लाडका नातू..
मी आज तुम्हाला माझ्या आईने मला माझ्या लहानपणी सांगितलेली एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे मला ती अचानक आठवली. ती का आठवली यावर अजून माझा विचार आणि मौन चालू आहे.
ही कथा म्हणजे काहीशी प्रचलित बोधकथाच आहे. त्यामुळे नवीन कथा म्हणून त्यात किती मूल्य आहे कोण जाणे. पण "मूल्य" या गोष्टीबद्दल मात्र ही कथा नक्की बोलते.
एका गावात एक म्हातारे गृहस्थ राहत होते. त्यांचं वय असेल सत्तरच्या आसपास. त्यांना सगळे आबा म्हणून हाक मारायचे. आबा सत्तर वर्षांचे असले तरी काटक होते. व्यायाम करायचे. दिवसभर काबाडकष्ट करायचे. त्यांना बायको मुलं नव्हती. बायको पूर्वीच मरण पावली होती.
मिसळपाव
अलीकडेच कोथरूडमधील एक लायब्ररी बंद झाली. त्यांच्याकडे असलेल्या लाखो पुस्तकांचा ठेवा त्यांनी सवलतीच्या किमतीत विकायला काढला. खरं तर पुस्तकप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना. पण म्हणतात ना उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गनियम आहे.
त्यांच्याकडील पुस्तकांचा काही ठेवा आपण आपल्या घरी आणावा म्हणून श्रावणी (माझी मोठी मुलगी) आणि मी तिथे गेलो. तिथे असलेली असंख्य पुस्तके तसेच आमच्यासारखे असंख्य पुस्तकवेडे तिथे गर्दी करून होते.
या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.