बिल्लु ( ) ... परीक्षण .......सुसह्य ( संशयाचा फायदा...)
मी जालावरची चित्रपटाची परीक्षणे वाचत नाही फारशी... पण टीव्हीवरती काही चॅनलवरती या चित्रपटाविषयी संमिश्र परीक्षणे पाहिली, काही समीक्षकांनी चित्रपटाला मजबूत झोडलेलाही पाहिले..... त्यामुळे चित्रपटाविषयी अपेक्षा आधीच कमी झालेल्या होत्या.... तरीही एका मित्राच्या आग्रहाने सिनेमा पहायचा योग आला...
... अपेक्षा अगदीच खाली असल्याने मला चित्रपट आवडला, असा निष्कर्ष मी काढला.......
....प्रियदर्शनचा सिनेमा म्हणजे कुठल्याशा मल्याळम किंवा तमिळ सिनेमाची फ्रेम टू फ्रेम कॉपी असणार हे खरंच... तसंच आहे...
गोष्ट साधीच...
मिसळपाव