कार्तिक महिन्यातील पोर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पोर्णिमा. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. त्रिपुरासुराच्या अनिर्बंध वागण्याने त्रस्त झालेले देव त्रिपुरासुराचा अंत झालेला पाहून हर्षित झाले आणि त्यांनी हा विजय दिवे प्रज्वलित करून व आतषबाजी करून साजरा केला. म्हणून ह्या दिवसाला देवदिवाळी असेही म्हणतात.
तिथी एकच असते , तोच पुर्णाकृती चंद्र आसमंतात असतो तरी प्रत्येक पोर्णिमा वेगळी भासते. फाल्गुनातील होळी पोर्णिमा आणि पुरणपोळी , कोजागिरी आणि मसाल्याच दूध हे जसं जोडीनेच आठवतं तसं त्रिपुरी पोर्णिमा म्हटलं की लखलखत्या हजारो पणत्यांची आरास डोळ्यासमोर येते.
पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या पाताळेश्वर मंदिरात त्रिपुरी पोर्णिमेला तेलवातीच्या पणत्यांची सुंदर आरास करतात. बोचर्या थंडीत अंधारलेल्या संध्याकाळी हजारो पणत्यांच्या प्रकाशात उजळून निघालेले पाताळेश्वराचे मंदिर फारच सुंदर दिसू लागते.
गेल्या वर्षी पुण्याला गेलो असताना पाताळेश्वर मंदिराला आवर्जून भेट दिली. त्यावेळी टिपलेले हे काही फोटोज..


वाचने
5654
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त फोटो...
सुरेख!! -
सुंदर
काल संध्याकाळी..
मस्त फोटो !
मस्त फोटो
मिरजेला
सुंदर
अप्रतिम...!!
खूप
सर्व
आमच्याकडे
आमच्य कडे
मनोहारी