गोरख कल्याण
गोरख कल्याण हा अनेकांप्रमाणे माझाही अत्यंत आवडता राग आहे. हा राग रात्रीच्या पहिल्या प्रहारात गातात असे म्हणतात. (अचूक वेळ माहीत नाही. याबाबत तात्या अधिकाराने बोलू शकतात.) पण या रागाची सुरावट ही रात्रीच्या वातावरणाला अजिबात पोषक नाही, असे माझे मत आहे. याविषयी कुणाचे म्हणणे वेगळेही असू शकेल. पण मला हा राग ऐकला किंवा पेटीवर वाजविला की उत्तर रात्री अगदी पहाट होताना एकाद्या मंदिरातून संगीत ऐकू यावे, असा भास होतो.
हा राग मी पहिल्यांदा कोणत्याही मंदिरात वगैरे एकलेला नाही. प्रथम संजीव अभ्यंकरची ध्वनिफित ऐकली होती. त्यानंतर जसराज ऐकले आणि नंतर अनेक गायकांना ऐकले आहे.
मिसळपाव
जेव्हा आशा भोसले,एस पी बालसुब्रमण्यम आणि बप्पी लाहिरी एकत्र येतात तेव्हा एक अफ़लातून गीत जन्माला येतं.
फ़र्स्ट लव लेटर या सिनेमातलं हे गाणं.