Skip to main content

धम्माल पिक्चर बोक्या सातबंडे

लेखक यन्ना _रास्कला यांनी रविवार, 19/04/2009 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
कालच मस्त पिक्चर पाह्यल. बोक्या सातबंडे. घरच्या सर्व लोकान्ला घेउन मुद्दाम होउन पाहन्यासारखा पिक्चर आहे तो. बच्चे कंपनीला तर फारच आवडेल पण मोठ्या माणसान्ला पन आवडेल.

पौर्णिमा

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 17/04/2009 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
काव्य विभागातल्या पौर्णिमा पाहून {वाचून} मला माझी पौर्णिमा खुणावू लागली. थोडी वेगळी पौर्णिमा. हाकारले फुलांनी अंगार शोधताना मज पौर्णिमा गवसली अंधार शोधताना एकेक पाकळीचा एकेक सूर झाला हरपून भान गेले गंधार शोधताना माझ्यापुढे खुली ही झाली कुबेरनगरी, माझ्याच अंतरीचे भांडार शोधताना डोळ्यांत दाटलेले ते भाव मूर्त झाले नाकारण्यात दडला स्वीकार शोधताना खुलली अजाणता ती विश्वातली रहस्ये, सगुणात निर्गुणाचा आकार शोधताना मी, सावळ्या अरूपाची ब्रम्हलीन छाया झाले तपस्विनी का संसार शोधताना?

वादळवारा

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 17/04/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो अंदाजे तासी ६०-७० च्या ही पेक्षा वेगाने वारा वाहत होता, स्थळ : फार्म हाऊस, मानेसर, गुडगांव.

जयंती स्मरण - श्री श्री चार्ली चाप्लिन

लेखक टायबेरीअस यांनी गुरुवार, 16/04/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
१६ एप्रिल . चार्ली चाप्लिन यांची जयंती. पु. लं. चे दैवत याहून काही अधिक लिहिणे आहे काय? परंतु यानिमित्ताने चार्ली च्या कलाकृतींचा रसास्वाद मिपा वर व्हावा ही इच्छा!

माझी भटकंती - ओहाय (Ojai)

लेखक भाग्यश्री यांनी बुधवार, 15/04/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूप दिवसांनी निवांत वेळ मिळाला.. म्हटलं आज काहीतरी छान , वेळ काढून, नीट लिहावे.. आता ते छान झालं की नाही माहीत नाही..! पण मन लावून लिहीतीय.. नेहेमी लिहीताना इतका विचार, इतकी तयारी मी एरवी नक्कीच करत नाही! तर मी आज सुरवात करतीय "माझी भटकंती" लिहायला.. जसं जमेल तसे इथे पाहीलेल्या गोष्टी, ठीकाणं इत्यादींवर लिहायचे ठरवत आहे.. ते प्रवास वर्णन असेल की अजुन काय ते माहीत नाही..

सांगा वसंत कुणी हा पाहिला

लेखक विंजिनेर यांनी मंगळवार, 14/04/2009 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
वसंत ऋतू हा कुणालाही वेड लावणारा असतो. कोरिया आणि जपानात साकूरा अर्थात चेरी ब्लॉसम जेव्हा फुलतो तेव्हा लोक वसंताच्या आगमनाला सज्ज होतात. ही रंगाची मुक्त उधळण साधारण दर ८-१० दिवसांच्या अंतराने बदलत जाते.

चाहूल वसंतऋतूची!!

लेखक शाल्मली यांनी सोमवार, 13/04/2009 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
गेले ४-५ महिने घराच्या बाहेर झाडांचे खराटे, थंड वारे, एकतर बर्फ तरी नाहीतर नुसतीच भयानक थंडी, सगळे पक्षी उष्ण देशात पळून गेलेले असं चित्र बघून नुसता कंटाळा आला होता. अशातच एक दिवस म्हणजे साधारण २०-२२ मार्चच्या आसपास एक पक्षी चोचीत काडी घेऊन उडत चाललेला दिसला. आम्हाला चाहूल लागायच्या आधी पक्ष्यांना चाहूल लागली होती वसंतऋतूच्या आगमनाची! आता ३-४ दिवसातच अजून काही पक्ष्यांची घरटं बांधण्यासाठीची लगबग दिसू लागली.

पौर्णिमा..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 13/04/2009 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
हृदयांत रंगलेल्या खेळात येशील का? हा डाव प्रीतिचा गं तू पूर्ण करशील का? बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का? पाऊस घेत हाती मल्हार छेडतो मी, होऊन धार मजला, तू चिंब करशील का? दिवसांत कैकवेळा घेतो मिठीत तुजला होऊन रातराणी श्वासात उरशील का? भिजल्या अनेक रात्री बघ आठवांत तुझिया ओलावल्या मनाने मज तू स्मरशील का? दिधले मला सखे तू उद्दिष्ट जीवनाचे ते ध्येय पूर्ण करण्या तू हात धरशील का? हे पाहिले तुझ्या मी, डोळ्यांत स्वप्न माझे घेऊन ते उराशी साकार करशील का? - प्राजु
Taxonomy upgrade extras

पुस्तक परिचयः कालगणना

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 11/04/2009 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचयः कालगणना, लेखकः मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, आवृत्ती पहिलीः जुलै २००८, किंमतः रू.२००/- फक्त.
पंचांग आणि खगोलशास्त्र यांचा अतिशय घनिष्ट संबंध आहे. सूर्यनिर्मित ऋतुचक्र किंवा चंद्राचे कलाचक्र यांच्या संयोगानेच पंचांगांची रचना केली जाते. भारतीय पंचांगाचे नाते, आकाशाशी निरंतर जडलेले आहे. म्हणूनच त्यासारखे माहितीदायक पंचांग दुसरे नाही.

गोठलेले शब्द (या संग्रहातून ;)

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 09/04/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
गोठलेले शब्द या जालिंदरांच्या कविता संग्रहातील एक कविता येथे लिहिण्याचा मोह आवरत नाही. वास्तविक हा संग्रह माझ्याकडे नाही. पण ती कविता कधीकाळी त्यांच्या 'भाषणाच्या बदल्यात भाकरी' या भाषणादरम्यान त्यांनी म्हटली आणि मी लिहून घेतली होती असे फिकट आठवते आहे. एखादेवेळी ही कविता त्या संग्रहात संग्राहित केली नसण्याची शक्यताही आहेच. पण आस्वाद घ्यायला काय हरकत? माझ्याकडील कविता एका जीर्ण पिवळ्या कागदावर हिरव्या शाईने लिहिली होती. कवितेतील काही शब्द वृत्त-मात्रांत बसत नसतील तर दोष त्या कागदाच्या प्रतिचा अथवा शाईच्या टिकून न राहण्याच्या गुणधर्माचा आहे.
Taxonomy upgrade extras