नागराज मंजुळेची हि पहिली शॉर्टफिल्म. अहमदनगरच्या चित्रकार्यशाळेत तिसऱ्या वर्षी त्यानं केलेला खरंतर हा एक प्रोजेक्ट होता. तंत्रज्ञानाच्या बाबतीत बरीच पिछाडीवर असलेली ही कार्यशाळा नागराजला राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यापासून रोखू शकली नाही, यातच खरंतर नागराजचं घवघवीत यश आहे.
मोजून दोन दिवसात (की सहा?) पिस्तुल्याचं चित्रीकरण पु्र्ण झालं. मात्र त्याआधी त्याने कित्येक दिवस तयारी केली होती. कॅमेरा कोठे ठेवायचा, लोकेशन्स, पात्रनिवड, वगैरेवर बरीच मेहनत घेतली होती.
हि केवळ १५ मिनिटांची शॉर्टफिल्म आहे. मात्र नागराजनं त्यातही एक जग उभं केलंय हे नक्की. पात्रं अभिनय करतायत असं कुठेच वाटलं नाही. अस्सल नैसर्गिक अभिनय. कथेत थोडे ट्विस्टपण आहेत जे समजायला थोडा वेळही लागतो.
कितीही अस्सल कलाकृती सरळसोट सामाजिक संदेश देणारी निघाली तर तिची धार जरा बोथटच होते. पिस्तुल्याच्या बाबतीत मला हेच जाणवले. मात्र तिकडे जरा दुर्लक्ष केल्यास कथेची मांडणी आणि चित्रभाषा डोळ्याला सुखावत राहतात.
फारच अपेक्षा घेऊन पाहिलात तर कदाचित हाती जास्त काही पडणार नाही. मात्र एकदा नक्कीच पाहिला पाहिजे असा जरूर आहे.
थोडक्यात कथा सांगतो,
लक्शुक्का बारक्या पिस्तुल्याला घेऊन दारोदारी पाटा वरुटा विकत फिरत असते. पाठीमागे पिस्तुल्या 'टी टी टी' करत तारांची गाडी चालवत असतो. मध्येच थांबून तो हातातल्या कागदावर लिहीलेली अक्षरं वाचण्याचा प्रयत्न करत राहतो. दगडं कोरुन पोट भरणाऱ्या जमातीतली ही मायलेकरं घरोघरी भाकर मागूनही पोट भरत असतात. एके ठिकाणी लक्शुक्का तारांची गाडी आवडलेल्या एका पोराशी गाडीच्या बदल्यात दोन ताज्या भाकरीचा सौदाही करते. स्वतः बनवलेली गाडी अशी सहजासहजी गेली याचं दु:ख पिस्तुल्या धड दाखवूही शकत नाही.
मुळात पिस्तुल्याला शाळेची आवड आहे. लक्शुक्का मात्र "तुझ्या गांडीला न्याट पडलं, तुला साळा आटवती व्हयरं, भाडखाऊ" म्हणत त्याला विरोध दर्शवते. पाटी पुस्तकं, गणवेस यांसारखा फाजिलपणा तिला खपणारा नसतो. आणि गणवेशाशिवाय शाळेत प्रवेश नाही असा तिढा पिस्तुल्यापुढे आहे.
पुढे काय होतं? हे चित्रफितीत पाहणेच उत्तम.
जाता जाता:
यूट्यूब वरची ही पिस्तुल्या (खराब क्लॉलिटीची प्रिंट) इच्छूकांनी जरुर बघावी. HD क्लॉलिटी कोठे सापडली नाही. क्षमस्व.
वाचने
5900
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्कीच बघीन!
अजून एक कॉपी राईट........
अर्रर्रर, असं आहे का ते?
In reply to अजून एक कॉपी राईट........ by राजकुमार१२३४५६
अरे काय भंगार प्रिण्ट आहे.
अजून काही शॉर्टफिल्म
Overrated….!!!!
मसाण! फारच भेदक आहे!
In reply to Overrated….!!!! by अफ्रिकेचा मुम्बैकर
काय गंमत आहे बघा
In reply to Overrated….!!!! by अफ्रिकेचा मुम्बैकर
हो नक्किच