सूड - भाग १ (कथा )

लेखनविषय:
खरे तर पहिला भाग टंकून खूप दिवस झाले होते. पण कथा पूर्ण होण्याचा योग लवकर येत नाही असे लक्षात येताच पहिला भाग वाचकांसाठी देत आहे. दुसरा आणि अंतिम भाग लवकरच देईन. नमस्कार रसिक वाचकहो, भाग २ येथे पहा संपूर्ण कथा पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी PDF येथे क्लिक करा.

आम्ही क्युबिकल डेकोरेशन करतो ....

तर मित्रांनो ही स्पर्धा होती आमच्या आस्थापनात, ती तिथेच घेतली गेली आणि निकाल तिथेच जाहीर झाले. जर पुढेमागे आमची कंपनी केंद्र सरकारने बेल-आउट पॅकेज देऊन चालवायला घेतली तर स्पर्धा महाराष्ट्रात, जाहिरात युपी/बिहारात, प्रत्येक्ष स्पर्धा कर्नाटकात व बक्षिसवितरण समारंभ दिल्लीत वगैरे होऊन ह्याला "*** गांधी पुरस्कॄत क्युबिकल डेकोरेशन स्पर्धा " असे नाव दिले जाऊ शकते ... ( कोणीतरी विचारत होता की मिपावर निकाल जाहीर झाले का म्हणुन तर त्याला हे उत्तर समजावे.

मर्मबंधातली ठेव ही...

लेखनविषय:
लेखनप्रकार
संगीतातील प्रत्येक रागाला एक नादप्रकृती असते. त्यातून भावनिर्मिती होते. मानवी भावनेला घट्ट कवटाळण्याचे विलक्षण सामर्थ्य यात असते. जसा यमनकल्याण आर्जवी, गोरख कल्याणमध्ये प्रासादिक तर भैरवीमध्ये समर्पण भाव आहे. या रागांतील प्रत्येक स्वर आणि त्याचा नाद माणसाच्या अंतरंगात त्या त्या भावनांचे तरंग उमटवितो. असाच पटदीप हा वियोगाची भावना व्यक्त करणारा राग आहे. मात्र ही भावना तो आक्रस्ताळेपणाने मांडत नाही. आपले गाऱ्हाणे तो कळकळीने सांगतो; पण वेदनेत अडकूनही पडत नाही. मर्मबंधातली ठेव ही...

झुठ का सामना

लेखनविषय:
लेखनप्रकार
मन्या हा साधासरळ गृहस्थ व निर्व्यसनी म्हणून सर्वांना परीचित वयाच्या एकविसाव्या वर्षीच वडिलांनी त्याचे लग्न लावून दिले.कामाला जाणे तिथून घरी येणे हे त्याचे नित्याचेच. पण या मन्याला घरच्यांना न सांगता अचानक सच का सामना मध्ये जायची दुर्बुध्दी होते आणि टिवी वर त्याचे दृश्य झळकू लागतात १) डान्स बार मे जाते थे क्या ? २) आपने कभी वेश्या के साथ शारीरीक संबंध बनाये है क्या?

विलक्षण ...साहिर.

लेखनविषय:
लेखनप्रकार
'संसार से भागे फिरते हो' हे चित्रलेखा या चित्रपटातईल गाने,शब्द रचना आणि संगीत या दोन्हीमुळे माझी अत्यंत आवडते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त वंदे मातरम्! आणखी दोन बाल कलाकार

लेखनविषय:
लेखनप्रकार
आठवड्याभराच्या भरपूर कामानंतर बाहेर पडायचा कंटाळा, बाहेर धुवांधार पाऊस, आणि सॅटेलाईट टीव्हीचा गायब सिग्नल, या सर्वांचा परिपाक म्हणजे आंतर्जालावर भटकणं, आणि भटकतांना सापडली ही दोन रत्नं! सुरूवात बहुतेक बालपणापासून केली असणारे हे दोघं आता कुमारवयाचे आहेत. पहिली स्मरणिका (ही बहुधा दिल्लीच्या पब्लिक स्कूल मधली विद्यार्थिनी असावी, व्हिडीओज् चे tags पहाता). हिचे, तिच्या वय वर्षे ९ ते १२ या कालावधीतले, यू ट्यूब वरचे instrumental वादनाचे व्हिडिओज सापडले.

परिक्षण-गंध (छोटा डॉन स्टाईल)

अखेरीस सात तारखेला 'गंध' प्रदर्शित झाला. अनेक महोत्सवातुन गाजल्यानंतर त्याला प्रेक्षकांपुढे यायला बराच वेळ लागला खरा, पण आता त्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा पुर्ण केल्या का नाहीत ते येत्या काही दिवसात कळेलचं. पण, माझ्या अपेक्षा पुर्ण झाल्या की नाही ते मात्र मी लिहित आहे.कदाचित माझ्या या लिखाणातुन लोकांनाही हा चित्रपट कसा आहे ते समजेल म्हणुन हा लिखाण प्रपंच. * पहिला प्रश्न म्हणजे 'गंध' हा चित्रपट मी का पाहिला? - 'गंध' हे नांव अनेक फेस्टिवलमधून गाजत होतेच.

आणि कॉमन मॅन बोलला!

हं, कॉमन मॅन हे नाव थोडंसं आठवतंय ना (हल्ली कॉमनमॅनच्या जागी 'कॉनमेन' हाच शब्द एवढ्या वेळा आपण वाचतो की विचारावंसं वाटलं!) काल पद्मविभूषण आर. के. लक्ष्मण यांचा मानसपुत्र, 'कॉमन मॅन'वर आधारित एकपात्री कार्यक्रम पाहिला. लेखक: अनिल जोगळेकर, भाषांतरकारः गौतम जोगळेकर, संगीत: बंकिम आणि बाकी सर्व श्रेय प्रा. अजित केळकर यांचं; पण केळकर म्हणतात सर्व श्रेय आपल्या सगळ्यांमधे असणार्‍या असामान्य सामान्यांचं आणि हे असामान्यत्व चितारणार्‍या कार्टूनीस्ट आर. के. लक्ष्मण यांचं! एकविनोदाच्या अंगाने जाणारा तरीही अंतर्मुख करणारा कार्यक्रम असं याचं वर्णन एका वाक्यात करता येईल.

गोरख कल्याण

लेखनविषय:
लेखनप्रकार
गोरख कल्याण हा अनेकांप्रमाणे माझाही अत्यंत आवडता राग आहे. हा राग रात्रीच्या पहिल्या प्रहारात गातात असे म्हणतात. (अचूक वेळ माहीत नाही. याबाबत तात्या अधिकाराने बोलू शकतात.) पण या रागाची सुरावट ही रात्रीच्या वातावरणाला अजिबात पोषक नाही, असे माझे मत आहे. याविषयी कुणाचे म्हणणे वेगळेही असू शकेल. पण मला हा राग ऐकला किंवा पेटीवर वाजविला की उत्तर रात्री अगदी पहाट होताना एकाद्या मंदिरातून संगीत ऐकू यावे, असा भास होतो. हा राग मी पहिल्यांदा कोणत्याही मंदिरात वगैरे एकलेला नाही. प्रथम संजीव अभ्यंकरची ध्वनिफित ऐकली होती. त्यानंतर जसराज ऐकले आणि नंतर अनेक गायकांना ऐकले आहे.
Subscribe to आस्वाद