Skip to main content

आस्वाद

दुर का रे असतो

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 28/04/2009 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
दुर का रे असतो दुर कारे असतो सखया जवळी ये ना तू || ध्रु ||
घालीत होती वेणी सकाळी
आरशासमोर होते उभी मी
न दिसे माझी मला मी
परी दिसलास तू || १ ||
दुर कारे असतो सखया जवळी ये ना तू || ध्रु ||
Taxonomy upgrade extras

कशाला?

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 28/04/2009 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला? नि:शब्द भावनांचे इमले फुका कशाला? नसतेच अमृताची गोडी कधी विषाला या भाबड्या जिवाला केलेस तू निराश ऐश्वर्य अन् सुखाची सुरई तुझ्या उषाला ! जाणून घेतले कां कधी सांग प्रेम माझे? नांदीशिवाय सांग , ही सांगता कशाला? काळीज पत्थराचे , चेहेरा जरी झकास बेशर्म त्या जिवाचा शृंगार हा कशाला? हृदयांत कंडलेल्या भावनांचा निखारा फुकतोय येथ आता , राखेमधे कशाला? कधी वाचशील का गं , तू आर्त ही कहाणी? शब्दांत गुंफलेल्या कविता इथे कशाला? जे एकदांच मरती , त्यांच्या परी उदास मी सारखाच मरतो , अश्रू मला कशाला? ढाळू नकोस आता अश्रू मढ्यावरी या ते पेलणार नाही , आता , सखे खिशाला !
Taxonomy upgrade extras

जीवन...!

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 28/04/2009 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
जीवन तसं असतं सोप्प काहीच नाही कठीण.. जीवन म्हणजे झुळझुळणारा खळखळणारा झरा जीवन म्हणजे मोर नाचरा फुलवून पंखपिसारा जीवन म्हणजे मंजुळ मंजुळ ऐकवं कोकीळ गाण जीवन तसं असतं सोप्प काहीच नाही कठीण.. जीवन म्हणजे हिरव्या हिरव्या पानांची हो सळसळ जीवन म्हणजे शितल शितल वा-याची हो झुळझुळ चैत्रबनात येउन घाली नवथर सृष्टीला शीळ जीवन म्हणजे मोकळ्या आकाशी सांडल ट्प्पोर चांदणं जीवन तसं असतं सोप्प काहीच नाही कठीण जीवन म्हणजे उचंबळुन वाहणारी अल्लड नदी म्हणे माझा साजण सागर भेटेल मला हो कधी..? जीवन म्हणजे डोंगरमाथी पेटीयला वणवा.. जणु मनाला जाळीतो माझ्या दु:खांचा वैशाखवणवा.. जीवन
Taxonomy upgrade extras

प्रिये..!

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 28/04/2009 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
तात्यांच्या सूचनेवरुन ..( पण खास जमली नाही असं वाटतं ) झाकला ग तुझा चेहेरा काळ्याकुट्ट बटांनी आकाशीचा चंद्र जणु ग्रासला ग नभांनी.. !! ******** नसेल तुझ्या गालांवर लाली निळी कमळंसुद्धा तळ्यात फुलतात नसतील तुझे ओठ गुलाबी काळी द्राक्ष सुद्धा रसरशीत असतात !!
Taxonomy upgrade extras

चांदरात

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 27/04/2009 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
चांदरात
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
तू स्पर्श करता जगा मी विसरले मी हरले अन मीच जिंकले न कळे मला कुणी कुणावर केली मात || १ ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
मंचकावर मी बसले कळ सोसते मुश्कील आपल्याच दुनियेमध्ये असती आपण मश्गुल दिवेही पेंगुळले चढत चालली चांदरात || २ ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
Taxonomy upgrade extras

का?

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 27/04/2009 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
का? सजल्या तुझ्या वेणीवरी मोगरा फुलला न का? ऐन आषाढातला पाऊस का झाला सुका? अजून तू माझ्या कवेत 'एकटा' मी, "दूर" का? सर्वस्व लुटुनी मी कफल्लक हाय् ! तू मजबूर का? राहिल्या गझला अभंग का बुडाला पण तुका? मैफिलीच्या स्वागताला भैरवीचा सूर का? २५ एप्रिल '०९ , स.०६.३०
Taxonomy upgrade extras

आरती पालीच्या बल्लाळेश्वराची

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 25/04/2009 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
आरती बल्लाळाची (चालीसहीत) जयदेव जयदेव जय पालीश्वरा हो देवा पालीश्वरा आरती ओवाळीतो मी तुज देवा बल्लाळा जयदेव जयदेव || ध्रु || देवूळ तुझे मोठे चौसोपी दगडी आत असे मुर्ती शेंदरी उघडी समोर मोठी घंटा अन खांब लाकडी वर्णावया रुप तुझे बुद्धी माझी तोकडी || १ || जयदेव जयदेव || ध्रु || देवा तुझा वास असे पाली गावी तव दर्शने माझी द्रुष्टी सुखावी मोदकांचा नैवेद्य मी तुजला दावी भक्तांवर क्रुपा नियमीत असो द्यावी || २ || जयदेव जयदेव || ध्रु || पौराणीक आणि ऐतीहासीक तव ग्राम असे मंदिर स
Taxonomy upgrade extras

सौजन्याची ऐशी तैशी. भाग-२

लेखक शितल यांनी शनिवार, 25/04/2009 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ कालच्याला आपण दिंडोरे आन यादव फॅमिलीला भेटलो.. आता त्या यादवाच्या उजव्या अंगाला राहतुया दावणे कुटुंब. तर ह्या दावण्याच्या फॅमिलीला आम्ही वाड्यातील समदी मंडळी "कोळसा फॅमिली" म्हणतुया. आता त्यासणी तसा का म्हणत्यात ते सांगायची गरज नाय हाये तुम्हासणी तवढं तुमासणी बुध्दी असलच. तर बघा पाव्हणं, ह्या कोळसा फॅमिलीत बी चार लोक हायेत. कोळसा-कोळसी आणि त्यांची दोन पोर, एक पोरग, आणि एक प्वॉर. तुम्हासणी म्हणुन सांगतो पाव्हण, ह्यो कोळसं खानदान त्यांच थोबाड गोरं व्हण्यासाठी काय काय करित न्हायती तेवढं इचारा.

खरंच मला बरंच काही करायचाय ...

लेखक अश्विनि३३७९ यांनी शुक्रवार, 24/04/2009 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच मला बरंच काही करायचायं आयुष्यातला प्रत्येक क्षण न क्षण तुझ्या साथीनी जगायचायं हातात हात गुंफून तुझ्या प्रत्येक स्वप्न पहायचाय !! अगणित चांदण्या मोजत रात्रभर जागायचाय आणि वाळूत रेषा ओढत सुर्यास्त बघायचाय !! प्रणयाला चंन्द्र साक्षीला हवा सोबत तुझी उब आणि हवेतील गारवा !! तुझ्या सोबतीनी मला गरुडा साऱखं उडायचाय मला जाणणारं तुझं मन मात्रा आयुष्यभर जपायचाय खरंच मला बरंच काही करायचायं !!
Taxonomy upgrade extras

मी वसंत मी वसंत..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 23/04/2009 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
शिशिरी मळभ दूर झाले, उत्तरायणी रवी आले, बेहोषला आसमंत, मी वसंत मी वसंत... खुलते आज कळीकळी, पानोपानी ही झळाळी, भ्रमराला ना आज उसंत, मी वसंत मी वसंत... ध्यान उभे बैराग्याचे, सळसळणारे मन त्याचे, पिंपळाचा श्वास संथ , मी वसंत मी वसंत... आज तयाला भान नुरे, सुवर्णाचे नाजूक तुरे, राजस आम्र उन्मत्त, मी वसंत मी वसंत... धरा होती ती ल्यायली, दाट धुक्याच्या त्या शाली, सुवर्णरेखा ही दिगंत, मी वसंत मी वसंत... तृणांकुराचे हे थवे, आज भासती नवे नवे, पानगळीची उगा खंत, मी वसंत मी वसंत... भरून गेली किल्बिल सारी, विहंगाची उंच भरारी, सृष्टीची ही नशा जिवंत, मी वसंत मी वसंत...