लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक

लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक आज आपण एका सायकलपटू असलेल्या सामाजसेवकाला भेटणार आहोत. नाव आहे लक्ष्मण यादव अहिरे. त्यांनी सायकलवर भारतभ्रमण केले आहे. ते वयाच्या ७१ व्या वर्षी अजूनही सायकलवरून नशिक उजैन अशी स्वारी करू शकतात. आजही पुढील महीन्यात आपला ७२ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर सायकलवरून 'इंधन बचाओ' हा संदेश घेवून भ्रमण करण्यास ते निघणार आहेत.

त्रिपुरी पोर्णिमा

लेखनविषय:
कार्तिक महिन्यातील पोर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पोर्णिमा. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. त्रिपुरासुराच्या अनिर्बंध वागण्याने त्रस्त झालेले देव त्रिपुरासुराचा अंत झालेला पाहून हर्षित झाले आणि त्यांनी हा विजय दिवे प्रज्वलित करून व आतषबाजी करून साजरा केला. म्हणून ह्या दिवसाला देवदिवाळी असेही म्हणतात. तिथी एकच असते , तोच पुर्णाकृती चंद्र आसमंतात असतो तरी प्रत्येक पोर्णिमा वेगळी भासते.

...आणि गावसकर पेटला!

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे क्रिकइन्फो च्या एका सदरात प्रत्येक तारखेला आधीच्या काही वर्षात काय झाले याची अत्यंत वाचनीय माहिती येते - त्यात या सिरीज बद्दल वाचले आणि क्रिकेट (टीव्हीवर दाखवू लागले आणि) पाहू लागलो तेव्हा अगदी सुरूवातीला पाहिलेल्या या सिरीज बद्दल च्या बर्‍याच गोष्टी आठवल्या. १९८३ च्या वर्ल्ड कप मधे भारताकडून वेस्ट इंडिज चा संघ हरला. लॉईड ने राजीनामा दिला होता, पण तो बहुधा स्वीकारला गेला नाही. हा संघ एकूणच प्रचंड डिवचला गेला होता.

.जाईन विचारीत रानफूला

लेखनविषय:
लेखनप्रकार
पावसाळ्यात अनेक ठिकाणी .रस्त्याच्या कडेला अशी सुंदर रानफूलं फूललेली असतात.

सुगरणीचा खोपा

लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या महिन्यात काही मित्रांबरोबर वाईला गेलो होतो. तिथे फिरताना झाडावर टांगलेली सुगरणीची घरटी पाहिली. मित्राने त्याचे काही फोटोदेखिल काढले. आज, मिपाच्या मुखपृष्ठावरील "खोपा" पाहून त्याची आठवण आली. स्थळ - वाई दिनांक - ५ सप्टेंबर २००९ आभार - (मिपाकर नसलेला) मित्र, सलील अवांतर - तात्यांनी दिलेल्या गाण्यातील दुव्यात बहिणाबाई चौधरींचा उल्लेख संत बहिणाबाई असा आला आहे, ते चूक आहे.

गार्गी अजून जिवंत आहे...

लेखनविषय:
आज अचानक मंगला आठलेकर यांचं "गार्गी अजून जिवंत आहे" हे पुस्तक हातात पडलं. जन्मतारीख वगैरे नसणार्‍या काळात साधारण १९१४-१५ च्या सुमारास उत्तरप्रदेशात इलाहाबादला जन्मलेल्या गुलाबबाईची ही कहाणी. सातव्या वर्षी लग्न होऊन दहाव्या वर्षी मुलाला जन्म दिलेल्या ह्या गुलाबबाईने इतक्या जुन्या काळात इलाहाबाद-प्रयागसारख्या कट्टर धार्मिक परंपरा असलेल्या शहरात अंत्यसंस्काराच्या कामाला वयाच्या अकराव्या वर्षी सुरवात करून तिने "स्त्रियांनी स्मशानपौरोहित्य का करू नये?" असा प्रश्न तत्कालीन धर्ममार्तंडांना केला होता. ह्या स्त्रीबाबत लेखिका एक दोन पानी लेख वाचते आणि त्या स्त्रीला भेटायचंच या विचाराने तिचा शोध घेते.

गोष्ट छोटी डोंगरा एवढी

"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या". कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'. ह्या आणी अशा अनेक शेतकर्‍याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्‍या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्‍याच्या खर्‍या अडचणी काय आहेत ? शेतकर्‍यावर आत्महत्या करायची वेळ का येते ?
Subscribe to आस्वाद