Skip to main content

चैत्रगौर

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 09/04/2009 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्रगौरीचं हळदीकुंकू करायचंय, सगळ्या सुगरण ताया स्वैपाकघरात गुन्तल्या, तेव्हा म्हटलं, आपण लिम्बू-टिम्बू कंपनीनं गौर सजवावी.

२१ - परीक्षण

लेखक विकास यांनी गुरुवार, 09/04/2009 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
काही आठवड्यांपुर्वी 21 नावाचा एक २००८ साली काढलेला चित्रपट अचानक पहाण्यात आला. त्या कथेचे मूळ असलेली सत्य घटना बॉस्टनशी म्हणजे एम आय टी शी संबंधीत असल्याने कधीतरी ऐकली होती. केवीन स्पेसी हा आवडता नट असल्याने बघुया तरी म्हणत आम्ही बघायला बसलो आणि बर्‍याच दिवसांनी मनोरंजनासाठी काहीतरी नवीन पहायला मिळाले असे वाटले.

गणपतीपुळे आणि मार्लेश्वर

लेखक दिपक यांनी बुधवार, 08/04/2009 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या विकांताला मार्लेश्वर आणि गणपतीपुळ्याला मित्रमंडळीबरोबर गेलो होतो.

फुलोरा..(माझ्या चाली सकट)

लेखक प्राजु यांनी सोमवार, 06/04/2009 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ुलोरा... केशराचा गंध ओला शोधते खुणांखुणांतून.. आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. चांदव्याला जाग आली की निशेला लाज आली का उषेच्या उंबर्‍याशी, रे उभी ओठंगुनी ती?? चांदणे मी शिंपले रे माझिया कणांकणांतून.. आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. दाट झाली सावली ती, तारकांच्या सांजवाती अमृताचे थेंब ओठी, चंदनी गंधीत राती पाकळ्यांचे चिंब गाणे वेळूच्या बनांबनांतून आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. वादळी आवेग सारा, तप्त श्वासांचा पसारा मखमली ओला शहारा, धुंदला एकांत सारा मीलनाची गंधसुमने वेचते क्षणांक्षणांतून.. आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. - प्राजु इथे ऐका कृपया न हसता..!

कविता पूर्ण करा...

लेखक प्राजु यांनी बुधवार, 01/04/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
सहज या दोन ओळी सुचल्या.. कोणाला ही कविता पूर्ण करावी वाटली तर जरूर करावी. कोणाला दुसरे कडवे सुचले तर लिहावे. ही कविता पूर्ण करण्यांस मदत करावी. या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..? - प्राजु

सावत्र आई २- चित्रपट प्रसंग

लेखक टायबेरीअस यांनी मंगळवार, 31/03/2009 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपुर्वी 'Stepmom' नावाचा चित्रपट आला होता. त्यातील एक प्रसंग चटका लावून जातो.. थोडक्यात कथा सांगायची तर नवरा बायको विभक्त होतात.. २ मुलं, - एक मुलगा, एक मुलगी.. मुलगी 'वयात' येऊ घातलेली.. दोघांच्या 'डिवोर्स' नंतर नवरा अजून एकीच्या प्रेमात पडतो आणि ते दोघं लग्न करतात. 'नवीन' सावत्र आई आपल्या परीने मुलांना प्रेम द्यायचा खूप प्रयत्न करते पण मुलगी तिला झिडकारत असते. पहिल्या बायकोलाही ती फारशी आवडत नसते.. दिवस जातात.. पहिल्या बायको ला कान्सर होतो आणि नाईलाजाने ती मुलीची 'जबाबदारी' सावत्र आईवर टाकते.

एक प्रसंग, दोन कवी आणि दोन कलाकृती

लेखक सुनील यांनी सोमवार, 30/03/2009 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे? कचेरीत जाता-येताना गाणी ऐकणे हा माझा एक आवडता छंद. गाण्यांचे दोन संच आहेत. एक संच आहे जलद, उडत्या चालींतील गाण्याचा. अशी गाणी सकाळी कचेरीत जाताना ऐकली की, काम करायला जणू दुप्पट उत्साह येतो! आणि दुसरा संच आहे तो शांत, संथ लयीतील गाण्यांचा, जी रात्री घरी परतताना ऐकायला खूप बरी वाटतात! असंच परवा येताना हे गाणं लागलं होतं. हृदयनाथांचे संगीत आणि आशाबाईंचा आवाज हे दोन्ही श्रवणीयच परंतु त्याहीपेक्षा जास्त भावते ती भटसाहेबांची समर्थ लेखणी. यायला उशीर होणार हे माहीत होतेच.