मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माध्यमवेध

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.

तुमचा अभिषेक ·
रविवारची सकाळ. दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेलो मी. टिव्ही वर चिकनी चमेली के शीला की जवानी. मात्र त्याकडे जराही लक्ष नाही. एका हातात चहाचा कप. दुसर्‍या हातात पोह्याने भरलेला चमचा, जो ‘आ वासलेल्या’ तोंडाच्या अगदी जवळ येऊन तसाच थांबलेला. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. हि बातमी दिवाणखान्यामधून स्वयंपाकघरापर्यंत पसरण्याआधी तिचा छडा लावणे गरजेचे होते.

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

सोत्रि ·
विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती. शोषित समाजातील काही उच्चविद्याविभूषित लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या लिखाणातून त्यांनी त्यांचे विश्व जे, बहुसंख्य जनतेचे होते, ते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. ते तसे करताना त्यांनी साहित्याची जनमान्य भाषा न वापरता त्या विश्वातील दैनंदिन भाषा, लहेजा, वाक्प्रचार, शिवराळपणा सहजपणे वापरला. तो पर्यंतच्या साहित्यात असे काही नव्हते, त्यामुळे एक आगळा प्रयोग म्हणून त्याकडे नजरा वळणे साहजिकच होते.

'प्रेमाची गोष्ट' . . .

आशु जोग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
'प्रेम' ही खरेच इतकी मोहक गोष्ट आहे का ! चित्रपटसृष्टीत अनेकांनी अनेक तर्‍हेनी हाताळूनसुद्धा अजून शोध घेणे संपलेले नाही. -- आत्तापर्यंत असंभव, अग्निहोत्र अशा मालिका आणि गैर, मुम्बई पुणे मुम्बई, एक डाव धोबीपछाड असे चित्रपट काढल्यानंतर दिग्दर्शक सतिश राजवाडे यांचा 'प्रेमाची गोष्ट' नावाचा हा चित्रपट. त्यांचा गैर सारखा सस्पेन्स थ्रिलर हिट्ट होऊनही ते बहुधा मुम्बई पुणे मुम्बई, एका लग्नाची दुसरी गोष्ट सारख्या चित्रपटांसाठी जास्त ओळखले जाऊ लागले असावेत. हा चित्रपट जरा वेगळ्या पद्धतीने घेतला आहे. डॉ. विवेक बेळे नावाचे एक नाटककार आहेत.

चावडीवरच्या गप्पा – आधार कार्ड (आधार क्रमांक)

सोत्रि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
chawadee “ह्या शिंच्या सरकारला एकेक नवीन योजना आणायचा भारीच जोर असतो बरं का! पण त्यांच्या अंमलबजावणीचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे.”, घारुअण्णा तणतणत चावडीवर प्रवेश करत. “आता काय झाले? आणि एवढे घामाघूम का झाला आहात?”, नारुतात्या काळजीभर्‍या आवाजात. “अहो काय झालें काय विचारताय? त्या आधार कार्डाच्या रांगेत पाय मोडेस्तोवर उभा राहून आलोय!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात. “अरे व्वा! चांगले आहे की मग, त्यात एवढे चिडताय काय?

उलट तपासणी - भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग...

शशिकांत ओक ·
मित्रांनो, काही दिवसांपुर्वी पुण्यनगरी दैनिक रेल्वे प्रवासात सहज वाचायला मिळाले. त्यातील 'उलटतपासणी' हे सदर वाचून व अरुंधती राय ताईंनी काढलेल्या अनमोल विचारांच्या धाग्यात सहभागी न होता हा नवा धागा टाकावासा वाटला. श्री. भाऊ तोरसेकर एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात. विविध बातम्यांमागील पटकन लक्षात न येणारी तथ्ये त्यात उलगडली जातात. अनेकदा नेमके असेच मला वाटते पण ते इतक्या अचूकपणे मांडलेले वाचून आपल्या मतांना/ विचारांना एक प्रकारचा आधार मिळतो असे वाटते. त्यांच्याशी वाद घालून त्यांचे वाभाडे काढणारे कमी.

रंगरेखा कलेचे-( Graphics) चे जग असते कसे ?

चौकटराजा ·
मानवी देहाला पांच संवेदना इंद्रिये आहेत त्यात त्चचेखालोखाल डोळा हे महत्वाचे संवेदना इंद्रिय आहे. कारण याने पाठविलेले संदेश ग्रहण मेंदूने करून बर्‍याच गोष्टीचे आकलन आपल्याला होत असते. डोळया पेक्षा त्चचेचे स्थान महत्वाचे असायचे कारण परिसराची अधिक महत्वाची माहिती उदा. तापमान त्वचा करून देते हे होय. ज्ञानासाठी मात्र डोळयाचे महत्व अनन्य असे आहे. डोळ्यातील सूक्ष्म रचनेमुळे आपल्याला रंगाचे , मितीचे, व आरेखनाचे ज्ञान होते. या तिन्ही मूलभूत घटकानी मिळून ज्याचे प्रकटीकरण होते त्यास ग्राफिक्स असे म्हणू या.

'स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' (लोकसत्ता - शरद जोशींचे सदर)

गंगाधर मुटे ·

स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे 

                                                                       

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण : एक पांगलेला वृत्तांत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता.

'बीपी' (बालक पालक)

किसन शिंदे ·
लेखनविषय:
लैंगिक शिक्षण! अतिशय नाजुक विषय! आपल्या भारतीय समाजात या विषयावरचं बोलणं मुद्दाम टाळलं जातं. मग इतका संवेदनशील विषय कोणी, कसा आणी कधी शिकवायचा?? साधारण वयाच्या १२-१३ व्या वर्षापासून हे असंही काही असतं याची जाणिव व्हायला सुरूवात होते आणि ते नेमकं काय असतं हे जाणून घ्यायच्या नादात अनेक चुकीच्या गोष्टी मुलांपर्यंत पोहचतात. बरं कुतूहुल म्हणून वाटलेल्या अशा काही प्रश्नांची उत्तरे मोठ्या माणसांकडे विचारायचीही सोय नसते. अशा वेळी पालकांची मानसिकता आड येते.