सहज या दोन ओळी सुचल्या.. कोणाला ही कविता पूर्ण करावी वाटली तर जरूर करावी. कोणाला दुसरे कडवे सुचले तर लिहावे.
ही कविता पूर्ण करण्यांस मदत करावी.
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?
- प्राजु
काही वर्षांपुर्वी 'Stepmom' नावाचा चित्रपट आला होता. त्यातील एक प्रसंग चटका लावून जातो..
थोडक्यात कथा सांगायची तर नवरा बायको विभक्त होतात.. २ मुलं, - एक मुलगा, एक मुलगी.. मुलगी 'वयात' येऊ घातलेली.. दोघांच्या 'डिवोर्स' नंतर नवरा अजून एकीच्या प्रेमात पडतो आणि ते दोघं लग्न करतात. 'नवीन' सावत्र आई आपल्या परीने मुलांना प्रेम द्यायचा खूप प्रयत्न करते पण मुलगी तिला झिडकारत असते. पहिल्या बायकोलाही ती फारशी आवडत नसते..
दिवस जातात.. पहिल्या बायको ला कान्सर होतो आणि नाईलाजाने ती मुलीची 'जबाबदारी' सावत्र आईवर टाकते.
तरुण आहे रात्र अजुनी,
राजसा निजलास का रे?
कचेरीत जाता-येताना गाणी ऐकणे हा माझा एक आवडता छंद. गाण्यांचे दोन संच आहेत. एक संच आहे जलद, उडत्या चालींतील गाण्याचा. अशी गाणी सकाळी कचेरीत जाताना ऐकली की, काम करायला जणू दुप्पट उत्साह येतो! आणि दुसरा संच आहे तो शांत, संथ लयीतील गाण्यांचा, जी रात्री घरी परतताना ऐकायला खूप बरी वाटतात!
असंच परवा येताना हे गाणं लागलं होतं. हृदयनाथांचे संगीत आणि आशाबाईंचा आवाज हे दोन्ही श्रवणीयच परंतु त्याहीपेक्षा जास्त भावते ती भटसाहेबांची समर्थ लेखणी.
यायला उशीर होणार हे माहीत होतेच.
(मूळ प्रेरणा : मिपा वरील समस्त विडंबने)
देवानं विडंबकांना असं का बनवलं?
दिसली कविता की तिला झोडावं
सगळ्याच विडंबनायोग्य वाटतात
पण मिपाकरांना उठसूट वेठीला का धरावं?
कधी गळे दाबावे, कधी छाताडावर नाचावे
प्रत्येक विडंबन का इतके अवगुणी?
दळभद्री मेली प्रतिभा, एकीवर बसत नाही
दर पाच धाग्यांनंतर यांचीच तुणतुणी!
कुणी हसून प्रतिक्रिया देतं
कुणी नाइलाजानं कौतुक करतं
कुणी शालजोडीतले हाणत असते
पण "जनाची ना मनाची' तरी यांना कुठे असते?
कुणी "लिहू नका' सुचवू पाहतं
क्वचित कुणी थेट हल्ला करतं
किती प्रकारे त्रास दिला, तरी
विडंबनाच्या व्यसनात मन फसतं
सगळ्याच कविता विडंबनयोग्य असतात?
"नको नको' म्हणूनही विडंबने
नमस्कार मित्रांनो,
आज गुढीपाडवा.... चैत्र शुद्ध प्रतिपदा , शके १९३१ (२७ मार्च २००९)
छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्दैवत आराध्य दैवत.
तर अशा या आराध्याच्या चरणी पुण्यातील संगणक सॉफ्टवेअर कंपनी संकेतस्थळ.कॉम च्या सौजन्याने छत्रपतींच्या जीवनावर आधारीत अशा अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याकरिता शिवमुद्रा.कॉम (http://www.shivamudra.com/) हे संकेतस्थळ आकारास आले आहे. हे संकेतस्थळ छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुरु करण्याची योजना आहे. या संकेतस्थळाने सुरु होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांवर मराठीतील पहिलाच स्क्रीन-सेव्हर प्रकाशित केला आहे.