'एका खेळियाने' आता पुस्तक स्वरूपात!
मिपाकरांनी भरभरून प्रेम दिलेली लेखमाला 'एका खेळियाने' आता सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात उपलब्ध झाली आहे.
त्याचं झालं असं की दोन एक वर्षांपूर्वी सकाळने एक स्पर्धा घेतली होती. त्यात 'एका खेळियाने'ला सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. त्याचेच फलित म्हणून सकाळ ने एका खेळियानेचे लेख पुस्तकरूपात प्रकाशित केले आहेत. मिपावर आधी प्रकाशित झालेले काही आणि काही नवीन अश्या तीसेक लेखांचा त्यात समावेश आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे पॅरिस ऑलिंपिक्स सुरु झाले त्याच दिवशी, २६ जुलै ला हे पुस्तक वेगवेगळ्या ई-दुकानांमध्ये उपलब्ध झाले. पुस्तकाचे ई-बुक देखील लवकरच उपलब्ध होईल.
मिसळपाव
पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला कोचीमध्ये पोर्तुगीजांनी पाऊल टाकले. लवकरच दहा वर्षात गोव्याला मुख्य ठाण केलं. आदिलशाहीविरूद्ध अनेक दशके सुरू असतानाच आपला मुख्य हेतू धर्म परिवर्तनाचा पसारा संपूर्ण गोवा पाटणात पसरवला.