आपण देशाबाहेर, आपल्या गावाबाहेर पडलो की नेहेमीच तिथल्या खादाडीची आठवण काढत असतो! मलाही इथे राहून सतत वैशाली, श्रेयस, अभिषेक,गार्डन कोर्ट..... जाऊदे सगळी लिस्ट नाही लिहीत इथे.. पण या सगळ्यांची सतत आठवण होत असते.. पण इथेही काही खायला मिळत नाही असं थोडीच आहे?
इथेही अशी अनेक ठीकाणं आहेत, काही स्पेशल डिशेस आहेत ज्या मला खूप आवडतात.. त्यांची ही कथा!
(अमेरिकेत नसणार्यांना हा लेख असंबद्ध वाटेल, कारण सगळे इथले लोकल रेफरन्सेस आहेत या लेखात.. मात्र पक्क्या खवैय्यला या गोष्टिने काही फरक पडणार नाही असे वाटते.. आणि इथे नक्कीच खवैय्ये आहेत असं माझं मत असल्याने हा लंबाचौडा लेख तुमच्या भेटीला!! ...