Skip to main content

युद्धावरील काही चित्रपट

लेखक दिपक यांनी शुक्रवार, 13/03/2009 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या एक भुत चढलं आहे युद्धावरील चित्रपट (वॉर मुव्हीज) पाहण्याचे. जे मिळतील चांगले असतिल ते पाहतोय. समिक्षण आणि परिक्षण मधले मला घंटा कळत नाही. तरीसुद्धा जे आवडले ते इथे मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय. सेव्हींग प्रायव्हेट रायन(Saving Private Ryan) -- स्टीवन स्पीलबर्गचे अप्रतिम दिग्दर्शन ह्या चित्रपटाला टॉप वॉर चित्रपटाच्या पक्तींत बसवते. चित्रपट पाहताना आपणही चित्रपटातील एक आहोत आणि लढाई स्वत: डॊळ्याने पाहतोय असे भासते, चित्रपटातील सुरुवातीचा प्रसंग अगांवर काटा आणतो.

वर्षाव अमृताचा..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 12/03/2009 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
कंपीत गात्र होई तू छेडिल्या सुरांनी श्वासात खोल जाई मिसळून रातराणी बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे क्षितिजास अन पहाटे ही चंद्रिका दिवाणी उठती अनेक हलके हलके तरंग कोठे गंधीत रात्र होई घुमवीत धुंद गाणी आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी (हळुवार मंद होई हा दीप तेवणारा वारा तशात गाई बेधुंदशी स्वराणी) वितळून या क्षणी मी माझीच ना उरावे उजळून जात काया, लावण्य हे नुराणी घेई टिपून हलके हे क्षण यौवनाचे दृष्टीस आज सांगे बघ मौन होत वाणी हलकेच गूज सांगे ती रात्र पांगताना बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी वर्षाव अमृताचा ..

फ्रॉस्ट्/निक्सन

लेखक शब्देय यांनी गुरुवार, 12/03/2009 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रॉस्ट्/निक्सन हा यंदाच्या ऑस्करसाठी नामांकन मिळवलेल्या चित्रपटांपैकी एक. यावेळी अगदी ठरवून सगळे ऑस्कर नामांकीत चित्रपट एक एक करुन पाहिले. ( अर्थात चित्रपट एक एक करुनच पाहतात...एकदम सगळे कुणी नाही पाहतं कारण ठसका लागतो.. जमल्यास ह.घ्या. न जमल्यास असो.) फ्रॉस्ट्/निक्सन बद्द्ल मी बरेच गैरसमज करुन घेतले होते. प्रोमो पाहून ही कोण्या एका फ्रॉस्ट् ने निक्सनच्या घेतलेल्या मुलाखतीची एक डॉक्युमेंटरी असावी असा आपला मी एक पूर्वग्रह करुन घेतला होता. निक्सनच्या वॉटरगेट प्रकरणाबाबतचे माझे (अ)ज्ञानही राजकारणी लोकांनी केलेला एक झोलझाल इतपतच मर्यादित होते.

'ग्रॅन टोरिनो' - आ़जोबांची शिकवण!

लेखक मुशाफिर यांनी बुधवार, 11/03/2009 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
क्लिंट ईस्टवूड हा माझ्या फार आवडत्या कलाकारांपैकी एक. खुप लहान असताना माझ्या मोठ्या मामेभावाने 'द गुड द बॅड ऍंड द अगली' हा त्याचा चित्रपट दाखवून ह्या कलाकाराशी माझी पहीली ओळख करून दिली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्याच्याविषयीचा आदर वाढतच गेला आहे. त्याच्या सुरवातीच्या काळातील 'मारधाड' किंवा 'वेस्टर्न' चित्रपटातील त्याची असलेली प्रतिमा लक्षात घेता, त्याचे अलिकडील चित्रपट उदा. 'मिलियन डॉलर बेबी', 'चेंजलिंग', 'लेटर्स फ्रॉम इवो जिमा' इ. हे फारच वेगळे आहेत. एका संवेदनशील कलाकाराची ते साक्ष देतात (यातील काही चित्रपटात त्याने स्वतः काम केलेले नाही तर ते दिग्दर्शित केले आहेत/निर्मिले आहेत).

मोत्झार्टचे शांतिस्तवन (रेक्विएम)

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 10/03/2009 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच बॉल्टोमोर सिंफनी ऑर्केस्ट्रा आणि बॉल्टिमोर कोरल आर्ट्स सोसायटी यांनी एकत्र सादर केलेला कार्यक्रम ऐकायचा योग आला. त्यांनी मोत्झार्टचे रेक्विएम (मृतात्म्यासाठी शांतिस्तवन) सादर केले. या संगीताबद्दलची दंतकथा काही लोकांनी हॉलिवुड-निर्मित "आमादेउस" चित्रपटात बघितली असेलच - तीत कल्पनारम्यता फार आणि तथ्य फार कमी आहे. त्या चित्रपटात मोत्झार्टचा द्वेषयुक्त भक्त त्या काळातला संगीतकार सालिएरी होता, आणि त्याने मोत्झार्टच्या बापाच्या भुताचे सोंग घेऊन भावनिक दडपणाखाली हे संगीत मोत्झार्टकडून लिहून घेतले, अशी काही कथा आहे.

पु.ल. एक साठवण

लेखक एकशुन्य यांनी मंगळवार, 10/03/2009 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, असा एकही मराठी माणुस नसेल, ज्याच्या मनात पु. ल. म्हणताच त्यांची एकाधी ओळ , एखादे पुस्तक किंवा त्यांचे मिस्किल हसू उमटणार नाही. अश्या पु.ल. वेड्या सर्वांसाठी हे संकेतस्थळ देत आहे. पु.लं. चे मजेदार किस्से, पु.लं. ची छायाचित्रे , त्यांचे विचार ह्या एका ठिकाणी मिळ्तील. संकेतस्थळाचे सर्व श्रेय त्याच्या मालकाला आहे. मी फक्त एक हास्यदुताचे काम करित आहे. भरपुर हसा आणि भरपुर जगा. संकेतस्थळः "http://cooldeepak.blogspot.com"

कधी येणारगं तू सखये

लेखक अडाणि यांनी सोमवार, 09/03/2009 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी वारा वाहता मेघदूत नी गारा होत्या मन माझे मग काहूरते कधी येणारगं तू सखये झाडावरचा राऊ मजला हळुच घालतो शीळ स्वरांची जाणुनबुजूनी माझ्याभोवती आठवण करीतो तुझ्या सुरांची रवीराज तो गहीवरलेला सांजवेळी बहरत होता मुक्तहस्ते तळ्याकिनारी तुझा रक्तिमा वाटत होता कोपरावरच्या वळणावरती मोगराही बहरलाय माझ्या वेड्या जिवाबरोबर तो ही तुझ्यासाठी आतुरलाय एक नभ जो जाई सुसाट वाटे तयावर स्वार होउनी मी यावे ऊडीनी अलगद कुशीत तुझया एक क्षणिक सरूनी जाते संध्याकाळ तुझ्या आठवणित नकळत मन माझे मग काहूरते कधी येणारगं तू सखये - अडाणि.
Taxonomy upgrade extras

लेक होती घरामध्ये--

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 09/03/2009 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेक होती घरामध्ये दारी गजबज होती लेक सासरी गेली अन सुनी झाली ही ओवरी लेक नटते थटते हौस पुरविते आई आत्ता संक्रांतीची मेंदी कशी रंगतच नाही गौर पुजतसे माय जणु लेकच साजिरी दोन दिवस पाहुणी लेक येतसे माहेरी बाप कणखर मोठा जीव गुंते लेकीपाशी सारा मानमरातब ठेवी लेकीच्या दाराशी लेक सुखात सासरी सुखी माहेरी माउली काय भाग्य त्या लेकीचे सासरी आईची सावली
Taxonomy upgrade extras

पुस्तक परिचय- नर्मदे हरं हरं (जगन्नाथ कुंटे)

लेखक चाणक्य यांनी रविवार, 08/03/2009 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच जगन्नाथ कुंटे यांचं 'नर्मदे हरं हरं' हे पुस्तक वाचलं. भन्नाट आहे. नर्मदा परिक्रमा करताना लेखकाला आलेल्या अनुभवांवर त्यांनी हे पुस्तक लिहीले आहे. जगन्नाथ कुंटे यांनी १९९९ पासून नर्मदा परिक्रमा करायला सुरुवात केली. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, "सद्गुरुंची आज्ञा झाली आणि निघालो. "जगन्नाथ कुंटे म्हणलं तर एक सामान्य माणूस, म्हणलं तर एक अवलिया. सिगरेट आणि चहा ही विशेष आवड. देव देव करीत बसत नाहीत, पण अध्यात्मात गती फार. त्यांनी एकूण ४ परिक्रमा केल्या आहेत, त्यापैकी पहिल्या ३ परिक्रमांदरम्यान आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहीले आहेत. भारतामधे वर्षानुवर्षे लोक नर्मदा परिक्रमा करत आहेत.