युचर आणि स्पॉट प्राइस समान होतात, अशावेळी अंडरलाईन प्राईस स्थिर राहिल्यास फ्युचर विकत घेतल्यास किंवा विकल्यास नफ्यातोट्यावर परिणाम होऊ शकतो टाईम डिके सारखा.

In reply to by आग्या१९९०

चौकस२१२ 19/07/2024 - 05:10
एक्सपायरीच्या दिवशी बऱ्याचदा फ्युचर आणि स्पॉट प्राइस समान होतात, हो होणारच .... हे गृहीतच आहे

In reply to by सुबोध खरे

कांदा लिंबू 18/07/2024 - 11:01
फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये सातत्याने नफा मिळवणे हि गोष्ट ९९% लोकांना अशक्य आहे.
UPSC परीक्षेतून अधिकारी होणे ही गोष्ट ९९% परीक्षार्थींना अशक्य आहे.* *नेमक्या आकड्याबद्धल चूभूदेघे.

In reply to by कांदा लिंबू

गवि 18/07/2024 - 11:56
समांतर उदाहरण देणे म्हणजे मूळ विधान मान्य करणे असे होते. इथे सूक्ष्म फरक आहे.
UPSC परीक्षेतून अधिकारी होणे ही गोष्ट ९९% परीक्षार्थींना अशक्य आहे.*
इथे लाँग टर्म नेट आणि रेग्युलर आऊटकमचा विषय नाही. म्हणजे दर वर्षी UPSC परीक्षा देत राहिले की कधी सिलेक्ट व्हाल (१) किंवा कधी कधी नाही (०) पण अधिक वेळा नियमित आऊटकम १ असेल आणि दीर्घकाळ सातत्य ठेवल्यास एकूण लाँग टर्म मध्ये ० पेक्षा १ च जास्त असतील असा दावा UPSC बाबत नसावा. जिंकण्याची शक्यता १ टक्का आणि हरण्याची शक्यता ९९ टक्के असलेला कोणताही खेळ (ते सोडा, ५० ५० टक्के असलेला खेळ देखील) दरमहा*, नियमित, आणि दीर्घकाळापर्यंत मोजल्यास पॉझिटिव्ह परतावा, देत राहू शकतो हा दावा फार वजनदार वाटत नाही इतकेच. (तिन्ही ठळक पॉइंट एकत्र महत्वाचे) *दरमहा म्हणजे एखाद्या महिन्यात लॉस, मग फायदा, पण सातत्याने पाहिल्यास जमेची बाजू जास्त असे मानू. हे सर्व केवळ इथे प्र गो आणि आंद्रे यांनी केलेले फ्युचर ऑप्शन्स बद्दलचे विवरण गृहीत धरून झालेले मत आहे -स्टाटिस्टिक प्रेमी गवि

In reply to by गवि

कांदा लिंबू 18/07/2024 - 16:00
समांतर उदाहरण देणे म्हणजे मूळ विधान मान्य करणे असे होते.
सांख्यिक विवेचन मान्य आहे. ---
  1. UPSC परीक्षेत शेकडा ०.०००१३८ जण यशस्वी होतात = नोकरीला लागतात.
  2. ऑप्शन्स् ट्रेडिंग् मध्ये शेकडा दहाजण यशस्वी होतात = पैसे कमावतात.
असे असताना -
  1. ऑप्शन्स् ट्रेडिंग् च्या नादाला लागू नको, बरबाद होशील.
  2. UPSC परीक्षेच्या नादाला लागू नको, बरबाद होशील.
या सल्ल्यांमध्ये काही व्यावहारिक फरक आहे का? --- तरीही, मी धाग्यात सांगितल्याप्रमाणे,
मी व्यावसायिक व हौशी गुंतवणूक सल्लागार नाही, त्यासंबंधित विकत व फुकट असे कोणतेही उत्पादन, सेवा वा प्रशिक्षण देत नाही.
मी केवळ माझा तुटपुंजा अनुभव इथे शेअर करत आहे.
बाकी ज्याची त्याची मर्जी.
--- मिपाकरांनो, चुकूनही ऑप्शन्स् ट्रेडिंग् / स्टॉक मार्केट च्या नादाला लागू नका, बरबाद व्हाल.

In reply to by कांदा लिंबू

गवि 18/07/2024 - 16:17
ऑप्शन्स् ट्रेडिंग् मध्ये शेकडा दहाजण यशस्वी होतात = पैसे कमावतात.
असे प्रमाण नक्की पडत असेल तर मग सर्वच चर्चा कामकाजातून वगळावी. जर एखादी "सिस्टीम बाय डिझाईन" सातत्याने वाढता आलेख असणारा फायदा देऊ शकत असेल तर मग काहीच आक्षेप नसावा. दहा जण जे करू शकतात ते पोटेन्शियली पन्नास जण पण करू शकतात. जर या स्कीममध्ये महिना १ ते महिना ३६ (उदा) उत्पन्नाचा आलेख थोडा वरखाली पण दिशा चढ दाखवत वाढत जाणारी असेल तर फारच उत्तम मार्ग आहे.

ऑप्शन ट्रेडिंग मधे सर्वसामान्यांनी पैसे गमावू नये म्हणून, (किँवा जे फंड मॅनेजर नाहीत, ज्यांचा पोर्टफोलिओ किरकोळ स्वरूपाचा आहे) अश्यानी ऑप्शन ट्रेडिंग मधे ( जंगली रमी, ड्रीम एलेवन) प्रमाणे पैसे "लावू" नये म्हणून... फी वाढवणे, लोट साइज् मोठा करणं, अश्या गोष्टी सेबि करणार आहेः असे ऐकिवात आहे... (डिलिव्हरी बेस्ड किरकोळ गुंतवणूकारांसाठी या गोष्टी लागू नाहीत)... आजचे गाणे: हे हे हे हे हे हे हे हे हे तदबीर से बिगड़ी हुई, तकदीर बना ले तकदीर बना ले अपने पे भरोसा है तो एक दाँव लगा ले लगा ले दाँव लगा ले... se

In reply to by आंद्रे वडापाव

कांदा लिंबू 18/07/2024 - 10:15
Sebi to tighten F&O rules, contract value may rise 5x प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडतंय! आधी निफ्टी चा लॉट ५० चा होता परवा २५ चा केला. अश्या प्रकारच्या चर्चा नेहमीच सुरु असतात. आपण चिमूटभर मीठ घालून चाखायला हव्यात. ही चार वर्षांपूर्वीची बातमी पहा. Sebi considers short selling ban, trading curbs to reduce market volatility प्रत्यक्षात यातलं अजून काय झालंय? --- अवांतर: "मोठे मासे लहान माशांना खातात" किंवा वेगळ्या शब्दांत "Eat or be eaten" या नियमाला स्टॉक् मार्केट् कसे अपवाद असेल? --- सवांतर: ऑप्शन्स् ट्रेडिंग् ला कुणी सट्टा म्हणेल, जुगार म्हणेल, जोखीम म्हणेल, संधी म्हणेल, उद्योग म्हणेल, कुणी अजून काही म्हणेल; त्यांचं म्हणणं त्यांच्यापाशी. तुम्ही जर त्यात कायदेशीरपणे पैसा मिळवत असाल तर कोण काय म्हणतं हे गैरलागू आहे. - हे विधान कोणत्याही कामाला लागू आहे. - मतभिन्नतेचा आदर वगैरे देखील लागू आहे

In reply to by कांदा लिंबू

गवि 18/07/2024 - 10:21
तुम्ही जर त्यात कायदेशीरपणे पैसा मिळवत असाल तर कोण काय म्हणतं हे गैरलागू आहे.
अगदी मान्य. पण जुगार सट्टा आणि उद्योग या वेगळ्या गोष्टी. जुगार हा मनोरंजक खेळ. उद्योग म्हणजे ज्याचा उद्देश वस्तू किंवा सेवा यांच्या निर्मिती द्वारे नवीन value निर्माण करणे. हां.. सट्टा जुगार बेटिंग घेणे याचा अड्डा, स्लॉट मशीन लावून धंदा असे काही करत असल्यास एक उद्योग म्हणता येईल. कायदेशीर बद्दल माहीत नाही. पण जुगारात पैसे लावणे हा उद्योग होऊ शकेल याबद्दल तीव्र शंका.

In reply to by गवि

कांदा लिंबू 18/07/2024 - 10:28
पण जुगारात पैसे लावणे हा उद्योग होऊ शकेल याबद्दल तीव्र शंका.
मी इथे स्पेसिफिकली स्टॉक् मार्केट् / ऑप्शन्स् ट्रेडिंग् यांबद्धल बोलतोय. बाकी मटका / लॉटरी / सट्टा / रेस / पत्ते / कॅसिनो यांबद्धल नाही.

In reply to by गवि

चौकस२१२ 19/07/2024 - 05:22
"जुगार हा धंदा होऊ शकतो" याचे उत्तम उदाहरण म्हणजे घोडे / खेळ यावर बरेच दशके फक्त घोडा/ खेळाडू जिकेलं या एकाच प्रकारे मागे पैसे बुकी कडे ( ज्या देशात कायदेशीर आहे त्या बद्दल बोलत आहे ) लावता यायचे = जुगार, बेटफैर सारखे "बेटिंग एक्सचेंज" सुरु झाले स्टोक एक्सचेंग सारखेच त्यामुळं दोन्ही बाजूने पैसे लावून "ट्रेडिंग " शक्य झाले = "उलाढालीचा धंदा करणे शकय झाले मग तो घोडा असो कि क्रिकेट चा संघ " अ जिकणार याचा बाजार चालू आहे १:३ त्याला आपण त्याला बॅक केले १० देऊन ३० एकूण परत मिळण्याची शक्यता निर्माण होते थोड्या वेळाने अ जिकंत आहे असे वाटले तर त्याचा "बाजारभाव" १:२ झाला ( शक्यता वाढली ) तर बाजारात ती बँक बेट बंद करून नफा होऊ शकतो ढोका तर आहेच , शेअर सारखेच हे करावे कि नाही, कि फक्त वस्तू आणि सेवा देणाऱ्या उद्योगातच उलाढाल किंवा गुंतवणूक करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी लीगल बेटिंग एक्सचेंज यावर जरूर महती शोधावी ( अप्लाय देशात आशय गोष्टीत भाग घेणे बेकायदेशीर असले तर त्या वाटेल जाऊ नये ) याशिवाय कायदेशीर रित्या कॅसिनो वगैरे खेळ मांडणे हा तर उद्योग आहेच पण आपण त्या बद्दल चर्चा करीत नाही आहोत ,

सुबोध खरे 19/07/2024 - 10:11
markets regulator Sebi showed that the futures and options (F&O) trading was a loss-making proposition for investors.The report revealed that 89% investors lost money through these activities, and only 11% made profits. If you study the Sebi report in detail, you will find that about half of those who make money earn trivial profits of a few thousand rupees in a year. They would have earned more even with a bank fixed deposit. The craziest part of this story is that no one in the industry mentions one simple fact: unlike equity, which is backed by the open-ended growth of the economy, F&O is a zero-sum game. Whenever someone earns a profit, it comes out of another trader’s pocket. So, if all the losses are someone else’s profits, who is pocketing all the money that the ordinary investors are losing? Take a guess It’s clear that the brokers, exchanges, and those lending stocks profit from this activity, As a reader of this publication, you are almost certainly an individual investor who is interested in making money from investments. However, you should understand that this activity is not designed for you to make money. Instead, it's designed, managed and run to take your money away. All the talk about derivatives being beneficial for one reason or another is just propaganda. Avoiding this potentially harmful activity might be the best choice for individuals, as it seldom brings any benefits. The facts speak for themselves: with a vast majority of individual traders reaping minimal, if any, benefits from F&O trading, one must ask if it is worth the gamble. Wisdom lies in taking a step back, analysing the facts, and making informed decisions, in order to safeguard your financial future. As the saying goes, ‘It’s not about how much money you make, but how much you keep.’ Read more at: https://economictimes.indiatimes.com/wealth/invest/individual-investors-should-avoid-trading-in-fo-segment-as-its-clearly-a-loss-making-proposition/articleshow/104599364.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

चौकस२१२ 19/07/2024 - 13:53
F&O is a zero-sum game. खरे आहे , मान्य म्हणून रिटेल सर्वसामान्यानाने याचा अजिबात उपयोग करूच नये? हे एकांगी होईल हे "डेरिव्हेटीव्ह " का निर्माण झाले हे समजून घेतले तर एकांगी विचार रहाणार नाही शेतीमाल आणि इतर उत्पादने जी एकसारखी ( कॉमोडिटी) झालेली असते त्यांचच्या उत्पादकांना विमा म्हणून फुचर सुरु झाले मग ऑप्शन चा शोध लागला असणार जरी सेबी किंवा जगातील इतर सरकारी नियत्रंण करणाऱ्या संस्थानी "याचा वापर फक्त उत्पादकांनीच करावा" असे बंधने घातले तरी जेवहा उत्पादक हा विमा घेऊ इच्छितो तेवहा तो विमा विकणारा पण कोणी तरी पाहिजे ना ! पुट ऑप्शन विकत घेणे म्हणजे विमा घेणे पुट ऑप्शन विकणारा = विमा देऊन जोखीमस्वीकारणारी संस्था किंवा व्यक्ती हे बंद करावे असे कोणाचे म्हणणे असले तर मग आयुर्विमा पण बंद केला पाहिजे ! दुर्दैवाने पुढे मूळ उत्पादनातील उलाढालीपेक्षा त्यावर बेतलेल्या या डेरीवेटीव्ह वरील उलाढालच फार वाढली आहे हे हि नाकारत येत नाही कलियुग म्हणूयात हवे तर ...

In reply to by चौकस२१२

आग्या१९९० 19/07/2024 - 20:44
डेरिवेटिव्हमधील व्यवहारावर स्टॉक एक्सचेंजचे नियंत्रण असते. प्रमाणाबाहेर व्यवहार होण्यापूर्वी market wide position ने पुढील व्यवहार रोखले जातात. योग्य तो रिस्क रिवॉर्ड रेशो आणि स्टॉप लॉस ठेवून व्यवहार केल्यास फायदा होतो. अर्थात हातात खेळते भांडवल असावे.

सुबोध खरे 19/07/2024 - 19:43
दुर्दैवाने पुढे मूळ उत्पादनातील उलाढालीपेक्षा त्यावर बेतलेल्या या डेरीवेटीव्ह वरील उलाढालच फार वाढली आहे हाच खरा प्रश्न आहे. पाच रुपयाच्या गोष्टी वर पाच हजार रुपयाचा सट्टा लावल्यास झटपट श्रीमंत होण्याची इच्छा धरणारी सामान्य माणसे त्यात अडकतात आणि उगाच आपली कष्टाने कमावलेली संपत्ती गमावून बसतात. बाजारात लोभ आणि भय या दोन गोष्टीमुळे सामान्य माणसं आपलं नुकसान करून घेतात आणि बाजाराला दोष देऊन त्यातून बाहेर पडतात. आणि हीच प्रक्रिया डेरिव्हेटिव्ह्स मध्ये फार पटकन होते आणि माणसे मोठे नुकसान सोसून / कफल्लक होऊन बाहेर पडतात. एक दोन टक्के जास्त व्याजाच्या लोभामुळे संशयास्पद पतपेढ्यात किंवा सहकारी बँकात पैसे गुंतवून पैसे बुडाल्यावर नशिबाला आणि सरकारला दोष देणारे असंख्य लोक आपल्या रोजच्या पाहण्यात आहेतच. ता क. -- गेली १८ वर्षे बाजारात गुंतवणूक करत असूनही मला डेरिव्हेटिव्ह्स मधले काहीही समजत नाही आणि मी त्यात एकही पैसा आजतागायत गुंतवलेला नाही. वर दिलेला लेख हा इकॉनॉमिक टाइम्स मधील आहे. त्यात माझा सहभाग शून्य आहे.

In reply to by सुबोध खरे

पॅट्रीक जेड 19/07/2024 - 19:54
२०१६ साली कॉल ऑप्शन मध्ये मी माझ्य वयाच्या २४ व्या वर्षी माझा सहा महिन्याचा पगार गमावला होता. माझ्यामुळे नादाने लागलेले माझे दोन चार सहकारीही ५० हजार ते लाखभर रुपयात डूबले होते, माझा तमिळ बॉस तर तेव्हाच ५ लाख मायनस मध्ये गेला होता, सरकार मार्केट ला दोष न देता मला दोष द्यायचा तूच नादाला लावलं बोलला:( दोनेक वर्षाआधी बोलणं झालं तेव्हा त्याने स्क्रिनशॉट पाठवले होते फ्यूचर मधे १५ लाख प्रॉफिट होतं. बोलला. माझा सहा महिन्याचा पगार नंतर कोरोनात एसबीआय १८० रुपयाला घेऊन दुप्पट किमतीत विकून मी वसूल केला.

इशारा: १. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. २. सदर धागा लेखक गुंतवणूक तज्ज्ञ वा बाजार सल्लागार नाही. हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून कुणी गुंतवणूक केल्यास सदर धागालेखक वा हे संस्थळ जबाबदार असणार नाहीत. --- नमस्कार मिपाकर्स मित्र मैत्रिणींनो. खरडफळ्यावर झालेल्या संक्षिप्त चर्चेतून हा धागा काढत आहे. लिखाण विस्कळीत वाटू शकेल याची कल्पना आहे पण भावार्थ समजून घ्यावा ही अपेक्षा आहे. आपण नवीन वर्षाचे अनेक संकल्प करतो. त्यातले अगदी थोडे पूर्ण होतात तर बरेचसे काही अपूर्ण राहतात.

दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम

मारवा ·

In reply to by आंद्रे वडापाव

समर्थन कारण सर्वच माणसे अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी नसतात. मायथॉ़ईतील कथा अर्धवट उचलुन त्यांचे अर्धवट अन सोयिस्कर अन्वयार्थ लावणे हे काही मोजक्या लोकांचे टूलकिट आहे. खरे जाणते आणि जिज्ञासु लोकं पुर्ण कथा वाचतात , आणि त्यातील भावार्थ समजुन घेतात . सगळ्यांना जमतेच असं नाही, जमलं पाहिजे असेही नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

सहमत भारतातील आपल्यासारखे खरे जाणते आणि जिज्ञासु लोकं पुर्ण बकरी ईद ची कथा वाचून , आणि त्यातील भावार्थ समजुन घेवुनचं, त्यांचे अर्धवट अन सोयिस्कर अन्वयार्थ न लावता ...सोशल मीडियावर वावरत, माणसा माणसात प्रेम वाढवण्याचे नागपुरी मंत्र तंत्र (टूलकिट) वापरताना रोज पाहतोच आहोत.

चौथा कोनाडा 17/06/2024 - 12:25
तर प्राणीप्रेमी संघटना PETAINDIA ने मोठी संवेदनशीलता दाखवत एक सुंदर उपक्रम सुरु केलेला आहे ज्याचे नाव आहे दावत-ए-ईद यात त्यांनी सुटका केलेल्या बकऱ्या आणुन त्यांना दावतसाठी आमंत्रण दिलेले आहे. म्हणजे त्यांना मारुन त्यांची दावत न देता त्या बकरृयांना खायला देणे असे या उपक्रमाचे स्वरुप आहे. जे अतिशय ह्रद्य असे मला वाटले.त्यांच्या संस्थळावर या उपक्रमाचे वर्णन असे केलेले आहे.
अ ति श य स्तुत्य !

सर टोबी 17/06/2024 - 12:28
हा उपक्रम येथेच न थांबता जेथे जेथे प्राण्यांचा बळी दिला जातो त्या ठिकाणी आणि त्या प्रसंगी राबवला जावा. एकट्या पुणे शहरात गटारी अमावस्या आणि अजून इतर तीन दिवसांना प्रचंड प्राणी हत्या केली जाते आणि वर त्याच्या अतिशय निर्लज्ज बातम्या दिल्या जातात जसं की अमुक इतके टन मटण, चिकन, आणि मासळी खवय्या पुणेकरांकडून फस्त.

टर्मीनेटर 17/06/2024 - 13:50
स्त्युत्य उपक्रम? पेटा इंडियाचा प्रसिद्धीचा सोस?, कि नवीन 'टूलकिट'? पेटा इंडियाने पेश केलेल्या 'दावत-ए-ईद' ह्या उपक्रमाच्या हेतू विषयी शंका घेण्यास वाव आहे. गेल्या अडीच दशकात जगातलया अनेक विकसित/अविकसित देशांना अधून मधून आर्थिक मंदीची झळ बसत असतानाही किंचित मंद वेगाने असली तरी सातत्याने शाश्वत वाढ नोंदवत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत खोडा घालण्यासाठी तसेच भारताच्या पायाभूत विकासकामांत अडथळे निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेली विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय संघटना, एनजीओ'ज चा समावेश असलेली इको-सिस्टीम सतत कुठली ना कुठली आंदोलने/अभियाने/उपक्रम राबवून देशात अराजकता माजवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कधी ते धरण किंवा पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांना विरोध, कधी बोगस शेतकऱ्यांचे आंदोलन, कधी सीएएचा विरोध तर कधी पर्यावरण /प्रदूषणाच्या नावाखाली 'दिवाळीत फटाके फोडू नका' सारखा कानांना सुखावेल असा प्रचार. सदर 'दावत-ए-ईद' हा उपक्रम देखील ह्याच पठडीतला वाटतोय. भूतदया, नितिमत्ता वगैरेचा मुलामा चढवून 'प्राणिहत्या' करू नका वगैरे संदेश ऐकायला छान वाटतो. त्याला शाकाहारी, वेगन (आणि कट्टर मुस्लिम विरोधी विचारसरणीच्या) लोकांचा पाठिंबाही भरपूर मिळेल, आणि असले विचार प्रत्यक्षात आल्यास शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी/मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या गरीब शेकऱ्यांचे संभाव्य नुकसान आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर किती विपरीत परिणाम होईल ह्याविषयी अनभिद्न्य असलेले भोळेभाबडे लोक नकळतपणे त्याचा उस्फूर्तपणे फुकट प्रचारही करतील! भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या संयुक्त विद्यमातून चालवल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय पशुधन अभियान' (National Livestock Mission - NLM) अंतर्गत कमाल ५० लाखांपर्यंतचे अनुदान, एक कोटी पर्यंतचे कर्ज अशा योजनांचा लाभ घेऊन देशभरातल्या असंख्य लहानमोठ्या शेतकऱ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी/मेंढी पालनास सुरुवात केली आहे. आपल्या पशुधनाची देखभाल करताना चारा व्यवस्थापन, रोगराई-आजार, बँकेच्या कर्जाचे हप्ते अशा अनेक आव्हानांचा सामना करत, खास ईदच्या कुरबानीसाठी विक्री करून चांगला मोबदला मिळून नफ्यातोट्याचे गणित जमून येईल ह्या आशेवर वर्ष-दोन वर्ष भर मेहनतीने पोसून तयार केलेल्या बोकडांची मागणी घटली तर त्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? 'पेटा इंडिया' त्यांच्या आणि पर्यायाने बॅंकेच्या होणाऱ्या काही हजार कोटींच्या नुकसानीची भरपाई करेल का? कि नुकसानीत गेलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपला नेहमीचा आत्महत्येचा पर्याय स्वीकारायचा? आपण लेखात म्हंटले आहे,
एकट्या पाकिस्तानमध्ये, अंदाजे ७.५ दशलक्ष प्राण्यांची, ज्याची किंमत अंदाजे $३ अब्ज (२०२३ मध्ये $४.१६ अब्ज समतुल्य) होती, २०११ मध्ये बळी दिला गेला.
मग भारतात हा आकडा किती असेल? निदान पाकिस्तानातल्या '४.१६ अब्ज डॉलर्स' ह्या आकड्यापेक्षा नक्कीच जास्त असेल! अर्थात उत्सवप्रेमी भारतीय असल्या प्रचाराला भीक न घालता दणक्यात आपापले धर्मिक सण-उत्सव साजरे करतात हि गोष्ट आपल्या प्रवाही अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक असल्याने फार काही काळजी करायचे कारण नाही, पण अर्थकारणाला अपायकारक अशा प्रचाराचा आपण एक भाग होऊ नये अशी सदिच्छा! शेतकऱ्यांविषयी कळवळा असलेल्या आमच्या बिरुटे सरांची 'अतिशय चांगला. स्तुत्य उपक्रम.' अशी प्रतिक्रिया वाचून खरंतर धक्का बसला होता, पण त्यांनीच दिलेला 'आपण प्रबोधनाचे काम करत राहायचे' ह्या मंत्राचे स्मरण झाल्याने हा प्रतिसाद प्रपंच. इति लेखनसीमा.

In reply to by टर्मीनेटर

स्वधर्म 17/06/2024 - 17:02
हेच तर्कशास्त्र वापरून… माणसाला हानिकारक तंबाखू किंवा दारू उद्योग बंद करणं कुणालाही शक्य झालं नाही. सगळ्यांना माहिती आहे, की मानवजातीला पडणारी एकूण किंमत ही त्या उद्योगात कार्यरत असलेल्या घटकांच्या आर्थिक लाभापेक्षा कैक पट जास्त असेल. या कारणासाठी सगळीकडे धूम्रपान, मद्यपान कमी व्हावे यासाठी सरकार व स्वयंसेवी संस्था प्रयत्न करतात. त्यालाही टूलकीट म्हणावे काय? इथे केवळ हानी मानवाची न होता प्राण्यांची होते आहे म्हणून टूलकीट म्हणावे का? पण मग हे मानवाला अपायकारक म्हणून सिध्द झालेले उद्योग चालूच ठेवले तर, दवाखानेही उत्तम चालतात, त्यांचे उत्पन्न वाढते, परिणामी अर्थव्यवस्थेला सतत वाढ मिळत राहते. अर्थस्य पुरुषो दास: असे महाभारतात भीष्म का कुणीतरी म्हटले आहेच. सबब सर्व मानवजात सुखाने जगावी यासाठी अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का? आणि तिला सतत वाढतच रहावे लागेल का? हा कळीचा प्रश्न आहे.

In reply to by स्वधर्म

टर्मीनेटर 17/06/2024 - 21:17
"अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का? आणि तिला सतत वाढतच रहावे लागेल का?" ह्या दोन प्रश्नांची 'अ' आणि 'ब' अशा दोन प्रकारे उत्तरे देता येतील त्यातले जे पटेल ते घ्यावे, चॉईस इज युअर्स... 😀 अ) पूर्णपणे शुद्धीत, वास्तवाचे भान असलेल्या आणि आधुनिक जीवनशैलीशी एकरूप झालेल्या व्यक्तीसाठी 'अर्थशास्त्रा'चा हवाला देऊन उत्तरे द्यायची झाल्यास : १) अफाट लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशातली 'आहे रे' आणि 'नाही रे' ह्या दोन वर्गांतली सामाजिक दरी बुजवण्यासाठी, गेला बाजार ती कमी करून १००% जनतेच्या 'अन्न', वस्त्र' आणि 'निवारा' ह्या तीन मूलभूत गरजा भागवून सर्व सामाजिक घटकांना एक समाधानकारक जीवनशैली मिळावी ह्यासाठी "अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे!" आणि, २) "मानवी इच्छा अमर्याद आहेत आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली संसाधने मर्यादित आहेत." हा अर्थशास्त्रीय नियम लक्षात घेऊन, देशातल्या सर्व जनतेच्या 'अन्न', वस्त्र' आणि 'निवारा' ह्या तीन मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावर, अन्य इच्छा आणि आकांक्षा ज्या अर्थशास्त्रात 'मानवी इच्छा' (Human wants) म्हणून ओळखल्या जातात, त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेक वस्तू आणि सेवांची निर्मिती/उपलब्धता वाढवण्यासाठी संसाधनांच्या उपलब्धतेत वाढ करून त्यांच्या मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन साधत गेल्या कित्येक दशकांपासून भारताला चिकटलेला 'विकसनशील' हा स्टेटस बदलून तो 'विकसित' असा होऊन जनतेचे जीवनमान अधिक उंचावण्यासाठी "अर्थव्यवस्थेला सतत वाढतच रहावे लागेल!" ब) 'कार्ल मार्क्स' छाप नशेची गोळी घेऊन बधिर झालेला मेंदू आणि मिटल्या डोळ्यांनी कल्पनेतल्या जगात वावरण्यातून वास्तवाचे भान सुटलेल्या व्यक्तीसाठी उत्तरे द्यायची झाल्यास : १) "अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का?" ह्या प्रश्नाचे एका शब्दातले, साधे सोपे उत्तर "नाही" असे आहे. आणि, २) मुळात संपत्ती निर्माण करून अर्थव्यवस्था वाढवण्याची नसती उठाठेव करण्याची गरजच नसल्याने, "तिला सतत वाढतच रहावे लागेल का?" ह्या प्रश्नाचे दोन शब्दांतले उत्तर "अजिबात नाही" असे आहे. (वरील दोन्ही प्रकारची उत्तरे हि माझी अल्पमती आणि अर्थशास्त्राचे जुजबी ज्ञान ह्यावर आधारित असल्याने पटली तर घ्या, नाहीतर केराच्या टोपलीत टाका. हाय काय अन नाय काय 😀) बाकी आपल्या प्रतिसादातील तंबाखू आणि दारूचा मुद्दा रास्त आहे, त्याबद्दल दुमत नसले तरी ते 'शौक, मौज, व्यसन' प्रकारात मोडत असल्याने त्याला आणि जगातल्या बहुसंख्य लोकांचा आहार, म्हणजे पर्यायाने मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या अन्नाला एकच मोजपट्टी लावणे किंवा एकच तर्कशास्त्र वापरणे काही योग्य वाटत नाही! असो, आमच्या बिरुटे सरांच्या शब्दांत सांगायचे तर "सार्वजनिक चर्चेची संस्थळे असल्यामुळे मतमतांतरे असायचीच." त्याला काही इलाज नाही, आणि आमचे ह.भ.प. , पपू , श्री श्री श्री मुक्तविहारी महाराज डोंबिवलीकर त्यांच्या प्रवचनात नेहमी सांगतात कि, "मतभेद असावेत, पण मनभेद नसावेत"! ह्या दोन्ही सिद्धपुरुषांच्या सिद्धवचनांवर दृढ विश्वास असल्याने अधून-मधून अशी मत-मतांतरे व्यक्त करण्यास मनोबल मिळत असते. चालायचेच, मिपा, मिपाकर आणि बिरुटे सर आपलेच आहेत! (समाजातल्या तळागाळातील लोकांशी नाळ न तुटलेला आणि 'टूलकिट' गॅंगविषयी सावध असलेला, संवेदनशील हौशी शेतकरी) - टर्मीनेटर.

In reply to by टर्मीनेटर

स्वधर्म 17/06/2024 - 22:19
सर, आपण सर्वप्रथम माणसांचे वर्गीकरण केले आहे, आणि मग त्या त्या गटाच्या दृष्टिकोनातून प्रश्नाचा विचार केला आहे. असं का, ते समजलेलं नाही. अर्थशास्त्रातलं मलाही फार कळतं असं नाही, पण ज्या अर्थी त्याला शास्त्र समजलं जातं, त्याअर्थी कोण प्रश्न विचारतो, याला महत्व नाही. शास्त्र हे विचारणार्याच्या निरपेक्षच उत्तर देणार. असो. तर जर आपण भारताचा विचार केला तर, आपली अधिक महत्वाची समस्या वाढीची आहे का वितरणाची याचा विचार करावा लागेल. आपल्याकडे दिवसाला ३००- ५०० रु मजूरी, तीही रोज नाही, मिळवणारे मनरेगाचे मजूर आहेत आणि दिवसाला ५ लाख कमावणारे सर्वोच्च न्यायालयातले वकीलही आहेत आणि ज्यांचा पैसाच त्यांच्यासाठी अहोरात्र काम करून दिवसाला करोडो रूपयांची भर घालतो असे महा-उद्योजकही आहेत. त्यांची भूक अधिक मोठ्या प्रकल्पांची, जीडीपीच्या वाढीची आहे आणि त्यांचे धोरणांवर वर्चस्व आहे. हे कुणालाही नाकारता येणार नाही. तर वाढ ही त्यांना पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था अर्ध्यापासून आज ३ ट्रिलीयन वगैरे झाली तरी मनरेगाचे मजूर प्रचंड प्रमाणात आहेतच. त्यांच्यापर्यंत समृध्दी या वाढीच्या प्रमाणात पोहोचलेली नाहीच. आज जे देश विकसित आहेत, तिथे समाजात एवढी टोकाची विषमता नाही, हे तर सहजच दिसते. लोकांना आता समजत आहे की मोठ्या चमकदार घोषणा व मेगा प्रकल्प करून आपल्याला काही मिळत नाही, रोजचा संघर्ष काही कमी होत नाही. त्यामुळे देशाने उगीच प्रचंड वाढ (खरं तर सूज) करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी संपत्तीचे वितरण चांगले होण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे मला वाटते. मला तरी आपल्यासारखे वर्गीकरण करून या प्रश्नाकडे बघण्याची गरज वाटली नाही.

In reply to by स्वधर्म

कांदा लिंबू 18/06/2024 - 04:27
त्यामुळे देशाने उगीच प्रचंड वाढ (खरं तर सूज) करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी संपत्तीचे वितरण चांगले होण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे मला वाटते. मला तरी आपल्यासारखे वर्गीकरण करून या प्रश्नाकडे बघण्याची गरज वाटली नाही.
म्हणजे सोप्या भाषेत मध्यमवर्गीयांकडून, त्यांची पांढरी संपत्ती - घरे, वाहने, सोनेनाणे, एफडी वगैरे काढून घेऊन ती तथाकथित दारिद्र्यरेषेखालील लोकांना देऊन टाकणे! "संपत्तीचे वितरण" याचा याहून वेगळा काही अर्थ असेल तर तो आम्हा मिपामरांना समजेल असा स्पष्ट करून सांगावा.

In reply to by कांदा लिंबू

भागो 18/06/2024 - 06:09
जो झोपला आहे त्याला जागे करता येतं पण ज्याने झोपेचे सोंग घेतले आहे त्याला कसे जागे करणार? हा जोक आधीच येऊन गेला आहे. तुम्ही पण "यमे यंटायर यिकनामिक्ष" केलेले दिसतंय.

In reply to by भागो

स्वधर्म 18/06/2024 - 14:38
मध्यमवर्गियांची संपत्ती काढून वगैरे मी कुठेही लिहिले नाही. महाउद्योजक असे म्हटले होते. त्यांना बॅंकांनी हेअरकटच्या नावाखाली प्रचंड कर्जमाफी दिलेली आहे. विकासाचे नांव घेऊन प्रकल्पाच्या जमिनी नगण्य भावाने आंदण दिल्या आहेत. मी लिहिलेले महाउद्योजक वगैरे अत्यंत सोईस्कररित्या दुर्लक्षित करून मध्यमवर्गीय असा शब्द घुसडण्याला काय म्हणणार? खरंच झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही.

In reply to by चौकस२१२

स्वधर्म 18/06/2024 - 22:24
त्यावर काय बोलणार? आपल्याला न पटणारा मुद्दा आला, की तो एकदम ताणून चुकीचा दाखवता येतो. ही एक सामान्य युक्ती आहे. पण गोरगरीब जनतेच्या तुलनेत महाउद्योजक हे सरकारवर आपल्याला हवे तसे धोरण बनवण्यासाठी अधिक प्रभाव टाकू शकतात, हे तर सहज दिसून येते. ही वस्तुस्थिती आपण नाकारता आहात का? हे सांगा. अगदी साधी उदाहरणं आहेत हो, फक्त पहायला पाहिजे. मागे त्या विश्वास पाटील या लेखक अधिकार्याने निवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात ३५ एक प्रकल्पांना मंजूरी दिली होती. आयुष्यभराच्या कार्यक्षमतेपेक्षा ५० पट कार्यक्षमता दाखवली होती त्याने. अंगणवाडी सेविका मात्र १००० - ५०० रूपयांची वाढ मागण्यासाठी वर्षभर आंदोलने करत आहेत. जाईल तिकडे सामान्य माणूस नाडला जातो, आणि बड्या धेंडांची काम चुटकीसरशी होतात, याचा अनुभव आला नाही का तुंम्हाला कधीच?

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 18/06/2024 - 15:22
ज्यांना खुल्या मनाने शास्त्रीय दृष्ट्या विषमतेकडे पहायचे आहे, त्यांनी नंदा खरे यांचा २०१७ मधला हा लेख जरूर वाचावा. https://www.loksatta.com/lokrang/lekha/violence-after-conviction-of-baba-gurmeet-ram-rahim-singh-1542623/

In reply to by स्वधर्म

कांदा लिंबू 18/06/2024 - 15:40
जातिव्यवस्था ही आपली खासियत आहे. मुळात समतावादी असणारे ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मही भारतात जातींमध्ये वाटले जाताना दिसतात.
जगाची इमानदार आणि काफिर अशी विभागणी करणारा आणि काफिरांना अस्तित्वहक्क नाकारणारा "मुसलमान हा धर्म मूळचा समतावादी" असे म्हणणारा लेख मिपावर लिंक देण्याच्या लायकीचा आहे का?

In reply to by कांदा लिंबू

स्वधर्म 18/06/2024 - 22:32
मूळ मुद्दा अडचणीचा ठरतोय म्हटल्यावर हिंदू-मुसलमान करण्यावर उतरलात? लेखाचा मूळ विषय काय? संदर्भ काय? बाकी ज्यांना खुल्या मनाने शास्त्रीय दृष्ट्या विषमतेकडे पहायचे आहे, त्यांच्यासाठीच तो लेख दिला होता. त्यामुळे, तुंम्ही द्या सोडून विषय सर. आपल्याला कसं अगदी सगळं सकारात्मकच हवं. सत्याचा त्याच्याशी संबंध नसला तरी चालेल.

In reply to by स्वधर्म

कांदा लिंबू 19/06/2024 - 05:04
मूळ मुद्दा अडचणीचा ठरतोय म्हटल्यावर हिंदू-मुसलमान करण्यावर उतरलात?
हे तुम्ही तो लेख लिहिणाऱ्यांना म्हणताय ना? बरोबर आहे, ते त्यांना लागू आहे. यावरूनच कळून येते लेखात काय कन्टेन्ट असणार आहे.

In reply to by कांदा लिंबू

भागो 20/06/2024 - 09:00
जातिव्यवस्था ही आपली खासियत आहे. मुळात समतावादी असणारे ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मही भारतात जातींमध्ये वाटले जाताना दिसतात.>>> कारण हे सगळे मुळचे हिंदूच आहेत.

In reply to by स्वधर्म

चौकस२१२ 20/06/2024 - 04:58
इथे केवळ हानी मानवाची न होता प्राण्यांची होते आहे म्हणून टूलकीट म्हणावे का? येथे खान्यासाठी प्राण्यांची हत्या होते आहे , हे तर नेहमीच होते मग ते सणा मुळे असो किंवा इतर दिवशी ,, फरक काय?

In reply to by टर्मीनेटर

आग्या१९९० 17/06/2024 - 18:02
गोवंश हत्याबंदिमुळे आपल्या शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याचेही आकडे येऊ द्या. उगाच भाकड गाई सांभाळण्यावर शेतकऱ्यांचा खर्च होतो.

In reply to by आग्या१९९०

टर्मीनेटर 17/06/2024 - 21:59
गोवंश हत्याबंदिमुळे आपल्या शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याविषयीची निश्चित आकडेवारी मलातरी कुठे दिसली नाही, पण ह्या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाकड गायी आणि निरुपयोगी बैल मोकाट सोडून दिल्याने ही मोकाट गुरेढोरे गायपट्ट्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात घुसून त्यांच्या पिकाचे नुकसान करत असल्याच्या अनेक बातम्या काहीवर्षांपूर्वी वाचल्या होत्या. २०२२ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने ह्या मुद्द्याचे भांडवल करून आपल्या प्रचारात त्यावरून प्रचंड काहुरही माजवले होते. पण तरी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथांचे सरकार बहुमताने निवडून आल्याने हा मुद्दा निष्प्रभ ठरला होता असे म्हणता येईल. बाकी भाकड गायींमुळे शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याची कल्पना नसली तरी अशा गायी, बैलांचा आनंदाने स्वीकार करून कित्येक गोशाळांनी त्यांचा सांभाळ करतानाच त्यांच्या मलमूत्रापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरु करून स्वतःच्या आणि आसपासच्या अनेक गरीब कुटुंबांची स्वयंपाकासाठीच्या इंधनाची गरज भागवल्याचे, ONGC शी केलेल्या सहकार्य करारातून CNG निर्मिती सुरु केल्याचे तसेच वीजनिर्मिती प्रकल्प, बायोगॅस स्लरी, गायीच्या शेणापासून कंपोस्ट, गांडूळ खत अशी सैंद्रीय खते आणि धूप, उदबत्ती व रंग अशा अनेक गोष्टींचे उत्पादन आणि विक्री असा फायदेशीर व्यवसाय आणि त्याद्वारे रोजगार निर्माण केल्याच्या यशोगाथा वाचल्या आहेत, असे कित्येक प्रेरणादायी व्हिडीओज युट्युबवरही पाहायला मिळतात. समस्येत संधी शोधून सेवाभावी कार्यातूनही आर्थिक लाभ मिळू शकतो हे दाखवणाऱ्या अशा गोशाळांच्या सर्जनशीलतेस सलाम! आणि धागाविषय भरकटवणे हा उद्देश नसला तरी माझ्या दोन प्रतिसादांतून थोडे अवांतर झाले असल्याने धागा लेखकाची मनापासून क्षमा मागतो 🙏

In reply to by आग्या१९९०

चौकस२१२ 18/06/2024 - 16:36
लै शेतकऱ्यांची काळजी तुहे ? मी, अनेक प्राण्याबरोबर गोमास खालेल्ला हिंदू असल्यामुळे जिथे गोमांसावर बंदी नाही तिथे खायला माझि काहीच हरकत नसते... ( उदहारण गोआ राज्य ) हरकत ह्याला आहे कि हिंदूनां मुद्डमून डिवचण्या साठी "गोमास खाल्ले तर काय बिघडते" अशी टूलकिट बाजी करणाऱ्यवर असले प्रश्न डुकराच्या मसबद्दल शांतताप्रिय लोकांना विचारावे ( हिंमत असेल तर ) भूतदया दाखवयाची तर हलाल ना खाता झटका तरी खा .. अरे पण हलाल बंद केले तर हलाल इकॉनॉमी ची वाट लागेल आणि काही दयाळू /शांतताप्रिय लोकांच्या पोटावर पाय येईल ना..... अर्रे नको ते पाप ,,, अब्दुल आन रे ताजे हलाल चाप ... लै शेतकऱ्यांची काळजी तुहे ? मी, अनेक प्राण्याबरोबर गोमास खालेल्ला हिंदू असल्यामुळे जिथे गोमांसावर बंदी नाही तिथे खायला माझि काहीच हरकत नसते... ( उदहारण गोआ राज्य ) हरकत ह्याला आहे कि हिंदूनां मुद्डमून डिवचण्या साठी "गोमास खाल्ले तर काय बिघडते" अशी टूलकिट बाजी करणाऱ्यवर असले प्रश्न डुकराच्या मसबद्दल शांतताप्रिय लोकांना विचारावे ( हिंमत असेल तर ) भूतदया दाखवयाची तर हलाल ना खाता झटका तरी खा .. अरे पण हलाल बंद केले तर हलाल इकॉनॉमी ची वाट लागेल आणि काही दयाळू /शांतताप्रिय लोकांच्या पोटावर पाय येईल ना..... अर्रे नको ते पाप ,,, अब्दुल आन रे ताजे हलाल चाप ... एकूण खालेलं प्राणी मगर, ससा, शहामृग, हरीण , बैल / गाय कबुतर , तितर ( क्वेल ) टर्की ,बेडूक शन्ख , ईल , साप ( बहुतेक सापच आठवत नाही ४ पेग झाले होते चीन मध्ये तेवहा ) ऑकटोपस, तिसऱ्या , लॉंगस्टीन , कच्चे मासे , कॅट फिश , कलामारी इत्यादी याशिवाय मेंढा / बकरी . बोकड / शेळी / डुक्कर हे आहेच

In reply to by टर्मीनेटर

प्रतिसाद वाचायला सुरुवात केली आणि पुढे ते टुलकिट वगैरे वाचलं आणि पुढे काही वाचू नये असं ठरवलं. पण, प्रतिसाद चाळता चाळता तळटीपेकडे येतांना आमची आठवण झाल्यामुळे दोन शब्द लिहावे वाटले. बाकी, सार्वजनिक चर्चेची संस्थळे असल्यामुळे मतमतांतरे असायचीच. स्वागत. कोणाला शेतक-यांचे आंदोलन बोगस वाटतं, कोणाला मजुरांची आंदोलन बोगस वाटतात, कोणाला विद्यार्थ्यांची आंदोलने बोगस वाटतात, कोणाला अंगणवाडी स्त्रियांची आंदोलने बोगस वाटतात, धरणांमुळे विस्थापित झालेल्या लोकांची आंदोलने बोगस वाटतात, गरिब, शोषित पिडित, हक्कासाठी लढणा-या लोकांची आंदोलने काहींना बोगस वाटू शकतात. अगदी शांततापूर्ण आणि जगाच्या प्रगतीच्या वाटेत देश अगदी विकासाच्या अग्रक्रमात भारत देश अगदी टॉपवर असतांना अशी ही सगळी आंदोलनजीवी जनता देशाच्या प्रगतीत खोडा घालणारी, अराजकता माजवणारी आहे असेही वाटू शकतं. टूलकिटचा वगैरेचा भाग वाटू शकतं. आपल्याबद्दल लिहित नाही. पण, अशा विचार करणा-या लोकांचं हल्ली अजिबात आश्चर्य वाटत नाही. अशा, संवेदनहीन जनतेचं, किंवा अशा संवेदना गमावलेल्या लोकांचा समुहाचा, वृत्तीचा, विचारांचा खरंच तळागाळातील लोकांशी काही थेट संबंध येत असेल याची अजिबात शक्यता वाटत नाही. आणि असा कोणताही संबंध येत नसल्यामुळे अशा समुहातील लोकांना हे सगळं खोटं नाटं वाटू शकतं. दिवाळीत फटाके फोडणा-यांमुळे बिचा-या कंपनीचं किती नुकसान होत असेल. फटाक्यामधील दारु-गोळा भरणा-या किती तरी मजूरांवर उपासमारीची वेळ येत असेल. सालं ते फटाक्याचा आवाजात हा विचार आलाच नाही. देशी-विषारी दारु बनविणा-या आणि त्यामुळे मरण पावणा-या लोकांपेक्षा त्या हातभट्टीचं किती आर्थिक नुकसान होतं हा विचार मनात आलाच नाही. तद्वतच, देशभरातील हजारो लाखो शेतकरी 'कुरबानीच्या' निमित्ताने बोकडांचे उत्पन्न घेतात आणि त्यामुळे होणा-या करोडो अब्जोंनी नुकसान होणा-या शेतक-यांचा विचार आमच्यासारख्या शेतक-यांविषयी कळवळा असणा-याच्यां मनात येऊ नये, हे फार दु:खदायक आहे. आम्ही सालं, ते विदा नसल्यामुळे शेळीपालन म्हणजे फ़क्त जोडधंडा, रोजगार, मांस, दूध, खत, वगैरे इतकंच समजत होतो. पण, 'कुरबानीमुळे' होणारं देशाचं आणि शेतक-यांचं आर्थिक नुकसान लक्षात आलंच नाही, लक्षात आणून दिल्याबद्दल किती आभार मानू....! ;) ' कुरबानी कुरबानी' -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संवेदना ई.व्ही.एम. मशीन वर मोजतात का हो सर ? कारण तुमच्या प्रतिसादातुन केवळ आमच्या संवेदना खर्‍या अन इतरांच्या खोट्या असा काहीसा सुर दिसुन येत आहे. =)))) दुत्त दुत्त, ह्या उजव्या विचारसरणीच्या लोकांन्ना हार्टच नसतं मुळी =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 18/06/2024 - 19:06
कारण तुमच्या प्रतिसादातुन केवळ आमच्या संवेदना खर्‍या अन इतरांच्या खोट्या असा काहीसा सुर दिसुन येत आहे. ,,,,, ++++

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौकस२१२ 18/06/2024 - 16:44
कोणाला शेतक-यांचे आंदोलन बोगस वाटतं, प्रामाणिक असते तर शीख धर्माचे ध्वज नसते आणि सर्व राज्यात तेवढेच जोर लावून असते पंजाब आणि हरयाणात का? धरणांमुळे विस्थापित झालेल्या लोकांची आंदोलने बोगस वाटतात, आंदोलनाच मूळ हेतू केवळ विरोधात विरोध दिस ला म्हणून , भारताचं ऊर्जा गरजेवर काही उत्तर नाही ,, ( अरुंधती रॉय सारखया महान विचारवंतांना एकदा भर सभेत हा प्रश्न विचारला मी कि तुमचे आंदोलन विस्थापितांची नुकसान भरपाई व्हावी रस्ताही आह की उद्योग वाढूच नयेत या साठी आहे ? टूलकिटचा वगैरेचा भाग वाटू शकतं. हो कधी कधी वाटते ... का वाटू नये , अर्थात या प्रतिसादवार प्रोफेसर " ऑस्ट्रेल्यात आंदोलने होतात का हो असले फालतू प्रश्न विचारतील यात शंका नाहीच संवेदना गमावलेल्या ओह ओके तर प्रश्न विचारला कि संवेदना गमावलेला का बाकी कुर्बानी कुर्बानी म्हणाल तर आमचच्या डोक्यात एकाच ती म्हणजे झीनत बेगम ची

कांदा लिंबू 17/06/2024 - 16:31
१. तुम्ही दिलेले विकी पान म्हणते -
... स्वर्गातून एक मेंढा देवदूत गॅब्रिएलने संदेष्टा अब्राहमला त्याच्या मुलाऐवजी कत्तल करण्यासाठी देऊ केला.
तुम्ही दिलेले पेटा चे पान म्हणते -
इस्लाम प्राण्यांबद्धल दयाळूपणा शिकवतो. Islam Teaches Kindness to Animals
दोन्ही विधाने १८० अंशात परस्परविरोधी आहेत. काहीतरी एक निश्चित करा मग पुढे बोलता येईल. २. भारतीय प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेने नागरिकांना प्रार्थना स्वातंत्र्य दिलेले आहे. इस्लाममध्ये जर मेंढा / बोकड आदी प्राण्यांची कत्तल करण्याची आज्ञा दिलेली असेल तर त्याचे पालन करण्यात बेकायदेशीर काय आहे?

In reply to by कांदा लिंबू

मारवा 17/06/2024 - 18:59
1-सर्वप्रथम तुम्ही जी विसंगती दाखवलेली आहे ती पूर्णपणे मान्य आहे 2-प्रत्येक धर्मात अशा विसंगती मुबलक प्रमाणात आहे इस्लाम त्त्याला अपवाद नाही. 3-मुळात सर्व धर्म हे माणसांनी स्वतःसाठी बनवलेली साधने आहेत त्याचप्रमाणे सर्व तत्त्वज्ञाने सर्व विचार सरणी या मानवनिर्मित आणि मानवाच्या जगण्यास सुसह्य करण्यासाठी विकसित करण्यासाठी आहे 4-कालानुरूप जेव्हा एखादा जुना धर्म किंवा जुनी विचारसरणी जेव्हा अनुपयुक्त होऊ लागते तेव्हा त्या त्या धर्मातील जो जो त्याज्य असा भाग आहे तो तो वगळून जो जो चांगला भाग आहे त्याला पूज्य मानत पुढे जात राहणे हे माणसांसाठी उपयुक्तच नव्हे तर श्रेयसकरही आहे 5-म्हणून जेव्हा दोन तत्वे परस्पर विरोधी एकाच धर्मात आहेत तेव्हा त्यातील पूज्य निवडून कालबाह्य भाग टाकून देणे योग्य आहे. 6-आता कोणी त्यातील काल सुसंगत असा भाग वेगळा करून त्याचे प्रमोशन करून कालबाह्य भाग सोडत आहे तर त्याचे स्वागत करायला हवे यात अडचण काय आहे ? 7-हिंदू धर्मातही चाळणी लावण्यासाठी .कलीवर्ज्य सारखी अधिकृत व्यवस्था होती. 8-कुठला भाग कालबाह्य कुठला काल सुसंगत यात मतभेद अर्थातच राहणार राहतील पण प्रक्रियेला चालू ठेवण्यात अडचण काय ,? 9-मतभेद तर उलट स्वागतारहच आहेत. त्यानेच पुढची दिशा स्पष्ट होईल.

In reply to by मारवा

सुबोध खरे 20/06/2024 - 19:45
प्रत्येक धर्मात अशा विसंगती मुबलक प्रमाणात आहे इस्लाम त्त्याला अपवाद नाही. हे विधान भयानक पाखंडी आहे आणि असे विधान केल्यास इस्लामी देशात आपल्याला केवळ मृत्युदंड एवढीच शिक्षा आहे. Islam means “submission to the will of God” इस्लाम चा अर्थच असा आहे कि अल्लाच्या इच्छेपुढे समर्पण. आता अल्ला ची इच्छा काय आहे याचा अर्थ लावण्याचा अधिकार फक्त कर्मठ आणि मागासलेल्या मुल्ला मौलवींच्या हातात असल्यामुळे त्या धर्मात कोणतीही सुधारणा संभवतच नाही. यामुळे त्या धर्मात गेल्या १४०० वर्षात फारशा सुधारणा झालेल्या नाहीत आणि होण्याची शक्यता पण नगण्य आहे. कारण कुराण हे सार्वकालिक सत्य च आहे आणि त्यात एक अक्षराचाही बदल संभवत नाही अशीच इस्लामिक जगताची भावना आहे. आम्ही म्हणू तोच आणि तेवढाच धर्म असे असल्यामुळे इस्लामच्या इतर शाखांबरोबर सुद्धा त्यांचा सलोखा नाहीच. सुन्नी लोक तर अहमदिया किंवा बहाई अथवा बोहरी या लोकांना मुसलमान मानतच नाहीत आणि त्यांची सर्रास कत्तल करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. शिया आणि सुन्नी यातील संघर्ष कायम चालूच असतो आणि यामुळेच जगभर सर्वच धर्माबरोबर त्यांचे कायमच संघर्ष होत आलेले आहेत. ४८ इस्लामिक देशांपैकी कोणत्याही इस्लामी देशात इतर धर्माला थारा नाहीच. आणि इस्लामला लोकशाही मान्यच नाही. त्यामुळे आपण लिहिलेले खालील मुद्दे बादच होतात ४) कालानुरूप जेव्हा एखादा जुना धर्म किंवा जुनी विचारसरणी जेव्हा अनुपयुक्त होऊ लागते तेव्हा त्या त्या धर्मातील जो जो त्याज्य असा भाग आहे तो तो वगळून जो जो चांगला भाग आहे त्याला पूज्य मानत पुढे जात राहणे हे माणसांसाठी उपयुक्तच नव्हे तर श्रेयसकरही आहे. कुराण मध्ये काहीही त्याज्य नाही त्यामुळे कालबाह्य भाग टाकून देणे हे सर्वथा अशक्य आहे 5-म्हणून जेव्हा दोन तत्वे परस्पर विरोधी एकाच धर्मात आहेत तेव्हा त्यातील पूज्य निवडून कालबाह्य भाग टाकून देणे योग्य आहे. 6-आता कोणी त्यातील काल सुसंगत असा भाग वेगळा करून त्याचे प्रमोशन करून कालबाह्य भाग सोडत आहे तर त्याचे स्वागत करायला हवे यात अडचण काय आहे ? कुराण मध्ये विसंगती नाहीच कारण ती अल्ला चीच इच्छा आहे आणि त्यात कोणताही बदल संभवतच नाही.

कांदा लिंबू 17/06/2024 - 16:39
खरोखरच स्तुत्य उपक्रम. सर्वच धर्मांमधल्या पशुहत्या बंद व्हाव्यात.

Islam Teaches Kindness to Animals
पिटाचे आवाहन इस्लामचे पालन करणाऱ्यांना आहे हे तिथे स्पष्ट लिहिले आहे; त्यात काफिरांच्या प्रार्थनापद्धतींना ओढण्याचे कारण नाही. पान वाचून पहा, "इस्लाम सांगतो म्हणून प्राणी हत्या थांबवा" असा संदेश आहे; "माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा" असा संदेश नाही. म्हणून हे सारे पिटाचे (खरेखोटे जे काही असेल ते) प्रकरण काफिरांना लागू नाही.

In reply to by कांदा लिंबू

मारवा 17/06/2024 - 19:09
त्यांनी माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा या ऐवजी इस्लामचा दाखला देऊन आव्हान केले आहे याचे कारण ते आव्हानच मुळात जे इस्लाम मानतात त्यांनाच केलेले आहे. जे मुळातच नास्तिक आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही. जे करत आहे त्यांची मूळ प्रेरणाच हे करण्यामागची धर्म आहे तर अशा व्यक्तींना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याच त्यांच्याच धर्मातील विरोधी तत्वे दाखवून देणे हे एकदम समर्पक आणि सुयोग्य असे आहे

In reply to by मारवा

कांदा लिंबू 18/06/2024 - 04:33
त्यांनी माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा या ऐवजी इस्लामचा दाखला देऊन आव्हान केले आहे याचे कारण ते आव्हानच मुळात जे इस्लाम मानतात त्यांनाच केलेले आहे.
म्हणजे जे इस्लाम मानतात ते, "माणुसकी म्हणून अमुक करा" या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत की काय? काय म्हणताय?
जे मुळातच नास्तिक आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही.
"जे मुळातच काफिर आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही." असे म्हणायचं आहे का तुम्हाला? नास्तिक ही हिंदू धर्म विचारातील एक विशिष्ट कल्पना आहे. सदर संदर्भात तिचा काही संबंध नाही.

मारवा 17/06/2024 - 16:42
इथे कायद्या चा कोणीच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तुमचा क्रमांक दोनचा मुद्दा अप्रस्तुत ठरतो

कांदा लिंबू 17/06/2024 - 16:59

१. मान्य आहे. मागे घेतो. पण इतर कुणाला फारश्या त्रासदायक न ठरणाऱ्या अश्या एखाद्याच्या प्रार्थना पद्धतीत बदल करण्याचे आवाहन नैतिकदृष्ट्या ठीक आहे का? --- कोणते आवाहन ऐकून कुणी मांसाहार करणे थांबवत नाही. पिटाने, त्यांना खरंच भूतदया असेल तर हलाल पद्धतीने प्राणी मारण्याऐवजी झटका पद्धतीने प्राणी मारले जावेत याचा पुरस्कार करावा, ते जास्त व्यावहारिक + नैतिक होईल. २. पहिल्या मुद्यावरही वाट पाहतो.

एक सुंदर उपक्रम सुरु केलेला आहे ज्याचे नाव आहे दावत-ए-ईद यात त्यांनी सुटका केलेल्या बकऱ्या आणुन त्यांना दावतसाठी आमंत्रण दिलेले आहे हे पेटा वाले बक्र्यांची कुठून सुटका करणार आहेत?

नठ्यारा 18/06/2024 - 13:25
लोकहो, इस्लामिक कट्टरपणास पर्याय उपलब्ध करवून दिल्याबद्दल पेटावाल्यांचं अभिनंदन. अब्राहमने मेंढा मारला म्हणून प्रत्येक मुसलमानाने मारलाच पाहिजे, हा कुठला न्याय? हा अरबस्थानात वगैरे ठीके. भारतात कशाला पाहिजे? त्यातूनही बकऱ्यांची संख्या अमाप वाढली तर इतर उपाय काढता येतील. या बाबतीत जननीच्या उत्सवाचं उदाहरण चपखल आहे. जननीचा डोंगर हा कोकण रेलवेवरील कोलाडच्या जवळ आहे. ही देवी स्थानिकांचे स्थानदैवत व मुंबईतील काही कुटुंबांचे कुळदैवत आहे. दर वर्षी माघपौर्णिमेस गडावर उत्सव भरतो. तीनेक दिवस चालतो. हे खाजगी देवस्थान असल्याने त्याचा फारसा बोलबाला होत नाही. दरवर्षी एखाद दोन बोकड बळी दिले जातात. हे साधारणत: कोण्या भक्ताने प्रायोजित केलेले असतात. एके वर्षी बरेच प्रायोजक उत्सवास आल्याने प्रत्येकाने बोकड अर्पण केला. त्यामुळे माणसे कमी आणि बोकड फार अशी परिस्थिती उद्भवली. तीनचारच्या जागी बारातेरा बोकड कापले गेले. गावकरी तरी किती खाऊन खाऊन किती खाणार. बोकडाचं मटण हा देवीचा प्रसाद असल्याने फेकून देता येत नव्हता. मग शेवटी परतणाऱ्या भक्तांना डब्यांत भरून दिला. गडावर जेवायची सोय नसल्याने प्रत्येक भक्तकुटुंबे खाणं वा शिधा डब्यातून आणतात. त्यामुळे डब्यांची वानवा नव्हती. तर असा हा प्रकार झाला. तेव्हापासून माणसं बघून तितकेच बोकड कापायचं ठरलं. मोठ्या प्रमाणावर हिंसा टाळलेली बरी. त्यानुसार ईदेस मौलवीने एक बोकड बळी चढवावा. सगळ्या मुस्लिमांनी बळी द्यायची गरज नाही. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

चौकस२१२ 18/06/2024 - 19:10
तेव्हापासून माणसं बघून तितकेच बोकड कापायचं ठरलं. एवढा सुजाणपणा असले तर ना... बदल होऊच कसा शकतो "पाक" ग्रंथात लिहिलंय ना मग बदलायाच नाही .. चालुद्या मुस्लिम सत्यशोधक समाजाचं दलवाईंना केवडः त्रास सोसावा लागला...

In reply to by चौकस२१२

नठ्यारा 18/06/2024 - 22:40
चौकस२१२, माझ्या माहितीप्रमाणे बोकड बळी द्यायची प्रथा कुराणातली नाही. पण याबाबत चूकभूल देणेघेणे. पण अर्थात तुमचा कट्टरपणाचा मुद्दा वैध आहेच. एरव्ही हा.पा.ला फतवे काढणारे मुल्लामौलवी कधी अनावश्यक हत्येविरोधात फतवे काढतात का? आज गोहत्येच्या विरोधात फतवा काढला तर हिंदूमुस्लीम तेढ कितीतरी कमी होईल. पण लक्षांत कोण घेतो. -नाठाळ नठ्या

बकरी ईदनिमित्त मुस्लिम समुदायात बकऱ्यांची कत्तल केली जाते. परंतु, जैन धर्मातील एका तरुणाने तब्बल १२४ बकऱ्यांचा जीव वाचवला आहे. यासाठी त्याने मुस्लिम बांधवांचा पेहराव केला होता. एवढे नव्हे तर १२४ बकरे खरेदी करण्याकरता त्यांनी १५ लाखांचा निधीही गोळा केला. जामा मशिदीपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या चांदणी चौकातील मंदिराच्या प्रांगणात या बकऱ्यांना ठेवण्यात आलं आहे. यासंदर्भातील सविस्तर वृत्त दि प्रिंटने दिलं आहे. ही बातमी

In reply to by धर्मराजमुटके

टर्मीनेटर 19/06/2024 - 20:43
मुटके साहेब बातमी वाचली, आपल्या लेख/प्रतिसादावर प्रतिसाद/उपप्रतिसाद द्यायला गेलो तर तो इतका मेगाबायटी होतो कि स्वत्रंत लेख म्हणून प्रकाशित करण्याची पाळी येते. मागे 'युट्युब'च्या बाबतीत असा अनुभव पहिल्यांदा आला होता, आणि ह्या धाग्यावरच्या आपल्या प्रतिसादातील बातमीच्या निमित्ताने आज दुसऱ्यांदा तसा अनुभव आला आहे 😀 असो, सदर बातमी वाचताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि 'व्यावहारिक चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी उपप्रतिसाद टंकायला घेतला तर तो बराच लांबल्याने "बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?" ह्या शीर्षकाने स्वत्रंत लेख म्हणून प्रकाशित केला आहे. लेखनाला विषय पुरवल्या बद्दल आपले आभार, आणि ध्यानीमनी नसताना अचानक एक लेख पाडायला लावलात त्यासाठी आपला तीव्र णिषेध 😂

मुस्लिम व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले असले तरीही धर्मात ढवळा ढवळ केली म्हणून त्या जैन मुलाचा गळा चिरला नाही म्हणजे बर होईल.

भागो 20/06/2024 - 08:56
About 900,000 cows are slaughtered every day. If every cow was 2 meters long, and they all walked right behind each other, this line of cows would stretch for 1800 kilometers.1 This represents the number of cows slaughtered every day. For chickens, the daily count is extremely large – 202 million chickens every day. To comprehend the scale, it is better to bring it down to the average minute: 140,000 chickens are slaughtered every minute. certainly, hundreds of millions of fish are killed every day. बकरे, डुकरे , बदके ह्यांची पण संख्या प्रचंड आहे. तेव्हा उगाचच ईदच्या बळी बकर्यांच्या नावाने नक्राश्रू ढाळू नका.

In reply to by भागो

सुबोध खरे 20/06/2024 - 10:43
मूळ मुद्दा बकर- ईद बद्दल नसून फुरोगाम्यांच्या दांभिकपणा बद्दल आहे जे केवळ हिंदू सणांबद्दल गरळ ओकताना दिसतात. उदा कोरडी होळी खेळा, फटाकेमुक्त दिवाळी असावी. पण मुसलमान लोकांच्या सणाबाबत काही बोलण्याची हिम्मत दाखवत नाहीत. यांचा दांभिकपणा म्हणजे लिटरला पाच किमी जाणाऱ्या गाडीतून ग्लोबल वॉर्मिंग बद्दल मोर्चाला जातात तसा आहे. कुर्बानी द्यायला हरकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी घाण, रक्त, मांस यांचा चिखल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मागे कत्तलखाने सोडून इतर ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी घातली होती. The Bombay High Court on Thursday said that it would not permit unregulated or unmonitored slaughter of animals anywhere in Maharashtra and that hygiene and sanitation were important. https://indianexpress.com/article/cities/mumbai/bombay-hc-slaughter-animals-sacrifice-vishalgad-fort-kolhapur-8664410/ हीच गोष्ट देवस्थानांबाबत आहे जेथे प्राणी बळी दिले जातात त्यावर पण बंदी आणलीच पाहिजे. बाकी कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या मुळे सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसाला त्रास होऊ नये इतकी मूलभूत काळजी घेतली गेलीच पाहिजे. मतांसाठी मुस्लिम लांगुलचालन होऊ नये हे जितके सत्य आहे तितकेच ते हिंदू सणामध्ये गैरप्रकार होऊ नये हि काळजी घेतली पाहीजे. मग तो गणेशोत्सवात डी जे लावणे असो कि मशिदींवरून बांग देणे असो. येथे मला लष्करातील शिस्तीची आठवण येते. तेथे मंदिरात लावलेली भजने ५० मीटरच्या पुढे ऐकू येऊ नयेत हा निर्बंध काटेकोरपणे पल्ला जातो तसेच मशिदीवरून भोंगे लावून बांग दिली जात नाही. मिरवणूक मर्यादित कालावधीत "डी जे" शिवायच होतात. मग ती मोहरम ची असो कि गणेशोत्सव वा अय्यप्पाची असो.

In reply to by सुबोध खरे

कुर्बानी द्यायला हरकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी घाण, रक्त, मांस यांचा चिखल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.
सहमत.
.हीच गोष्ट देवस्थानांबाबत आहे जेथे प्राणी बळी दिले जातात त्यावर पण बंदी आणलीच पाहिजे.
सहमत.
कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या मुळे सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसाला त्रास होऊ नये इतकी मूलभूत काळजी घेतली गेलीच पाहिजे.
सहमत.
मतांसाठी ( हिंदू असो की ) मुस्लिम लांगुलचालन होऊ नये हे जितके सत्य आहे तितकेच ते हिंदू सणामध्ये गैरप्रकार होऊ नये हि काळजी घेतली पाहीजे. मग तो गणेशोत्सवात डी जे लावणे असो कि मशिदींवरून बांग देणे असो.
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

डोळे पाणावले.
अरे सुधरा रे.... देशाची अर्थव्यवस्था जर सुधारायची असेल तर, कोंबड्या, मासे, खेकडे, कोळंबी, आणि इतर जीव खाण्यास शास्त्रात ''जीवो जीवस्य जीवनम्'' चा संदर्भ घेऊन काही आड़काठी नसली तरी केवळ प्रोटीन्स मिळतात म्हणून खान-पान मर्यादित असले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

गणपाच्या हातची कोळंबी किंवा पापलेट फ्राय असेल तरी ते सोडावे का?
हे राम. गणपाच्या हातच्या कोलंबी आणि पापलेट असतील तर, अगोदर पानात हे सर्व वाढून घ्यायचे. मांडी घालून बसायचे. दोन्ही हात जोडायचे. डोळे मिटायचे. ‘‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’. असे म्हणून जेवणास सुरुवात करायची. जेवण हे यज्ञासारखेच पवित्र आणि अग्नी म्हणजे ऊर्जा निर्माण करणारे आहे असे समजून खाल्ले की चालते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 20/06/2024 - 12:44
तरी केवळ प्रोटीन्स मिळतात म्हणून खान-पान मर्यादित असले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे.
ह्यातल्या 'खान' बद्दल १०००% सहमत आहे पण 'पान?'... No way 😂

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 20/06/2024 - 11:49
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे!
"मुंबई उच्च न्यायालयाने मागे कत्तलखाने सोडून इतर ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी घातली होती."
हा निर्णय खूप आधीच यायला हवा होता, पण ठीक आहे... 'देर आये, दुरुस्त आये' म्हणायचे, अजून काय! पूर्वी मुलुंडच्या 'वोक्हार्ट' (आताचे - फोर्टिस) हॉस्पिटलच्या गच्चीवर त्याचे संस्थापक,मालक, चेअरमन असलेल्या 'हबील खोराकीवाला' ह्यांनी जाहीररीत्या बोकडाची कुरबानी दिली होती आणि हा तमाशा बघायला बरीच गर्दी गोळा झाली होती. (असे कृत्य त्यांनी अनेकदा केले होते म्हणतात) असला प्रकार कोणीही केला असता तरी तो निंदनीयच आहे, पण हबील खोराकीवालांसारख्या उच्च विद्याविभूषित, अब्जाधीश, नामांकित व्यावसायिक व्यक्तीने केलेले हे कृत्य केवळ निंदनीयच नाही तर त्यांच्या प्रतिमेला अशोभनीयही होते!

In reply to by सुबोध खरे

रामचंद्र 20/06/2024 - 12:58
तेथे मंदिरात लावलेली भजने ५० मीटरच्या पुढे ऐकू येऊ नयेत हा निर्बंध काटेकोरपणे पल्ला जातो तसेच मशिदीवरून भोंगे लावून बांग दिली जात नाही. मिरवणूक मर्यादित कालावधीत "डी जे" शिवायच होतात. मग ती मोहरम ची असो कि गणेशोत्सव वा अय्यप्पाची असो.> यात जर कुणाच्याही भावना न दुखावता लोकमान्य पद्धतीने धार्मिक परंपरांचे पालन होत असेल तर इतरत्रही याचे पालन व्हायला काय अडचण आहे? सर्वांच्याच मनासारखं पण त्रास (फारसा) कुणालाच नाही!

In reply to by रामचंद्र

भागो 20/06/2024 - 14:18
यात जर कुणाच्याही भावना न दुखावता>>>मग त्यात काय मजा राहिलि? अहो भावना दुखावण्यासाठी तर सारा खटाटोप.

In reply to by रामचंद्र

भागो 20/06/2024 - 17:43
श्री रामचन्द्र कृपालु भजुमन हरण भवभय दारुणं । सर, माझ्या प्रतिसादाचा आशय लक्षात आला असावा असे मी समजतो.

In reply to by भागो

रामचंद्र 20/06/2024 - 18:00
अहो, दोन्ही पक्ष आपल्याकडून त्रास न होण्याची भूमिका घ्यायला तयार नसतात म्हणून मी तसं म्हटलं... पण अशा आडमुठ्या भूमिकेमुळे पीडित लोक दोन्ही गोटांतले आहेत, शिवाय याचा अनिष्ट परिणाम होणारे मुके प्राणी-पक्षी, पर्यावरण हेही आहेतच.

रामचंद्र 20/06/2024 - 18:04
शिवाय 'ते कसं वागतात' असं म्हणत चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा किमान आपण शहाणपणाची भूमिका घेतली तर काही प्रमाणात तरी चुकीच्या गोष्टी कमी होतील असा विवेक दोन्ही बाजूचे लोक दाखवत नाहीत.

आज बकरी ईद चा सण आहे. मुस्लिम धर्मियांचा एक महत्वाचा सण याला इद-अल-अधा असे ही म्हटले जाते.या सणामागील परंपरा साधारण अशी आहे. विकीपेडीया मधुन् अब्राहमच्या जीवनातील मुख्य परीक्षांपैकी एक म्हणजे त्याच्या प्रिय पुत्राचा वध करण्याची देवाची आज्ञा स्वीकारणे आणि त्याचे पालन करणे. कथेनुसार, अब्राहमला स्वप्न पडत होते की तो आपल्या मुलाचा बळी देत ​​आहे. अब्राहामला माहित होते की ही देवाची आज्ञा आहे आणि त्याने आपल्या मुलाला सांगितले, जसे कुराणमध्ये म्हटले आहे,"अरे बेटा, मी तुझा वध करतोय असे स्वप्न मला पडत आहे".

सत्तावीस वजा किती बरोबर शून्य?

आजी ·

गवि 13/06/2024 - 10:53
पावसाळा जोरदार सुरू झाला आहेच. लेख समयोचित. तूर्त मात्र जे टाळू या म्हटले आहे तेच समोर येत आहे. मुंबईची तुंबई, नालेसफाईचे दावे निष्फळ, पावसाची दमदार बॅटिंग वगैरे घिसे पिटे शब्द सर्वत्र ..

Bhakti 13/06/2024 - 11:00
खुपचं सुंदर लिहिलंय!!
पावसाळ्यात काही जण अपेय पितात. काहीजण भजी खातात. कुणी कडक काॅफी पितात. कुणी आवडती गाणी ऐकतात. कुणी रहस्यकथा वाचतात. तर काही जण गुरगुटून झोपतात. काही जण पृथ्वीदेवीनं खरंच हिरवा शालू नेसलाय का याची खात्री करून घ्यायला पिकनिकला जातात.
मस्त निरीक्षण..

भर दुपारची वेळ.उन्हाची काहिली. मी माझ्या आवडत्या खिडकीपाशी, माझ्या आवडत्या कोचावर बसले होते. समोरच्या टीपाॅयवर पाय पसरून. अगदी आरामात. एसी लावून. आणि थोड्याच वेळात लक्षात आलं अचानक खोलीत काळोख पसरलाय. बाहेरही काळोख झालाय. उन्हं लपून गुडूप झालीत. आकाश काळ्याभोर ढगांनी घेरलंय. ओहो, क्षणातच एक एक टपोरा थेंब जमिनीवर पडायला लागला. मी एसी बंद केला. मला आता कृत्रिम खोट्या गारव्याची गरज नव्हती. मला नैसर्गिक,खरा, आतून शांत करणारा थंडावा मिळणार होता. पावसाला सुरुवात झाली. धरती आणि पावसाचं लग्न लागलं. आसपासची झाडं सळसळत,आनंदानं डोलत अक्षता टाकत होती.

तांडव (ऐसी अक्षरे -१८)

Bhakti ·

प्रचेतस 09/06/2024 - 09:35
तांडव अतिशय प्रत्ययकारी कादंबरी आहे. महाबळेश्वर सैल ह्यांनी अत्यन्त सूक्ष्मतेने मांडलेला गोवा धर्मन्यायाधिकरणाने केलेला धर्मछळ वाचकांना अस्वस्थ केल्याशिवाय राहवत नाही. ह्या विषयावर अधिक वाचावयास असल्यास आपल्याच मिपाकर जयंत कुलकर्णी ह्यांनी लिहिलेले एका धर्मच्छळाची कहाणी पुस्तक उपलब्ध आहे. तसेच हे पुस्तक ज्यावर आधारीत आहे ते अनंत काकबा प्रियोळकर ह्यांनी लिहिलेले मूळ पुस्तक The Goa Inquisition हे अर्काइव्ह.कॉम वर उपलब्ध आहे.

In reply to by प्रचेतस

Bhakti 09/06/2024 - 10:07
Inquisition हे पहिल्यांदाच समजलं...भयानक. एक प्रश्न आहे सोजिरं आणि कपिताव म्हणजे काय? कादंबरीत खूप वेळा हे शब्द आहेत.

तांडव-पुस्तक परिचय लेखक-महाबळेश्वर सैल अ पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला कोचीमध्ये पोर्तुगीजांनी पाऊल टाकले. लवकरच दहा वर्षात गोव्याला मुख्य ठाण केलं. आदिलशाहीविरूद्ध अनेक दशके सुरू असतानाच आपला मुख्य हेतू धर्म परिवर्तनाचा पसारा संपूर्ण गोवा पाटणात पसरवला.

बाजारगप्पा-भाग-४

मारवा ·

- स्टॉप लॉस किती लावावा? - प्रॉफिट टार्गेट किती असावे? हे अगदी banal प्रश्न वाटत असतील तरीही नवख्यांना (आणि अनुभवींनाही) महत्वाचे वाटू शकतात. त्यावर प्रॅक्टिकल चर्चा करावी.

३- आता बघा सर्वात अगोदर आपली मॅक्स लॉस अमाऊंट जी आहे ती पुर्णपणे आपल्याला अंतिमतः सहन करता येइल अशी आपण घेत आहोत. आणि त्या मॅक्स लॉस पर्यंत पोहोचणंच च आपण फार लांबवत आहोत. कारण की आपण भाग २ मधील तक्ता बघा ज्या न्युट्रल स्टेज ला आपण सुरुवात करतो तिथे आपले एकुण नंबर ऑफ ट्रेडस ३० आहेत. म्हणजे त्याचा रिस्क पर ट्रेड १००० रुपये आहे.आणि रीस्क पर ट्रेड इन % जी आहे ती ०.३३% इतकी आहे.

बाजारगप्पा-भाग-३

मारवा ·
मागील दोन्ही भाग वाचला नसेल तर विनंती आहे की पहील्या भागापासुन वाचुन घ्या नाहीतर काहीच कळणार नाही. तर मागील भागात आपण एक मनी मॅनेजमेंट कशी करावी ते बघितले त्यालाच आता पुढे नेऊन जाऊ. तर मागे म्हणालो तसे मनी मॅनेजमेंट आणि माइंडसेट हे क्लोजली इन्टरकनेक्टेड आहेत. जसे शरीर आणि मन. पण शरीर समजा मनी मॅनेजमेंट आहे आणि माइंडसेट मन च आहे की. तर तुम्ही बघा सुरुवात शरीराकडुन करणे सोपे आहे तुम्ही आंघोळ केली तुमच्या मनाला फ्रेश वाटेल तुम्ही संभोग केला तुमच्या मनाला आनंद होइल. तर शरीराकडुन सुरुवात करत मनाला नियंत्रित करणे तुलनेने सोपे आहे. आणि दोन्ही एकच आहेत.

जल्लोष (निवडणूक निकाल स्पेशल)

आजी ·

अगदी माझ्यासारखंच आहे तुमचं आजी :D मला वाटलं होतं की राजकारण, राजकारणी, फार कशाला आपल्या मतदारसंघातील उमेदवार या कोणाशीही काहीही संबंध नसताना उगीच लष्कराच्या भाकरी भाजण्याचा उत्साह फक्त मलाच आहे, किंवा तुम्ही हे उपहासाने लिहिलं असेल तर कल्पना नाही :)

चित्रगुप्त 03/06/2024 - 15:56
आजीचे लिखाण हे 'साध्याही विषयात आशय मोठा' आपल्या खुसखुशीत शैलीत समर्थपणे मांडण्याचे उत्तम उदाहरण असते. " इश्य " म्हणणार्‍या काही बायका अजून जगात शिल्लक आहेत हे वाचून ड्वाळे पाणावले आणि गतकाळातील 'इश्य' म्हणणार्‍या काही मोहक तरुणी आठवल्या. -- (गेले ते दिवस)

In reply to by चित्रगुप्त

भागो 03/06/2024 - 16:45
(गेले ते दिवस) >>> अगदी अगदी. "अय्या" पण गेले. अय्या आणि इश्श्य ह्यांची जोडी होती. दिवस एकदा गेले कि परत नाही येत!

अथांग आकाश 03/06/2024 - 16:13
"हा एक्झिट पोल नसून "एक्झॅक्ट"पोल आहे. हे दिसतंय ते सत्य आहे."दुसरा "बुद्धिमान"म्हणतो", एक्झिट पोलही मॅनेज केलेले असतात. मिडियाही विकला गेलाय." ही विधानं आपण नेहमी ऐकतो. खरे खोटे ब्रह्मराक्षस जाणे.
एका पाकिस्तानी च्यानलचा अँकर म्हणतोय एन डि ए ३५३ ते ४२९ जागा जिंकेल! तिकडचा मिडिया सुद्धा विकला गेलाय का काय :) खरे खोटे उद्या कळेलच!!

गवि 04/06/2024 - 07:28
उत्तम वर्णन. असाच उत्साह सर्वत्र दिसतो आहे. आणि हल्ली जास्त वाढला आहे. चला, निवडणूक निकाल बघता बघता चर्चा करायला हाच धागा वापरावा हे बरे. किती वाजता सुरू होणार आहे मोजणी? कधीपर्यंत फायनल कळेल?

गवि 04/06/2024 - 10:05
२७५-२२५ असे दिसतेय. ४०० सोडा, ३०० पार झाले तरी पुष्कळ. असे तूर्त चित्र. मोदी येतील मोस्टली. पण प्रचंड बहुमत? तूर्त काहीच कळत नाहीये.

In reply to by गवि

सोत्रि 04/06/2024 - 11:03
४०० पार हे तसंही शक्य नव्हतं हे मोदीशहांना पण माहिती होतं. निवडणूकीतलं स्लेजिंग होतं ते. पण भाजपाला बहुमत ही मिळणं कठीण दिसतंय सध्याच्या आकड्यांवरून, पण एकंदरीत भाजपा+ (एनडीए) सरकार बनवेल असं दिसतंय. - (स्थिर सरकारची अपेक्षा असलेला) सोकाजी

In reply to by कर्नलतपस्वी

१. स्थानिकांच्या जागा गेल्या असणार, किंवा त्यांना अपेक्षित विकास झालेला नसणार २. इतका प्रचंड संयम ठेवून, संघर्ष करून मंदिर झाले पण मोदींना वर्षभर थांबता आले नाही. इतक्या घिसाडघाईत प्राणप्रतिष्ठा करायला नको होती. सगळा राजकीय इवेंट केला मोदींनी. लोकभावना इतकी गृहीत धरू नयेत.

मोदींनी हा धडा जरी घेतला तरी पुरेसे. वाटेल ती नौटंकी खपवून घेणार नाहीत, तुम्हाला विकास करावा म्हणून निवडून दिले होते असा स्पष्ट इशारा लोकांनी भाजपला दिला आहे. महाराष्ट्रात जर भाजप ने राजकारणाचा चिखल केला नसता तर आज चित्र वेगळे असते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 04/06/2024 - 11:41
सहमत. मोदीच येतील पुन्हा. पण अधिक जमिनीवर राहून भाजप राज्य करेल हा जनतेला फायदा. जनतेची लोकशाहीची ताकद अशी दिसते.

सकाळपासूनच वेफर्स,पॉप्कॉर्न खात टी.व्हि.पाहणे चालु होते. एकंदरित येणारे कल पाहता , मतदार भाजपाला हेच सांगू पाहतात की "अतिरेक करू नका. प्रत्येकवेळी ईतिहास खणून काढुन लोकांना पेटवायची गरज नाही. सारखे हिंदु-मुस्लिम करू नका. उठ्सूठ विरोधी नेत्याना जेल्मध्ये टाकू नका. तुमच्या नेत्यांची ऐषारामी राहणी आम्ही पाहत आहोत. तेव्हा अजून एक चान्स तुम्हाला देत आहोत."

नवनित राणा हरल्या ते बरे झाले. ह्यांचे आचरट वर्तन डोक्यात जायचे. स्मृती ईराणी हरल्या तेही बरे झाले. संसदभवनात फक्त हातवारे करुन ओरडणे ही ह्यांची खासियत. उज्ज्वल निकम हरले तेही योग्यच झाले. वास्तविक भाजपाकडे चांगल्या नेत्यांची तशी कमी नव्हती. पण उमेद्वार निवडताना फक्त जिंकण्याची शक्यता आणि पैसा.. बाकी काहीच बघायचे नाही. ही अमित शहांची कथित चाणक्य नीती. ज्या राज्यांमध्ये फोडाफोडीचे राजकारण झाले नाही तेथे भाजपाचा बर्यापैकी विजय होताना दिसत आहे.

In reply to by अहिरावण

सुक्या 05/06/2024 - 10:01
बुलदोझर, जेसीबी रस्ते बनवायलाच वापरा.. त्याची पण गरज नाही. धुर्व राठी बोललाच आहे .. काय गरज आहे हायवे ची.. काय गरज आहे विमानतळांची...?

In reply to by अहिरावण

त्या आकाश बॅनर्जीने गेले काही महिने आकाश पाताळ एक करुन भाजपा विरोधात आघाडी उघडली होती. आमचे नव-बुद्धिवादी निखिल वागळे,असिम सरोदे,निरंजन टकले हेही भाजपाविरोधात प्रचार करत होते. खुद्द काँग्रेसवाल्यांचा जेवढा विरोध नव्हता तेवढा ह्या लोकांचा भाजपाला विरोध होता.!ह्यांची अवस्था एका डोळ्यात आनंदाश्रु आणि दुसर्या डोळ्यात दु:खाश्रु अशी झाली आहे. कारण पुढची ५ वर्षे भाजपाच सत्तेवर असणार आहे.

निवडणूक मग ती विधानसभेची असो की लोकसभेची, मी खूप उत्सुक, उत्साही आणि अधीर होते. मतदानाचा दिनांक जाहीर होतो आणि तो माझ्या पक्का लक्षात राहतो. ती तारीख जवळ येत चालली की माझा उतावीळपणा वाढत जातो. "आपली नावं आहेत ना मतदारयादीत? चेक करा. तुम्ही खात्री करून घेतली आहे ना? मतदान केंद्र नेहमीचंच ना? सकाळी लवकर जावून मतदान करुन येऊया हं! उशीर नको. आपला पहिला नंबर हवा. पहिला चहा, ब्रेकफास्ट मतदानानंतर करायचा." .. अशी कटकट मी घरच्यांच्या कानाशी सुरु करते आणि तेही होकार देऊन देऊन बेजार होतात.

तू फुलत रहा...

नूतन ·

Bhakti 26/05/2024 - 13:31
ॲडेनिअमलापण म्हातारी येते,हे माहिती नव्हतं.

निळा,जांभळा,लाल,पांढरा गुलाबी अशा विवीध रंगाची फुले देणारा मेन्टेनन्स फ्री प्लांट ,अतीशय मनमोहक. माझेही अवडते प्लांट आहे. जवळपास पंधरा वर्ष कामटी,लखनौ, दिल्ली पुणे असे इमाने इतबारे फिरले. मुलीकडे अमेरिकेला जाताना सारी झाडे पार्किंग मधे ठेवली व चौकीदाराला काळजी घ्यायला सांगीतली. परत आल्यावर आज वर नेऊ ऊद्या नेऊ करताना कुणीतरी चोरी केले. सोसायटीच्या ग्रुपवर खुप शिव्या दिल्या काही उपयोग झाला नाही. म्हणा झाडही तसेच होते. कोणालाही मोह पडावा असे. कदाचित मी सुद्धा चोरी केले असते. कोणत्याही परिस्थितीत ठाम उभं राहून कसं फुलत रहायचं, हेच शिकायला हवं! अगदी,अगदी.... सहमत. लेख आवडला.

नूतन 26/05/2024 - 19:16
निळा,जांभळा,लाल,पांढरा गुलाबी अशा विवीध रंगाची फुले देणारा मेन्टेनन्स फ्री प्लांट हे माहित नव्हतं. प्रतिसादाबद्दल धन्यवाद

त्याच्या बागेतील जवळपास चाळीस एक कदाचीत जास्त असतील अशी वेगवेगळ्या रंगसंगतीतली डबल आणी सिंगल पाकळ्यांची झाडावर असलेल्या फुलांचे फोटो टाकलेत. एका पेक्षा एक सरस. दिडशे रुपयाला एक प्लांट विकतो.

१०-१२ वर्षांपूर्वी एका प्रदर्शनातून आम्ही 'ॲडेनिअम 'चं एक झाड आणलं.छोटीशी बाल्कनी  फुलांनी बहरून गेली आहे अशी स्वप्नं कायमच पडायची.पण बागकामासाठी लागणारं ज्ञान, त्यासाठी खर्च करावा लागणारा‌ वेळ, इत्यादी इत्यादी गोष्टींच्या नावाने बोंबच होती. त्यामुळे फारशी काळजी घ्यावी लागणार नाही आणि बोन्साय.. (म्हणजे मुळातच मोठं झालेलं झाड . हो म्हणजे नवजात शिशु संगोपन करावं लागणार नाही!), या वैशिष्ट्यांमुळे खरं तर हे झाड आम्ही आणलं. शिवाय मी चाफाप्रेमी. त्यामुळे चाफ्याशी साधर्म्य असलेलं , वर्षभर फुलणारं हे  बोन्साय मनात भरलंच!