राम प्रहरीची भटकंती - स्वैर चिंतन १
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about राम प्रहरीची भटकंती - स्वैर चिंतन १
- 6 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
हे एक स्वानंदासाठी केलेले स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे.
हल्ली (गेल्या काही महिन्यांपासून) ब्रह्म मुहुर्तावर उठणे होते. खरे सांगायचे तर जाग तशीही येत होती पण झोप पूर्ण होत नव्हती तर होणार्या झोप मोडीशी झगडा करण्यापेक्षा संध्याकाळचे जेवण आणि रात्री झोपण्याचीच वेळ बरीच अलिकडे घेतली. ज्या दिवशी लवकर झोप येणार नाही त्या दिवशी मेडीटेशन केले आणि झोपीचा पॅटर्न यशस्वीपणे बदलला.
----
हिंदू नूतन वर्षाच्या मिपाकरांना हार्दिक शुभेछा .
------
चैत्र महिना सुरू होण्यापूर्वीच वैशाख वणवा जाणवू लागलाय.यावर्षी जरा लवकर उन्हाळा आलाय का? संक्रांती नंतर दुपार तापू लागली. होळी येण्या आगोदरच माठ, डेरे, पंखे सुरू झालेत.वातानुकूलित यंत्रांची खरेदी तपासणी, दुरूस्ती सुरू झाली आहे.कागदी लिंबू, काकड्या यांचे भाव कडाडले आहेत.टरबूज, खरबूज बाजारात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.मार्तंडाने आता पासूनच आग पाखडायला सुरूवात केली आहे.