Skip to main content

माध्यमवेध

चावडीवरच्या गप्पा – ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 24/10/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
आवशीचा घों ह्या रांडेच्या मॅथ्यु हेडनच्या!”, घारुअण्णा भयंकर चिडून आणि लालबुंद होऊन कट्ट्यावर हजेरी लावत. “काय झाले घारुअण्णा आज अचानक!”, नारुतात्या. “अहो शिंचा मॅथ्यु हेडन म्हणतोय सचिनला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ने सन्मानित करू नका”, घारुअण्णा रागाने थरथरत. “अहो घारुअण्णा का शिळ्या कढीला ऊत आणताय?”, इति भुजबळकाका. “नाहीतर काय! काय हो घारुअण्णा रद्दी काढलीत की काय वाचायला? आणि हो, तो तुमचा संध्यानंद सोडून ह्या कसल्या क्रीडा विश्वाच्या बातम्या वाचताय? खी खी खी...”, शामराव बारामतीकरांनी भुजबळकाकांची री ओढली. “हे बघा, अस्मितेचा प्रश्न आहे हा, बातमी जुनी असो की नवी!

चावडीवरच्या गप्पा – मंत्रालयातील आग आणि पाणी सिंचन

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 04/10/2012 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
“अहो बारामतीकर, पाण्यामुळे तर आग विझते ना! पण इथे तर उलटच होतंय, मज्जाच आहे ब्वॉ!”, घारुअण्णा एकदम खुशीत कट्ट्यावर हजेरी लावत. “काय झाले आता?”, कोणीतरी. “अहो, मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे पाणी सिंचन घोटाळा करणार्‍यांचे फावले आहे.”, घारुअण्णा. “काय हो घारुअण्णा, कोणाचा जावईशोध म्हणायचा हा?”, इति शामराव बारामतीकर. “बोलून बोलून बोलणार कोण, उद्धव शिवाय आहेच कोण? असे जाहीर बोलण्याची छाती एका शिवसैनिकाशिवाय कोणाची असू शकते?”, इति बहुजनह्रदयसम्राट भुजबळकाका. “आयला, यू टू भुजबळकाका? ”, शामराव बारामतीकर. “मग काय!

कानसेन कोण? २०१२ क्र. २

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 26/09/2012 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
दहा मिनिटांच्या विश्रामानंतर बहुगुणी आता या पुढील भागाचं आयोजन करतील.
   गाणे क्रमांक विजेता
चिंतामणी+मैत्र
मराठे
चिंतामणी

चावडीवरच्या गप्पा – रिटेल बाजार आणि FDI

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 25/09/2012 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
“हद्द झाली ह्या शिंच्या काँग्रेसची, आता तर काय भारत विकायलाच काढला आहें.”, घारुअण्णा तणतण करीत कट्ट्यावर हजेरी लावत. “तरी म्हटलेच! अजून असे काय कोणी सरकारी निर्णयावर न घसरता पक्षावर तोंडसुख घेतले नाही”, शामराव बारामतीकर. “अहो बारामतीकर, तो तुमच्या पक्षाचा चष्मा काढा आणि उघड्या डोळ्यांनी बघा जरा”, घारुअण्णा जरा चिडून. “अहो घारुअण्णा तुम्ही नेमक्या कोणत्या काँग्रेसबद्दल बोलताय?

चावडीवरच्या गप्पा - प्रमोशन आणि आरक्षण

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 06/09/2012 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
“चिंतोपंत खरे नशिबवान आहात तुम्ही”, नारुतात्या चावडीवर हजेरी लावत. “काय झाले?”, चिंतोपंत बुचकाळ्यात पडत. “अहो काय झाले काय? रिटायर झालात तुम्ही! आमची अजुन आठ वर्षे जायची आहेत. आता काही नशिबात सिनीयर डिव्हीजनल ऑफीसरची पोस्ट नाही. प्रमोशन घेऊन रिटायर होणे हे आता स्वप्नच रहाणार असे दिसतेय”, नारुतात्या हताश स्वरात. “कशाला जीव जाळताय एवढा, व्ही.आर.एस. घेऊन टाका”, शामराव बारामतीकर “त्याने काय होणार आहे शामराव, नोकरीरुपी म्हातारी मरेल पण काळ सोकावतोय त्याचे काय?”, नारुतात्या. “अरे पण झाले काय ते सांगाल का?”, घारुअण्णा काहीच न कळल्यामुळे बुचकळ्यात पडून. “घ्या!

दै. लोकमत आणि 'मिसळपाव'

लेखक पैसा यांनी रविवार, 02/09/2012 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी घरातले काम करताना पेपर वाचला नव्हता. पण सुहास.. ने फोन केला आणि सांगितलं. आजचा दै. लोकमत वाच. त्यातल्या मंथन पुरवणी मध्ये 'मायबोली, मिसळपाव ते साहित्यसंस्कृती' हा लेख आला आहे. मंथन पुरवणीच्या दुसर्‍या पानावरचा लेख वाचला. लेखकाने मराठी संस्थळांचा चांगला परामर्ष घेतला आहे. त्यात आपल्या 'मिसळ्पाव' चा छान उल्लेख आहे (लोगो सकट). शिवाय संस्थळाची लिंकही दिलेली आहे. दै.

चावडीवरच्या गप्पा - असुरक्षित भारत

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 11/08/2012 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
“आता भारत अजिबात सुरक्षित राहिलेला नाही, पुण्यात बॉम्बस्फोट... चक्क पुण्यात!”, चिंतोपंत, उत्तर भारत सहलीमुळे बर्‍याच दिवसांनी कट्ट्यावर हजेरी लावत. “काय म्हणता!

शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत

लेखक भरत कुलकर्णी यांनी शनिवार, 11/08/2012 05:13 या दिवशी प्रकाशित केले.
शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत
नमस्कार श्रोतेहो. आज आपल्या स्टूडीओमध्ये ग्रामीण भागातले शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी आलेले आहेत. त्यांच्या कादंबर्‍या, लेख, कथा, निबंध प्रसिद्ध आहेतच तसेच कवितांचे पीक ते जोमाने दर हंगामात घेतात. पंचक्रोशीतील इतर शेतकवी त्यांच्या उत्पादनातून नेहमीच प्रेरणा घेत आलेले आहेत. त्यांच्या शेतसाहित्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.

जीवनव्रती...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 03/08/2012 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणातला मंडणगड तालुका म्हणजे एकेकाळी सरकारी नोकरांसाठी `अंदमान'! इथे बदली होणं ही शिक्षा समजली जायची. याच तालुक्यातल्या हजारभर वस्तीच्या घराडी गावातली ही कथा. रायगड जिल्ह्य़ात उरण गावातली शाळा आजही `किनरे गुरुजींची शाळा' म्हणून ओळखली जाते. गावातल्या पालकांनी मुलांना शाळेत पाठवावं म्हणून किनरे गुरुजींनी घरोघर अक्षरश: वणवण करून पटसंख्या जमविली. ९० मुलांनिशी सुरू झालेल्या या शाळेत आज चार हजार मुलं आहेत. किनरे गुरुजींचं शाळेशी असलेलं नातं आजही शाळेनं जपलंय. किनरे गुरुजींच्या पत्नीचं माहेर घराडीतलं. वागळ्यांकडचं. माहेरचं हे घर किनरे यांच्या पत्नीला मिळालं होतं.

चावडीवरच्या गप्पा - साहित्य संमेलने आणि सरकार

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 01/08/2012 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
“सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असे पुन्हा विचारायची वेळ आली आहे”, घारूअण्णांनी तणतणत चावडीवर हजेरी लावली. “ऑ?”, नारुतात्या. “अहो, सरकार संवेदनाशून्य झाले आहे. समाजाची सांस्कृतिक जडणघडण नावाची काही चीज आहे की नाही? साहित्यिकांची कदर राहीलेली नाही”. घारूअण्णांचा तांबडा चेहेरा लालेलाल झाला होता. "अहो काय झाले ते सांगाल का? का उगाच सकाळी सकाळी घशाच्या शिरा ताणताय!", इति नारुतात्या. “अहो साहित्य संमेलनाविषयी काही जिव्हाळा नाही ह्या सरकारला. साहित्य संमेलनं म्हणजे मराठी भाषेची शान. त्याला अनुदान देणे कर्तव्य आहे सरकारचे, नव्हे, तो साहित्यविश्वाचा हक्कच आहे ”, घारुअण्णा.