मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

लोकं पूर्वकल्पीत धारणा ठेवून एकमेकांशी का वागतात?

श्रीकृष्ण सामंत ·
“मागच्या वेळी तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा कधी पाहिलं होतं,त्याला भेटला होता आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला जे वाटलं होतं तेच होतं का? कदाचित कधीच नसावं.विचार करा, एका दिवसात तुम्हाला किती वेळा “अरे, तो अबोल आहे”, किंवा “ती इतकी छान नाही” किंवा “ते तिथे का असतील?” असे प्रश्न मनात उद्भवले असतील. आजकाल, लोक नेहमी असं गृहीत धरतात की त्यांना इतरांबद्दल सर्व गोष्टी माहित आहेत. परंतु खरोखर, इतरांबद्दल, त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल, किंवा त्यांच्या भूतकाळाबद्दल, त्यांना अजिबात सुगावा नसतो. मग भाऊसाहेब, लोकं पूर्वकल्पीत धारणा ठेवून एकमेकांशी का वागतात?” असा प्रश्न कालच्या भेटीत मी प्रो.

एका कोळीयाने,

श्रीकृष्ण सामंत ·
त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे एका मोठ्या बालडीत कपडे धुण्यासाठी साधारण कोमट पाणी भरून साबूची पावडर टाकून दोन्ही हात पाण्यात बुडवून साबूचा फेस बाथरुम मध्ये तयार करीत होतो. तेव्हड्यात मी एक काळा कोळी त्या साबूच्या फेसावर तरंगताना पाहिला.

स्वतःची अणू अस्त्रं भारताने स्वतःच निर्माण केली.

श्रीकृष्ण सामंत ·
“आपला भारत देश आता प्रगतीच्या मार्गावर आहे. आणि भारताला प्रगती करण्याच्या मार्गात आता कुणी ही खीळ घालू शकत नाही.” हे मी प्रो.देसायांना चर्चेच्या दरम्यान सांगत होतो. आणि मी पूढे म्हणालो, “भारतात खूप संशोधन संस्था निर्माण केल्या पाहिजेत.TIFR आणि BARC सारख्या संस्था श्री.टाटा आणि डॉ.भाभा ह्यांच्या सहाय्याने सत्तर बहात्तर वर्षांपूर्वी स्थापन झाल्या.

ढगाळ वातावरण

श्रीकृष्ण सामंत ·
शेतात रोज उन्हाळी वातावरण पाहून,कंटाळा आल्यासारखं होतं. आणि ढगाळ पावसाळी वातावरणाची आठवण येत राहते. ढगाळ दिवसांत शेतावर काम करत असल्याची अनुभवून गेलेली आठवण,मी माझ्या वहीत एकदा कधी लिहून ठेवली होती ती वाचत होतो. “कधीकधी मला ढगाळ दिवस पण आवडतात त्यांचं सौंदर्य मला मोहित करतं. सर्वसाधारणपणे बरेच लोक उन्हाळी दिवसांचं कौतुक करताना दिसतात.आनंद आणि उच्च उत्साह मिळतो असं त्यांना वाटत असतं. निळ्या आकाशात आनंद निर्माण होतो असं वाटणं स्वाभाविक असू शकतं, परंतु माझ्यासाठी ते अगदी उलट आहे: जेव्हा सूर्य ढगाळ पडद्याआड सुरक्षितपणे दूर जातो तेव्हा मी सर्वात समाधानी असतो.

आनंदी न राहण्यात आणि मजा करण्यात काही अर्थ नाही

श्रीकृष्ण सामंत ·
“एकटं मन वैरी असतं “ असं म्हणतात,पण आज माझ्या एकट्या मनात जे विचार सुचले, ते माझ्या मनाला पटणारे वाटले.ते असे, “मला असं वाटतं की, आनंदी न राहता मजा करण्यात काही अर्थ नसतो. आनंदी लोक आशावादी असल्यामुळे उत्तम जीवन जगतात. माझं एक आवडतं म्हणणं आहे आनंदी लोक निरोगी असतात. मला असं वाटतं की, आनंदी राहिल्याने बरंच काही मार्गस्थ करता येतं. जीवनाचा उद्देश काय आहे असा प्रश्न बहुतेकांना पडतो.जेव्हा मी वेगवेगळ्या मूडमध्ये असतो, तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा मला वाटतं की जीवन व्यर्थ आहे.

निसर्गरम्य शांतता

श्रीकृष्ण सामंत ·
माझ्या लहानपणी मी शेतात खूप काम करत असे. चोहीकडचा परिसर म्हणजे अर्थात निसर्ग असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आता ह्या वयात त्या परिसरात अनुभवलेल्या गोष्टींची आठवण येऊन निसर्गाबद्दल थोडंफार लिहावं म्हणून केलेला हा प्रयत्न. मला वाटतं निसर्गाचं सामर्थ्य अफाट आहे. मी निसर्गाच्या आपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेचा संदर्भ देत नाही, तर उलट - त्याच्या ठीक करण्याच्या,बरं करण्याच्या शक्ती, बद्दल म्हणत आहे. सूर्यप्रकाशात भिजणं आणि ताज्या, शुद्ध हवेत श्वास घेणं यापेक्षा मनाला आणि शरिराला आरामदायक, सुखदायक करणारं दुसरं काहीही नाही.

सोनचाफ्याचची फुलं आणि तो स्पर्श (भाग ३ )

श्रीकृष्ण सामंत ·
सुम्याच्या लहानपणातल्या प्रेमासंबंधाच्या सतावणार्‍या त्या आठवणी सुम्या,तिची मुलगी आणि नवरा घाईगर्दीने कोकणात गेली होती कारण,सुम्याची आई बरीच आजारी होती.एक महिना ती कोकणात राहिली.आईला मुंबईला आणून चांगल्या डॉक्टरला दाखवायचं असा त्यांचा विचार होता.पण हा विचार ऐकून आई खूप नाउमेद झाली. आणि दोन दिवसातच तिचा अंत झाला. सुम्याला आता बेत बदलावा लागला. म्हातार्‍या वडीलाना आपल्याबरोबर मुंबईला घेऊन जाण्याचा विचार त्यांनी केला.आणि त्याप्रमाणे कोकणातलं घर बंद करून वडीलांना घेऊन ती सर्व मंडळी मुंबईला आली.

पाकिस्तानने भारतावर परमाणू अस्त्र वापरलं आणि भारताने आपलं—

श्रीकृष्ण सामंत ·
मानवजात आणि भविष्यात होऊ घातलेली पृथ्वीची समस्या. काल मी आणि प्रो. देसाई आम्ही दोघेच तळ्यावर भेटलो होतो.प्रो.

माझ्या वहितला एक उतारा,-मनोदशा (mood ).

श्रीकृष्ण सामंत ·
माझ्या वहितला एक उतारा.--- मला आठवतं हा उतारा लिहायला त्या दिवशी मी का उद्युक्त झालो होतो. शेतावरची कामं त्या दिवशी मनासारखी होत नव्हती.बरेच कामगार एनंकेनं कारणाने गैरहजर होते.जरूर ती कामं होणार नव्हती. वैताग आला होता. दिवस कसातरी संपायला आला होता.घरी जायचं मूड नव्हतं. आजही तसंच वाटत होतं.म्हणून माझ्या वहितला उतारा वाचत होतो. “ मला असं वाटतं की,( मूड ) मनोदशा सतत बदलत असते आणि काही सेकंदात बदलली जाऊ शकते. जीवनातला एखादा क्षण पुसला किंवा बदलला जाऊ शकत नाही, परंतु केवळ आठवणींच्या संदर्भातून मागे वळून पाहिलं जाऊ शकतं.

प्रश्न एवढाच आहे की, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायचं आहे?

श्रीकृष्ण सामंत ·
मी श्री समर्थांना म्हणालो, “बरेच वेळा माणसं एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसताना एकदम निर्णयाला येतात.मग तो त्यांचा निर्णय सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असू शकतो. मी तुम्हाला हे असं का विचारतो ह्याचं एक कारण झालं आहे. परवा मला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता.मी फक्त त्याला त्याने केलेल्या मुद्यावर हं हं एव्हढंच म्हणालो होतो.काल मी एका दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असताना योगायोगाने, त्या दिवशी माझ्या फोनवर बोललेल्या व्यक्तीशी आणि ह्याच्याशी सलगी आहे असं कळल्यावर, विषय निघाल्यावर मला ह्याने सांगितलं की,ती फोनवरची व्यक्ती मला मी उद्धट, अहंकारी आहे असं म्हणाली. ऐकून मला वाईट वाटलं “ असं म