Skip to main content

'हाय...' लताबाईंचा!

लेखक प्रदीप यांनी शुक्रवार, 24/07/2009 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
तात्यांच्य्या गांधाराच्या लेखावरून काही इतर, विषेशतः लताबाईंच्या हिंदी चित्रपटगीतांमधील विशेष स्थानांची आठवण झाली. ती त्यातील 'हाय..' ह्या शब्दाच्या अत्यंत परिणामकारक उच्चारावरून. लताबाईंचे गाणे अगदी अंडरप्लेईंगचा उत्तम नमुना आहे. कोठेच भाव उतू चालले आहेत असे दिसत नाही.

"लहाने"पण देगा देवा !

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 20/07/2009 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
"लहाने"पण देगा देवा ! रविवार दिनांक १९ जुलै २००९, स्थळ सहयोग मंदीर , ठाणे (पश्चिम) आणि व्यास पौर्णिमेनिमित्त : व्यास क्रिएशन्स चा व्यास स्नेह महोत्सव. सूर सप्तकांचे-हा श्री.संदीप वैद्य संकल्पित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आणि श्री मधुकर मंडलेकर यांनी मराठीमधे अनुवाद केलेले (रोझेलीन पर्लमन यांचे मूळ इंग्रजी पुस्तक : द ब्लाईंड डॉ.जेकब बोलेटीन - ऑटोबायोग्राफी ) "मात अंधारावर" या पुस्तकाचे प्रकाशन हे निमित्त. कार्यक्रमाची सुरुवात गणपती स्तवनाने झाली, आणि कार्यक्रम फुलत गेला.साधारण ५ गाणी झाली आणि सभागृहात "त्यां"चे आगमन झाले - ज्यांच्या हस्ते "मात अंधारावर" या पुस्तकाचे प्रकाशन हो

वाहन पार्श्चभाग लिखाण अर्थात बंपर स्टिकर

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 17/07/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
आता बहूतेक जण म्हणतील की यावर बरेच धागे लिहून झाले, हा फूटकळ धागा आहे, मी आपणाला ओळखत नाही त्यामुळे (निगेटिव्ह का होईना पण) प्रतिक्रीया देणार नाही वैग्रे वैग्रे. तरी पण वाचा आणि आनंद घ्या. असो. रत्याने जातांना वाहनांच्या पार्श्चभागी लिखाण अर्थात बंपर (तसेच) नेम प्लेट, ट्रकचे फाळके, मागील काच, मडगार्ड रबर वर अनेक (महाभागांनी) अनेक तर्‍हेचे लिखाण केलेले असते. अजाणतेपणी आपण त्या कडे बघतो किंवा बघत नाही. काही काही लिखाण मनास भिडते तर काही वेळा मनोरंजन होते. रहदारीच्या वैतागात आपल्याला ते लिखाण नकळत सुखावून जाते. मी खाली काही तसले बघीतलेले लिखाण टाकलेले आहे.

बापू!! (व्यक्तिचित्रण)

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 16/07/2009 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे बापू, जाऊन जरा नविन शेटच्या शेडवरून आपली बिमं घेऊन ये.." "बापू, इचलकरंजी सहकारी मधे हा चेक टाकून ये..." "बापू.. ३ नंबरचा माग बंद का पडलाय बघ जरा.." एक ना हजार! हा बापू म्हणजे पुलंच्या "नारायण" चं पॉवरलूम मॉडेल असंच म्हणावं लागेल. इचलकरंजीमध्ये माझ्या भावाच्या पॉवरलूमच्या कारखान्यात असलेला हा एक नमुना. नमुना अशासाठी की, कोणतंही काम करायला हा जसा एका पायावर तयार असतो तसंच कोणताही प्रश्न विचारताना तो लोजिकली बरोबर की चूक हा विचार करणं म्हणजे घोर अपराध केल्यासारखं त्याला वाटतं. अंगकाठी म्हणाल तर हाफ पॅन्ट घालून आला तर दहावी-बारावीचा विद्यार्थी वाटेल. २ मुली आहेत त्याला.

आजची ऑर्डर

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/07/2009 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव - १ बटाटावडा - १ जादा पाव -८ तर्री रस्सा आणुन ठेव नंतर कटिंग चहा -१ आमच्या कडे म्हणतात :
वाह रे तेरा डाव
एक मिसळ और १०-१० पाव !

प्रिय सौ. आईस..!

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 07/07/2009 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
माझं तुझ्यासोबत असणं.. माझ्या कौतुकात तुझं बुडुन जाणं.. माझ्या आवडीनिवडी सांभाळण्यासाठी तू तुझ्या कामांना बाजूला ठेवणं.. संपूर्ण महिनाभर चालणारा हा कौतुकाचा सोहळा..!! पण... काहितरी राहून गेलंय.. आपलं निवांत गप्पा मारणं.. एकमेकींच्यासोबत ! केवळ अन केवळ बोलणं.... असं झालंच नाही गं! हिंडलो, फिरलो.. खेळलो.. पण.. फक्त आणि फक्त आपण दोघी कितीवेळ एकमेकीसोबत होतो?? आता तू येणार... तुझं येणं तसं वर्षभर लांबलं.. .... अन शेवटी हो नाही करता करता तू आलीसही.. तू इथे आल्यावर.. हिंडण्या फिरण्यासोबतच तुझ्याशी खूप खूप गप्पा मारायच्या...