Skip to main content

नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा

लेखक गणेशा यांनी बुधवार, 29/12/2010 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
-------------------नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा--------------------------- महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा सह्याद्रीच्या रांगामधूनी तेजसूर्य उगवतो मराठीचा नजरेच्या तीराने ही घायाळ होतो दुश्मन येथे शिवबाची ज्योत ठेवतो तेवत, बाणा मराठीचा कीतीही डोंगर फोडले परक्यांनी तरीही सह्याद्री सांधतो मनात, हा मान मराठीचा गरजले सारे जरी घरात आपापल्या नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये घुमतो आहे आवाज मराठीचा तेजोमय तलवार तळपते येथे ललकार मराठीचा विवेधतेतला नाद साज मराठीचा एक चिंगार मराठीचा गणेशा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1982
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

वरती शब्दांच्या झेंड्याला भगवा कलर दिला होता , पण प्रकाशित केल्यावर तो दिसत नाहिये . कसे देतात टेक्स्ट ला कलर ? मंडळ देवु शकेन का तसा रंग.

नजरेच्या तीराने ही घायाळ होतो दुश्मन येथे शिवबाची ज्योत ठेवतो तेवत, बाणा मराठीचा कीतीही डोंगर फोडले परक्यांनी तरीही सह्याद्री सांधतो मनात, हा मान मराठीचा वा ..!! क्या बात !!..मस्त ..आवडला मराठी बाणा .