नागराज मंजुळेची हि पहिली शॉर्टफिल्म. अहमदनगरच्या चित्रकार्यशाळेत तिसऱ्या वर्षी त्यानं केलेला खरंतर हा एक प्रोजेक्ट होता. तंत्रज्ञानाच्या बाबतीत बरीच पिछाडीवर असलेली ही कार्यशाळा नागराजला राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यापासून रोखू शकली नाही, यातच खरंतर नागराजचं घवघवीत यश आहे.
मोजून दोन दिवसात (की सहा?) पिस्तुल्याचं चित्रीकरण पु्र्ण झालं. मात्र त्याआधी त्याने कित्येक दिवस तयारी केली होती. कॅमेरा कोठे ठेवायचा, लोकेशन्स, पात्रनिवड, वगैरेवर बरीच मेहनत घेतली होती.
हि केवळ १५ मिनिटांची शॉर्टफिल्म आहे. मात्र नागराजनं त्यातही एक जग उभं केलंय हे नक्की. पात्रं अभिनय करतायत असं कुठेच वाटलं नाही.