✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम

म
मारवा यांनी
Mon, 06/17/2024 - 08:26  ·  लेख
लेख
आज बकरी ईद चा सण आहे. मुस्लिम धर्मियांचा एक महत्वाचा सण याला इद-अल-अधा असे ही म्हटले जाते.या सणामागील परंपरा साधारण अशी आहे. विकीपेडीया मधुन् अब्राहमच्या जीवनातील मुख्य परीक्षांपैकी एक म्हणजे त्याच्या प्रिय पुत्राचा वध करण्याची देवाची आज्ञा स्वीकारणे आणि त्याचे पालन करणे. कथेनुसार, अब्राहमला स्वप्न पडत होते की तो आपल्या मुलाचा बळी देत ​​आहे. अब्राहामला माहित होते की ही देवाची आज्ञा आहे आणि त्याने आपल्या मुलाला सांगितले, जसे कुराणमध्ये म्हटले आहे,"अरे बेटा, मी तुझा वध करतोय असे स्वप्न मला पडत आहे". त्याने उत्तर दिले, "बाबा, तुम्हाला जे करण्यास सांगितले आहे ते करा." अब्राहामने देवाच्या इच्छेला अधीन राहण्यास आणि देवाच्या विश्वासाचे आणि आज्ञाधारकतेचे कृत्य म्हणून आपल्या मुलाचा वध करण्यास तयार केले. [२२] [२३] तयारी दरम्यान, इब्लिस (सैतान) ने अब्राहम आणि त्याच्या कुटुंबाला देवाची आज्ञा पाळण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आणि अब्राहमने इब्लिसवर खडे टाकून तेथून हाकलून दिले. इब्लिसला नकार दिल्याच्या स्मरणार्थ, हजच्या विधीच्या वेळी प्रतीकात्मक खांबांवर दगड फेकले जातात, ज्या ठिकाणी इब्लिसने अब्राहमला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. [२४] अब्राहाम आपल्या प्रिय वस्तूचा त्याग करण्यास तयार होता हे मान्य करून, देवाने अब्राहाम आणि त्याच्या पुत्राचा सन्मान केला. देवदूत गॅब्रिएल (जिब्रील) ने अब्राहमला हाक मारली, "ओ' इब्राहिम, तू प्रकटीकरण पूर्ण केले आहेस," आणि स्वर्गातून एक मेंढा देवदूत गॅब्रिएलने संदेष्टा अब्राहमला त्याच्या मुलाऐवजी कत्तल करण्यासाठी देऊ केला. अनेक मुस्लिम अब्राहमची भक्ती आणि त्याचा मुलगा इश्माएल याच्या स्मरणार्थ ईद अल-अधा साजरी करतात. [२५] [२६] [२७] ईदच्या प्रार्थनेनंतर, उधिया , किंवा गुरांचा विधी बलिदान केले जाऊ शकते. श्रीमंत मुस्लिम ज्यांना हे परवडते ते हलाल गुरे, सहसा उंट, बकरी, मेंढ्या किंवा मेंढ्याचा बळी देतात, हे अब्राहमच्या त्याच्या एकुलत्या एका मुलाचा बळी देण्याच्या इच्छेचे प्रतीक आहे. [३६] [३७] बलिदानासाठी प्राण्यांना विशिष्ट वय आणि गुणवत्ता मानके पूर्ण करणे आवश्यक आहे. [३८] एकट्या पाकिस्तानमध्ये, अंदाजे ७.५ दशलक्ष प्राण्यांची, ज्याची किंमत अंदाजे $३ अब्ज (२०२३ मध्ये $४.१६ अब्ज समतुल्य) होती, २०११ मध्ये बळी दिला गेला. [३९] [४०] बळी दिलेल्या प्राण्याचे मांस साधारणपणे तीन भागात विभागले जाते: उधिया करणाऱ्या कुटुंबाने तृतीयांश ठेवला आहे; उर्वरित मित्र आणि नातेवाईक आणि गरीबांमध्ये समान प्रमाणात विभागले गेले आहे. [३६] तर प्राणीप्रेमी संघटना PETAINDIA ने मोठी संवेदनशीलता दाखवत एक सुंदर उपक्रम सुरु केलेला आहे ज्याचे नाव आहे दावत-ए-ईद यात त्यांनी सुटका केलेल्या बकऱ्या आणुन त्यांना दावतसाठी आमंत्रण दिलेले आहे. म्हणजे त्यांना मारुन त्यांची दावत न देता त्या बकरृयांना खायला देणे असे या उपक्रमाचे स्वरुप आहे. जे अतिशय ह्रद्य असे मला वाटले.त्यांच्या संस्थळावर या उपक्रमाचे वर्णन असे केलेले आहे. Several vegan Muslim PETA India supporters celebrated Eid by having goats for dawat – not as the main course but as the guests of honour. They prepared a beautiful spread of fresh fruits and vegetables for the rescued animals while sharing the message that Islam, like all religions, teaches compassion and mercy and urging others to sacrifice cruel habits – not animals – by going vegan. 1 2 या स्तुत्य धाडसी संवेदनाशील उपक्रमासाठी पेटा संस्थेचे मनापासुन हार्दिक अभिनंदन. अधिक माहीती इथे बघु शकतात https://www.petaindia.com/features/vegan-muslim-peta-india-supporters-ce...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
16049 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

तीव्र णिषेध

धर्मराजमुटके
गुरुवार, 06/20/2024 - 18:58 नवीन
बहुलेखप्रसवा भव ! लेख वाचून तिकडे प्रतिसाद देतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

मुस्लिम व्यापाऱ्यांना त्यांचे

रात्रीचे चांदणे
Wed, 06/19/2024 - 06:45 नवीन
मुस्लिम व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले असले तरीही धर्मात ढवळा ढवळ केली म्हणून त्या जैन मुलाचा गळा चिरला नाही म्हणजे बर होईल.
  • Log in or register to post comments

About 900,000 cows are

भागो
गुरुवार, 06/20/2024 - 08:56 नवीन
About 900,000 cows are slaughtered every day. If every cow was 2 meters long, and they all walked right behind each other, this line of cows would stretch for 1800 kilometers.1 This represents the number of cows slaughtered every day. For chickens, the daily count is extremely large – 202 million chickens every day. To comprehend the scale, it is better to bring it down to the average minute: 140,000 chickens are slaughtered every minute. certainly, hundreds of millions of fish are killed every day. बकरे, डुकरे , बदके ह्यांची पण संख्या प्रचंड आहे. तेव्हा उगाचच ईदच्या बळी बकर्यांच्या नावाने नक्राश्रू ढाळू नका.
  • Log in or register to post comments

मूळ मुद्दा बकर- ईद बद्दल नसून

सुबोध खरे
गुरुवार, 06/20/2024 - 10:43 नवीन
मूळ मुद्दा बकर- ईद बद्दल नसून फुरोगाम्यांच्या दांभिकपणा बद्दल आहे जे केवळ हिंदू सणांबद्दल गरळ ओकताना दिसतात. उदा कोरडी होळी खेळा, फटाकेमुक्त दिवाळी असावी. पण मुसलमान लोकांच्या सणाबाबत काही बोलण्याची हिम्मत दाखवत नाहीत. यांचा दांभिकपणा म्हणजे लिटरला पाच किमी जाणाऱ्या गाडीतून ग्लोबल वॉर्मिंग बद्दल मोर्चाला जातात तसा आहे. कुर्बानी द्यायला हरकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी घाण, रक्त, मांस यांचा चिखल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मागे कत्तलखाने सोडून इतर ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी घातली होती. The Bombay High Court on Thursday said that it would not permit unregulated or unmonitored slaughter of animals anywhere in Maharashtra and that hygiene and sanitation were important. https://indianexpress.com/article/cities/mumbai/bombay-hc-slaughter-animals-sacrifice-vishalgad-fort-kolhapur-8664410/ हीच गोष्ट देवस्थानांबाबत आहे जेथे प्राणी बळी दिले जातात त्यावर पण बंदी आणलीच पाहिजे. बाकी कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या मुळे सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसाला त्रास होऊ नये इतकी मूलभूत काळजी घेतली गेलीच पाहिजे. मतांसाठी मुस्लिम लांगुलचालन होऊ नये हे जितके सत्य आहे तितकेच ते हिंदू सणामध्ये गैरप्रकार होऊ नये हि काळजी घेतली पाहीजे. मग तो गणेशोत्सवात डी जे लावणे असो कि मशिदींवरून बांग देणे असो. येथे मला लष्करातील शिस्तीची आठवण येते. तेथे मंदिरात लावलेली भजने ५० मीटरच्या पुढे ऐकू येऊ नयेत हा निर्बंध काटेकोरपणे पल्ला जातो तसेच मशिदीवरून भोंगे लावून बांग दिली जात नाही. मिरवणूक मर्यादित कालावधीत "डी जे" शिवायच होतात. मग ती मोहरम ची असो कि गणेशोत्सव वा अय्यप्पाची असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भागो

सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/20/2024 - 11:07 नवीन
कुर्बानी द्यायला हरकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी घाण, रक्त, मांस यांचा चिखल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.
सहमत.
.हीच गोष्ट देवस्थानांबाबत आहे जेथे प्राणी बळी दिले जातात त्यावर पण बंदी आणलीच पाहिजे.
सहमत.
कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या मुळे सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसाला त्रास होऊ नये इतकी मूलभूत काळजी घेतली गेलीच पाहिजे.
सहमत.
मतांसाठी ( हिंदू असो की ) मुस्लिम लांगुलचालन होऊ नये हे जितके सत्य आहे तितकेच ते हिंदू सणामध्ये गैरप्रकार होऊ नये हि काळजी घेतली पाहीजे. मग तो गणेशोत्सवात डी जे लावणे असो कि मशिदींवरून बांग देणे असो.
सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डोळे पाणावले.

गवि
गुरुवार, 06/20/2024 - 12:05 नवीन
डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझे सुद्धा :)

टर्मीनेटर
गुरुवार, 06/20/2024 - 12:25 नवीन
माझे सुद्धा 😂 एकदा बाहेर डोकाउन आलो सुर्य आज कुठल्या दिशेला उगवलाय ते पहायला, पण ढगाळ वतावरणामुळे तो दिसलाच नाही 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/20/2024 - 12:34 नवीन
डोळे पाणावले.
अरे सुधरा रे.... देशाची अर्थव्यवस्था जर सुधारायची असेल तर, कोंबड्या, मासे, खेकडे, कोळंबी, आणि इतर जीव खाण्यास शास्त्रात ''जीवो जीवस्य जीवनम्'' चा संदर्भ घेऊन काही आड़काठी नसली तरी केवळ प्रोटीन्स मिळतात म्हणून खान-पान मर्यादित असले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

समजा गणपाच्या हातची कोळंबी

गवि
गुरुवार, 06/20/2024 - 12:35 नवीन
समजा गणपाच्या हातची कोळंबी किंवा पापलेट फ्राय असेल तरी ते सोडावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/20/2024 - 12:48 नवीन
गणपाच्या हातची कोळंबी किंवा पापलेट फ्राय असेल तरी ते सोडावे का?
हे राम. गणपाच्या हातच्या कोलंबी आणि पापलेट असतील तर, अगोदर पानात हे सर्व वाढून घ्यायचे. मांडी घालून बसायचे. दोन्ही हात जोडायचे. डोळे मिटायचे. ‘‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’. असे म्हणून जेवणास सुरुवात करायची. जेवण हे यज्ञासारखेच पवित्र आणि अग्नी म्हणजे ऊर्जा निर्माण करणारे आहे असे समजून खाल्ले की चालते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तरी केवळ प्रोटीन्स मिळतात म्हणून खान-पान

टर्मीनेटर
गुरुवार, 06/20/2024 - 12:44 नवीन
तरी केवळ प्रोटीन्स मिळतात म्हणून खान-पान मर्यादित असले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे.
ह्यातल्या 'खान' बद्दल १०००% सहमत आहे पण 'पान?'... No way 😂
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे!

टर्मीनेटर
गुरुवार, 06/20/2024 - 11:49 नवीन
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे!
"मुंबई उच्च न्यायालयाने मागे कत्तलखाने सोडून इतर ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी घातली होती."
हा निर्णय खूप आधीच यायला हवा होता, पण ठीक आहे... 'देर आये, दुरुस्त आये' म्हणायचे, अजून काय! पूर्वी मुलुंडच्या 'वोक्हार्ट' (आताचे - फोर्टिस) हॉस्पिटलच्या गच्चीवर त्याचे संस्थापक,मालक, चेअरमन असलेल्या 'हबील खोराकीवाला' ह्यांनी जाहीररीत्या बोकडाची कुरबानी दिली होती आणि हा तमाशा बघायला बरीच गर्दी गोळा झाली होती. (असे कृत्य त्यांनी अनेकदा केले होते म्हणतात) असला प्रकार कोणीही केला असता तरी तो निंदनीयच आहे, पण हबील खोराकीवालांसारख्या उच्च विद्याविभूषित, अब्जाधीश, नामांकित व्यावसायिक व्यक्तीने केलेले हे कृत्य केवळ निंदनीयच नाही तर त्यांच्या प्रतिमेला अशोभनीयही होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

<तेथे मंदिरात लावलेली भजने ५०

रामचंद्र
गुरुवार, 06/20/2024 - 12:58 नवीन
<तेथे मंदिरात लावलेली भजने ५० मीटरच्या पुढे ऐकू येऊ नयेत हा निर्बंध काटेकोरपणे पल्ला जातो तसेच मशिदीवरून भोंगे लावून बांग दिली जात नाही. मिरवणूक मर्यादित कालावधीत "डी जे" शिवायच होतात. मग ती मोहरम ची असो कि गणेशोत्सव वा अय्यप्पाची असो.> यात जर कुणाच्याही भावना न दुखावता लोकमान्य पद्धतीने धार्मिक परंपरांचे पालन होत असेल तर इतरत्रही याचे पालन व्हायला काय अडचण आहे? सर्वांच्याच मनासारखं पण त्रास (फारसा) कुणालाच नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

यात जर कुणाच्याही भावना न

भागो
गुरुवार, 06/20/2024 - 14:18 नवीन
यात जर कुणाच्याही भावना न दुखावता>>>मग त्यात काय मजा राहिलि? अहो भावना दुखावण्यासाठी तर सारा खटाटोप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

मग सुसंस्कृत राष्ट्र आणि

रामचंद्र
गुरुवार, 06/20/2024 - 16:23 नवीन
मग सुसंस्कृत राष्ट्र आणि सुजाण समाज निर्माण होण्याची अपेक्षाही करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भागो

श्री रामचन्द्र कृपालु भजुमन

भागो
गुरुवार, 06/20/2024 - 17:43 नवीन
श्री रामचन्द्र कृपालु भजुमन हरण भवभय दारुणं । सर, माझ्या प्रतिसादाचा आशय लक्षात आला असावा असे मी समजतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

अहो, दोन्ही पक्ष आपल्याकडून

रामचंद्र
गुरुवार, 06/20/2024 - 18:00 नवीन
अहो, दोन्ही पक्ष आपल्याकडून त्रास न होण्याची भूमिका घ्यायला तयार नसतात म्हणून मी तसं म्हटलं... पण अशा आडमुठ्या भूमिकेमुळे पीडित लोक दोन्ही गोटांतले आहेत, शिवाय याचा अनिष्ट परिणाम होणारे मुके प्राणी-पक्षी, पर्यावरण हेही आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भागो

शिवाय 'ते कसं वागतात' असं

रामचंद्र
गुरुवार, 06/20/2024 - 18:04 नवीन
शिवाय 'ते कसं वागतात' असं म्हणत चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा किमान आपण शहाणपणाची भूमिका घेतली तर काही प्रमाणात तरी चुकीच्या गोष्टी कमी होतील असा विवेक दोन्ही बाजूचे लोक दाखवत नाहीत.
  • Log in or register to post comments

पूर्ण सहमत.

भागो
गुरुवार, 06/20/2024 - 19:29 नवीन
पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा