Skip to main content

कृष्णमय--

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 23/03/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
गोरी राधा हरी सावळा अव्दैताचा रम्य सोहळा सगुण होउनी सखा श्रीहरी सहज छेडतो मुग्ध बासरी राधा तोचि तोच बासरी मनात तोचि तोच अधरी स्वरातूंन तो तोच सुरांतून हरी खेळतो कणाकणातून गोप्-गोपिका तोच र्निमितो वेड लावुनी रास खेळतो होउन यमुना धुंद वाहतो हरी सावळा हरी रहतो त्रिगुणात्मक तो तोच गुणातीत विश्वात्मक तो तोच कणातीत तोच लिहीतसे माझे हे गीत श्रीहरी चरणी नित्य समर्पित
Taxonomy upgrade extras

दिलीप प्रभावळकरांनी साकारलेल्या माझ्या आवडत्या भूमिका... भाग एक

लेखक भडकमकर मास्तर यांनी शनिवार, 21/03/2009 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिलीप प्रभावळकर म्हणजे एकदम भन्नाट चतुरस्त्र अभिनेता.रंगमंच, टीव्ही, सिनेमा सर्व माध्यमांमध्ये ते लीलया वावरले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. dilipprabhawalkar.com या त्यांच्या संस्थळावरती त्यांच्या सर्व भूमिकांचा तपशील उपलब्ध आहे. त्यातली बरीचशी नाटके पाहिली आहेत... प्रत्यक्ष आणि व्हिडिओवरती. त्यांनी लिहिलेले ’एका खेळियाने’ हे त्यांच्या भूमिकांबद्दलचे आत्मकथनपर पुस्तक नुकतेच वाचले... परत परत वाचले.आधी त्या पुस्तकाची ओळख करून देणारा लेख लिहिणार होतो. ( हे पुस्तक म्हणजे अभिनय प्रवासाची कथा आहे.

कृष्णमयी..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 19/03/2009 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन त्या दुपारी, कालिंदीच्या तिरी खेळतो मुरारी, पाठशीव.. हसत खेळत, अल्लड गोपिका अव्खळ राधिका, कान्हा पाही.. घट डोईवर, चाले भराभर नदी तीरावर, पाण्यासाठी.. भरूनिया कुंभ, घेता डोईवर खडा घटावर, ट्णकारला.. भिजुनिया चिंब, शहारे सर्वांग निरखे श्रीरंग, राधिकेला.. चोरून ती उभी, अव्घड ओलेती सावळ्याची मिठी, अंगभर.. मिटले नयन, सुटला पदर थरारे अधर, चुंबताना.. म्हणा कृष्णसखी, अथवा सानिका झाली ही राधिका, कृष्णमयी.. पावरीचा सूर, आज दूर दूर प्रणयाचा पूर, गोकुळात.. - प्राजु वि. सु. = अव्खळ , अव्घड हे मात्रा सांभाळण्यासाठी लिहिले आहे.
Taxonomy upgrade extras

आई-बापच लेकरु पंख फुट्ल पाखरु

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 17/03/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
आई-बापच लेकरु पंख फुट्ल पाखरु दूर उडुनिया गेल संगे काळीजही नेल बाळ होता इवलासा केला जीवाचा हिंदोळा पापणीच्या पंखावर त्यांनी बाळाला ठेवला त्याची गरुडाची झेप जग कवेमध्ये आल कसा विसरला बाळा बळ पंखाना दिलेल घार हिंड्ते आकाशी लक्ष्य तिचे पिलापाशी पिलु उड्ता आकाशी घार एकटी घराशी दिसु लागे पैलतीर पिलु दुरच्या आकाशी वाट पाहते नजर घोर लागला जीवासी कारे उमजेना बाळा वेडी माया माउलीची पिलु तुलाही होउदे ओढ कळेल आईची हाती नक्षत्र धराव मागे परत फिराव माउलीच्या चोचीतल दांण प्रेमाने टिपाव
Taxonomy upgrade extras

आणखी एक निवांत, मोकळा वीकांत

लेखक बेसनलाडू यांनी सोमवार, 16/03/2009 06:01 या दिवशी प्रकाशित केले.
सुनीलरावांचा एक निवांत, मोकळा वीकांत वाचून आम्हांला - म्हणजे नाटक्या, अस्मादिक आणि बबलु हे मिपाकर - आमचा गेला वीकांत आठवला - अशीच निवांत, मोकळी शनिवारची संध्याकाळ. "वीकेन्डला काय करतो आहेस?" आठवड्याच्या मध्यावर नाटक्याचा फोन आलेला. "हापिसात नसलो तर मोकळा असेन; पण शक्यता अंधुक आहे" मी. "बबलुच्या घरी कॉक् टेल् पार्टी करायचा बेत आहे. बरेच दिवसात आपली भेटही झालेली नाही. ब्याचलर् पार्टी करू ;)" नाटक्या (सौ.

अंधारातले सिऍटल (कॅमेरा व ईतर माहिती सह)

लेखक शारंगरव यांनी सोमवार, 16/03/2009 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मि. पा. वरिल पहिला प्रयत्न कॅमेरा: सोनि अल्फा ए २०० , लेन्सः १८-७० (२८ मि.मि. ला सेट) कॅमेरा: सोनि अल्फा ए २०० , लेन्सः १८-७० (७० मि.मि. ला सेट) कॅमेरा: सोनि अल्फा ए २०० , लेन्सः ७५-३०० (७५ मि.मि.

एप्रील फळ (१०)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 14/03/2009 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
या पूर्वीचे दुवे http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६)

रसराजेश्वर..!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 13/03/2009 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
साला, मुक्तछंदातल्या आमच्याही या काही ओळी.. मार्च अर्धा संपला जवळजवळ! तो आता येणारे, तो येतोय, येऊ घातलाय..! चला त्याचं स्वागत करुया, सज्ज राहूया, गुढ्यातोरणं उभारून! तो राजा आहे, तो बादशहा आहे तो सम्राट आहे..! तो साक्षात चक्रवर्ती आहे..! तो माणसाला माणूस जोडतो, तो मनातले सारे विकार करतो नाहीसे एका क्षणात.. तो वाटतो फक्त प्रेम