मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाचा (एचआरएम) अभ्यास केलेले आणि "नेतेगिरी" (मराठी- लिडरशिप) चा अभ्यास केलेल्यांना कदाचित माणसाच्या ह्या मानसिक द्वंद्वाची, कलाची माहिती असेल. मला जेव्हा ह्या थेअरीची तोंडओळख झाली तेव्हा मी हरखून गेलो होतो व पटले की, ही एक बहूव्यापी थेअरी आहे. - असे मी का म्हणतो आहे, ते नंतर सांगितलेले आहेच. प्रथम ह्या थेअरीची पार्श्वभूमी (उगम) पाहू व तीचा नेतेगिरीत कसा वापर होतो ते पाहू.
"प्रिझनर्स डिलेमा" ला आपण ह्या गोष्टीपुरते "कैद्यांचा पेच" असे म्हणू.
गृहीत धरा की, एका मोठ्या गुन्ह्यात दोन (अ आणि ब) संशयितांना पकडले आहे. पोलिस त्यांना वेगवेगळ्या कैद-खोलीत डांबून ठेवतात.