Skip to main content

((देवानं विडंबकांना असं का बनवलं?))

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 29/03/2009 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
(मूळ प्रेरणा : मिपा वरील समस्त विडंबने) देवानं विडंबकांना असं का बनवलं? दिसली कविता की तिला झोडावं सगळ्याच विडंबनायोग्य वाटतात पण मिपाकरांना उठसूट वेठीला का धरावं? कधी गळे दाबावे, कधी छाताडावर नाचावे प्रत्येक विडंबन का इतके अवगुणी? दळभद्री मेली प्रतिभा, एकीवर बसत नाही दर पाच धाग्यांनंतर यांचीच तुणतुणी! कुणी हसून प्रतिक्रिया देतं कुणी नाइलाजानं कौतुक करतं कुणी शालजोडीतले हाणत असते पण "जनाची ना मनाची' तरी यांना कुठे असते? कुणी "लिहू नका' सुचवू पाहतं क्वचित कुणी थेट हल्ला करतं किती प्रकारे त्रास दिला, तरी विडंबनाच्या व्यसनात मन फसतं सगळ्याच कविता विडंबनयोग्य असतात? "नको नको' म्हणूनही विडंबने

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या स्क्रीनसेव्हरचे प्रकाशन

लेखक सागर यांनी शुक्रवार, 27/03/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा.... चैत्र शुद्ध प्रतिपदा , शके १९३१ (२७ मार्च २००९) छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्दैवत आराध्य दैवत. तर अशा या आराध्याच्या चरणी पुण्यातील संगणक सॉफ्टवेअर कंपनी संकेतस्थळ.कॉम च्या सौजन्याने छत्रपतींच्या जीवनावर आधारीत अशा अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याकरिता शिवमुद्रा.कॉम (http://www.shivamudra.com/) हे संकेतस्थळ आकारास आले आहे. हे संकेतस्थळ छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुरु करण्याची योजना आहे. या संकेतस्थळाने सुरु होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांवर मराठीतील पहिलाच स्क्रीन-सेव्हर प्रकाशित केला आहे.

दि ड्रॉईंग्ज इन बोरिंग ट्रेणिंग !!

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 27/03/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स !! , णव्या जॉब ला जॉईन झालो .. गेले आठवडा झाले ट्रेणिंग णावाचा एक माहा बोरिंग कार्यक्रम चालू आहे .. अस्मादिक जरा दिडशहाणे असल्याने त्यांना कसल्याही ट्रेणींगची गरज वाटत नाही ... हे आपल्यासाठी नाहीच असे समजून अस्मादिक झोपा झोडणे , कमेंट पास करणे , विंडोज स्पायडर (पत्त्यांचा गेम) खेळणे .. इत्यादी कामे करून बाकी पेंगू लागलेल्या पब्लिक्स ला चैतण्य देण्याचं एक मोलाचं काम देखिल करतात ! अशाच एका बोरिंग सेशण मधे हि कलाकृती संगणकावर (एमेस पेंट) खरडण्यात आले !~~! अर्थात टाईमपास आहे ..

नववर्षाच्या शुभेच्छा आणि एका नविन उपक्रमाची सुरुवात.

लेखक रामदास यांनी गुरुवार, 26/03/2009 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या एका नविन वर्षाची सुरुवात होते आहे. शुभेच्छा.मिपावर गेल्या वर्षभरात बरेच नविन प्रयोग वाचायला -बघायला मिळाले.एक कमतरता कायम वाटत होती ती म्हणजे व्यंगचित्रांची.चित्रकार छायाचित्रकार आहेत पण व्यंगचित्रकार नाहीत असे वाटत होते.आजचा प्रयोग आहे तो ही पोकळी भरून काढण्यासाठी.मला आवडलेली बरीचशी व्यंगचित्रे मी संग्रहात ठेवली आहेत. यापैकी काही व्यंगचित्रे आपल्यापुढे ठेवतो आहे.या कलाकृती माझ्या नाहीत.बर्‍याचशा इंग्रजी मासीकातून घेतलेल्या आहेत.मला अपेक्षीत आहे तो प्रयोग असा. जुने व्यंगचित्र नविन चित्रकारानी परत तयार करावे.जुने गाणे नविन आवाजात रेकॉर्ड करतात तसेच.

(आज तुझा वाढदिवस )

लेखक दशानन यांनी गुरुवार, 26/03/2009 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
निखिल देशपांडे ह्यांची ही कथा वाचल्यावर असेच मनात आले जर निखिल च्या जागी मी असतो तर कशी लिहली असती ही कथा, निखिल देशपांडे ह्यांची परवानगी घेऊन मी ही त्याची कथा परत लिहीली आहे माझ्या शब्दात. _________________________________________________ आज तिचा वाढदिवस......... काल सकाळी उठुन ऑफिसला पोहचायचे होते, पण सोमवार रात्री घेतलेल्या एक्स्ट्रा पॅग मुळे उठण्यासाठीच उशीर झाला

वक्तृत्वाचे कथन..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 25/03/2009 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रमोद काकांच्या कडून प्रेरणा घेऊन.. नमस्कार मंडळी, सगळे जण बालपणीच्या आठवणी सांगताहेत. जुने दिवस सांगताहेत. मग आम्हीही होतोच की लहान.. आम्ही ही बालपण अनुभवलेलं आहेच. भलेही ते व्हेळ्यातल्या दिवसांइतकं थ्रिलिंग नसेल किंवा प्रमोद काकांच्या गीतापठणा इतकं सुरेल आणि खणखणीत नसेल.. पण म्हणून काय आम्ही आमच्या बालपणाच्या आठवणी सांगूच नये की काय्..(पु.लंच्या असामी असामी तल्या "आत्मचरित्र लिहूच नये की काय" च्या चालीत) असो.. !!! तर मंडळी मी एकदा लहान होते.. म्हणजे लहान होते तेव्हा मी नेहमी शाळा-शाळा खेळताना शिक्षिका असायचे आणि बाकी मित्र मंडळ विद्यार्थी. म्हणजे तसा तो अलिखित्(मीच केलेला) नियमच होता.

माझे महान प्रयोग - २

लेखक दशानन यांनी मंगळवार, 24/03/2009 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
माझे महान प्रयोग - १ मागील भाग. सकाळ : ७.१५ मिनिटे नंतर टाईम आसपास ग्रहीत धरा. सतबीरला काल सुट्टी घे म्हणून सांगतले होतेच, त्यानुसार तो सकाळ पासूनच गायब होता + फ्रिज मधील बियर चे कॅन पण. चहाची तलफ होती, त्यामुळे उठल्या उठल्या सरळ किचन मध्ये प्रवेश केला, वरुन कोणीतरी फुले टाकत आहे.. दुरवर कुठे तरी जय हो जय हो चा घोष चालू आहे, कोणी तरी सुगंधी द्रव्य शिपंडत आहे असा काही तरी भास मला जेव्हा मी प्रथम काहीतरी निर्माण करण्यासाठी किचन मध्ये प्रवेश करताना झाला ! माझ्या मते चहा ही एक सोपी कृती आहे, चहा पावडर, साखर व दुध !

द हॅपनिंग...

लेखक भाग्यश्री यांनी मंगळवार, 24/03/2009 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी जास्वंदीचे फळ ही कथा वाचनात आली.. त्या कथेची एकंदरीत कन्सेप्ट, व तिथले प्रतिसादांवरून कळले की द हॅपनिंग मधे असंच काहीसं आहे.. तेव्हापासून तो पाहायचाच होता.. परवा रात्री पाहीला.. काहीतरी होतं, सगळे नाहीसे होतात.. म्हणजे स्वत:ला मारून घेतात.. असं काहीतरी होतं या पिक्चरमधे आणि तो नाईट श्यामलनचा पिक्चर आहे, याव्यतिरिक्त काहीएक माहीत नसताना लावला.... SPOILER : (ज्यांनी पाहीला नाहीये हा मुव्ही, त्यांनी रहस्यभेद न होण्यासाठी पुढे नाही वाचलं तर खरं म्हणजे बरं पडेल..