वार्तालाप: दुर्जनांचा ही सन्मान करा.
दुर्जन प्राणी समजावे.
परी ते प्रगट न करावे.
सज्जना परीस आळवावे.
महत्त्व देऊनी.
समर्थ म्हणतात राजकारण करताना, दुर्जन लोक असतील ते ओळखून ठेवावे पण त्यांचा दुर्जनपणा प्रगट करू नये. इतकेच नव्हे, तर त्यांना सज्जनापेक्षाही अधिक मोठेपण देऊन प्रसन्न ठेवावे. राजकारणात दुर्जन लोक तुम्हाला त्रास देऊ शकता तर त्यांना महत्त्व देऊन संतुष्ट करावे. त्यांच्या उपयोग करून त्यांना आपल्या शत्रू वर सोडावे. योग्य वेळी त्यांना नष्ट ही करून टाकावे.
कथा स्मशानातील लग्नाची
तो जहाल नास्तिक होता चुकूनही त्याने कधी देवाला नमस्कार केला नव्हता. अंधश्रद्धेच्या विरुद्ध चालणाऱ्या मोहिमेत तो नेहमीच पुढे राहायचा. देवी देवतांची आणि संत महात्म्याची निंदा केल्यामुळे त्याला कधी-कधी मारही खावा लागायचा. पण समाजाच्या हितासाठी एवढे कष्ट तर सहन करावेच लागतात, असे त्याचे मत होते. त्याने स्वतःचे लग्न स्मशानात करण्याचे ठरविले. परिणाम वयाची पस्तीशी उलटली तरी त्याचे लग्न जमले नाही. शेवटी एक हुशार मुलगी त्याच्याशी, त्याच्या अटींवर लग्न करायला तयार झाली. पण त्यासाठी त्याला तिच्या बापाला लग्नापूर्वी हुंडा म्हणून रोख दहा लाख द्यावे लागले.
त्याने लग्नाची जय्यत तयारी सुरू केली.
वार्तालाप: जाणण्याचे विज्ञान
जाणते लोक ते शहाणे.
नेणते वेडे दैन्यवाणे.
विज्ञान तेही जाणपणे.
कळो आले.
समर्थ म्हणतात सतत ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करणारे लोक शहाणे असतात. जे लोक काहीही जाणण्याचा प्रयत्न करत नाही, अज्ञानी आणि आळशी असतात. त्यांना समर्थांनी नेणते म्हटले आहे. नेणते लोकांच्या नशिबी फक्त दुःख आणि दारिद्र्य येते. समर्थ पुढे म्हणतात विज्ञान हेही जाणण्यामुळे कळू लागते. जाणण्याचे विज्ञान म्हणजे काय हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते.
समर्थानी श्री सार्थ दासबोधाच्या माध्यमातून प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कसे सिद्ध करावे याचे मार्गदर्शन केले आहे.
‘यू’ का ‘नॉन-यू' ? : एक इंग्लिश भेदभाव
आणि का आनि? पुष्कळ का लई? होतं की व्हतं? किल्ली का चावी? वॉशर का वायसर? वस्तू मिळते का भेटते? ?.........
ही यादी आपल्याकडे कितीही वाढवता येईल. यातला कळीचा मुद्दा वाचकांच्या लक्षात आला असेल - संभाषणात प्रमाणभाषा की बोलीभाषा ?
आपल्या महाराष्ट्रात प्रमाणभाषा हीच जवळपास बोलीभाषा असणारा तथाकथित उच्चवर्ग एका बाजूस आणि प्रमाणभाषेशी काहीसा फटकून वागणारा आणि आपापल्या बोलीभाषेवरच जिवापाड प्रेम असलेला सामान्यवर्ग दुसऱ्या बाजूस, अशी एक भाषिक विभागणी पूर्वापार झालेली आहे; आजही ती कमीअधिक प्रमाणात जाणवते.
पीएनामा: झाडाची फांदी आणि एसीआर
(पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप ए पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस इत्यादींच्या दरबारात कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि थोडी कल्पना, पीएनामाच्या रूपाने सादरीकरण करण्याचा प्रयत्न) किस्से सांगण्यासाठी काही टोपण नावे मी अर्थात पटाईत, सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे)
(ऐकलेल्या किस्याचा आधारावर काल्पनिक कथा) .
त्यावेळी सीएसएसएस केडरमध्ये प्रमोशन दुर्मिळ होते. प्रमोशनसाठी १५ ते २० वर्ष वाट पाहत लागायची.
ओपनहायमर नोलन कलाकृती
छंद बायकोचा
(काल्पनिक कथा)
मैफिल वसंतोत्सव अंकात प्रकाशित ऋचा मायी लिखित कथा वाचत होतो. फावल्या वेळात:
बायकोने छंद जोपासला.
नवऱ्याला हिरा सापडला.
अंगणी वर्षाव झाला
नोटांचा.
तिचा छंद व्यवसायात बदलला. हीरे-मोत्यांचे दागिने तिने अंगावर घातले. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखी आणि समाधानी झालें. साठा उत्तराची कहाणी सफल व सुंदर झाली. मनात विचार आला, अरे ऋचा ३६ वर्ष आधीहि कथा लिहिली असती तर माझ्या सौ.ला एखाद छंद जोपासायला म्हंटले असते. तिचा फावला वेळ 'सास-बहू' पाहण्यात व्यर्थ गेला नसता. ऋचा, फार अन्याय केला तू माझ्यावर.
जीऐ मराठीतील मैलाचा दगड - जन्म शताब्दी वर्ष
दिव्याचे तेज, डोळ्यांचे वेज
कोण तिथे जाळीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी
कविता वाचीत आहे?
माझी उन्हे मावळली आहेत
माझी फुले कोमेजली आहेत
कालचा प्रकाश कालचा सुवास
मात्रा वेलांटीत शोधीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी
कविता वाचीत आहे?
आजची फुले आजच्या उन्हात
पाखरांचा शब्द पिकला रानात
माझी कविता तिथे वाचा
जिथे ती दिनरात घडत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी
कविता वाचीत आहे?
वा.रा कांत
शतकवीर फक्त क्रिकेट मधेच नसतात तर इतर प्रांतातही आसतात.असेच एक साहीत्य क्षेत्रा
मिसळपाव