मानस -रामनवमी उत्सव सन १९०५
स्थळ: थोरले राम मंदिर, गोंदवले
वेळ- सकाळी ६ची
"बाळांनो, आज समोर राममंदिराकडे नका जाऊ बरं! आज तिथे उत्सव आहे, फार गर्दी होईल! इकडून आता नदीपात्रात बैलगाड्या सोडायला जातील लोक, उगा कुठल्या बैलगाडीच्या चाकाखाली यायला नको." इकडे तिकडे हुंदडू नका.. ": थोरले रामाच्या समोरच असलेल्या पिंपळाच्या झाडाची ढोली म्हणजे आमचे घर! आई, बाबा, आणि आम्ही चार बहिणी असे आमचे छोटेखानी खारुताईंचे कुटुंब तिथे गेल्या अनेक वर्षांपासून राहतोय.
आई नेहमी म्हणायची की आपले कुळाचे दैवत हे रामप्रभू. आणि म्हणायची, आपण खूप भाग्यवान आहोत कि आपण इथे, या भूमीत जन्माला आलोय.