श्रीशिवरायाचा जयकार
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about श्रीशिवरायाचा जयकार
- 6 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
श्रीशिवरायाचा जयकार
सह्याद्रीवर घुमतो अजून
तुझ्या शौर्याचा हुंकार ...
श्वासाश्वासातून निघतो
श्रीशिवरायाचा जयकार ...
म्लेंच्छांनी घातले घाव
घाव मातृभूमी वरी ..
परदास्याच्या अंधःकारातून
पेटला स्वातंत्र्याचा रवी ...
घेऊनी रामदासी मंत्र
गर्जला हा नृसिंह असा ...
दुमदूमला आसमंत सारा
थरथरल्या दाही दिशा ...
मावळे मराठे मर्द
झुंजले अर्पुनी प्राण ...
रोवले छातीत मोघलांच्या
तेजस्वी भगवे निशाण ...
तासिले कडे अभेद्य
घडविले दुर्ग बेलाग ...
सळसळती मनगटे मराठी
अन् समशेर ओकते आग ...
हिंदवी स्वराज्याचा ज्यानी
थाटला सं