Skip to main content

मालवून टाक दीप

लेखक अन्वय यांनी गुरुवार, 17/09/2009 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
भूप म्हणजेच भूपाली. हा राग रात्रीच्या वेळी गायला जातो, असं म्हणतात. परंतु आपल्याकडे असंख्य भूपाळ्या आहेत. त्या याच रागातल्या. त्यामुळे हा राग रात्रीचा की पहाटेचा हा वादाचा विषय आहे. --- उत्तर रात्र उलटून गेलीय. पक्षांचा किलबिलाटही अद्याप सुरू व्हायचा आहे. काही वेळानंतर झुंजूमुजू होणार आहे. अशा धीरगंभीर वातावरणात भूपाळ्यांचे स्वर मनप्रसन्न करतात. या वातावरणातील शांत आणि गंभीर पण प्रसन्नभाव भूपमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. हीच भूपची नादप्रवृत्ती असावी. सा रे ग प ध सा हे सहा स्वर असलेला हा राग त्यामुळेच उत्तररात्रीनंतर पहाटपर्यंत गायला जात असावा, असे वाटते. असो.

सोंगट्या, कवड्या, गंजिफा आणि सारीपाट

लेखक अभिरत भिरभि-या यांनी गुरुवार, 17/09/2009 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
म्हैसूरजवळच्या एका संग्रहालयातील ही छायाचित्रे. माझ्या मित्राकडे सापडली. मी यातील अनेक गोष्टी प्रथमच बघितल्या होत्या. कदाचित तुमची ही पहिलीच वेळ असेल म्हणून शेअर करतोय :) मोबाईल कॅमेर्‍याने काढल्यामुळे दर्जा मर्यादित आहे. सांभाळून घ्या.

चवीने खाणार त्याला...

लेखक सुबक ठेंगणी यांनी बुधवार, 16/09/2009 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन गणपतीच्या दिवसातलं घर. घालीन लोटांगण, मंत्रपुष्पांजली होते. देवासमोर क्षणभर हात जोडून सगळे पदर भराभर खांद्यावरून कमरेला खोचले जातात. एकीकडे बॅकस्टेजला पेलेवाटयांची खणखण सुरू झालेली असतेच त्यातच फ्रीजमधल्या गारेगार कोशिंबिरीला खमंग फोडणी पडते, तळणीत पापडकुरडया फुलून येतात, आमटीला उकळया फुटतात, आणि गोरेगोमटे मोदक सारणाचं गोड गुपित सांगण्यासाठी तोंड उघडण्याची वाट बघत चाळणीत ताटकळत बसून असतात. म्हणता म्हणता पानं मांडली जातात. “उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म” म्हणेम्हणेपर्यंतच तोंडात असंख्य चवी पाझरू लागलेल्या असतात.

डोंबारी

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 14/09/2009 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गल्लीत काल छत्तीसगढी डोंबारी आला होता. त्याची लहान मुलगी व त्या डोंबार्‍याचे हे फोटो. ह्या फोटोतील मुलीचे हावभाव फक्त एंजॉय करा. लहान मुलगी कामाला लावली, बालकामगार, दोन मुलांमधली परिस्थिती वैग्रे, वैग्रे काही डोक्यात आणू नका. जस्ट एंजॉय लाईफ अ‍ॅज दॅट गर्ल एंजॉयस हर सिच्यूएशन! अँड कमेंट ऑन दॅट. लाईफ ईज व्हेरी हॅपी दॅन वी थॉट. Dombari डोंबारी १ Dombari2 डोंबारी २

सध्या वाचत असलेली पुस्तके... भाग अमुकतमुक..

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 13/09/2009 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी सध्या वाचत असलेली पुस्तके... ... गेल्या महिन्याच्या मध्यात स्वाईन फ्लू उद्रेकामुळे काही काळ धंदा नियंत्रण करून घरी बसलो होतो .. त्या काळात ही ही पुस्तके वाचली... १.कुमार माझा सखा २.अवघड अफगाणिस्तान ३.सुलतान ( नाटिक संग्रह) ४. युगान्त ( त्रिनाट्य ... वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी , युगांत)) ५.मौनराग ६.काटेसावरी ( नाटक) ७.अग्नि आणि पाऊस ( नाटक) ८.गगनभेदी ( नाटक) ९.प्रेमाची गोष्ट ( नाटक) १०. कोबाल्ट ब्लू ( कादंबरी) ११.

द बर्निन्ग ट्रेन

लेखक फारएन्ड यांनी बुधवार, 09/09/2009 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
यालाच (टायटल प्रमाणे) 'धी बरनिन्ग ट्रैन' किंवा सुरूवातीला बराच वेळ रेल्वे न दाखवता इतर बर्‍याच गोष्टी दाखवून लोकांची डोकी फिरवल्याने काही लोक याला The Turning Brain असेही म्हणत फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा डब्यात कारणाशिवाय साखळी ओढण्याला २५० रू. दंड होत असे तेव्हाची. कदाचित त्याही आधीची. एन्ट्रीलाच तीन पोरे नासिर हुसेन बरोबर एका नॅरोगेज यार्डात गप्पा मारत असतात. नासिर त्यांना एकेका इंजिनाकडे बोट दाखवून 'हे खुद्द महाराजा म्हैसूर यांचे आहे...' वगैरे माहिती पुरवत असतो.

म्हाळसाक्का.. ३

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 08/09/2009 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाळसाक्का १ म्हाळसाक्का २ तो ही चालू लागला. कुठेतरी या म्हातारीबद्दल माया वाटू लागली होती. "काम मिळाले की या म्हातारीला भेटायला यायचं पुन्हा" असा निश्चय त्याने केला.. पण इतक्यात.. काम??? दामू कडं... !! काय सांगायचं ??म्हातारीनं पाठवलं म्हणून?? कोण म्हातारी?? कुठली?? नाव काय?? दामूला कुठल्या म्हातारीनं पाठवलं म्हणून सांगायचं?? त्याला काहीच सुधरेना.. हिचं नाव आपण परत विचारलंच नाही. काय करायचं?? बघू!! काहीतरी करूच.. दामूने नाही दिलं काम तर दुसरीकडे कुठेतरी करू..

मोहक दरबारी

लेखक अन्वय यांनी रविवार, 06/09/2009 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळ्या हवेत, अगदी नीरव शांततेत चांदण्यांनी भरलेले आकाश न्याहाळताना दुरावलेल्या प्रेयसीचा आठव यावा. तिच्या सहवासात घालविलेला क्षणन्‌ क्षण पुढ्यात उभा राहावा, असे दरबारी कानडाचे रुप वाटते. हा राग मंद्र आणि मध्यम सप्तकात रमणारा असल्याने यात आतर्तबरोबरच गंभीरताही आहे.

म्हाळसाक्का..२

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 04/09/2009 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाळसाक्का.. भाग १ "मावशे, कोन गं तू?" त्याने तिच्याकडे कृतज्ञतेने पहात विचारले.. "मावशी म्हनालास नव्हं.. मंग मावशीच म्यां." बेफिकीरीने ती म्हणाली. तिचं वागणं बुचकळ्यात टाकणारं आहे असं त्याला वाटून गेलं. *********** तो तिच्याकडं बघतच राहिला. म्हाळसाक्कानं त्याच्या पुढतला वाडगा उचलला आणि मागे निंबोर्‍या जवळ असलेल्या मोरीपाशी नेऊन धुऊन आणला आणि पुन्हा कोंडाळात ठेऊन दिला. तो तिच्या भराभर होणार्‍या हलचालींकडे बघतच राहिला.